Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय १५—रुग्णाच्या खोलीमध्ये

    जे लोक रुग्णांची सेवा करतात त्यांना चांगल्याप्रकारे समजणे आवश्यक आहे की आरोग्याच्या नियमांकडे त्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे. स्वर्गाच्या खोलीमध्येच या नियमांचे पालन करणे अति महत्त्वाचे आहे. रुग्णाच्या खोलीमध्येच पूर्ण जबाबदारीने छोट्या-छोट्या गोष्टींकडे अगदी काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. यावरच शुश्रुषा अवलंबून आहे. गंभीर आजाराच्या बाबतीत एक छोटेसे दुर्लक्ष थोड्या वेळासाठी रोग्याकडे आणि धोक्याकडे लक्ष न देणे भीती दाखविणे, राग करणे आणि कमी प्रमाणामध्ये सहानूभूती दाखविणे यामुळे जीवन आणि मृत्युयामधील समतोल बिघडू शकतो आणि जो रुग्ण वाचू शकतो तो कबरेमध्ये जाऊ शकतो. एका परिचारीकेची कार्य कुशलता तिच्या शारीरिक आरोग्यावर अवलंबून राहते. तिचे आरोग्य जितके चांगले राहील तितक्या चांगल्या प्रकारे ती रुग्णाची सेवा करु शकते. रुग्णाची सेवा करतांना निर्माण होणारा तणाव ती सहजतेने पेलू शकते आणि रुग्णाची सेवा उत्तम प्रकारे ती सेवा करु शकते. रुग्णाची सेवा करणाऱ्याने स्वत:ची स्वच्छता भोजन, शुद्ध हवा आणि व्यायामावर विशेष ध्यान देणे आवश्यक आहे. त्यांच्या कुटुंबाकडून सावधगिरीचा वापर करुन रुग्णाला असलेल्या रोगापासून सावध राहण्यासाठी आवश्य त्या मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे. जेथे गंभीर आजार आहे तेथे त्यांना रात्र दिवस सेवा करण्याची गरज असते. अशावेळी दोन कुशल परिचारीकांना आलीपाळीने काम करणे आवश्यक आहे. यामुळे दोघींना विश्रांती घेणे आणि मोकळ्या हवेमध्ये त्यांना व्यायाम करण्याची संधी मिळेल असे करणे अति महत्त्वाचे आहे. विशेषत: ज्या रुग्णाच्या खोलीमध्ये शुद्ध व ताज्या हवेची व्यवस्था नसते रुग्णाला प्रकाश व हवेचा त्रास होऊ नये म्हणून खिडक्या बंद केल्या जातात आणि असे करणे धोक्याचे असते. रुग्ण आणि त्याची काळजी घेणारे या दोघांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.MHMar 167.1

    जर योग्य पद्धतीने सावधगिरी बाळगली तर असे आजार जे स्पर्शा ने होत नाहीत किंवा प्रसरण पावत नाहीत तसेच इतरांनाही त्याची लागण होत नाही. सवयी चांगल्या असणे आणि रुग्णाच्या खोलीमध्ये योग्य स्वच्छता असणे तसेच खोलीमध्ये स्वच्छ हवेचा प्रवेश असेल तर विषारी तत्वांपासून खोली सुरक्षित राहील. अशा परिस्थितीमध्ये रुग्ण लवकर बरा होतो. यामुळे रुग्णाची काळजी घेणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा धोका होऊ शकत नाही.MHMar 167.2