Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय १३—वा असहाय्य दरिद्री

    गरीब व दरिद्री लोकांना तोपर्यंत मदत केली जाते जोपर्यंत तो स्वत: काही करु शकत नाही. याशिवाय विधवा, अनाथ, वृद्ध, असाह्य आणि आजारी लोक असतात. अशा लोकांना आमची सहानुभूती आणि मदतीची गरज असते त्यांची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. अशा लोकांकडे कधीच दुर्लक्ष करु नये. दया, प्रीति आणि त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी खुद्द परमेश्वराने त्यांच्यावर सोपविली आहे ज्यांना त्याने आपला कारभारी नेमले आहे. विश्वासू भाऊबहिणी :MHMar 150.1

    “तर मग जसा आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.” (गलतिकरास ६:१०). ख्रिस्ताने आपल्या मंडळीच्या सभासदांना एक विशेष कार्य मंडळीवर सोपविले आहे तो प्रत्येक मंडळीला एक मर्यादेपर्यंत गरीब बनविले आहे असे केल्याने मंडळीचा प्रत्येक सभासद देवाच्या सान्निध्यात राहिल आणि अशा गरीब लोकांची काळजी मंडळीच्या सभासदांवर सोपविली आहे.MHMar 150.2

    ज्या प्रकारे एका कुटुंबातील लोक एकमेकांची काळजी करतात आजाऱ्याची शुश्रुषा करणे, बलहीतांना आधार देणे अशिक्षितांना शिक्षण देणे, ज्यांना अनुभव नाही त्यांना शिकविणे. त्याचप्रमाणे मंडळीतील विश्वासू लोकांना सुद्धा अशाच प्रकारचे सहाय्य करावे. गरजवंतांना मदत करणे हरप्रकारे त्यांचे सहाय्य करणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारे त्यांच्याकडे दुर्लक्ष करु नये. विधवा आणि अनाथMHMar 150.3

    “पृितहीतांना पिता, विधवांचा कैवारी असा देव आपल्यापवित्र निवासस्थानी आहे.” (स्तोत्रसंहिता ६८:५).MHMar 150.4

    “कारण तुझा निर्माण कर्ता तुझा पति आहे. सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाव इस्राएलाचा पवित्र प्रभु तुझा उद्धारकर्ता आहे त्याला सर्व पृथ्वीचा देव म्हणतात.” (यशया ५४:५).MHMar 150.5

    “तुझे अनाथ राहू दे, मीत्यांस जीवत ठेवीन तुझ्याविधवा मजवर भरवसा ठेवोत” (यिर्मया ४९:११).MHMar 151.1

    बहुतसे पिता, जेव्हा आजारी पडून आपल्या कुटूंबमधून मृत्युकडे जाण्याच्या मार्गावर असतात तेव्हा ते आपल्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेऊन सर्व जबाबदारी परमेश्वरावर सोपवून मरण पावतात. विधवा आणि अनाथ यांच्या गरजा पुरविण्यासाठी परमेश्वर स्वर्गातून माना पाठवितो किंवा कावळ्या करवी भाकर पाठवितो विधवेच्या तेलाची कुपी आणि पीठाचे मडके सदा भरलेलेच राहते तसे सध्यकाळामध्ये तो मंडळीमधील कार्यकत्यामधील स्वार्थ काढून अनाथ, विधवा आणि गरजवंतांसाठी त्यांनी मने प्रीतिने भरुन त्यांना गरीब, अनाथ व विधवा यांनी मदत करण्यासाठी त्यांना प्रेमळ बुद्धी देतो. अशा प्रकारे गरजवंतांच्या गरजा भागविल्या जातात. परमेश्वर आपल्या अनुयायांकरवी जे दुःखी कष्टी, पीडीलेले व अन्याय झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी पाठवितो.MHMar 151.2

    थरांमध्ये सर्व उपयोगी वस्तुंची रेलचेल असते. जसे भरपूर धान्य, कपडे सोने चांदी आणि सर्व प्रकारच्या उपयोगी वस्तु परमेश्वराने दिलेल्या असतात त्यांचा संग्रह असतो तेव्हा या सर्व गोष्टी गरजवंतांत देण्यासाठी असतात. MHMar 151.3

    अनेक विधवा आपल्या पिताहीन मुलांसाठी दुप्पट ओझी उचलण्याचे काम करतात. कारण आपल्या मुलांना भरपूर पुरवठा होण्यासाठी अति कष्ट करून आपल्या मुलांच्या गरजा पुरविण्याची खटपट करतात. त्यांचे शिक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी भरपूर वेळ मिळावा म्हणून आधीच तरतूद करुन ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे भविष्य उज्वल करण्याचे त्यांचे प्रयत्न असतात. मुलांना सहानुभूति व प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना वेळ मिळावयासाठी त्या अधिक कार्य करतात. परमेश्वर आमच्याकडून हीच अपेक्षा करतो की ज्यांना पिता नाही त्यांची त्यांना कमतरता भासू नये म्हणून त्या मुलांना तशाप्रकारचे मार्गदर्शन करावे आपण वेगळे उभे राहून विधवेच्या मुलांच्या चुका, त्यांनी निर्माण केलेल्या समस्या आणि तक्रारी त्यांना दोष न देता होईल तितक्या प्रमाणात मार्गदर्शन करावे. चिंता काळजीने व्यस्त असलेल्या त्यांच्या मातंना मदत करण्याचे प्रयत्न करावे. त्यांचा भार हलका करण्याचे प्रयत्न करावेत.MHMar 151.4

    अशी अनेक मुले आहेत की जे पूर्णपणे आई वडीलांच्या मार्गदर्शनाला वंचित आहेत. ख्रिस्ती परिवाराच्या शिक्षणाच्या प्रभावापासून वेगळे आहेत. ख्रिस्ती लोकांनी अशा मुलांसाठी आपली घरे आणि अंत:करणे सतत उघडी ठेवली पाहिजेत. परमेश्वर जे व्यक्तिगत कार्य ठरवितो ते कोणती संस्था किंवा परोपकारी मंडळासाठी नसते परंतु परिवारातील सदस्यांकडे सोपविले असते. परमेश्वराने कुटंब स्थापनेची जी योजना बनविली आहे ते प्रेम किंवा मार्गदर्शन कोणतीही संस्था करु शकत नाही तर कौटुंबिक जिव्हाळ्यामधूनच केले जाते. मुलांचा स्वभाव व गुण ख्रिस्ती परिवारामध्येच योग्य प्रकारे तयार केले जातात.MHMar 152.1

    अनेक लोक असे आहेत त्यांना अपत्य नसते ते अशा अनाथ मुलांना सहाय्य करु शकतात पाळीव जनावरे पाळण्याऐवजी त्यांनी या अनाथ मुलांकडे लक्ष दिले तर त्यांना स्वर्गीय आनंद व आशीर्वाद मिळेल. पाळीव जनावरांवर भरमसाठी पैसे खर्च करण्याऐवजी त्यांनी गरीब, अनाथ व विधवांची काळजी घ्यावी. पाळीव प्राण्यांवर आपला वेळ आणि पैसे खर्च करण्याऐवजी अनाथ मुलांसाठी सहाय्य करुन त्यांना अन्न, वस्त्र व शिक्षणाची व्यवस्था केली तर स्वर्गीय आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग पाहा की या मुलांना योग्य मार्गाला लावून त्यांच्यामध्ये सभ्य व देवभिरु स्वभाव निर्माण करुन समाज सुधारणा करण्याचे श्रेय तुम्हाला मिळेल तुम्हाला त्याचे समाधान व त्यांचा आशीर्वाद ही मिळेल.MHMar 152.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents