Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
युगानुयुगांची आशा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय २३—“देवाचे राज्य जवळ आले आहे”

    “येशू देवाची सुवार्ता गाजवीत गाजवीत गालीलांत आला व म्हणाला, काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे; पश्चाताप करा, व सुवार्तेवर विश्वास ठेवा.’ मार्क १:१४, १५.DAMar 186.1

    मशीहाच्या जन्माची वार्ता सर्वप्रथम यहूदीया प्रातांत घोषीत करण्यात आली होती. यरुशलेमातील मंदिरात जखऱ्या याज्ञिकी सेवा करीत असताना त्याला येशूच्या वाटाड्याच्या जन्माची बातमी देण्यात आली होती. बेथलेहेमाच्या डोंगरावर देवदूतानी येशूच्या जन्माची वार्ता प्रसिद्ध केली होती. येशूचा शोध करीत करीत मागी लोक यरुशलेमाला आले होते. शिमोन व हन्ना यानी त्याच्या देवत्वाविषयी मंदिरात साक्ष दिली. “यरुशलेम व यहूदा” या सर्वांनी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे संदेश ऐकले होते, आणि धर्मसभेने लोकसमुदायासोबत पाठविलेल्या नियुक्तमंडळानेसुद्धा योहानाने येशूविषयी दिलेली साक्ष ऐकली होती. ख्रिस्ताला त्याचा पहिला शिष्य यहूदा प्रातात मिळाला होता. येशूचे सुरूवातीचे बहुतेक सर्व सुवार्ता कार्य याच ठिकाणी झाले होते. मंदिराच्या शुद्धीकरणाच्या कार्यांत चमकलेले त्याचे तेजस्वी देवत्व, रोग निवारक त्याचे चमत्कार, त्याच्या मुखातून निघालेले स्वर्गीय सत्याचे धडे, या सर्व गोष्टींनी स्पष्टपणे जाहीर केले होते की, बेथेसदा तळ्यावर रोग बरे करण्याचा चमत्कार केल्यानंतर धर्मसभेपुढे तो देवाचा सनातन पुत्र होता असा त्याने केलेला दावा स्पष्ट होता.DAMar 186.2

    जर इस्राएलाच्या अधिकाऱ्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला असता तर त्याने त्यांचा सर्व जगाला सुवार्ता गाजविणारे सुवार्तीक म्हणून सन्मान केला असता, त्यांचे गौरव केले असते. देवाच्या राज्याची व कृपेची सुवार्ता गाजविण्याची संधि सर्वांत प्रथम त्यांना देण्यात आली होती. परंतु इस्राएलाला त्यासाठी फुरसत नव्हती. यहूदी अधिकाऱ्यांच्या अंतःकरणातील मत्सर व अविश्वास इतक्या पराकोटीला पोहचले होते की, त्यामुळे लोकांची मने त्यांच्यापासून दूरावण्यात आली होती.DAMar 186.3

    धर्मसभेच्या सभासदांनी येशूच्या संदेशाचा अव्हेर करून त्याला ठार मारण्याचा बेत केला होता; म्हणून तो यरुशलेम, याजक लोक, मंदिर, धर्मपुढारी व नियमशास्त्राचे शिक्षण घेतलेले लोक या सर्वांना सोडून निघून गेला व सुवार्ता सांगण्याच्या त्याच्या कार्यासाठी आणि सर्व राष्ट्रांना सुवार्ता सांगणाऱ्यांना जमा करण्यासाठी तो इतर लोकांकडे वळला.DAMar 187.1

    ज्याप्रमाणे ख्रिस्ताच्या काळी प्रशासकीय वर्गाने मानवाचे जीवन व मानवाचा प्रकाश याला नाकारण्यात आले होते त्याचप्रमाणे त्यानंतरच्या प्रत्येक पिढीनेही नाकारले. यहूदातील ख्रिस्ताच्या माघार घेण्याच्या इतिहासाची पुन्हा व पुन्हा पुनरावृती होत आहे. जेव्हा धर्मसुधारकांनी देवाच्या वचनाचा संदेश दिला, तेव्हा प्रस्थापित मंडळीतून अलग होण्याचा विचार त्यांच्या मनात कधीच नव्हता. परंतु धर्मपुढारी नवा प्रकाश सहन करू शकत नव्हते. सत्यासाठी जे उत्सुक होते अशा लोकांचा शोध करण्यास त्यांना भाग पाडिले. आजच्या आपल्या काळात धर्मसुधारकाच्या अनुयायापैकी फारच थोडके अनुयायी धर्मसुधारकाच्या स्फूर्तिद्वारे कार्यप्रवृत केले जातात. अगदी थोडकेच लोक देवाच्या वचनाकडे कान देतात, आणि कोणत्याही स्वरूपात सादर केलेल्या सत्याचा स्वीकार करण्यास तयार असतात. अनेक वेळा जे लोक धर्मसुधारकाच्या पावलावर पाऊल टाकतात त्याना देवाच्या साध्या-सरळ वचनाची शिकवण जाहीर करता यावी म्हणून त्याच्या आवडत्या मंडळीला सोडून देणे त्यांना भाग पडते. अनेक वेळा जे प्रकाशाचा शोध करीत असताना, त्याना त्याच शिकवणीद्वारे त्यांच्या वाडवडीलाच्या मंडळीला सोडणे क्रमप्राप्त होते, यासाठी की त्यांना आज्ञापालन करता यावे.DAMar 187.2

    गालीलातील लोकांना असभ्य व अशिक्षीत असे समजून यरुशलेमातील गुरूकडून त्यांचा उपहास होत होता, तथापि त्यांनी तारणाऱ्याला त्याच्या कार्यासाठी अधिक उत्तम योग्य कार्यक्षेत्र उपलब्ध करून दिले होते. ते लोक उत्सुक व प्रामाणिक होते; ते धर्मवेडाच्या दडपणाखाली नव्हते. सत्याचा स्वीकार करण्यासाठी त्याची मने पूर्णपणे उघडी होती. गालीलात जाण्याकडून येशू एकांतवास किंवा लोकांपासून अलगपणा साधण्याचा प्रयत्न करीत नव्हता. तो प्रांत सर्व प्रांतातून आलेल्या लोकांच्या मिश्रणाच्या यहूदाहूनही दाट लोकवस्ती असलेला प्रांत होता.DAMar 187.3

    येशू लोकांना शिक्षण देत व लोकांचे रोग बरे करीत गालीलातून प्रवास करीत असताना लोकांचे थवेच्या थवे त्याच्याकडे येत होते. यहूदा आणि त्याच्या आसपासच्या प्रांतातूनही अनेक लोक आले होते. अनेक वेळा त्याला लोकापासून लपून राहावे लागत असे. लोकांच्या उत्साहाला इतके उधान आले होते की दक्षता बाळगणे आवश्यक झाले होते, नाही तर रोमी अधिकाऱ्यांच्या मनात बंडाची भीति उभी राहिली असती. यापूर्वी जगात असा काळ आला नव्हता. स्वर्ग लोकांत अवतरला होता. इस्राएलाच्या तारणाची प्रतीक्षा करणारे भूकेले तहानेले लोक आता दयावान तारणाऱ्याच्या दयेने तृप्त झाले होते.DAMar 187.4

    “समय पूर्ण झाला आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे; पश्चाताप करा, व सुवार्तेवर विश्वास ठेवा,’ हेच ख्रिस्ताच्या सुवार्ताकार्याचे ओझे होते. अशा प्रकारे स्वतः ख्रिस्ताने दिलेला संदेश भाकीतावर आधारभूत होता. जो “समय’ पूर्ण व्हावयाचा होता त्या समयाच्या कालखंडाची सविस्तर माहिती दानीएलाला गब्रिएल देवदूताकडून देण्यात आली होती. देवदूत दानीएलाला म्हणाला, “आज्ञाभंगाची समाप्ति व्हावी, पातकाचा अंत करावा अधर्माबद्दल प्रायश्चित करावे, सनातन धार्मिकता उदयास आणावी, दृष्टात व संदेश मुद्रित करावे आणि जो परमपवित्र त्याला अभिषेक करावा, हे घडून येण्यासाठी तुझे लोक व तुझे पवित्र नगर यासंबंधाने सत्तर सप्तके उरली आहेत.” दानीएल ९:२४. भाकीतांतर्गत एक दिवस म्हणजे एक वर्ष. गणना १४:३४; यहज्के. ४:६. पाहा. याचा अर्थ असा की सत्तर सप्तके किंवा चारशे नव्वद दिवस हे चारशे नव्वद वर्षांचे दर्शक आहेत. या कालखंडाच्या सुरूवातीची दिलेली वेळ अशी आहे: “हे कळून येऊ दे व समजून घे की यरुशलेमाचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून अभिषिक, अधिपति, असा जो तो येईपर्यंत सात सप्तकाचा अवकाश आहे; व बासष्ट सप्तके लोटल्यावर धामधुमीचा काळ असताही नगर, रस्ते व खदक यासह बांधितील.” दानीएल ९:२५. यरुशलेमाचा जीर्णोद्धार करण्याची व बांधण्याची आज्ञा इ. स. पूर्वी ४५७ मध्ये अहिशस्त राजाच्या अंमलात झाली. (एज्रा. ६:१४; ७:१, ९ पाहा). या वेळेपासून चारशे त्र्याऐशी वर्षे हा काळ इ. स. २७ पर्यंत पोहंचतो. भाकीतानुसार हा काळ अभिषिक्त मशीहाच्या अभिषेकापर्यंत पोहंचावयाचा होता. इ. स. २७ मध्ये झालेल्या बाप्तिस्म्याच्या वेळी येशूचा पवित्र आत्म्याद्वारे अभिषेक झाला, आणि त्यानंतर लवकरच त्याने त्याचे कार्य करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर “समय पूर्ण झाला आहे’ अशी घोषणा करण्यात आली.DAMar 188.1

    तद्नंतर देवदूत म्हणाला, “तो पुष्कळ लोकांबरोबर एक सप्तकाचा (सात वर्षे) पक्का करार करील.’ येशने त्याच्या सेवाकार्यास प्रारंभ केल्यानंतर सात वर्षे त्याला खास करून यहूदी लोकांसाठी कार्य करावयाचे होते; त्यापैकी साडेतीन वर्षे स्वतः ख्रिस्ताला कार्य करावयाचे होते आणि त्यानंतर त्याच्या शिष्यानी. “अर्ध सप्तकापर्यंत तो यज्ञ व अन्नबली बंद करील.” दानीएल ९:२७. वसंतऋतुत इ. स. ३१ मध्ये ख्रिस्त हा खरा यज्ञ वधस्तंभावर अर्पण करण्यात आला. यज्ञयागाच्या पद्धतीचे पावित्र्य व संकेतार्थ नाहीसे झाले हे दाखवून देण्यासाठी मंदिरातील पडदा दुभागला गेला. पृथ्वीवरील यज्ञ व अन्नबली बंद करण्याची वेळ आली होती.DAMar 188.2

    एक सप्तक म्हणजे सात वर्षे या कालावधीचा शेवट इ. स. ३४ मध्ये झाला. त्यावेळी यहदी लोकांनी स्तेफनावर दगडमार करण्याद्वारे त्यानी सुवार्तेच्या केलेल्या नाकारावर शिक्कामोर्तब केले; त्यानंतर छळामुळे पांगलेले शिष्य “वचनाची सुवार्ता सांगत देशातून फिरले.” (प्रेषित. ८:४); त्यानंतर लवकरच छळ करणाऱ्या शौलाचे परिवर्तन झाले, आणि तो इतर धर्मियांना सुवार्ता सांगणारा पौल बनला.DAMar 188.3

    ख्रिस्ताच्या जन्माचा समय, पवित्र आत्म्याने होणारा त्याचा अभिषेक, त्याचा मृत्यू आणि इतर धर्मियामध्ये सुवार्ता प्रसार या घटना निश्चितपणे दर्शविण्यात आल्या होत्या. ही भविष्य कथने व त्यांची येशूच्या कार्याद्वारे होणारी पूर्तता हे समजून घेण्याची यहूदी लोकांना लाभलेली एक संधि होती. शिष्यानी भाकीताच्या उपयुक्ततेचा महत्त्वाचा अभ्यास करावा असे येशूने त्याच्या शिष्याना आग्रही सांगणे होते. त्याच्या काळाविषयी दानीएलाला देण्यात आलेल्या भाकीताचा उल्लेख करताना येशू म्हणाला, “वाचणाऱ्यांनी हे ध्यानात आणावे.’ मत्तय २४:१५. पुनरुत्थानानंतर येशूने त्याच्या शिष्यांना “सगळ्या शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टीचा अर्थ सांगतिला.’ लूक २४:२७. तारणारा सर्व संदेष्ट्याद्वारे बोलला होता, “त्याच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता त्याने ख्रिस्ताची दुःखे व त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी ही पूर्वीच सांगितली.” १ पेत्र १:११.DAMar 188.4

    देवाच्या पुत्राच्या दुसऱ्या दर्जाचा गब्रिएल देवदूत दैवी संदेश घेऊन दानीएलाकडे आला होता. जे लवकर झाले पाहिजे ते प्रिय योहानाला दर्शविण्यासाठी आणि जे भाकितांतर्गत गोष्टी वाचतात, ऐकतात व पाळतात त्यांना आशीर्वाद देण्यासाठी ख्रिस्ताने ज्या “आपल्या दूताला” पाठविले होते तो गब्रिएल दूत होता. प्रगटी. १:३.DAMar 189.1

    “प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यास कळविल्याशिवाय खरोखर काहीच करीत नाही.” “गुप्त गोष्टी आमचा देव परमेश्वर याच्या आहेत. पण प्रगट केलेल्या गोष्टी आपल्या व आपल्या वंशजाच्या निरंतरच्या आहेत.” आमोस ३:७; अनुवाद २९:२९. परमेश्वराने आपल्याला या गोष्टी दिलेल्या आहेत, आणि भाकीताचा आदरयुक्त भावनेने व प्रार्थनापूर्वक अभ्यास केला तर आम्हाला त्याचा आशीर्वाद प्राप्त होईल.DAMar 189.2

    ज्याप्रमाणे ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाच्या संदेशाने त्याच्या कृपेच्या राज्याची घोषणा केली, त्याचप्रमाणे त्याच्या द्वितियागमनाचा संदेश त्याच्या गौरवी राज्याची घोषणा करतो. दुसरा संदेशही पहिल्याप्रमाणे भाकितावर आधारभूत आहे. देवदूताने शेवटल्या दिवसाच्या संदर्भात दानीएलला जे सांगितले ते काळाच्या अन्ताच्या संदर्भात समजून घ्यावयाचे होते. त्या काळी, “पुष्कळ लोक धुडाळीत फिरतील; व ज्ञानवृद्धी होईल.” “दुर्जन दुर्वर्तन करितील; दुर्जनापैकी कोणाला समज मिळणार नाही; पण जे सुज्ञ आहेत त्यास तो प्राप्त होईल.” दानीएल १२:४, १०. स्वतः तारणाऱ्याने त्याच्या येण्याची चिन्हे दिलेली आहेत. “या गोष्टी होताना पाहाल तेव्हा देवाचे राज्य जवळ आले आहे असे समजा.” “तुम्ही आपणास सांभाळा, नाहीतर कदाचित गुंगी, दारूबाजी व संसाराच्या चिंता यानी तुमची अंतःकरणे जड होऊन तो दिवस पाशाप्रमाणे अकस्मात तुम्हावर येईल.” “तुम्ही तर या सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.’ लूक २१:३१, ३४, ३६.DAMar 189.3

    या वचनात भाकित केलेल्या काळापर्यंत आपण पोहंचलो आहोत. अन्ताचा काळ आला आहे, संदेष्ट्याचे दृष्टात प्रगट झाले आहेत, आणि त्यांचे गंभीर इशारे प्रभूचे गौरवी आगमन अगदी नजीक आले आहे याचा निर्देश करीत आहेत.DAMar 189.4

    यहूदी लोकांनी देवाच्या वचनाचा विपरीत अर्थ लावून दुरूपयोग केला. त्यांना त्यांच्या चौकशीच्या (न्यायाच्या) समयाची जाणीव झाली नव्हती. ख्रिस्त व त्याचे शिष्य यांच्या अनेक वर्षांच्या सेवाकार्याच्या वेळी; प्रभूच्या निरोप्यांचा नाश करण्यास कटकारस्थाने रचण्यात त्यांनी घालविली. त्यांची मने जगीक मोठेपणाने ग्रासून टाकली, आणि त्यांच्याकडे चालून आलेली आध्यात्मिक राज्याची देणगी वायफळ गेली. तद्वतच आजही लोकांची मने भौतिक अभिलाषाने व्यापून टाकली आहेत, आणि ते वेगाने पूर्ण होत चाललेल्या भाकीताकडे आणि जलद गतीने येत असलेल्या देवराज्याच्या लक्षणाकडे मुळीच लक्ष देत नाहीत.DAMar 190.1

    “बुधजनहो, त्या दिवसाने चोरासारिखे तुम्हास गांठावे असे तुम्ही अंधारात नाही. कारण तुम्ही सर्व प्रकाशाचे पुत्र व दिवसाचे पुत्र आहा; आपण रात्रीचे व अंधाराचे नाही; यावरून आपण इतरासारिखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे.’ १ थेस्सल. ५:४-६.DAMar 190.2