Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    ईश्वराच्या रहस्याचा शोध

    “गुप्त गोष्टी आपला देव परमेश्वर याच्या स्वाधीन आहेत, पण प्रगट केलेल्या गोष्टी आपल्या व आपल्या वंशजांच्या निरंतराच्या आहेत. ह्याचा हेतु हा की ह्या नियमशास्त्राची सर्व चने आपण पाळावीत.” (अनुवाद २९:२९). परमेश्वराने स्वत:च्या बाबतीत जितके प्रगट केले तितके आमच्या अध्ययनासाठी आहे. हे समजण्यासाठी आपण अध्ययन व शोध करु शकतो, परंतु त्यापुढे जाण्याची आम्हांला गरज नाही. सर्व बुद्धमान लोक थकेपर्यंत परमेश्वराच्या स्वभावाचा अभ्यास करु शकतो. परंतु त्यांच्या या प्रयत्नांचे फळ त्यांना मिळू शकणार नाही. या समस्येचे निवारण करणे आपले काम नाही. कोणीही मानवी बुद्धी परमेश्वराला समजू शकत नाही. परमेश्वराच्या स्वभावाचे अनुमान लावू शकत नाही आणि त्याची गरजही नाही. येथे शांत राहणेच ठीक आहे. सर्वज्ञानी परमेश्वर वादविवादाच्या सीमे पलीकडे आहे. तो खूपच उंच आहे. जेव्हा पिता आणि पुत्र यांनी मिळून उद्धाराची योजना बनविली तेव्हा स्वर्गीय देवदूतांनाही त्यामध्ये सामील करुन घेतले नाही. मानवीय प्राण्यांना सर्व शक्तिमान परमेश्वराच्या रहस्याचा उलगडा करण्याची परवानगी नाही आणि तो ते करुही शकत नाही. आम्ही बालकांप्रमाणे परमेश्वराविषयी अज्ञानी आहोत, परंतु लहान बालकांप्रमाणे आपण परमेश्वरावर प्रेम करु शकतो आणि त्याच्या आज्ञांचे पालन करु शकतो. परमेश्वराचा स्वभाव आणि त्याच्या अधिकाराविषयी अंदाज लावण्याऐवजी चला आपण त्याच्या वचनाकडे लक्ष देऊ या जे तो बोलला “ह्या कारणास्तव स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरुन नाव देण्यात येते. त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करितो की त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धी प्रमाणे तुम्हांला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बल संपन्न व्हावे. ख्रिस्ताने तुमच्या अंत:करणामध्ये तुमच्या विश्वासाच्याद्वारे वस्ती करावी ह्यासाठी की तुम्ही प्रीति मुळावलेले व पाया घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी, उंची व खोली किती हे तुम्ही सर्व पवित्रजनासह समजून घ्यावे व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीति ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे.” (इफिस ३:१४-१९).MHMar 331.2

    “ह्या वरुन आम्हीही ते ऐकल्या दिवसापासून तुम्हासाठी खंड पडू न देता प्रार्थना करुन मागतो की सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी ह्यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे अशा हेतूने की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्यापूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. सर्व प्रकारचा धीर, सहनशक्ति ही तुम्हांस आनंदासह प्राप्त व्हावी म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे” (कलसैकरास १:९-११).MHMar 332.1

    तेच हे ज्ञान आहे ते प्राप्त करण्यासाठी परमेश्वर आम्हास निमंत्रित करीत आहे. आणि याशिवाय सर्व शून्य आणि व्यर्थ आहे.MHMar 332.2

    *****