Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    भोजनाची तयारी

    केवळ भूक भागविण्यासाठी अन्नाचे सेवन करणे चुकीचे आहे. परंतु भोजन बनविताना किंवा खाताना त्यामध्ये पोषणास आवश्यक असणारे अन्नपदार्थ असणे अति महत्वाचे आहे. आपल्यासमोर वाढलेले जेवण जर स्वादिष्ट नसेल तर शरीराचे म्हणावे तसे पोषण होणार नाही सावध राहून भोजन पदार्थ निवडावे आणि दक्षता पूर्ण तयार करावे.MHMar 231.1

    ब्रेड बनविण्यासाठी मैद्याचा वापर योग्य नाही कारण त्यामध्ये पोषकतत्वे नसतात. परंतु पूर्ण गव्हाच्या पीठाने बनविलेली ब्रेड उत्तम पोषक असते. यामुळे मलबद्धता होत नाही.MHMar 231.2

    परंतु ब्रेड बनविण्यासाठी सोडा आणि बेकींग पावडर अनावश्यक आणि हानीकारक असतो. सोड्यामुळे पोटामध्ये सूज आणि जळजळ निर्माण होते. यामुळे पूर्ण तंत्र बिघडते. बऱ्याच महिलांना वाटते की सोड्याशिवाय चांगली ब्रेड बनविता येत नाही. परंतु तो त्यांचा गैरसमज आहे. जर त्यांनी ब्रेड कशी बनवावी हे तंत्र आत्मसात केले तर त्यांची ब्रेड आरोग्यदायी बनू शकते. त्याचा स्वाद नैसर्गिक होतो.MHMar 231.3

    ही ब्रेड फुगण्यासाठी सोड्याचा वापर करू नये किंवा दूधही वापरू नये. दूधाचा वापर म्हणजे वायफळ खर्च होतो. यामुळे ब्रेडमधील पौष्टिकता कमी होते. कारण दूधामध्ये बनविलेल्या ब्रेडचा स्वाद जास्त काळ टिकत नाही आणि ती लवकर खराबही होते. परंतु पाण्यातून केलेली ब्रेड जास्त काळ टिकते व स्वादही राहतो.MHMar 231.4

    ब्रेड हल्की आणि गोड असावी. यामध्ये आंबटपणा मुळीच असू नये. ब्रेड बनविताना पीठाचे गोळे छोटे असावेत. ब्रेड चांगली भाजावी म्हणजे त्यातील खमीरामध्ये असलेले जंतू मरतील. फुगलेली ब्रेड पचनास जड असते व अशाप्रकारची ब्रेड खाण्याच्या मेजावर मूळीच असू नये. परंतु हा नियम बेखमीरच्या ब्रेडला लागू नाही. खमीर न घालता बनविलेली ब्रेड ही आरोग्यास अति उत्तम स्वादिष्ट आणि आरोग्यवर्धक असते.MHMar 231.5

    दलिया किंवा जाड रवा वापरायचा असल्यास त्याला खूप शिजवावे लागते व जास्त चावावे लागते. यामध्ये पौष्टिकताही कमी असते दोनवेळी भाजलेली ब्रेड पचनास आणि पौष्टिकपणामध्ये अधिक असते. फुगलेली ब्रेड तोपर्यंत भाजा की त्यातील शेवटचा अंश संपेल. म्हणजे ब्रेड ब्राऊन होईपर्यंत भाजणे एका कोरड्या ठिकाणी ठेवल्यास सामान्य ब्रेडपेक्षा जास्त काळ टिकते अणि खाण्याअगोदर पुन्हा गरम केल्यास ती ताजी ब्रेड होईल.MHMar 232.1

    सर्वसामान्यपणे भोजनामध्ये साखरेचे प्रमाण जास्त वापरले जाते. यामध्ये केक, जाम, जेली, गोड पदार्थ असे पदार्थ मलावरोध करण्यास सक्षम आहेत. मुख्यतः या पदार्थांमध्ये कस्टड हलवा ज्यामध्ये दूधाचा वापर केला जातो. यामध्ये साखर व अंडीही असतात. दूध आणि साखर एकत्र केल्यास समस्या उद्भवते.MHMar 232.2

    जर दूधाचा वापर करायचा असेल तर ते पूर्णपणे निर्जंतूक करणे अति आवश्यक आहे. अशी सावधगिरी बाळगली तर संसर्ग होण्याचे टाळले जाते. थंड ब्रेडवर जर लोणी लावले जाते तर ते कमी हानीकारक होते. परंतु यापासून दूरच राहिले तर बरे होईल. यापेक्षा पनीर जास्त घातक असते.MHMar 232.3

    भोजन करताना ते हळूहळू खावे. खूप चावून खावे. तोंडातील लाळ व्यवस्थीत मिसळून बारीक झालेले अन्नच गिळावे म्हणजे ते व्यवस्थित पचले जाईल.MHMar 232.4

    खाण्यामधील दुसरी एक अयोग्य सवय म्हणजे अयोग्य वेळी खाणे ही गंभीर बाब आहे. म्हणजे व्यायाम केल्याबरोबर काही खाऊ नका किंवा खाल्ल्याबरोबर व्यायाम करु नये. खाल्ल्याबरोबर आपल्या नाडीवरील दबाव वाढतो. तसेच भोजनाआधी काम करून आपले शरीर व मेंदू थकलेले असतात म्हणून काम केल्याबरोबर काही खाऊ नये जर कोणी उत्तेजित, काळजीमध्ये किंवा गडबडीत आहेत तर अशांनी शांत आणि विश्रांती घेतल्याशिवाय भोजन करु नये. MHMar 232.5

    पोटाबरोबरच आपल्या मेंदूशी अति घनिष्ठ संबंध आहे. आणि जेव्हा पोट आजारी पडते तेव्हा दुर्बळ इंद्रियाला मेंदूकडून पचनसंस्थेसाठी मदत होते. आणि जेव्हा पचनसंस्थेच्या मागण्या वाढतात तेव्हा मेंदूवर दबाव पडतो या कारणामुळे मेंदू थकतो. आणि जेव्हा शारीरिक व्यायाम होत नाही तेव्हा अन्नही थोडेच खावे. आणि भोजन करताना चिंता काळज्या व सर्व प्रकारचे विचार सोडून द्यावेत. भरभर न जेवता मन शांत ठेवून हळू सावकाश आणि प्रत्येक घास बारीक चाऊन खाण्यात यावा. परमेश्वराला धन्यवाद देऊन अन्न खावे.MHMar 232.6

    इतर लोक जे मांसाहार करतात व इतर हानिकारक वस्तु खात होते त्यांनी त्या सोडून दिल्या आहेत व साधे व स्वास्थ्यवर्धक पदार्थ खातात ते अधिक प्रमाणात खातात हे चुकीचे आहे जे अन्न स्वादिष्ट असते ते अधिक प्रमाणामध्ये खाल्ल्यास ते पचनास जड जाते म्हणून असे अन्न कितीही स्वादिष्ट असो ते प्रमाणाबाहेर खाऊ नये.MHMar 233.1

    भोजनाच्या मेजावर वारंवार अन्नपदार्थ ठेवण्याची प्रथाच पडली आहे. हे समजत नाही की आता कोणता पदार्थ येईल. तोपर्यंत भोजनास बसलेल्यांनी बऱ्याच प्रमाणात भोजन केलेले असते. आणि आता येणारा पदार्थ खाणे त्यांना योग्य होणार नाही. आणि जेव्हा शेवटचा पदार्थ त्यांच्यासमोर येतो तेव्हा ते पोट भरलेले असूनही त्यांना खाण्याचा मोह सुटत नाही. आणि तो पदार्थ ते घेतात आणि तो पदार्थ त्यांना हानिकारक होतो. त्याऐवजी सर्वच खाण्यात येणारे पदार्थ एकाच वेळी टेबलावर ठेवण्यात आले तर खाणारे ते पदार्थ जसे लागतील तसे आपल्या इच्छेप्रमाणे वाढून घेतील. आणि ते त्यांच्या आवडीनुसार पदार्थ घेतील.MHMar 233.2

    कधी कधी जास्त प्रमाणात खाण्यामुळे त्याचे परिणाम लवकरच दिसून येतील. इतर गोष्टींमध्ये काही त्रास होणार नाही परंतु पाचनसंस्थेवर नक्कीच त्याचे परिणाम दिसून येते. शारीरिक शक्ति कमी होते इतक्या प्रमाणात खाण्यात येणारे पदार्थ व्यवस्थित पचत नाहीत. MHMar 233.3

    आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात खाण्यात येणारे पदार्थांचे पचनसंस्थेला ओझे होते व सर्व तंत्र बिघडते व शरीराला आजारी पाडते. यामुळे ताप येतो. यामुळे पोटाला अधिक रक्ताची गरज भासते. यामुळे हातपाय थंड पडतात. पचनसंस्थेवर जास्त प्रमाणात ओझे होते आणि जेव्हा ही संस्था आपले कार्य पूर्ण करते तेव्हा खूप थकवा येतो. काही लोक सतत खात राहतात आणि त्याला ते भूक समजतात. परंतु हे पाचनसंस्थेच्या अधिक कामामुळे येणाऱ्या थकण्याचे कारण आहे. कधी कधी मेंदूमध्ये बधीरता येते. यामुळे मानसिक व शारीरिक असणारी रूचि समाप्त होते.MHMar 233.4

    हे अस्वाभाविक लक्षणे अशासाठी दिसून येतात की प्रकृतिने आपले अनावश्यक जीवन शक्ति खर्च केलेली असते. त्यामुळे ती पूर्णपणे थकलेली असते. पोट सांगत राहते की “मला विश्रांती द्या.’ परंतु याचा अर्थ आणखी अधिक खावे असा त्याचा अर्थ घेतला जातो. अशाप्रकारे पोटाला विश्रांती देण्याऐवजी त्यावर अधिक ओझे लादले जाते. परिणामी पाचनसंस्था बिघडून जाते. परंतु अधिक प्रमाणात काम केल्यामुळे पोटाला विश्रांतीची गरज असते.MHMar 234.1

    शब्बाथ दिवशी आपणास इतर दिवसाप्रमाणे अधिक खाद्यपदार्थ करण्याची गरज नसावी कारण शब्बाथ दिवशी केवळ खाद्यपदार्थ बनविण्यामध्येच जास्त वेळ खर्च होईल. म्हणून त्या दिवशी जेवण साधेच असावे. तसेच या दिवशी कमीच खावे. यामुळे मेंदू तल्लख व स्वच्छ राहील. यामुळे शब्बाथ दिवशी आध्यात्मिकतेकडे जास्त लक्ष राहील. पोट अस्वस्थ राहिल्यास बुद्धी कार्यक्षम राहणार नाही. आणि अनमोल वचनाकडे लक्ष जाणार नाही. अनुचित आहारामुळे बुद्धी भ्रमिष्ट होते. शब्बाथ दिवशी बहुतेक लोक भरपूर खाण्यामुळे मंडळीमध्ये त्यांना झोप येते व पवित्र वचनाकडे त्यांचे लक्ष नसते. कदाचित त्यांना आठवडाभर स्वादिष्ट पक्वान करणास वेळ मिळत नसेल म्हणून शब्बाथ दिवशी ते चविष्ट भोजन करण्यात वेळ खर्च करतात. परंतु हे चुकीचे आहे. जेथे चुकीचे खाण्याची सवय जडली आहे त्याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. यामध्ये सुधारणा करण्यास उशीर करू नये. जेव्हा पोटाचा दुरुपयोग केला जातो त्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात तेव्हा शरीराबरोबर बुद्धीच्या शक्तिचाही हास होतो. या कारणामुळे सर्व तंत्रच बिघडते आणि मनुष्य आजारी पडतो. मनुष्य निष्काळजी होतो, हट्टी व चिडचिडा होतो, त्याला राग येतो. बेफिकीरीने बनविलेले अन्नाचे हजार शिकार नाही तर दहा हजार लोक शिकार होतात. अनेक कबरांवर लिहीले पाहिजे की “निष्काळजीपणे शिजविलेले अन्न खाऊन मेला,’ पोटाला त्रास देऊन मरण पावले.”MHMar 234.2

    भोजन बनविणाऱ्यांचे हे एक पवित्र कार्य आहे की त्यांनी आरोग्यदायी स्वयंपाक करायला शिकावे. निष्काळजीपणाने केलेल्या भोजनामुळे अनेक लोक मरतात. चांगली ब्रेड बनविण्यासाठी चांगले विचार असावेत परंतु एक चांगली ब्रेड बनविण्यासाठी स्वच्छता व टापटीपपणा असणेही आवश्यक आहे. चांगले स्वयंपाकी थोडेच असतात. काही मुलींना वाटते की अन्न शिजविणे आणि घरातील इतर कामे करणे हे तुच्छ काम आहे. म्हणून लग्न करणाऱ्या अनेक मुलींना जी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारतात. त्यांना एक पत्नी आणि आईच्या कर्तव्याविषयी अति अल्प माहिती असते. जेवण बनविणे हे काय तुच्छ काम नाही. व्यवहारी जीवनामध्ये याचे ज्ञान अति आवश्यक आहे. हे ज्ञान प्रत्येक मुलीने शिकणे अति आवश्यक आहे आणि असे ज्ञान शिकविणे सुद्धा अति आवश्यक आहे म्हणजे गरीब समाजातील महिलांना त्याचा फायदा होईल. असे भोजन बनवा की त्याने भूकही वाढेल आणि ते पौष्टिक असणे ही आवश्यक आहे. आणि तशी काळजी घ्यावी. जेवण बनविणाऱ्यांनी ते अन्न पौष्टिक तर असावेच आणि त्याचा स्वादसुद्धा उत्तम असावा. एवढेच नाही परंतु ते चवदार व पौष्टिकसुद्धा असावे. भोजन साधेच असावे परंतु ते स्वादिष्ट पौष्टिक ही असावे. शरीराच्या योग्य वाढीसाठीसुद्धा असावे. MHMar 234.3

    प्रत्येक स्त्री जी कुटुंबाची प्रमुख असते. आणि तरीही ती पौष्टिक व स्वादिष्ट भोजन बनवू शकत नाही. अशावेळी तिन दृढ निश्चय करुन आपल्या कुटुंबासाठी उत्तम व पौष्टिक अन्न बनविण्यास शिकावे. अनेक ठिकाणी स्वच्छतेबरोबरच योग्य व स्वादिष्ट अन्नपदार्थ बनविण्याचे शिकविले जाते. ज्यांना असे प्रशिक्षण शिक्षणाची संधी मिळत नाही त्यांनी एखाद्या तरबेज स्वयंपाकीकडून शिक्षण घ्यावे. आणि तोपर्यंत शिकत रहा प्रयत्न करीत राहा जोपर्यंत तुम्ही स्वतः निरनिराळे पौष्टिक व्यंजन करण्यात तरबेज होत नाही. खाण्यापिण्यामध्ये नियमितपणा अतिशय महत्वाचा आहे. प्रत्येक भोजनाची एक ठराविक वेळ पाहिजे. यावेळी आपण प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे खावे आणि दुसऱ्या भोजनापर्यंत अधेमधे काहीही खाऊ नये. बहुतेक लोक त्यांच्या इच्छाशक्तिच्या कमतरतेमुळे त्यांना जेव्हा भूकही लागत नाही तेव्हा ते काहीही खातात. भोजनाच्या मध्ये खातात, कधीही खातात. प्रवास करताना प्रवाशांना खाण्याची सवय असते ते काहींना साधे आणि पौष्टिक आहार घेतला तर त्यांना थकवा येणार नाही. आणि ते आजारापासून सुरक्षित राहतील. दुसरी चुकीची सवय म्हणजे झोपायला जाण्याआधी खाणे. नियमित असेल तर आणि अति खाणे झाले तर अशक्तपणा येतो. अति खाण्याच्या सवयीने पोट पुढे येते आणि खाण्याच्या सवयीमुळे रात्री जेवण केल्याशिवाय त्यांना झोप येत नाही. रात्रीचे जेवण उशीर केल्यामुळे झोपतेवेळी त्याचे पचन कार्य सतत चालूच राहते. जर पोटाला सतत कार्य असेल तर पचनाचे कार्यही पूर्ण होत नाही. यामुळे भीतिदायक स्वप्ने पडतात. आणि झोपमोड होते. आणि सकाळी जेव्हा जाग येते तेव्हा त्याला उत्साह नसतो. आणि न्याहारी करण्याची इच्छाही होत नाही. जेव्हा आम्ही रात्री झोपायला जातो तेव्हा पचनाचे कार्य पूर्ण होणे आवश्यक असते. म्हणजे पोटाबरोबर शरीराच्या इतर अवयवांनाही विश्रांती मिळते. याशिवाय बैठे काम करणारांनी रात्री उशीरा जेवण करून ते हानीकारक असते. त्यांच्यामध्ये अशा सवयींमुळे विघ्न येते आणि शेवटी मृत्युनेच विघ्न संपते.MHMar 235.1

    अनेकांच्या बाबतीत कमकुवतपणा येतो की त्यांना वेळी अवेळी खाण्याची इच्छा अनावर होते. म्हणून असेही होऊ शकते की अतिकामाच्या ताणामुळेही त्याची पाचनसंस्था थकते. एकवेळचे जेवण खाल्यानंतर ते अन्न पचते. पचन झाल्यावर पचनसंस्थेला विश्रांतीची गरज असते. दोनवेळच्या भोजनामध्ये पाच ते सहा तासांचे अंतर हवे असते. बहुतेक करुन लोकांना ही योजना करुन पाहायची असेल तर त्यांनी तीन वेळा खाण्याऐवजी दोन वेळा जेवावे.MHMar 236.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents