Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    “जा आणि पुन्हा पाप करु नको”

    मंडपाचा सण आता समाप्त झाला होता. यरुशलेममध्ये याजक आणि शास्ती त्याच्या विरुद्ध षडयंत्र रचना करण्यात अयशस्वी झाले होते. जशी संध्याकाळ झाली “तेव्हा सर्व आपापल्या घरी गेले तेव्हा येशू जैतूनाच्या डोंगराकडे गेला.” (योहान ७:५३, ८:१)MHMar 48.2

    नगरातील गोंधळ व गर्दीमधून शास्त्री परूशांच्या छळ व कपटांमधून येशू जैतूनाच्या डोंगरावर एकांत व शांत ठिकाणी निघून गेला म्हणजे परमेश्वराबरोबर काही वेळ घालविता येईल, परंतु दुसरे दिवशी भल्या पहाटे तो मंदिरात परत आला, आणि जेव्हा लोक एकत्र आले तेव्हा तो त्यांना शिकवू लागला.MHMar 48.3

    लवकरच्या त्याच्या उपदेशामध्ये विघ्न आले. परुशी आणि शास्त्र्यांनी एक भयभीत स्त्रीला ओढत फरपटत त्याच्यासमोर आणले. तिच्यावर ओरडत त्यांनी आरोप करीत होते आणि सातव्या आज्ञेचे भंग केल्याचा आरोप तिच्यावर लावित होते. एक ढोंग्याने तिला येशू समोर ढकलून स्वत:चा दिमाख दाखविल सांगू लागला की, “गुरुजी ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली आहे. मोशेने नियमशास्त्रात अशी आली आहे की अशांना दगड मार करावा, तर आपण हिच्याविषयी काय म्हणतात ? (योहान ८:४-५).MHMar 48.4

    त्यांच्यावरील सन्मान आणि दिखाव्याने व त्याच्यामागे ख्रिस्ताला शब्दामध्ये पकडून त्याच्यावर दोषारोप लावण्याची त्यांची योजना होती त्या स्त्रीला जर तो दोषमुक्त ठरवून तिला मुक्त करील तर मोशेचा नियम मोडल्याचा आरोप त्याच्यावर लावला जाईल आणि जर तिच्यावर दोष लावून तिला मृत्युदंड त्याने दिला तर रोमी सरकार विरुद्ध विद्रोह करण्याचा दोष लागला जाईल. कारण एखाद्याला मृत्युदंडाची शिक्षा केवळ रोम सरकारच देवू शकतात.MHMar 49.1

    त्या दृष्यावर येशूने एक दृष्टी टाकली. लाजेने आखडलेली ती स्त्री कठोर चेहऱ्याच्या आणि सन्मानीय लोक ज्यांच्यामध्ये मानवी दया मुळीच नव्हती. तिचा तो निष्कळंक आत्मा हे दृष्य पाहून थरथर कापत होती. येशूने त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन खाली ओणवून मातीमध्ये काही तरी लिहीत होता. आपल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन तो काय करीत आहे हे पाहण्यासाठी आणि तेच प्रश्न पुन्हा विचारण्याचे हेतुने ते त्याच्या जवळ आले आणि त्याचे लक्ष समोर असलेल्या समस्येवर केंद्रित करण्याचा प्रयत्न करु लागले, परंतु त्यांनी जेव्हा पाहिले की येशू जमिनीवर त्यांच्याच पापांचे कर्तृत्व लिहिले होते तेव्हा त्यांची तोंडे गप्प झाली. कारण त्यांची सर्व गुप्त पातके येशू जमिनीवर लिहीत होता.MHMar 49.2

    मग उठून येशूने त्या स्त्रीवर दोष लावणाऱ्या वडील लोकांकडे वळून म्हाला, “तुमच्यामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा.” मग तो पुन्हा खाली ओणवून जमिनीवर लिहू लागला.” (योहान ८:७)MHMar 49.3

    त्याने मोशेचा नियम मोडला नाही आणि रोम सरकारच्या कायद्याचे उल्लंघन केले नाही. उलट दोष लावणारेच लज्जित फजित होऊन निघून गेले. त्यांच्या वरुन दिसणाऱ्या पवित्रतेच्या चिंध्या झाल्या आणि अनंत पवित्र ते समोर दोषी होऊन पळून गेले. त्यांना भीती वाटली की कदाचित तो त्यांची गुप्त पातके सर्वांसमोर उघड करील. त्यांनी आपल्या मानाखाली घालून येशूला दोषी ठरविण्याच्या हेतूने आणलेली शिकार तेथेच सोडून निघून गेले.MHMar 49.4

    “नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, “बाई तुला दोष देणारे कोठे आहेत ? तुला कोणी दंड ठरविला नाही काय ?’ ती म्हणाली, “प्रभुजी कोणी नाही.” तेव्हा येशू तिला म्हणाला, “मीही तुला दंड ठरवित नाही, जा ह्यापुढे पाप करु नकोस’ (योहान ८:१०-११).MHMar 50.1

    ती स्त्री भयाने व अपराधी भावनेने येशूचे समोर उभी होती. येशूचे शब्द “तुमच्यामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा.” हे शब्द तिला मृत्युदंड देऊन गेले. उद्धारकर्त्याकडे पाहाण्याचे तिचे धाडस झाले नाही. ती गुपचूप उभी राहून स्वत:च्या नाशाची प्रतिक्षा करीत होती. तिला हे पाहून नवल वाटले की तिला दोष देणारे सर्व लज्जित होऊन गुपचूपपणे निघून गेले होते. तेव्हा आशायुक्त शब्द तिच्या कानावर पडले. “मी ही तुला दंड ठरवित नाही जा ह्यापुढे पाप करु नको.” त्याच्या या शब्दांनी तिचे हृदय पाघळले. ती त्याच्या पायावर पडून अश्रु ढाळू लागली. त्याला धन्यवाद देऊ लागली व आपल्या सर्व पापांचा अंगिकार करुन पश्चात्ताप केला.MHMar 50.2

    तिच्यासाठी ही नव्या जीवनाची सुरुवात होती आणि तिचे ते नवीन जीवन शांती आणि पावित्र्याने परिपूर्ण असे होते. तिने स्वत:ला परमेश्वराच्या भक्ति व सेवेमध्ये वाहून दिले. या पतित आत्म्याला वर काढून येशूने एक महान चमत्कार केला होता. हा चमत्कार एखाद्या रोग्याला बरे करण्यापेक्षा ही अति महान असा होता. येशूने तिचा आत्मिक आजार बरा केला होता. हा आजार तिच्या अनंत नाशाला कारण होऊ शकला असता. ही महिला त्याची एक अति मौल्यवान भक्त बनली. आत्मत्यागी प्रेम आणि भक्तिबरोबर तिने करुणामयी क्षमेसाठी आपला धन्यवाद व्यक्त केला. चूक करणाऱ्या या महिलेसाठी जगाजवळ केवळ तिरस्कार आणि द्वेषच होता, परंतु निष्पाप प्रभुने तिच्या कमकुवतपणा वर दया येऊन तिला सहाय्य करण्यासाठी आपला हात पुढे केला. जेव्हा त्या ढोंगी परुशांनी तिच्यावर दोष लावला होता तेव्हा येशूने तिला सांगितले होते की “जा आणि पुन्हा पाप करु नको.”MHMar 50.3

    प्रत्येक आत्म्याची अवस्था येशू जाणून आहे. पाप्याचा दोष जितका जास्त असेल तितकी अधिक त्याला उद्धारकर्त्याची गरज असते. स्वर्गीय प्रेम आणि सहानुभूतिपूर्ण ख्रिस्ताचे हृदय त्यांना पापाच्या जाळ्यातून सोडविण्यासाठी अधिक आतूर असते. त्याने स्वत:च्या रक्ताने पापांच्या मुक्ति करारावर सही केली आहे. आम्हांला त्याने फार मोठे मोल देऊन विकत घेतले आहे.MHMar 50.4

    इतक्या मोठ्या मोलाने खरेदी केलेल्या लोकांसाठी ते त्यांच्या शत्रुच्या जाळ्या खोल अडकून पडावे अशी त्यांची इच्छा नाही. आम्ही पराभूत होऊन नाशाच्या खोल गर्तेत पडावे अशी त्याची इच्छा नाही. कोणाचा एकाचाही नाश होऊ नये अशीच प्रभुची इच्छा आहे. जो सिंहाच्या गुहेत त्यांची तोंडे बंद करुन आपल्या सेवकाला वाचवितो तोच आपल्या भक्तांना सातपट तिप्पत भट्टीतून सुरक्षित बाहेर काढण्यास समर्थ आहे. तो स्वतः त्यांच्याबरोबर भट्टीत फिरला. तोच प्रभु आजही आपल्यामध्ये असणारा कमकुवतपणा बळकट करुन वाईट प्रवृत्तिंचा प्रभाव कमी करु शकतो. आज तो दयासना समोर उभा राहून परमेश्वरासमोर आमच्या रदबदलीसाठी प्रार्थना करीत आहे. आमचे सहाय्य करण्यासाठी तो विनंती करीत आहे. तो कोणाही द:खी व भग्न हृदयाला आणि रडत असणाऱ्या पामराला मोकळ्या हातांनी परत पाठवित नाही. जे लोक आपली पापे पदरी घेऊन प्रभुला शरण येतात व क्षमायाचना करतात त्यांना क्षमा करुन त्यांची तो तृप्ती करतो. तो कधी कोणाला म्हणत नाही की प्रगट केले जाईल, परंतु असे म्हणतो की धीर धरा. परमेश्वराकडून कोणीही शक्ति प्राप्त करुन घेऊ शकतो तो त्यांच्यासाठी शांती प्रस्थापित करतो आणि तो शांती राखतो.MHMar 51.1

    जो आत्मा येशूला शरण येतो. त्यांना तो दोष आणि तिरस्कार करणाऱ्यांपासून उंच करतो. या आत्म्यांवर कोणी मनुष्य किंवा दुष्ट दूत दोष लावू शकत नाही. ख्रिस्त त्यांना आपल्या ईश्वरी आणि मानवी स्वभावामध्ये सामील करुन घेतो. ते परमेश्वराच्या सिंहासनापासून निघणाऱ्या प्रकाशामध्ये आमची पापे हरण करणाऱ्या प्रभुबरोबर उभे राहतात. येशू ख्रिस्ताचे रक्त “आमच्या सर्व पापांपासून शुद्ध करते.” (१ योहान १:७). MHMar 51.2

    “देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण करील ? देवच नीतिमान ठरविणारा आहे. जर देडाज्ञा कोण करणार ? तो मेला इतकेच नाहीतर मेलेल्यातून उठला आहे. जो देवाच्या उजवीकडे बसला आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करत आहे तो ख्रिस्त येशू आहे.’ (रोम ८:३३३४). MHMar 51.3

    ख्रिस्ताने दाखवून दिले की हवा समुद्राच्या लाटा आणि भूतग्रस्तांच्या दुष्टात्म्यावरही त्याचे नियंत्रण आहे. त्यानेच वादळ शांत केले आणि खवळलेला समुद्री लाटांना गप्प केले. जे लोक परमेश्वरापासून दूर जाऊन सैतानाकडून पराभूत झाले होते त्यांना शांती प्रदान केली.MHMar 51.4

    कफर्णहूमाच्या सभास्थानामध्ये येशू आपल्या सेवेबाबत लोकांना हे सांगत होता की तो पापाच्या दास्यामध्ये असलेल्यांना स्वतंत्र करण्यासाठी आला आहे. त्याचवेळी एक जोराने ओरडण्याच्या आवाजाने त्याच्या भाषणामध्ये व्यत्यय आला. लोकांच्या गर्दीमधून एक वेडा मनुष्य आरडाओरडा करीत येशूकडे धावून आला. तो ओरडून म्हणाला, “हे येशू नासरेथकरा तू आमच्यामध्ये का पडतोस ? आमचा नाश करण्यासाठी आलास काय ? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र तो तूच.” (मार्क १:२४).MHMar 52.1

    “तेव्हा यशू त्याला धमकावून म्हणाला, “गप्प राहा व ह्याच्यातून नीघ” मग भूत त्या मनुष्याला त्यांच्यामध्ये खाली आपटून काही उपद्रव न करता त्याच्यातून निघाले.” (लूक ४:३४-३५).MHMar 52.2

    या व्यक्तिच्या अशा अवस्थेचे कारण त्याचे पापमय जीवन हे होते. पापमय जीवनावर तो प्रसन्न व मोहीत होता आणि त्याने विचार केला होता की अशा प्रकारच्या जीवनामध्ये तो रममाण झाला होता. त्याच्या या असंयमी जीवनामुळे त्याचा स्वभाव दूषित झाला होता आणि सैतानाने पूर्णपणे त्याच्या जीवनाचा ताबा घेतला होता आणि त्याला खूप उशीराने पश्चात्ताप झाला होता. तोपर्यंत त्याने आपली सर्व संपत्ति सुखासाठी खर्च करुन टाकली होती व तो कफल्लक झाला होता. तारुण्य परत मिळविण्याच्या नादात त्याने सर्व काही खर्च केले आणि सैतानाच्या पकडीमध्ये तो असहाय्य झाला होता.MHMar 52.3

    मुक्तिदात्याच्या उपस्थितिमध्ये स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्याच्यामध्ये एक जिज्ञासा निर्माण झाली, परंतु त्याच्यातील दुष्टात्म्याने ख्रिस्ताच्या शांतीचा विरोध केला. मानसिक वेदनेने तो जोरात ओरडला. त्याची इच्छा होती की येशून मला मुक्त करावे, परंतु तेवढ्यात दुष्टात्म्याच्या प्रभावाने त्याने येशूला विरोध करण्याचा प्रयत्न केला.MHMar 52.4

    सैतानापासून सुटका करुन घेण्याची त्याची स्वत:ची इच्छा आणि सैतानाचा विरोध या दोघांमध्ये संघर्ष चालू होता असे वाटत होते की या संघर्षात हा मनुष्य आपले प्राणही गमावू शकत होता. परंतु उद्धारकर्त्याने अधिकार वाणीने त्याला दाखवले व त्या मनुष्यातून निघून जाण्यास सांगितले. आता ते भूतग्रस्त पूर्ण शुद्धीवर येऊन आश्चर्यचकित झालेल्या लोका समुदायामध्ये उभा होता. आनंदीयुक्त शब्दामध्ये त्याने मुक्तिदात्याचे आभार मानले. त्याची स्तुति केली. ते त्याचे डोळे थोड्या वेळापूर्वी वेड्याच्या नजरेने इकड-तिकडे पाहात होते, परंतु आता ते शांत आणि समंजसपणाने शांत होते. समजूतदारपणाची चमक त्या डोळ्यांमध्ये होती आणि त्या डोळ्यांतून धन्यवादाचे अश्रु ओघळत होते. तेथील लोकसमुहाला इतके आश्चर्य वाटत होते की त्यांच्या तोडून शब्दही फुटत नव्हता. ते काही बोलण्याचा प्रयत्न करीत एकमेकांकडे पाहू लागले व हे काय नवल आहे इतकेच शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडत होते. ते एकमेकांस म्हणाले. काय ही अधिकार वाणी युक्त नवीन शिकवण हा अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो व ते त्याचे ऐकतात.” (मार्क १:२७).MHMar 52.5

    कफर्णहुम दुष्टात्म्याने पीडित व्यक्तिसारखे आजसुद्धा लोकांची मोठी संख्या दुष्ट शक्तिच्या अधीन आहे. जितके लोक परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध जातात ते सर्व समजून उमजून सैतानाच्या ताब्यात जातात. अनेक लोक सैतानाबरोबर असा खेळ करतात आणि सैतानापासून आपण केव्हाही सुटका करुन घेऊ शकतो या संभ्रमात ते राहतात. सैतानाशी आपण केव्हाही नाते तोडू शकतो असे त्यांना वाटते. परंतु या पोकळ विश्वासामध्ये ते अधिक काळ सैतानाच्या ताब्यात असे राहतात की शेवटी त्यांना त्यातून सुटका करुन घेणे अति कठिण होऊन बसले. तेव्हा त्यांना स्वत:वर नियंत्रण राहात नाही आणि ते पूर्णपणे सैतानाच्याच ताब्यात राहतात व त्यांना स्वत:ची इच्छाशक्ति राहात नाही किंवा त्याच्या ताब्यातून ते स्वत:ची सुटका करुन घेऊन शकत नाहीत. त्यांची गुप्त पापे व वासना त्यांना कफर्णहूमच्या दुष्टात्माग्रस्त मनुष्यासारखे सैतानाचे गुलाम होणारे खूपजण आहेत. तरीही त्यांची अवस्था पूर्णपणे आशाहीन नसते. परमेश्वर आपल्या इच्छेविरुद्ध आमच्या बुद्धीवर नियंत्रण करु शकत नाही तर प्रत्येक मनुष्य आपला निवड करण्यास स्वतंत्र आहे. तो कोणाच्या शक्तिच्या अधीन जायचे हे त्याने ठरवायचे आहे. कोणीही इतक्या खालच्या थराला जाऊ शकत नाही जे देवाच्या राज्यात जाण्याची इच्छा धरतात त्यांना देव एकटे सोडणार नाही. दुष्टात्माग्रस्त मनुष्याच्या मुखातून सैतानाचे शब्द निघतात, परंतु हृदयाचे आवाज न बोलताही परमेश्वर ऐकत असतो. जे लोक परमेश्वराच्या वचनामध्ये राहण्याचे ठरवितात परंतु तसे बोलत नाहीत ते सैतानाच्या अधीन राहू शकत नाहीत. देव त्यांना त्यांच्या स्वभावाच्या बुर्बलतेमध्ये एकटे सोडत नाही.MHMar 53.1

    “बीरापासून लूट हिसकावून घेता येईल काय ? पकडून गेलेल्या धार्मिक जनांची सुटका होईल काय ? परमेश्वर म्हणतो होय वीराने केलेले बंदिवान हिसकावून घेण्यात येतील. जुलमी पुरुषाने केलेली लूट सोडविण्यात येईल. कारण तु जशी युद्ध करणाऱ्या बरोबर मी युद्ध करीन तुझ्या मुलांचा उद्धार कर्त्यासाठी आपल्या हृदयाचे द्वार उघडतील त्यांच्यामध्ये आश्चर्य करणारे परिवर्तन दिसून येईल.MHMar 54.1