Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय २३—भोजन आणि आरोग्य

    आपण जे अन्न खातो त्याचमुळेच आपले शरीर बनते. आपल्या शरीरामधील पेशींचा सतत नाश होत असतो आणि नव्या पेशींची निर्मिती होत असते. प्रत्येक अवयांच्या हालचालीबरोबर उष्मांक खर्च होत असतात आणि या उष्माकांची पुर्तता करण्यासाठी आपणास अन्नाची गरज असते. आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाला त्यांच्या पोषणाची गरज असते. मेंदूला त्याच्या पोषणाची गरज असते. हाडे, स्नायुपेशी आणि सर्व नाडी तंत्रांना त्यांच्या त्यांच्या भागांना पोषणाची आवश्यकता असते. ही क्रिया अद्भुत आहे. या क्रियेमध्ये अन्नाचे रक्तामध्ये रुपांतर होते. आणि या रक्तामुळे प्रत्येक इंद्रियांचे पोषण होते. देहाच्या प्रत्येक अवयवांची निर्मिती होत असते. परंतु ही प्रक्रिया निरंतर चालत असताना प्रत्येक इंद्रिये पेशीजाल आणि मांसपेशींना शक्ति देते.MHMar 228.1

    देहाची निर्मिती करण्यासाठी अशा प्रकारच्या अन्न पदार्थांची निवड करायला हवी की सर्वांग शरीरासाठी सर्वोत्तम अन्नपदार्थांचा समावेश असावा. या निवडीमध्ये भूक हा सुरक्षित मार्गदर्शक होऊ शकत नाही. चुकीच्या सवयीमुळे भूममार्ग भ्रष्ट झालेली आहे. भूक अशा पदार्थांची इच्छा व्यक्त करते की शरीराला शक्ति देण्याऐवजी शरीर दुर्बल होण्याच्या पदार्थांची अपेक्षा भूक करते. समाजाचे रीतीरिवाजांचे मार्गदर्शन घेणे हे सुरक्षित नाही. प्रत्येक स्थानाकडे पायी चालत जाण्याचे कष्ट आणि आजार हे भोजनाच्या चुकीच्या पद्धतीमुळे होऊ शकते.MHMar 228.2

    मनुष्याच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम अन्नपदार्थ कोणते आहेत त्याच्या मूळ योजनाचे अध्ययन करणे आवश्यक आहे. परमेश्वराने यासंबंधी सूचना दिल्या आहेत. कारण त्याने मानवाला निर्माण केले व त्याला मानवाच्या गरजा ठाऊक आहेत. आदामाचे भोजन त्यानेच ठरविले. तो म्हणाला, “पाहा, अवघ्या भूतलावरील बीज देणारी प्रत्येक वनस्पती व सबीज देणारे प्रत्येक झाड मी तुम्हास देतो, ही तुमचे अन्न होतील.” (उत्पति १:२९). पापामुळे भूमि शापित झाल्यावर भोजनासाठी पृथ्वीवर आदामाला एदेन बाग सोडावी लागली तेव्हा आदामाला शेताचा उपज खाण्याची परवानगी मिळाली. (उत्पत्ति ३:१८).MHMar 228.3

    सृष्टिकर्ता परमेश्वराने आमच्या भोजनासाठी धान्य, फळे, कडधान्य व सर्व प्रकारच्या भाज्या निवडल्या या सर्व गोष्टी कच्च्या किंवा शिजवून खाल्यास मानवाच्या पोषणासाठी हे अन्न सर्वोत्तम आहे, आरोग्यदायी आहे. ते सामर्थ्य, सहनशक्ती, उत्साह आणि बुद्धी देते आणि हे मसालेदार तेलकट अशा पदार्थांनी शक्य नसते. परंतु प्रत्येक खाद्यपदार्थ आपल्या आरोग्याला हितकारकच असतात असे नाही. म्हणून अन्नपदार्थांची निवड सावधगिरीने करणे आवश्यक आहे. आमचे अन्न, आमचे कार्य, ऋतु आणि ज्या वातावरणामध्ये आम्ही राहत आहोत त्या प्रसंगाप्रमाणे असावे. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक ऋतु आणि वातावरणामध्ये ठराविक प्रकारचे अन्न असावे. प्रत्येक ऋतुमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आहार असावा. म्हणून प्रत्येक ऋतु वातावरणात, व्यवसाय व कामाच्या स्वरुपानुसार तशाप्रकारचा आहार निवडावा. कष्टाचे काम करणारे व बुद्धीचे काम करणाऱ्यांना ज्या प्रकारचे भोजन पदार्थांची गरज असते ते केवळ बसून व्यवसाय करणारांना चालणार नाही. ते रिकामटेकडे असतील काही काम करीत नाहीत त्यांना कठीण अन्नपदार्थ पचणार नाहीत. परमेश्वराने आपल्याला अनेक प्रकारचे अन्नपदार्थ दिले आहेत. आणि प्रत्येक व्यक्ति आपल्या अनुभवानुसार बुद्धी आणि समजूतदारपणाने स्वतःसाठी अन्नपदार्थांची निवड करतो. निसर्गाने आम्हाला भरपूर प्रमाणात फळे, काष्टफळे, धान्य आणि भाज्या, फळभाज्या दिल्या आहेत. जगामध्ये सर्वत्र अन्नधान्याची रेलचेल भरपूर प्रमाणात आहे. परिणामस्वरुप जे खाद्यपदार्थ काही वर्षापूर्वी अति महाग होते व श्रीमंतांसाठी उपलब्ध होते. परंतु आज प्रत्येकांच्या आवाक्यामध्ये आहेत. विशेषतः डब्बाबंद ड्रायफुटस सर्वत्र उपलब्ध आहेत.MHMar 229.1

    मांसाहाराची जागा घेण्यासाठी ड्रायफ्रुट खूप प्रमाणात उपलब्ध आहेत. या सुक्या फळांबरोबर फळे, धान्य आणि काही मूळेसुद्धा वापरात येतात. या सर्वाकरवी आरोग्यवर्धक भोजन करता येते. परंतु तरीही ड्रायफ्रुटचा वापर सावधगिरीनेच करायला हवा. ज्या लोकांना सुकलेली फळे खाण्याने समस्या निर्माण होते ते सावधपणे त्यांचा वापर करु शकतात. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे सर्व सुकी फळे आरोग्यवर्धक नसतात. बदाम भूईमूग शेंगांपेक्षा उत्तम असतात परंतु त्यांचा वापर अल्पप्रमाणात करावा. पचनासही ते हलके असतात.MHMar 229.2

    जे लोक जास्त प्रमाणात तेलकट तुपकट खातात त्यांचा स्वाद नैसर्गिक आहे. त्यांना साध्या जेवणाची चव बेचव लागते. परंतु चमचमीत खाणाऱ्यांना साधे जेवण थोडे दिवस बेचव होईल. जे लोक स्वास्थ्यवर्धक भोजन करतात ते त्यांना स्वादिष्ट लागेल. जे लोक मैदायुक्त व रिफाईंड जेवण खातात त्यांना साधे जेवण चांगले लागणार नाही. परंतु हळुहळू त्यांना सवय लागली तर साधे जेवण त्यांना स्वादिष्ट लागेल आणि रिफाईंड पदार्थांनी बिघडलेले पोट सुरळीत होईल व आरोग्यही सुधारेल कारण हे अन्न सर्वप्रकारे पोषक आहे. आरोग्य चांगले राखण्यासाठी चांगल्या पौष्टिक अन्नपदार्थांची आवश्यकता असते. यामुळे ते आजारी पडणार नाहीत.MHMar 230.1

    आरोग्य चांगले राखायचे असल्यास योग्य मात्रेत चांगले पौष्टिक आहार घ्यावा. शरीरासाठी योजनाबद्ध आहार असल्यास तो आरोग्यासाठी उत्तमच असतो. असा सकस आहार प्रत्येक राष्ट्रामध्ये सहज उपलब्ध असतो. स्वदेशी, परदेशी भाज्या कोठेही उपलब्ध असतात. त्यांचे उत्पादन कोणत्याही देशात केले जाते. आपल्या शरीरास पोषक व आरोग्यास उत्तम असा पौष्टिक आहार मांसाहारापेक्षा उत्तम असतो. MHMar 230.2

    ज्या ठिकाणी फळांचे उत्पादन केले जाते ती फळे सुकवून त्यांचा संग्रह केला जातो किंवा बंद डब्यामध्ये ठेवली जातात. मनुके, अंजीर, स्ट्रॉबेरी अशाप्रकारची छोटी फळे सुकवून टिकविली जातात त्यांची निर्यात आयात ही केली जाते. त्यांची शेती ही अनोळखी असते मोठ्या प्रमाणात त्यांचे उत्पादनही केले जाते.MHMar 230.3

    जेथे शक्य असेल तेथे ही फळे ठेवण्यासाठी काचेच्या बरण्यांचा वापर करावा. विशेषतः डब्यामध्ये बंद केलेली फळे चांगल्या अवस्थेत असायला हवी व तशी तरतुद करावी. थोड्या साखरेमध्ये फळे वाफाळली जावीत की ती सुरक्षित राहतील अशी दक्षता घ्यावी म्हणजे फळातील ताजेपणाचे गुण कमी होणार नाहीत असे करावे.MHMar 230.4

    सुकविलेली फळे जसे मनुके, अंजीर, बोरे, चेरी, स्ट्रॉबेरी अशी फळे काही ठिकाणी स्वस्त दरात मिळतात. मुख्य भोजनामध्ये त्यांचे स्थान वेगळे ठेवण्यात येते. मुख्य भोजनाबरोबरच फळे खाणे योग्य नाही. मानसिक कार्य करण्यामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. एकवेळच्या भोजनामध्ये केवळ भोजनच करावे व दुसऱ्या भोजनाच्या वेळी केवळ फलाहारच करावा. पाचनशक्ती दुर्बळ असेल तर दोन्ही एकाच वेळी खाल्ल्यास समस्या निर्माण होईल. प्रत्येक भोजनामध्ये सुद्धा वेगळेपणा असायला हवा. एकाच प्रकारचे भोजन रोजरोज नसावे. भोजनाच्या प्रकारामध्ये वेगळेपणा असेल तर ते चवीने व स्वादपूर्ण खाल्ले जाते. आणि शरीराचे उत्तम पोषण होते.MHMar 230.5

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents