Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    सहानुभूति :

    मानसिक रोगावर उपचार करण्यासाठी फार मोठ्या बुद्धीमत्तेची गरज असते. एक वेदनादायी आजारी हृदय, एक निराश मनाला कोमलतेच्या उपचाराची गरज असते. अनेकदा कुटुबातील निराशा एक कीड असते. ही कीड आत्म्याला खाते आणि जीवन शक्ति कमी करते. कमजोर करते. कधी कधी पापामुळे पस्तावायामुळे शारीरिक रचना दर्बल होते. यामळे बौद्धीक संतुलन बिघडते. कोमल सहानुभूती करवी अशा प्रकारच्या अपंग लोकांचे सहाय्य केले जाते. चिकित्सकांना प्रथम त्यांचा विश्वास मिळवायचा आहे आणि मग त्यांना आरोग्यदान देणाऱ्या प्रभूकडे पाहण्यासाठी प्रोसाहित करावे. जर त्यांचा विश्वास खऱ्या चिकित्सकावर बसला तर ते लवकर बरे होतील कारण त्यांचा हात उद्धारकाच्या हाती असेल. यामुळे त्यांचे मन शांत होईल व ते बरे होतील.MHMar 190.1

    सहानुभूति आणि व्यवहार कुशलतेमुळे करण्यात येणाऱ्या उपचारामुळे रुग्ण लवकर बरा होईल कारण शांतपणे व सहनशीलतेने जापले कार्य करतात. जेव्हा एखादा डॉक्टर रुग्णाच्या बिछान्याजवळ निराश मुद्रेने येतो. रुग्णाला काही सहानुभूती न दाखविता यंत्रवत आपले काम करतो आणि जास्त चौकशी न करता निघून जातो रुग्णाला त्याच्याच विचारात सोडून अशा प्रकारच्या वागणूकीने रुग्णाचे अधिकच नुकसान होते. डॉक्टरचा निराशवादी चेहरा आणि रुग्णाबाबतीतील बेपवाईमुळे तो औषधोपचारांना प्रतिसाद देत नाही तो निराश होतो.MHMar 190.2

    जर डॉक्टरने स्वत:ला रुग्णाच्या ठिकाणी ठेऊन त्याच्या भावना जाणून रुग्ण ज्या सहानुभूतीची अपेक्षा करतो याची जाणी डॉक्टराला होईल आणि या गोष्टी लक्षात घेऊन तो रुग्णाशी सहानुभूतिने व प्रेमळ शब्दांना रुग्णाला वागणूक दिली तर त्याची इच्छा शक्ति प्रबळ होऊन तो उपचाराला प्रतिसाद देईल. ख्रिस्ताने हेच केले. त्याला सर्व दुखणाईतांचा कळवळा आला. आजारी लोकांच्या बाबतीत येशूने जो कळवळा आणि प्रेम दाखविले तेच प्रेम आणि ज्ञान डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये रुग्णाला मिळाले तर रुग्ण आशीर्वादीत होऊन तो नक्कीच बरा होईल. रुग्णाशी आपुलकीने आणि मोकळे पणाने बोलल्यास त्याच्यामध्ये विश्वास निर्माण होईल आणि अशाप्रकारे त्याला बरे होण्यास सहाय्य मिळण्याचे सिद्ध होईल असे ही डॉक्टर आहेत की जे रुग्णापासून त्याच्या आजाराची गंभीरता आणि ज्यामुळे तो दुःखी आहे ते त्याच्या पासून लपविणे शहाणपणा समजतात. अनेक डॉक्टरांना भीति वाटते की रुग्णाला त्याच्या आजाराची गंभीरता सांगितली तर तो निराश होईल म्हणून रुग्णांना ते त्याच्या बरे होण्याची खोटी आशा त्यांच्या मनात निर्माण करतात. धोक्याची सूचना न देताच कबरेची वाट दाखवितात. हा सर्व मुर्खपणाच आहे. रुग्णाला त्याच्या रोगाची गंभीरता त्याला सांगणे हे नेहमीच चांगले असते असे नाही. यामुळे तो भयभीत होऊ शकतो, त्याच्यावरील उपचारामध्ये अडथळे येऊ शकतात आणि ज्या रुग्णांना त्यांच्या आजाराची केवळ कल्पनाच आहेत त्यांना सुद्धा सांगून काही उपयोग नसतो. कारण या ५ लोकांपैकी अनेकजण विवेकहीन असतात असे लोक आत्मनियंत्रण करायला शिकलेले नसतात. त्यांची निवड वेगळी असते स्वत:च्या व इतरांच्या बाबतीत खोट्या गोष्टींच्या कल्पना त्यांच्यामध्ये असतात. त्यांच्यासाठी या गोष्टी वास्तविक असतात म्हणून जे लोक त्यांचा काळजी घेतात त्यांना त्यांना प्रेमाने धैर्याने व सहनशीलतेने त्यांच्याशी व्यवहार करावा आणि जर रुग्णांना त्यांच्या बाबतीत खरी गोष्ट सांगितली तर ते निराश होतील किंवा आपमानीत होतील. ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितले व मला अद्याप पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत. परंतु आताच तुमच्या ने त्या सोसवणार नाहीत.” (योहान १६:१२). तरीही प्रत्येक वेळी खरे सांगण्याची गरज नाही. परंतु धोकादेणे कधीही योग्य नाही. डॉक्टर आणि नर्स यांच्याकडून रुग्णाला कोणत्याही प्रकारे दुःख होईल असे वर्तन करु नये. जे असे करतात ते स्वतः त्या अवस्थेत येत नाहीत. जेथे त्यांना परमेश्वर सहाय्य करु शकत नाही आणि रुग्णाचा विश्वास नसल्याने सर्वात प्रभावशाली उपाय करण्याची संधीही गमाऊन बसतात इच्छा शक्तिलाही तितके महत्त्व दिले जात नाही. जितके द्यायला हवे. आपल्या इच्छा नेहमी जागृत आणि योग्य दिशेला ठेवा आणि पूर्ण देहाला ऊर्जा प्राप्त करुन देते आणि आरोग्य राखण्यासाठी अद्भुत सहाय्य मिळेल. रुग्णाबरोबर योग्य व्यवहार केल्यास एक शक्ति मिळते योग्य दिशेला रुग्णाचे मार्गदर्शन केल्याने त्यांच्या कल्पनांवर नियंत्रण केले जाते व ते वास्तवामध्ये येतात. देह व प्राण या दोन्हीच्या आजारांवर मात करण्याचे सहाय लाभेल. जीवनाबरोबर त्यांचे योग्य संबंध कायम करण्यासाठी इच्छा शक्तिचा प्रयोग केल्याने त्यांना बरे होण्यासाठी डॉक्टरांनी करण्यात येणाऱ्या उपचारावर योग्य प्रतिसाद रुग्णांकडून होतो. अनेक प्रकारचे रुग्ण असे आहेत जे या प्रकारच्या प्रयोगाने बरे होऊ शकतात. मनुष्याने आजारी व्हावे अशी परमेश्वराची मुळीच इच्छा नाही. त्याची इच्छा आहे की प्रत्येकानी निरोगी व आनंदी राहावे. आणि त्यांनी आपली मते निरोगी होण्यासाठी आपली तयारी करायलापाहिजे. तसे पाहता आजारी निराश व हताश लोकांनी आजारासमोर निष्क्रिय आणि निराश व हतबल होण्याऐवजी दुःखी जीवन जगण्याचा विरोध करायला हवा. आपले दुःख व वेदनांकडे दुर्लक्ष करुन आपल्या शक्तिनुसार स्वत:ला एखाद्या उपयुक्त कार्यामध्ये गुंतवून घ्यायला पाहिजे. याच जोडीला स्वच्छ व ताजी हवा आणि सूर्यप्रकाशामध्ये अनेक दुर्बल लोक बरे होतात आणि आपले आरोग्य पुन्हा प्राप्त करुन घेतात. बरे होण्यासाठी बायबलमधील नियम :MHMar 190.3

    जे लोक पुन्हा आरोग्यप्राप्ती करुन घेऊ इच्छितात व आजारांपासून सुरक्षित राहू पाहतात. त्यांच्यासाठी धर्मशास्त्रामध्ये एक धडा आहे. “द्राक्षारसाने मस्त होऊ नका, द्राक्षारसामध्ये बेतालपणा आहे पण आक्याने परिपूर्ण व्हा.” (इफिस ५:१८). अनैसर्गिक उतेजनात्मक औषधी किंवा कृत्रिम उपचाराने आजार बरे होत नाहीत. तसेच भूकेची औषधे वापरु न तृप्ती होत नाही किंवा खोट्याप्रेमाने आत्माही तृप्त होत नाही. जगामध्ये असे लोक आहेत की जे खरे प्रेम आणि परमेश्वरापासून दूर आहेत, आशाहीन जीवन जगत आहेत त्यांच्या इच्छा, अतृप्ती अव्यवस्थित वासना आणि स्वत:चा विवेक सोडून आपले जीवन जगत आहेत आणि येणाऱ्या जीवनामध्ये त्यांना मुळीच भविष्य नाही. अशा प्रकारच्या जीवन जगणाच्या आणि त्यातच राहणाऱ्या रुग्णांना त्यांच्यावर उपचार करणाऱ्यांनी त्यांच्याकडून बरे होण्याची अपेक्षा नसते. कारण त्यांच्या जीवनाच्या तो अभिशाप असो. जोपर्यंत ते अशा प्रकारच्या जीवनाला चिकटून आहे त्यांच्याविषयी कोणी काहीच करु शकणार नाही. तहानलेले आणि भुकेले प्राण तोपर्यंत तडफडतात जोपर्यंत त्यांची तृप्ती होत नाही. जे लोक स्वार्थाच्या विहिरीतून पीतात ते धोक्यात असतात. यातील उल्हासाला ते प्रसन्नता समजण्याची चूक करतात आणि जेव्हा उत्तेजन समाप्त होते तेव्हा ते निराश व दुःखी होतात.MHMar 192.1

    विश्वासामध्ये राहणे आणि आत्म्याची खरी शांतीचे एकच मूळ आहे. येशूने आपल्या बोलण्यामध्ये सांगितले होते. “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.” (मत्तय ११:२८).” मी तुम्हास शांती देऊन ठेवतो, मी आपली शांति तुम्हास देतो, जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही तुमचे अंत:करण असस्थ अथवा भयभीत होऊ नये.” (योहान १४:२७). ही शांति स्वतः येशू आपणास देतो ही शांति मिळविण्यासाठी आम्हाला येशूचा स्वीकार करणे आवश्यक आहे.MHMar 193.1

    ख्रिस्त जीवनीपाण्याचा उगम आहे. याविषयी अनेकांना ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे. त्यांनी धैर्य दया तसेच मन लावून शिकून घ्यावे की त्यांनी स्वर्गीय शक्ति मिळविण्यासाठी स्वत:ला परमेश्वरास शरण जाणे आवश्यक आहे. यामुळेच रोग आजारातून त्यांना मुक्ति मिळू शकते. जेव्हा परमेश्वराची प्रीति आत्म्यांच्या अंधारामध्ये चमकते. यामुळे चिंता, निराशा व अतृति नष्ट होते आणि संतोष जनक प्रसन्नता मनाला बळ देते आणि शरीराला आरोग्यदायी शक्ति देते.MHMar 193.2

    आम्ही पीडा आणि वेदना युक्त जगामध्ये राहात आहोत. स्वर्गीय घराच्या प्रतीक्षेमध्ये परीक्षा कष्ट व कठीण पणा आपली वाट पाहात आहेत. परंतु असे अनेक लोक आहेत की ते सतत समस्याची अपेक्षा करुन जीवनाचे ओझे दुप्पट करतात. जर ते संकटे आणि समस्यांचा सामना करतात त्यांना वाटते की सर्व काही संपणार आहे आणि त्यांच्या वाट्यालाच सर्व समस्या आल्या आहेत आणि ते निश्चितच त्यांचा सामना करतील. अशा प्रकारे ते स्वत:वर आपत्ति आगतात आणि चारीबाजूला अंधार करुन घेतात. त्यांच्यासाठी जीवन एक ओझे होते. परंतु असे व्हायला नको त्यांनी आपले विचार बदलण्याचा दृढ संकल्प करण्याचा निश्चय करावा आणि प्रयत्न केला तर बदल होऊ शकतो. त्यांना या जीवनातील आणि येणाऱ्या जीवनाच्या प्रसन्नतेच्या विचारावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कल्पनाच्या काळ्या चित्रांवरील लक्ष काढून अहृष्य अनंत काळच्या जीवनाकडे लक्ष लावावे. कारण परमेश्वर त्यांच्या मार्गामध्ये सार्वकालिक जीवन पसरवितो.MHMar 193.3

    मानवाच्या प्रत्येक परीक्षेमध्ये नेहमीच मदत करीत आला आहे. रानामध्ये जेव्हा इस्राएललो कडू पाण्याच्या झऱ्याजवळ आले तेव्हा मोशेने परमेश्वराला विनंती केली. परंतु परमेश्वराने कोणते नवे औषध दिले नाही तेथे जे होते ते दिले. एक झुडूप तेथे होते त्याची फांदी कडू पाणी गोड करण्याचे गुण त्यामध्ये परमेश्वराने टाकले होते. जेव्हा पाणी स्वच्छ व गोड झाले तेव्हा सर्व पाणी पिऊन तृप्त झाले. प्रत्येक परीक्षा ज्या आपल्यावर येतात व आपण परमेश्वराला विनंती केली तर नेहमी तो सहाय्य करतो. त्याच्या वचनामध्ये लिहिण्यात आलेले अभिवचन वाचण्यासाठी आपले डोळे उघडले जातील. पवित्र आत्मा आपल्याला शिकविल की त्याने देऊ केलेल्या आशीर्वादाचा कशा प्रकारे उपयोग करावा. यामुळे तो आशीर्वाद आम्हास आमचे दुःख दूर करण्यासाठी उपयोगी पडेल. कारण जो कडू घास आमच्या ओठावर येतो तो आपल्या आजाराला एक औषधासारखा होईल.MHMar 194.1

    आम्हाला आमच्या भविष्यातील कठीण समस्या आणि असंतुष्ट भावनांना हृदयातील भीति यांना थारा देऊ नये. तर परमेश्वराचा आश्रय घ्यावा. “पण त्याने माझा आश्रय धरावा. त्याने मजबरोबर दोस्ती करावी.” (यशया २७:५). जे कोणी आपले जीवन त्याचे मार्गदर्शन आणि त्याच्या सेवेसाठी समर्पित करतात त्यांना तो कधीच कोणाच्याही दबावाखाली ठेवीत नाही ते कधी निराश होत नाहीत. आमची परिस्थिती कशीही असो. त्याच्या वचनाचे आपण पालन केले तर तो आमचा एक मार्गदर्शक होतो. आमची कोणतीही व कितीही मोठी समस्या असू दे तो आमचा एक सल्लागार आहे. आमचे दुःख, समस्या, एकटेपण कसेही असो आम्हाला सहानुभूती देणारा तो आमचा मित्र आहे. जरी आम्ही निष्काळजीपणाने चुका करतो तरी आपला परमेश्वर आपणास सोडत नाही. आपण एकटे आहोत असे आपण कधीही समजू नये कारण स्वर्गीय देवदूत आपले साथीदार आहेत. ज्या सहाय्यकाला आमच्यासाठी पाठविण्याचे ख्रिस्ताने वचन दिले होते ते हे आहेत. परमेश्वराच्या नगरात जाण्यासाठी कोणतेच अडथळे नाहीत ज्यामध्ये परमेश्वरावर विश्वास ठेवणारे कधी विजयी होणार नाहीत. तर ते विजयीच होतील. असा कोणता धोका नाही ज्यामधून ते सुटणार नाहीत. असे कोणते दुःख शोक नाहीत किंवा मनुष्य दुर्बल नाही ज्यातून परमेश्वर सुटका करणार नाही. अशी कोणतीच समस्या नाही जी परमेश्वर सोडवू शकणार नाही.MHMar 194.2

    कोणालाही निराशा आणि उदासपणापुढे हार मानण्याची गरज नाही. सैतान तुमच्यासमोर कठीण समस्या घेऊन येतो. कारण तो निर्दयी आहे. “तुमचा त्रस्त निराशजनक आहे, तुमची सुटका अशक्य आहे.’ परंतु ख्रिस्तामध्ये तुम्हाला आशा आहे. परमेश्वर म्हणत नाही तुम्ही आपल्या शक्तिने विजयी व्हा तर तो आम्हाला त्याच्याकडे येण्यास सांगतो आम्ही आमच्या शारीरिक व मानसिक समस्यासाठी कष्ट करतो. शरीर व आक्याच्या ओझ्याने दबलेल्या आपणा सर्वांना तो स्वतंत्र करण्यासाठी पाचारण करीत आहे.MHMar 195.1

    मनुष्य बनून जो या जगामध्ये आला त्याला ठाऊक आहे की द:खी मनुष्याला सहानूभूति कशी दाखवावी. ख्रिस्त केवळ प्रत्येक व्यक्तिला ओळखितो असे नाही तर त्याच्या समस्या, त्याच्या गरजा, परीक्षा व त्याला त्रासदायक असणारी सर्व परिस्थिती तो जाणतो. परमेश्वराच्या प्रत्येक दु:खी मुलांकडे त्याचे दयेचे हात पसरलेले असतात. जे लोक ज्यांना जास्त त्रास पीडा आहेत. त्यांच्यासाठी अधिक दया व सहानुभूती मिळते. आमच्या दुबळतेमुळे तो दुःखी होतो आणि त्याची इच्छा आहे की आम्ही आमची सर्व दु:खे व त्रास त्याच्या चरणाजवळ ठेवायच्या आहेत.MHMar 195.2

    स्वत:ला पाहणे व स्वत:च्या भावनांचे अध्ययन करणे मध्ये शहाणपण नाही. जर आम्ही असे करतो तर आपला वैरी अधिक दुःख व समस्या निर्माण करतो. यामुळे आपले साहस व विश्वास अधिकच कमी होतो. आपल्या भावनांचे अध्ययन करणे आणि त्यामध्ये वाहून जाणे. संशयाचे स्वागत करणे, स्वत:च्याच त्रासामध्ये गुरफूटून जाणे यामध्ये शहाणपण नाही तर स्वत:वरची दृष्टी काढून येशूकडे पाहायचे आहे.MHMar 195.3

    जेव्हा त्रास पीडा आपल्यावर हल्ला करतात तेव्हा आपण चिंता आणि अंधकार यामध्ये गुंतलो जातो. तेव्हा त्या ठिकाणी पाहा जेथे आपण शेवटी प्रकाश पाहिला होता. ख्रिस्ताचे प्रेम आणि त्याच्या काळजीमध्ये विश्राम करा. जेव्हा पाप आपल्या हृदयावर राज्य करण्यासाठी सरसावते, संघर्ष करते. अपराधी भावना आपणास व आत्म्याला दाबून टाकते. आपल्या विवेकावर दबाव येतो. आपला अविश्वास मनाला उदास करतो. पण लक्षात ठेवा की ख्रिस्ताची कृपा आपल्या पापावर विजय मिळविण्यास पूरे आहे. त्याच्या कृपेने आपल्या जीवनातील अंधार दूर होतो उद्धारकाशी आपण जेव्हा वार्तालाप करतो. तेव्हा आपण शांतीच्या क्षेत्रात प्रवेश करतो.MHMar 195.4

    “परमेश्वर आपल्या सेवकांच्या जिवाचा उद्धार करतो त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोष पात्र ठरत नाही.” (स्तोत्र ३४:२२).MHMar 196.1

    “परमेश्वराचे भय धरल्याने श्रद्धा दृढ होते आणि ज्यांच्या ठायी श्रद्धा असते त्यांच्या मुलास ती आश्रयस्थान होते. (नीतिसूत्रे १४:२६).MHMar 196.2

    “यावर सियोन म्हणाले, परमेश्वराने माझा त्याग केला आहे, प्रभु मला विसरला आहे स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही. एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय ? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. पाहा मी तुला आपल्या तळ हातावर कोरुन ठेवले आहे. तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहेत.” (यशया ४९:१४-१६). तू भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे घाबरु नको कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ति देतो, मी तुझे सहाय्यहि करीन मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरिते.” (यशया ४१:१०).MHMar 196.3

    “याकोबाच्या घराण्या इस्त्राएल घराण्यातील सर्व अवशिष्ठ लोक हो, गर्भवासापासून मी तुमचे ओझे वाहिले, उदरात होता तेव्हापासून तुम्हास मी वागविले, माझे ऐका तुमच्या वृद्धापकाळापर्यंत हि मीच तो आहे. तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हास वागवीन निर्माण कर्तामीच आहे. वागविणारा मीच आहे. मी खांद्यावर वागवून तुमचा बचाव करीन.” (यशया ४६:३-४).MHMar 196.4

    शरीर आणि प्राणाचे आरोग्य वाढविण्यासाठी स्तुति आणि कृतज्ञता करणे यापेक्षा अधिक काहीच नाही. निराशा आणि नाराजी विचारांना आणि भावनांना विरोध करणे हे आत्म्याचे सकारात्मक कर्तव्य आहे. जसे की प्रार्थना करणे आपले कर्तव्य आहे. जर आपण स्वर्गाच्या मार्गावर आहे तर आम्ही विलाप करणे, दुःखी उसासे टाकणे आणि तक्रार करणे यासारख्या समुहासारखे आपण आपल्या पित्याच्या घरी जाऊ शकतो?MHMar 196.5

    स्वत:ला ख्रिस्ती समजणारे लोक सतत कुरकुर करतात, ते प्रसन्न आणि आनंदी राहण्यासाठी पाप समजतात ते वास्तविकता ख्रिस्ती नसतात. जगामध्ये ते दुःखाने भरलेले सुख पाहतात. सुंदर फुले गोळा करण्याऐवजी ते सुकलेली पाने गोळा करतात. असे लोक पहाडावरील सुंदर हिरवळ व सृष्टी सौंदर्य पाहात नाहीत सृष्टीमधील मंजूळ आवाज ते ऐकत नाही. असे लोक ख्रिस्तामध्ये नसतात ते स्वत:साठी दुःख आणि अंधार आणतात. ते नेहमी उदास राहतात. परंतु त्यांच्यामध्ये चमक आणि धार्मिकतेचा प्रकाश येऊ शकतो आणि त्यांच्या हृदयात परमेश्वराचा आनंद येऊ शकतो. असे होऊ शकते की वेदनांमुळे आपले मन सतत अंधारामध्ये राहले अशावेळी आपण विचार करु शकत नाही. आपल्याला ठाऊक आहे की येशू आपल्यावर प्रेम करतो. तो आपला दुबळापणा ओळखतो. आपण त्याच्याजवळ जाऊन विश्रांती घेऊ शकता.MHMar 197.1

    हा निसर्गाचा नियम आहे की जसे आपण आपल्या भावना शब्दामध्ये व्यक्त करतो तेव्हा त्यांना बळ मिळते. जेव्हा शब्द विचारांना व्यक्त करतात परंतु हेही सत्य आहे की विचार शब्दांचा पाठपुरावा करतात. जर आपण आपला विश्वास व्यक्त करतो तर ज्या आशीर्वादामध्येराहतो जो आपणास ठाऊक आहे त्यामध्ये आपण आनंदीत राहिलो तर परमेश्वराची दया आणि त्याची महान प्रीति आम्हास आमच्या विश्वासामध्ये अधिक बळकट करील आणि त्याचा धन्यवाद करण्यामध्ये जो आशीर्वाद प्राप्त होतो त्याचे वर्णन करण्यासाठी कोणतीही जीभ करु शकणार नाही व कोणतीही बुद्धी समजू शकणार नाही. येथे पृथ्वीवर सुद्धा आम्हाला पाण्याच्या प्रवाहासारखा झरा आपणास मिळू शकतो. जो कधीही आटणार नाही. कारण तो परमेश्वराच्या सिंहासनापासून निघतो.MHMar 197.2

    चला तर आता आपण आपले ओठ आणि हृदये उघडून त्या परमेश्वराच्या अतुल प्रेमाची स्तुति आणि गौरव करण्यासाठी स्वत:ला सुशिक्षित करु या. चला आपण आपल्या आत्म्यांना आशावादी करुन त्याच्या प्रकाशात राहण्याचे शिक्षण घेऊ या हा प्रकाश कालवरीच्या क्रुसावरुन चमकत आहे. आपण सर्व त्या स्वर्गीया राजाची प्रजा आहे त्याचे संतान आहे हे कधीही विसरु नये. त्या प्रभूची आपण मुले व मुली आहोत हे आमचे भाग्य आहे की त्याने आम्हाला शांति आणि विश्रांती दिली आहे.MHMar 197.3

    “ख्रिस्ताची शांति तुमच्या अंत:करणात राज्य करो, तिच्या करिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण करण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा.” (कलसै ३:१५). आपण आपल्या समस्या व त्रास विसरुन सुवेळेसाठी परमेश्वराची स्तुति करु या जी त्याने आम्हाला त्याचा महिमा करण्यासाठी जीवन जगण्याची संधी आपणास दिली आहे. प्रत्येक नवीन जीवनाचा ताजा आशीर्वाद तो आम्हास देतो. प्रेमाने व दयेने तो आपली काळजी घेतो यासाठी रोज त्याची आराधना करण्यासाठी आपण आपल्या मनात इच्छा प्रगट करु या. जेव्हा सकाळी आम्ही डोळे उघड तो तेव्हा रात्रभर तो आमचे रक्षण करतो. याबद्दल परमेश्वराचा धन्यवाद करु या. सकाळी दुपारी व संध्याकाळच्या वेळी आपला सुगंधी प्रार्थनारुपी धूप स्वर्गाकडे आभार प्रदर्शनासाठी जाऊ द्या.MHMar 198.1

    जेव्हा कोणी तुम्हाला विचारले की तुम्ही कसे आहात तर त्यांची सहानुभूती मिळविण्यासाठी आपले दुःख त्याला सांगण्याचा प्रयत्न करु नका. आपल्या विश्वासाची कमतरता आणि दुःख व त्रासाविषयी काही सांगू नका. कारण परीक्षा घेणारा सैतान हे ऐकून आनंदित होतो. जेव्हा आण दुःखद गोष्टी विषयी बोलतो तेव्हा आपण सैतानाची स्तुति करतो. सैतानाच्या महान शक्तिविषयी आपण विचार करु नये. ती आपणावर विजय मिळवू पाहाते. सहसा आपण सैतानाच्या शक्तिविषयी चर्चा करुन स्वत:ला त्याच्या हाती सोपवित असतो. याऐवजी आपण परमेश्वराच्या महान शक्तिविषयी व त्याच्या प्रीतिविषयी चर्चा करावी. ते आपल्या हिताचे आहे. ख्रिस्ताच्या अतुल्य शक्ति आणि प्रीतिविषयी चर्चा करा व त्याची स्तुति करा. संपूर्ण स्वर्ग आमच्या मुक्तिची वाट पाहात आहे. उद्धार पावणाऱ्या लोकांची सेवा करण्यासाठी परमेश्वराने आपल्या लक्षावधी दूतांना आज्ञा दिली आहे. आमच्या वाईटापासून ते आमचे संरक्षण करतात आणि आमचा नाश करु पाहणाऱ्या अंधाऱ्या शक्तिंनाते मागे ढकलून देतात. जेव्हा आमच्यावर त्रास व संकटे येतात तेव्हा आणि प्रत्येक क्षणासाठी परमेश्वराचा धन्यवाद करण्यासाठी आपल्याकडे कारणे नाहीत काय ? स्तुतिगीते :MHMar 198.2

    आमच्या गीतांमधून त्याचा धन्यवाद करावा. जेव्हा आपल्यावर मोहपाश येतात तेव्हा भावना व्यक्त करण्याऐवजी आपण त्याचा विश्वासाने धन्यवाद करु व वस्तुतिगीते गाऊ या. आवाज उंच करुन त्याचा महिमा करु या गीत एक असे हत्यार आहे की जे निराशेच्या विरुद्ध त्याचा वापर केला जातो. अशा प्रकारे जेव्हा आम्ही आमच्या मुक्तिदात्याच्या उपस्थितीच्या प्रकाशासाठी तोंड उघडतो तेव्हा आम्हाला आरोग्य आणि परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त होईल.MHMar 198.3

    “परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. परमेश्वराने उद्धारिलेले जन असे म्हणोत कारण त्यास त्याने शत्रूच्या तावडीतून मुक्त केले आहे.” (स्तोत्र १०७:१२).MHMar 199.1

    “हे माझ्या जिवा परमेश्वराचा धन्यवाद कर हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर त्याचे सर्व उपकार विसरु नको.” (स्तोत्र १०३:१-२).MHMar 199.2

    “कारण त्याने तान्हेल्या जिवांस तृप्त केले भुकेल्या जिवास उत्तम पदार्थांनी संतुष्ट केले. काही जणळलेशानी व बेड्यांनी जखडले होते अंधारात व मृत्यु छायेत बसले होते. कारण त्यांनी देवाच्या आज्ञाविरुद्ध बंडाळी केली होती. परात्पराचा बोध तुच्छ मानला होता. त्यास कष्ट देऊन त्याने त्यांचा ताठा उतरविला होता ते पतन पाषलेव त्यास सहाय्यक करण्यास कोणी नव्हता. तेव्हा त्यांना संकट समयी धावा केला आणि परमेश्वराने त्यांस अंधारातून व क्लेशातून बाहेर आणि लेव त्यांची बंधने तोडून टाकली. परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यासाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोकत्याचे उपकार स्मरण करोत.” (स्तोत्र १०७:९१५).MHMar 199.3

    “हे माझ्या जिवा तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस ? देवाची आशाधर तोमाझा देव मला दर्शन देऊन माझाउद्धार करितो म्हणून मी त्याचे पुनरपी गुणगान गाईन’ (स्तोत्र ४२:११). “सर्वास्थितीत उपकार स्मरण करा, कारण तुम्हाविषयी येशूख्रिस्तामध्ये देवाची इच्छा हीच आहे.” (१ थेस्सलनी ५:१८). ही आा या गोष्टीचे आश्वासन देते की आतापर्यंत ज्या गोष्टी आमच्या विरुद्ध दाखविल्या आहेत त्यासुद्धा आमच्या भल्यासाठी कार्य करतात. ज्या गोष्टीमुळे आमचे नुकसान होते. त्यासाठी आमचा परमेश्वर कधीही धन्यवाद करण्यास सांगत नाही. “परमेश्वर माझा प्रकाश माझे तारण आहे, मी कोणाची भीति बाळगू? परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे मी कोणाचे भय धरु?’ (स्तोत्र २७:१).MHMar 199.4

    “कारण विपत्काली तो मला आपल्या मंडपात लपविल. मला तो आपल्या डेऱ्यात गुप्त स्थळी ठेवील तो मला खडकावर उचलून ठेवील. आता सभोवतालच्या माझ्या वैऱ्यापुढे माझे मस्तक उन्नत होईल. त्याच्या डेऱ्यात मी उत्सवपूर्वक यज्ञ करीन. मी गायनवादन करीन. परमेश्वराचे गुणगान गाईन’ (स्तोत्र २७:५-६).MHMar 200.1

    “मी धीर धरुन परमेश्वराची वाट पाहिली तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. नाशाच्या खाचेतून दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढिले माझे पाय खडकावर ठेविले आणि माझी पावले स्थिर केली त्याने माझ्या मुखात नवे गीत आमच्या देवाचे स्तोत्र घातले हे पाहून पुष्कळ भय धरतील व परमेश्वरावर भाव ठेवीतील.” (स्तोत्र ४०:१-३).MHMar 200.2

    “परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे त्याच्यावर मी अंत:करणपूर्वक भाव ठेविला आणि मी सहाय्य पावलो, म्हणून माझे हृदय उल्हासते मी गीत गाऊन त्याचे स्तवन करीन.” (स्तोत्र २८:७).MHMar 200.3

    आजारातून बरे होण्याचा सर्वात मोठा अडथळा म्हणजे रुग्णाचे स्वत:कडेच लक्ष असणे अनेक दुर्बळ लोकांना वाटते की प्रत्येकाने मला सहानुभूती दाखवावी आणि त्यांना सहाय्य करावे. परंतु त्यांची गरज ही आहे की त्यांनी स्वत:वरील लक्ष काढून इतरांकडे पाहावे. दुसऱ्यांच्या देखरेखीकडे पाहावे. त्यांच्याविषयी विचार करावा.MHMar 200.4

    तसे पाहता द:खी कष्टी व आजारी लोकांसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली जाते आणि ते योग्यही आहे. आम्हाला प्रार्थना करायला हवी की परमेश्वर अंधारातील मनाला प्रकाश दाखवावा आणि शोक करणाऱ्या हृदयाचे सांत्वन करावे. परंतु परमेश्वर त्या लोकांच्या प्रार्थनांची उत्तरे देतो जे स्वत:ला इतरांच्या आशीर्वादाचे माध्यम म्हणून सादर करतात. जेव्हा आम्ही दुःखीत लोकांसाठी प्रार्थना करतो आम्हाला त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. जे इतरांच्या सहाय्यासाठी प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्या हृदयातील अंधार दूर होतो. जेव्हा आपण दुसऱ्यांना धीर देतो जो आपणाला मिळाला आहे तेव्हा आपले आशीर्वाद आम्हाला परत मिळतात.MHMar 200.5

    यशयाचा अठावणावा अध्याय शरीर आणि आत्म्याच्या आजारावर उपचार आहे. जर आपण आरोग्य आणि जीवनाचा खरा आनंद मिळवू पाहतो तर आम्हाला धर्मशास्त्रामध्ये (बायबल) दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ती सेवा जी त्याला स्वीकारणीय आहे आणि आशीर्वादाच्या बाबतीत प्रभु म्हणतो.MHMar 201.1

    “तू आपले अन्न भुकेल्यास वाटावे, तू लाचारास व निराश्रितास आपल्या घरी न्यावे. उघडा दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवाला तोंड लावू नये हाच तो उपासनव्हे काय ? असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझा धार्मिकता तुझ्या पुढे चालेल व परमेश्वराचे गौरव तुझे पाठीराखे होईल तेव्हा तू हाक मारिशील ती परमेश्वर ऐकेल. तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल हामी आहे. जर तू आपल्यामधून जोरवड लादण्याचे सोडून देशील बोट दाखविण्याचे व दुष्ट गोष्टी टाकून देशील जर तू आपल्या जिवाला इष्ट ते भुकेल्यास देशील दुःखग्रस्त जिवास तृप्त करिशील तर तुझा प्रकाश अंधकारात प्रकाशेल, निबीड अंधकार तुला मध्यानाचे तेज असा होईल. परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक असा होईल, तो अवर्षण समयी तुझ्या जिवास तृप्त करील. तुझ्या हाडांस मजबूत करील. तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील.” (यशया ५८:७-११).MHMar 201.2

    चांगले कार्य दुप्पट आशीर्वाद आणते ते दया दाखविणारे व दया करणाऱ्या दोघांसाठी लाभदायक होते. योग्य कार्य करण्याची चेतना शरीर व बुद्धी दोन्हीसाठी चांगलीच असते. दुसऱ्यांना आनंद देणे आणि मदत केल्याने आपणास जे समाधान मिळते त्याच्यासारखे दुसरे औषध नाही. आपले मन स्वतंत्र होते. एक आनंद मिळतो तेच एक महान औषध आहे. आपणास एक नवजीवन प्राप्त होते. दुर्बल लोकांना सतत सहानुभूति दाखविण्याऐवजी ती इतरांमध्ये पसरविण्याविषयी विचार करावा. आपली दुःखे, कष्ट व अडचणी ही सर्व ओझी आपल्या उद्धार कर्त्यावर सोपवा. आपली हृदये त्याच्या प्रेमासाठी उघडी करा आणि ख्रिस्ताकडून मिळालेले प्रेम इतरांना सांगा लक्षात ठेवा की सर्वांना कठीण परीक्षा अडचणी त्रास आणि दुःखाचा सामना करावा लागतो आणि याचे ओझे कमी करण्यासाठी आपणही काहीतरी करु शकतो. आपणा जो आशीर्वाद मिळतो त्याबद्दल परमेश्वराचे आभार माना व दुसऱ्यांनाही आपला अनुभव सांगा परमेश्वराच्या अनमोल वचनांनी आपले हृदय भरून टाका. म्हणजे आपल्या या खजिन्यातून असे शब्द निघतील ते इतरांना धीर व शक्ति देतील असे केल्याने आपण असे वातावरण निर्माण करु शकू की त्यामुळे इतरांना सहाय्यकारी होऊ शकता. आपले लक्ष्य इतरांना आशीर्वादीत करण्याचे असावे. इतरांना मदत करण्याचे असावे. यामुळे इतरांना आशीर्वाद मिळेल व तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना सुद्धा ते आशीर्वादीत होईल. जर कोणी आजाराने ग्रसीत असतील तर त्यांनी स्वत:चे दुःख विसरुन जे अधिक दुःखी आहेत त्यांना मदत करावी. असे केल्याने आपण प्रभुच्या कार्यामध्ये सहाय्य करतो त्याच्या आज्ञांचे पालन करतो. दुःखीतांनाही देवाच्या आज्ञा पालक करण्यास शिकवा. भविष्यवाणी संबंधित असणारे सत्य समजून घ्या.” तेव्हा तुझा प्रकाश प्रभातीससारखाच केल आणि तू लवकरच बरा होशील.” “तेव्हा प्रियजन हो आपणालाही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वत:ला शुद्ध करु आणि देवाचे भयबाळगून पवित्र्याला पूर्णतो आणू.” (२ करिंथ १:७).MHMar 201.3

    “स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टींमध्ये इंद्रियदमन करितो ते नाशवंत मुगूट मिळविण्यासाठी असे करितो. म्हणून मीही तसाच धावतो म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही तसेच मुष्टीयुद्धहि करितो म्हणजे वाऱ्यावर मुष्टि प्रहार करीत नाही तर मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करुन ठेवितो असे न केल्यास मी दुसऱ्यास घोषणा केल्यास कदाचित मी स्वतः पसंतीस न उरलेला असा ठरेन.” (१ करिंथ ९:२५-२७).MHMar 202.1

    *****