Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय ४०—रोजच्या जीवनातील सहाय्य

    “जसे तुझे दिवस तशी तुझी शक्ति असेल”

    शुद्ध आणि सच्चे ख्रिस्ती शांत जीवनामध्ये ठाम राहण्याची वाक्य शक्ति केवल शब्दामध्ये निर्माण होणाऱ्या वाक्य शक्तिपेक्षा जास्त आहे. मनुष्य जे काही बोलतो त्यापेक्षा अधिक प्रभाव मनुष्य जो काही आहे त्याचा जास्त प्रभाव पडतो.MHMar 369.1

    ज्या अधिकाऱ्यांना येशूकडे पाठविले ते असा निरोप घेऊन आले की तो जसे बोलतो तसे कोणीच मनुष्य बोलू शकत नाही, परंतु त्याचे कारण असे आहे की कोणीही मनुष्य असा राहात नाही जसा तो राहतो, जर त्याचे जीवन तसे होते, तेव्हा तो तसा बोलत नसता जसे तो बोलतो. तो शब्दांनी त्यांच्यासाठी काहीच बोध होत नव्हता. कारण तो पवित्र आत्म्याकरवी बोलत होता. त्याचे शब्द शुद्ध होते. पिवत्र होते त्यामध्ये प्रेम सहानुभूति, दया आणि भरपूर सत्यता होती.MHMar 369.2

    हा आमचा अनुभव व स्वभाव आहे. जो दुसऱ्यांवर आमच्या प्रभावावर निर्धारित करतो. दुसऱ्यांना ख्रिस्ताच्या अनुग्रहाच्या शक्ति विषयी सांगायचे झाल्यास या शक्तिंचा प्रभाव इतरांवर पडणे अति आवश्यक आहे. त्यायोगे तेसुद्धा ख्रिस्तांचे गुण व स्वभाव ओळखून त्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतील. ख्रिस्ती या नात्याने आम्ही ख्रिस्ताचे गुण आमच्या जीवनात व व्यवहारात वापरणे आवश्यक आहे. जी सुवार्ता आम्ही आत्म्यांचे तारण करण्यासाठी उपयोगात आणतो तीच सुवार्ता आमच्या आचरणामध्ये असल्यास त्याचा जास्त परिणाम घडून येतो. ख्रिस्ताचे जीवनच ही चालती बोलती सुवार्ता होती. अशाप्रकारे आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी या नात्याने ख्रिस्ताच्या जिवंत विश्वासकरवी आम्ही अविश्वासू समजामध्ये आपला प्रभाव सोडू शकतो. जर आपण एखाद्या पाप्याला पाण्याच्या धारदार प्रवाहातून वाचवू पाहातो तर प्रथम आम्ही आमचे पाय येशू ख्रिस्त नावाच्या खडकावर दृढ टिकवून ठेवायला हवे. ख्रिस्तीपणाचा बिल्ला हा बाहेरुन दिसण्याचे चिन्ह नाही किंवा गळ्यात वधस्तंभ किंवा मुगुट घालण्यासारखे नाही, परंतु ते तर मनुष्य आणि परमेश्वर दोघांचे संयुक्त संघटन आहे. चारित्याच्या बदलावामध्ये परमेश्वराच्या अनुग्रहाची शक्तिच्या अनुग्रहाकरवी जगाला समजावायचे आहे की परमेश्वराने आपल्या पुत्राला या जगामध्ये मुक्तिदाता बनवुन पाठविले आहे. मानवाच्या आत्म्याला घेरणारा कोणताही प्रभाव एका नि:स्वार्थी जीवनाच्या प्रभावाची बरोबर करु शकत नाही. सुवार्ता प्रचाराच्या पक्षामध्ये सर्वात अधिक शक्तिशाली तो आहे. जो प्रेम करणारा आणि प्रेमी ख्रिस्त.MHMar 369.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents