Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
युगानुयुगांची आशा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ३९—“तुम्ही त्यांस खावयास द्या”

    मत्तय १४:१३-२१; मार्क ६:३२-४४; लूक ९:१०-१७; योहान ६:१-१३.

    ख्रिस्त त्याच्या शिष्यासह एकांतस्थळी विसावा घेत होता, परंतु त्यांना हा क्वचित मिळालेला शांततेचा काळ लवकरच भंग पावला होता. शिष्यांची कल्पना झाली होती की ते अशा ठिकाणी विसावा घेत होते की त्या ठिकाणी त्यांच्या विसाव्याच्या काळात त्यांना त्रास दिला जाणार नव्हता; परंतु स्वर्गीय गुरू दृष्टीआड होताच लोकसमुदाय “तो कोठे आहे.” अशी चौकशी करू लागला. त्यातील काही लोकांनी येशू व त्याचे शिष्य कोणत्या दिशेने गेले होते हे पाहिले होते. काहीजण त्यांना भेटण्यासाठी भूमार्गाने गेले, तर इतर त्यांच्या मचव्यातून जलमार्गाने सरोवराच्या पलीकडे गेले. वल्हांडण सण जवळ आला होता, आणि दूरदूरच्या ठिकाणाहून यात्रकरूंचे थव्वे येशूला पाहण्यासाठी यरुशलेमात जमा झाले होते. तेथे जमलेल्या लोकांच्या संख्येत अधिक भर पडून जमावाची संख्या, स्त्रीया व मुले वगळता पाच हजारापर्यंत पोहंचली. येशू सरोवराच्या किनाऱ्यावर पोहचण्या अगोदरच जनसुमदाय त्याची मार्गप्रतीक्षा करीत होता. परंतु त्यांच्या दृष्टीस न पडता तो किनाऱ्यावर पोहचला, आणि शिष्यासंगती थोडा वेळ त्याने घालविला.DAMar 315.1

    टेकडीच्या पायथ्यावरून त्याने त्याच्याकडे येणारा मोठा समुदाय पाहिला. त्यांना पाहून त्याचे अंतःकरण दयापूर्ण भावनेने उचंबळून आले. जरी त्याच्या विसाव्यात व्यत्यय आणला होता, तरी तो असहनशीलपणे वागला नव्हता. लोक येतच राहिले, असे जेव्हा त्याने पाहिले, तेव्हा एक महा अनिवार्य गोष्ट लक्ष पुरविण्याची मागणी करीत होती हे त्याला दिसून आले. “ज्या मेढरास मेंढपाळ नाही त्याच्यासारखे ते होते म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला.” एकांत स्थळ सोडून लोकांची सेवा करता येईल असे एक सोयीस्कर ठिकाण त्याने शोधून काढले. त्या लोकांना याजक व अधिकारी यांच्याकडून काहीच मदत मिळत नव्हती; परंतु जेव्हा येशूने त्यांना तारणाच्या मार्गाविषयी शिकविले तेव्हा त्यांना त्याच्याकडून (ख्रिस्ताकडून) आरोग्यदायी जीवनी पाणी मिळाले. DAMar 315.2

    लोकांनी देवाच्या पुत्राच्या मुखातून अव्याहतपणे बाहेर पडणारी दयेची वचने ऐकूण घेतली. आनंददायक, साधी व सरळ त्यांच्या आत्म्याना गिलादाच्या मलमासारखी वाटावी अशी वचने त्यांनी ऐकली. त्याच्या दैवी हाताच्या आरोग्यदायी स्पर्शाने, मृतवत झालेल्यांना आनंद व जीवन आणि रोगाने जर्जर झालेल्याना आराम व आरोग्य दिले. तो दिवस म्हणजे त्यांना पृथ्वीवर अवतरलेल्या स्वर्गासारखा वाटला, आणि म्हणून ते बराच वेळ अन्नाचा कणही न घेता तसेच राहिले होते याचे त्यांना अगदीच भान नव्हते.DAMar 316.1

    सरते शेवटी दिवस बराच सरला होता. सूर्य मावळतीला लागला होता, तरीसुद्धा लोक आजूबाजूला रेंगाळत होते. अन्नाचा एकही घास आणि क्षणभराचाही विसावा न घेता येशू दिवसभर श्रम करीत होता. तो थकव्याने व भूकेने गळून गेला होता. शिष्य त्याला श्रम करण्याचे थांबविण्यास विनंती करीत होते. परंतु त्याच्या भोवती जमलेल्या लोकसमुदायापासून तो पाय काढू शकत नव्हता.DAMar 316.2

    शेवटी शिष्य त्याच्याकडे आले आणि आग्रहपूर्वक विनंती करीत म्हणाले की निदान लोकांच्या सोयीसाठी तरी त्यांना जाण्यास सांगितले पाहिजे, अनेक लोक फार दूरदूरून आले होते आणि सकाळपासून त्यांनी काहीच खाल्लेले नाही. सभोवतीच्या गावांतून व खेड्यातून ते स्वतःसाठी अन्न विकत घेऊ शकतात. परंतु येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही त्यास खावयास द्या.’ नंतर फिलिप्पाकडे वळून तो फिलिप्पाला म्हणाला, “यास खावयास आपण भाकरी कोठून विकत आणाव्या?’ शिष्यांची परीक्षा पाहण्याकरिता तो असे बोलला. फिलिप्पाने महासमुद्रासारखा पसरलेल्या त्या लोकसमुदायावर नजर फिरविली आणि इतक्या प्रचंड लोकसमुदायाची अन्नाची गरज भागविणे हे किती अशक्य कोटीतील काम होते असा त्याने विचार केला. त्याने उत्तर दिले की प्रत्येकाला थोडे थोडे जरी दिले तरी, प्रत्येकाच्या वाट्याला येण्यासाठी पन्नास रुपायांच्या सुद्धा भाकरी पुरणार नाहीत. येशूने विचारले, या लोकाजवळ कितीसे अन्न आहे? यावर अंद्रिया त्याला म्हणाला, “येथे एक मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या पांच भाकरी व दोन मासळ्या आहेत; परंतु त्या इतक्यास कशा पुरणार?” त्या भाकरी व मासळ्या त्याच्याकडे आणण्यास येशूने शिष्यांना सांगितले. सुव्यवस्था ठेवली जावी, व तो काय करणार होता हे सर्वांनी पाहावे म्हणून लोकांना, पन्नास पन्नासाच्या व शंभर-शंभराच्या पंक्तीत बसविण्यास त्याने शिष्यांना सांगितले. ते सर्व झाल्यानंतर येशूने “त्या पांच भाकरी व ते दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून त्यास आशीर्वाद दिला, आणि ती मोडून लोकसमुदायाला वाढण्याकरिता शिष्याजवळ दिल्या.” “तेव्हा सर्वजण जेवून तृप्त झाले; आणि उरलेल्या बारा टोपल्या तुकडे त्यांनी उचलून नेले.” DAMar 316.3

    ज्याने लोकांना शांती व सौख्य साधनेचा मार्ग शिकविला होता तो त्यांच्या आध्यात्मिक गरजाबाबत जितका विचारी होता तितकाच त्यांच्या तात्कालिक गरजाबाबत होता. लोक थकले होते, गळून गेले होते. त्यात काखेत तान्ही बाळे असलेल्या माता होत्या. लहान मुले त्यांच्या झग्याना (पदराना) बिलगली होती. अनेक जण तासांचे तास उभेच राहीले होते. ख्रिस्ताची वचने ऐकण्यात ते इतके एकचित झाले होते की त्यांना खाली बसण्याचा विचार एकदाही आला नव्हता आणि गर्दी इतकी प्रचंड होती की एकमेकांना पायदळी तुडविले जाण्याचा धोका होता. येशू त्यांना विसावा घेण्याची संधि देत असे, आणि तो त्यांना खाली बसण्यास सांगत असे. त्या ठिकाणी गवताची हिरवळ पसरली होत, त्यावर आरामशीर ते बसू शकत होते.DAMar 316.4

    खऱ्या गरजा भागविण्या खेरीज येशूने कधीच चमत्कार केले नाहीत. प्रत्येक चमत्कार लोकांना, ज्या झाडाची पाने राष्ट्रासाठी आरोग्यदायी आहे त्या जीवनी झाडाकडे नेईल अशा स्वरूपाचा होता. शिष्यांनी सर्वांना वाढलेले अन्न हा अनेक उदाहरणाचा खजिना होता. वाढण्यात आलेले अन्न अगदी साधे होते. मासळ्या व जवाची भाकरी हे गालील समुद्राच्या आसपास वस्ती करणाऱ्या कोळी जमातीचे दररोजचे अन्न. ख्रिस्त त्या लोकांना सुग्रास भोजन देऊ शकला असता, परंतु केवळ इच्छा तृप्तीसाठी पुरविलेले अन्न त्यांच्या भल्यासाठी कोणताही धडा शिकवू शकले नसते. या धड्याद्वारे ख्रिस्ताने त्यांना शिकविले की मानवाला देवाने दिलेल्या नैसर्गिक गोष्टी भ्रष्ट केल्या आहेत. त्या निर्जन ठिकाणी-मानवी वसाहतीपासून अगदी दूर असलेल्या ठिकाणी ख्रिस्ताने दिलेला विसावा व पुरवलेले साधे अन्न यामुळे जसा या लोकांनी आनंद उपभोगला होता तसा विपरित रुचिच्या तृप्तीसाठी तयार केलेल्या विलासी भोजनाचा आनंद लोकांना कधीच उपभोगता आला नव्हता.DAMar 317.1

    सुरूवातीला आदाम व हव्वा जसे निसर्ग नियमाशी सुसबंधीत राहून त्यांच्या संवयीबाबत साधेपणाचे जीवन जगले होते तसेच आजचे लोक जगले असते तर मानवी कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी भरपूर पुरवठा उपलब्ध झाला असता. फार थोड्या अकल्पित गरजा उद्भवल्या असत्या, आणि देवाच्या पद्धतीने कार्य करण्यास पुष्कळ प्रसंग मिळाले असते. परंतु एका बाजूला रेलचेल व दुसऱ्या बाजूला कमतरता यातून स्वार्थ आणि अनैसर्गिक रुचिचा लाड यांनी जगात पाप व विपत्ति आणली आहे.DAMar 317.2

    येशूने चैनीच्या गोष्टीची आकांक्षा तृप्त करण्याद्वारे लोकांना स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न केला नाही. चैतन्यमय खळबळीच्या दिवसभरानंतर थकलेल्या व भूकेलेल्या प्रचंड लोकसमूदायाला ते साधे अन्न केवळ त्याच्या सामर्थ्याचीच खातरी नव्हती, तर त्यांच्या जीवनातील सर्वसाधारण गरजामधील वात्सल्यमय देखरेखीचीही होती. तारणाऱ्याने त्याच्या अनुयायाना जगिक चैनीच्या गोष्टी पुरवण्याचे अभिवचन दिलेले नाही; त्यांचे अन्न अगदी साधे असू शकेल, आणि अपुरेसुद्धा असू शकेल; ते गरीब असू शकतील; परंतु त्याच्या शब्दाने शास्वती दिली आहे की त्यांच्या गरजा भागविल्या जातील. भौतिक कल्याणापेक्षा अधिक उत्तम अशा त्याच्या सानिध्याचे टिकाऊ समाधानाचे अभिवचन दिले आहे.DAMar 317.3

    पाच हजार लोकांना भोजन देण्याद्वारे येशू निसर्गावरील पडदा वर उचलतो आणि आमच्या भल्यासाठी सातत्याने कार्य करणारी शक्ती प्रगट करतो. मातीतून अन्न-धान्याच्या उपजाद्वारे देव दररोज चमत्कार करीत आहे. पाच हजार लोकांना जेऊ घालण्याद्वारे जे कार्य केले होते तेच कार्य निसर्गाच्या हस्तकाद्वारे तडीस नेले जाते, साध्य केले जाते. लोक मशागत करतात आणि बी पेरतात, परंतु देवाची चैतन्य शक्तीच ते बी रुजविते. देवाचा पाऊस, ऊन (प्रकाश), आणि हवा, ही पिकाला “पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा’ याप्रमाणे तरारून वाढवतात. मार्क ४:२८. भूमिपासून मिळणाऱ्या अन्न-धान्याद्वारे दररोज अब्जावधि लोकांची जो उपजिविका करतो तो देवच करतो. ते देवाचे गौरव रास्त असलेल्या त्याच्या नावाला देत नाहीत. त्याच्या शक्तीच्या कार्याचे श्रेय निसर्गाच्या कार्यशक्तीला किंवा मानवी साधनाना देण्यात येत आहे. देवाऐवजी मानवाचे गौरव केले जात आहे. त्याच्या उत्तम देणग्यांचा स्वार्थासाठी दुरोपयोग केला जात आहे आणि त्या देणग्यांना आशीर्वादाऐवजी शाप गणण्यात येत आहे. देव हे बदलून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. तो अपेक्षा बाळगतो की त्याची प्रेमयुक्त दया समजून घेण्यास आणि त्याच्या कार्यशक्तीसाठी, त्याचे गौरव करण्यासाठी आपल्या मंद समजबुद्धीला चालना दिली जावी. त्याच्या देणग्याद्वारे आम्ही त्याला ओळखावे-स्वीकारावे अशी तो अपेक्षा करतो, यासाठी की त्या देणग्या त्याच्या उद्देशाप्रमाणे आम्हासाठी आशीर्वाद ठराव्या. तो उद्देश-हेतू साध्य व्हावा यासाठी ख्रिस्ताचे चमत्कार करण्यात आले होते.DAMar 318.1

    सर्व लोक जेवून तृप्त झाल्यानंतर बरेच अन्न उरले होते. परंतु अमर्याद सामर्थ्याचे सर्व साठे ज्याच्या हाताशी आहेत तो म्हणाला, “काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा.’ या शब्दामध्ये भाकरीचे तुकडे टोपलीत जमा करण्यापेक्षाही अधिक अर्थ होता. त्यांत दुहेरी धडा होता. काहीच व्यर्थ जाऊ देऊ नये. आपण कोणताही तात्कालिक फायदा वाया जाऊ देऊ नये. मानवाच्या कल्याणासाठी जे हितकारक असेल त्याकडे आपण दुर्लक्ष करू नये. सर्व जमा केले जाऊ दे, यासाठी की जगातील भूके कंगालाची भूक भागविली जाईल. आध्यात्मिक बाबतीतही तशीच दक्षता बाळगली पाहिजे. जेव्हा भाकरीचे तुकडे टोपलीत जमा केले होते तेव्हा लोक घरातील त्यांच्या मित्रांचा विचार करीत होते. ख्रिस्ताने आशीर्वादीत केलेल्या भाकरीचा भाग त्यांना मिळावा अशी त्यांची इच्छा होती. टोपलीत जमविलेले भाकरीचे तुकडे उत्सुक लोकांना वाटण्यात आले आणि ते सर्व प्रदेशांत नेण्यात आले. त्याचप्रमाणे भोजनाच्या वेळी जे हजर होते त्यांनी इतरांना, त्यांच्या आत्म्याची भूक भागविण्यासाठी स्वर्गातून खाली येणारी भाकर द्यावयाची होती. त्यांनी देवाविषयीच्या ऐकलेल्या अद्भूत गोष्टी पुन्हा सांगावयाच्या होत्या. काहीच सोडून द्यावयाचे नव्हते. त्यांच्या सार्वकालिक तारणाविषयी एकही शब्द जमिनीवर व्यर्थ पडू द्यावयाचा नव्हता.DAMar 318.2

    पाच भाकरीचा चमत्कार देवावरील भरवशाविषयी धडा शिकवितो. जेव्हा ख्रिस्ताने पाच हजार लोकांना जेवू घालून तृप्त केले तेव्हा अन्न हाताशी नव्हते. स्पष्टच बोलायचे झाले तर त्याच्या हाती काहीच साधन नव्हते. त्या निर्जन रानात स्त्रिया व मुले सोडून पाच हजार लोकात तो होता. वास्तविक त्याने स्वतः इतक्या लोकांना त्याच्यामागे येण्याचे आमंत्रण दिले नव्हते; आमंत्रण न देता किंवा न बोलावता ते आले होते; परंतु इतका प्रदीर्घ काळ त्याची वचने ऐकून घेतल्यानंतर ते भुकेने व्याकूळ व क्षीण होतील हे तो जाणून होता. कारण जेव्हा त्यांना अन्नाची आवश्यकता होती त्यावेळी तो त्यांच्यात एक झाला होता. ते आपापल्या घरापासून फार दूर अंतरावर होते, आणि रात्र तर पडत आली होती. त्यांच्यापैकी अनेकाजवळ अन्न विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. अर्थात त्यांच्यासाठी ज्याने अरण्यात चाळीस दिवस उपास केला होता तो त्यांना तसेच उपासपोटी घरी जाण्यास सांगणार नव्हता. देवाच्या तरतुदीने येशूला त्या परिस्थितीत ठेवले होते, आणि गरज भागविण्यासाठी अर्थ साहाय्याकरिता तो त्याच्या स्वर्गीय पित्यावर अवलंबून राहीला होता. DAMar 319.1

    जेव्हा आपण पेचात पडतो तेव्हा आपण देवावर विसंबून राहीले पाहीजे. आपण आपल्या जीवनात प्रत्येक कृती करताना सुज्ञता व चातुर्य यांचा उपयोग केला पाहिजे, यासाठी की आपल्या बेफिकीर वागण्यामुळे आपण अडचणीत-संकटात सापडू नये. देवाने पुरविलेल्या सुविधाकडे दुर्लक्ष करून, आणि त्याने दिलेल्या बौद्धिक सामर्थ्याचा दुरूपयोग करून आपण स्वतःला संकटात लोटू नये. ख्रिस्ताच्या कामदारांनी त्याच्या सूचना निक्षूण पाळल्या पाहिजेत. हे काम देवाचे आहे. आपण इतराच्या इच्छेप्रमाणे करू पाहतो तेव्हा त्याच्या योजना अंमलात आणल्या पाहिजेत. अहंभावनेला केंद्रबिंदु करण्यात येऊ नये; अहंपणाला सन्मान मिळू शकतच नाही. आपण जर आपल्याच कल्पनेप्रमाणे योजना करू लागलो तर देव आम्हाला आमच्याच चुकांच्या आधीन करील. परंतु आपण त्याच्या सांगण्याप्रमाणे चालल्यानंतर जर अडचणीच्या प्रसंगात अडकलो तर, तो आपली सुटका करील. आपण निराशमय परिस्थितीत धीर सोडू नये तर प्रत्येक आणिबाणीच्या काळात, ज्याच्या शब्दात अमर्याद सामर्थ्याचा साठा आहे त्याच्याकडे आपण मदत मागावी. अनेक वेळा आपण असाह्य परिस्थितीने घेरले जाऊ, अगदी अशाच वेळी आपण पूर्ण भरवशाने देवावर अवलंबून राहिले पाहिजे. देवाच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न केल्यामुळे गुंतागुंत्यात अडकलेल्या प्रत्येकाचे तो संरक्षण करील.DAMar 319.2

    “तू आपले अन्न भूकेल्यास वाटावे;” “तू लाचारास व निराश्रितास आपल्या घरी न्यावे;” “उघडा दृष्टीस पडल्यास त्यास वस्त्र द्यावे.’ यशया ५८:७-१०. अशी आज्ञा ख्रिस्ताने त्याच्या संदेष्ट्याद्वारे आम्हाला दिली आहे. त्याचप्रमाणे “सर्व जगांत जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा’ अशीही आज्ञा त्याने आम्हाला दिली आहे. मार्क १६:१५. तथापि कार्य किती तरी मोठे आहे आणि आपल्या हातातील साधने किती तरी अपुरी आहेत असे जेव्हा आम्हाला दिसून येते तेव्हा किती वेळा आमची अंतःकरणे खचून जातात आणि आमचा विश्वास आम्हाला निराश करतो. पाच भाकरी व दोन मासळ्या पाहून आंद्रियाने जे उद्गार काढले तेच आपणही काढतो, “त्या इतक्यास कशा पुरणार?” अनेक वेळा, घाबरून जाऊन आपण आपल्याजवळ जे आहे ते सर्व देण्यास व इतरांच्या कामी लावण्यास कचरतो, परंतु येशू आम्हाला आज्ञा करतो की, “तुम्ही त्यांस खावयास द्या.” त्याची ही आज्ञा म्हणजे एक अभिवचनच आहे; आणि सरोवराच्या किनाऱ्यावर ज्या शक्तीने प्रंचड समुदायाला जेवू घातले तिच शक्ती या अभिवचनाच्या पाठीमागे आहे.DAMar 319.3

    भूकेलेल्या अफाट समुदायाची ऐहिक गरज भागविण्याच्या ख्रिस्ताच्या कृतीमध्ये त्याच्या सर्व कामदारासाठी एक अतिशय गहन आध्यात्मिक धडा दिलेला आहे. देवाकडून ख्रिस्ताला मिळाले; त्याने ते शिष्यांच्या हाती दिले; त्यांनी लोकांच्या हाती दिले; आणि लोकांनी एकमेकांत वाटले. त्याचप्रमाणे जे ख्रिस्ताबरोबर एक झालेले आहेत, त्यांना इतरांना देण्यासाठी त्याच्याकडून स्वर्गीय अन्न म्हणजे जीवनाची भाकर मिळेल.DAMar 320.1

    देवावर पूर्णपणे विश्वास ठेवून, येशूने केवळ पाच भाकरीचा अल्पसा साठा हातात घेतला; जरी त्याचे कुटुंबिय शिष्य यांच्यासाठी त्यातील थोडा भाग होता, तरी त्याने त्यांना जेवण्यास सांगितले नाही, तर जेवण त्यांच्या हातात देण्यास सुरूवात केली व त्यांना लोकांना वाढण्याच्या कामास जुपले. त्याच्या हातातील अन्नाचा थोडासा साठा अतिशय मोठा झाला आणि स्वतःच जीवनाची भाकर असलेल्या ख्रिस्तापर्यंत पोहचणारे शिष्यांचे हात कधीच रिक्त झाले नाहीत. अल्पसा अन्नाचा साठा सर्वासाठी पुरेसा होता. सर्व लोक जेवून तृप झाल्यानंतर, भाकरीचे तुकडे जमा करण्यात आले आणि त्यानंतर ख्रिस्त व त्याचे शिष्य यांनी एकत्र येऊन स्वर्गातून पाठविलेले ते स्वादिष्ट अन्न सेवन केले.DAMar 320.2

    शिष्य हे ख्रिस्त व लोक यांच्यामधले संपर्काचे एक साधन होते. आजच्या त्याच्या शिष्यासाठी ती गोष्ट एक उत्साहवर्धक गोष्ट असली पाहिजे. सर्व शक्तीचा उगम असलेला ख्रिस्त हा एक महान केंद्रस्थान आहे. त्याच्या शिष्यांनी त्यांना लागणाऱ्या आवश्यक गोष्टी त्याच्यापासूनच मिळविल्या पाहिजेत. अतिशय हुशार, अतिशय धार्मिक वृतीचे, लोक त्यांना जे मिळते तेच ते इतरांना देऊ शकतात. ते स्वतः आत्म्याच्या गरजा भागविण्यासाठी काहीच देऊ शकत नाहीत. आम्हाला ख्रिस्ताकडून जे मिळते केवळ तेच आपण इतरांना देऊ शकतो; आपण इतरांना दिले तरच ख्रिस्ताकडून आम्हाला मिळू शकते. आपण सतत देत राहिलो, तर आपल्याला सतत मिळत राहील; आणि आपण जर अधिक दिले, तर आपणाला अधिक मिळेल. अशा प्रकारे आपण सतत विश्वास ठेवणारे, श्रद्धा ठेवणारे, पावणारे आणि देणारे होऊ.DAMar 320.3

    देवाचे राज्य अतिशय मंद गतीने पुढे सरकत आहे असे जरी दिसले आणि अशक्यता त्याच्या वाढीविरूद्ध साक्ष देत आहे असे जरी भासले, तरी त्याच्या वाढीचे कार्य पुढे जाईल. हे कार्य देवाचे आहे. तोच त्याच्यासाठी अर्थ सहाय्य, साधने पुरवील. खरे प्रामाणिक, शिष्य तोच पाठवील. भूकेलेल्यांना तृप्त करण्यासाठी त्याच्या हातात भरपूर अन्नाचा साठा असेल. नाश पावणाऱ्या लोकांना जीवनी वचन देण्यासाठी जे प्रेमाने कष्ट करतात आणि त्यांची पाळी आल्यानंतर भुकेलेल्या इतरांना अन्न देण्यासाठी जे हात पुढे करतात त्यांना देव विसरत नाही.DAMar 321.1

    आपण देवाचे कार्य करीत असताना, मनुष्यावर, त्यांच्या कलेवर व त्यांच्या सक्षमतेवर जास्तीत जास्त विसंबून राहणे धोक्याचे आहे. कारण त्यामुळे आपण, जो महान कार्यकर्ता आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. अनेकदा ख्रिस्ताचा कामदार त्याची जबाबदारी समजून घेण्याबाबत चूक करतो. जो सर्व सामर्थ्याचा साठा आहे त्याच्यावर विसंबून राहण्याऐवजी तो त्याची जबाबदारी संस्थावर टाकतो तेव्हा तो धोक्यात असतो. देवाचे कार्य करताना मानवी बुद्धिचातुर्यावर किंवा संख्याबळावर विश्वास ठेवणे ही फार मोठी चूक आहे. ख्रिस्ताचा यशस्वी कामदार हेतूची शुद्धता, आणि कळकळीचा साधा विश्वास ह्यावर अवलंबून असतो. ज्यांना ख्रिस्ताची ओळख नाही त्यांच्यासाठी वैयक्तिक जबाबदारी धारण केली पाहिजे, वैयक्तिक कर्तव्य पार पाडली पाहिजेत, वैयक्तिक प्रयत्न केले पाहिजेत. तुमच्यापेक्षा सक्षम आहे असे तुम्हाला वाटते अशा कोणावर तुमची जबाबदारी टाकण्याऐवजी तुम्ही तुमच्या क्षमतेप्रमाणे कार्य करा.DAMar 321.2

    “यास खावयाला आपण भाकरी कोठून विकत आणाव्या?” असा तुमच्या मनात प्रश्न आला, तर अविश्वास प्रगट करणारे तुमचे प्रतिउत्तर नसावे. जेव्हा शिष्यांनी “तुम्ही त्यांस खावयास द्या” अशी येशूने दिलेली आज्ञा ऐकली, तेव्हा त्यांच्यापुढे अनेक समस्या उभ्या राहिल्या. त्यांनी विचारले, अन्न विकत आणण्यासाठी आम्ही खेड्यात जावे काय? आजही तशीच परिस्थिती आहे, जेव्हा लोक जीवनाच्या भाकरीसाठी भूकेले आहेत तेव्हा देवाचे लोक विचारतात. त्यांची भूक भागविण्यासाठी आपण कोणाला तरी बोलवावे का? पण येशू काय म्हणतो? “पंक्ति करून त्यांस बसवा,” आणि त्याने त्यांना जेवण दिले. म्हणून हे लक्षात ठेवा की जेव्हा गरजू लोकांच्या घोळक्यात तुम्ही असता तेव्हा येशू तुमच्याबरोबर असतो. त्याच्या बरोबर संवाद करा. तुमच्या जवाच्या भाकरी येशूच्या हातात द्या. DAMar 321.3

    आपल्याजवळ असलेला पैसा देवाच्या कार्यासाठी पुरेसा नाही असे वाटले, परंतु आपण सर्वशक्तिमान देवाच्या सामर्थ्यावर भरवसा ठेवून, विश्वासाने पुढे पाऊल टाकले तर आपल्यासाठी अनेक मार्गाने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. जर कार्य देवाचेच आहे तर ते पूर्ण करण्यासाठी तो स्वतः अर्थसहाय्य पुरवील. जे काही अगदी थोडकेच असेल तेच स्वर्गीय देवाच्या सेवेसाठी शहाणपणाने व काटकसरीने वापरल तर, ज्या प्रमाणात वापरले जाईल त्याप्रमाणात ते वाढेल. ख्रिस्ताच्या हातातील अगदी थोडासा अन्नसाठा कडकडून भूक लागलेला लोकसमुदाय तृप्त होईपर्यंत कमी न होता अधिक झाला. आपण जर विश्वासरूपी हात पसरून मागण्यासाठी सर्व शक्तीचा साठा असलेल्या देवाकडे गेलो, तर आडकाठी आणणाऱ्या परिस्थितीतही आपण आपल्या कार्यात टिकून राहू आणि इतरांना जीवनाची भाकर देण्यास समर्थ होऊ.DAMar 321.4

    प्रभू म्हणतो, “द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल.’ “जो हात राखून पेरितो तो त्याच मानाने त्याची कापणी करील; आणि जो सढळ हाताने पेरितो तो त्याच हाताने त्याची कापणी करील... सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव शक्तिमान आहे; यासाठी की तुम्हास सर्व गोष्टीस सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी तुम्हाजवळ सर्व काही विपुल व्हावे. असे शास्त्रात लिहिले आहे, जो पेरणाऱ्याला बी पुरवितो, “तो चहूकडे वाटप करीत असतो; दारिग्रास दानधर्म करीत असतो; त्याचे नीतिमत्त्व युगानुयुग राहाते.” खाण्याकरिता अन्न पुरवितो तो तुम्हास बी पुरवील व ते पुष्कळ करील आणि तुमच्या धार्मिकतेचे फळ वाढवील; म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टीनी धनसपन्न व्हाल; त्या औदार्यावरून आमच्याद्वारे देवाचे आभार प्रदर्शन होते.’ लूक ६:३८; २ करिंथ. ९:६-११.DAMar 322.1