Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय २—सेवेसाठी जगणे

    “या जगामध्ये असे दिवस कधीच आले नव्हते स्वर्ग झुकून पृथ्वीवर आला होता.”

    कफर्णहूममध्ये पेत्र या कोळ्याच्या घरी त्याची सासू भयंकर तापाने आजारी होती आणि त्यांनी येशूविषयी सांगितले. “येशूने तिला स्पर्श केला आणि ती बरी झाली. आणि ती उठून त्याची व त्याच्या शिष्यांची सेवा करु लागली.” (लूक ४:३८, मार्क १:३०, मतय ८:१५)MHMar 9.1

    ही आनंदाची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. हे आश्चर्यजनक कार्य त्याने शब्बाथ दिवशी केले आणि यहूदी धर्मगुरुंच्या भयाने सूर्यास्त होईपर्यंत लोक बरे होण्यासाठी आले नाहीत. नंतर मात्र घरातून, दुकानातून, बाजारातून व सर्व शहरातून येशू जेथे होता तेथे लोकांनी गर्दी केली. आजारी लोकांना झोळीतून व बाजेवरुन आणले गेले. काही रुग्ण कुबड्या व काठीच्या व काही एकमेकांच्या आधाराने तेथे आले. या मुक्तिदात्यासमोर ते अशक्तपणामुळे धडपडत होते.MHMar 9.2

    लोक सतत येत राहिले व बरे होऊन जाऊ लागले. कारण कोणाला ही ठाऊक नव्हते की रोगमुक्त करणारा दुसरे दिवशी त्यांच्यामध्ये असेल किंवा नाही. या अगोदर कफर्णहूम मधील लोकांनी असा दिवस कधीच पाहिला नव्हता. वातावरणामध्ये जयचा विजय आणि सुटकेलचा आवाज घुमत होता.MHMar 9.3

    जोपर्यंत शेवटचा रुग्ण बरा झाला नाही तो पर्यंत येशूने आपले कार्य थांबविले नव्हते. बरीच रात्र झाल्यावर गर्दी कमी झाली. तेव्हा शिमानाच्या घरात शांततेचे वातावरण निर्माण झाल. एक उत्साहपूर्ण आणि दीर्घ दिन निघून गेला. येशूने विश्रांती घेण्याची इच्छा दर्शविली. यावेळी शहरातील लोक गाढ झोपेत होते. सूर्य उगवायच्या खूप अगोदर मुक्तिदाता भल्या पहाटे उठून घनदाट रानात एके ठिकाणी गेला व तेथे प्रार्थना करु लागला. (मार्क १:३५)MHMar 9.4

    सकाळी पेत्र आणि त्याचे साथीदार येशूकडे आले आणि म्हणाले की कफर्णहूमचे लोक त्याचा शोध करीत आहेत. “परंतु तो त्यांस म्हणाला मला इतर गावी ही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे. कारण त्यासाठीच मला पाठविले आहे.” (लूक ४:४३). येशूचे हे शब्द ऐकून त्यांना नवल वाटले.MHMar 9.5

    कफर्ण हूममध्ये जे उत्तेजन पसरले होते त्यामुळे त्याच्या सेवेचा उद्देश त्याच्या डोळ्या समोरुन निघून जाण्याचा धोका होता. येशू हा केवळ चमत्कार करणारा किंवा शारीरिक रोग बरे करणारा असा लोकांसमोर आकर्षण बनावा अशी त्याची इच्छा नव्हती तर त्याची इच्छा होती की लोकांनी त्याच्याकडे उद्धारकर्ता म्हणून पाहावे. परंतु तो एक राजा बनून पृथ्वीवर आपले राज्य स्थापन करण्यासाठी आला आहे असा विश्वास ठेवायला लोक तयार होते, परंतु तो लोकांचे पृथ्वीवरील गोष्टीतून उठवून स्वर्गीय गोष्टींवर केंद्रित करु पाहात होता. आध्यात्मिक गोष्टींकडे त्यांचे लक्ष लागावे अशी त्याची इच्छा होती.MHMar 10.1

    मनुष्याची जगातील यशस्विता त्याच्या या कार्यामध्ये अडथळा निर्माण करु शकत होती. कारण जगीक धन, पदवी आणि यश ज्यांना मिळते त्यांचा सन्मान होतो. म्हणून मानव हा मनुष्याच्या पुत्राच्या इच्छेपासून खूप दूर आहे. जगिक सन्मान आणि प्रतिष्ठेची इच्छा जे व्यक्त करतात त्यांच्यामध्ये येशूने कोणत्याही माध्यमाचा वापर केला नाही. त्याच्या जन्माच्या शतकांपूर्वी जी भविष्यवाणी केली होती ती अशी होतो. “तो गवगवा करणार नाही, तो आपला स्वर उच्च करणार नाही, तो रस्त्यातून पुकारा करणार नाही, चेपलेला बोरु तो मोडणार नाही. मिणमिणती वात तो विझविणार नाही; तो सत्याने न्यायाची प्रवृत्ति करील.” (यशया ४२:२-३). परुशी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करीत असत म्हणून ते स्वत:ला इतरांपेक्षा वेगळे समजत असत. धर्माबाबतीत आपला उत्साह दाखविण्यासाठी ते वादविवाद करीत असत. विरोधी गटाबरोबर त्यांचा वाद मोठ्याने आणि दीर्घ काळ चालत असे व त्यामध्ये ते स्वत:चे वर्चस्व दाखवित असत. या क्रोधित विद्वानांचा रस्त्यावर व इतरत्र या शिवाय नवीन काही नसे.MHMar 10.2

    येशूचे जीवन याच्या अगदी विरुद्ध होते. त्याच्या जीवनामध्ये वादविवाद किंवा आरडाओरडा मुळीच नव्हता. त्याच्यामध्ये दिखाऊपणा व स्वत:ची वाहवा मुळीच नव्हती तो ईश्वरामध्ये लपला होता व त्याच्यातून ईश्वर दिसत होता. याच प्रकाशाकडे लोकांचे लक्ष वेधण्याचा तो प्रयत्न करीत होता.MHMar 10.3

    धार्मिकतेचा सूर्य मोठ्या प्रकाशाप्रमाणे जगावर उठावला नव्हता की ते पाहून लोकांचे डोळे दिपतील, परंतु ख्रिस्ताविषयी लिहिले आहे की, “त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्चित आहे.” (होशेय ६:३). सूर्याचा प्रकाश हळूहळू उदय होऊन हा प्रकाश पृथ्वीवर पसरतो व अंधार नाहीसा करतो व सर्व सृष्टीला जीवन देतो. अशाप्रकारे धार्मिकतेचा सूर्य आपल्या किरणांनी आरोग्यदान देण्यासाठी उदय पावला.MHMar 11.1

    पाहा, हा माझा सेवक याला मी आधार आहे. पाहा हा माझा निवडलेला या विषयी माझा जीव संतुष्ट आहे.” (यशया ४२:१). MHMar 11.2

    “कारण निर्दय लोकांचा झपाटा भिंतीवर आदळणाऱ्या वादळाप्रमाणे आहे, पण तू दुर्बलास दुर्ग, लाचारास विपत्काली आश्रय, वादळात निवारा, उन्हात सावली असा झालास.” (यशया २५:४).MHMar 11.3

    “आकाश निर्माण करुन विस्तारणारा, पृथ्वीच्या व तिच्या उपजाचा फैलाव करणारा, तिच्यावरील लोकांत प्राण घालणारा व तिच्यावर संचार करणाऱ्यास जीवन देणारा देव परमेश्वर असे म्हणतो : मी परमेश्वराने न्यानुसार तुला बोलाविले आहे मी तुझा हात धरिला आहे, तुला राखिले आहे, तू लोकांना करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असे मी तुला करीत. अंधळ्यांचे डोळे उघडावे, बंदिशाळेतून बंदिवानास व अंधारात बसलेल्यास कारागृहातून बाहेर काढावे म्हणून मी असे करीन.” (यशया ४२:५-७)MHMar 11.4

    “माहीत नाही अशा रस्त्याने मी अंधळ्यास नेईल, अज्ञात अशा मार्गाने मी त्यास चालवित त्याच्यापुढे अंधार प्रकाश होईल व उंचसखल जागा सपाट मैदान होईल असे मी करीन. ह्या गोष्टी मी करीन सोडणार नाही’ (यशया ४२:१६).MHMar 11.5

    “अहो समुद्रावर पर्यटन करणारे व त्यात राहणारे सर्व लोक हो, अहो द्वीपांनो तुम्ही आपल्या रहिवाश्यासह परमेश्वराला नवगीत गा, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्याची स्तोत्रे गा. अरण्य व त्यातील नगरे आणि ज्या खेड्यापाड्यात केदार वसत आहे ती गाण्याचा गरज करोत, सेलाचे रहिवासी उत्सव करोत. ते टेकड्यांच्या माथ्यावर मोठ्याने जयघोष करोत. ते परमेश्वराचे गौरव करोत. द्वीपद्वीपांतरी त्याचा गुणानुवाद करोत.” (यशया ४२:१०-१२).MHMar 11.6

    “हे आकाशा जयघोष कर, कारण परमेश्वराने हे केले आहे. अहो पृथ्वीच्या अधोभागांनो, हर्ष नाद करा. अहो पर्वतांनो, हे वना त्यातील प्रत्येक वृक्षा तुम्ही जयजयकार करा. कारण परमेश्वराने याकोबास उद्धरिले आहे; तो इस्त्रायलच्या ठायी आपला प्रताप प्रगट करितो.’” (यशया ४४-२३).MHMar 11.7

    हेरोद राजाच्या काळकोठडीमध्ये बंदी असलेला, निराश झालेला बाप्तिस्मा करणारा योहान ज्याने मुक्तिदात्याच्या कार्याविषयी ऐकले आणि आपल्या शिष्यांना व मित्रांना त्याच्याकडे पाठविले व विचारले की “जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी ?” (मत्तय ११:३).MHMar 12.1

    मुक्तिदात्याने शिष्याच्या प्रश्नाचे उत्तर लगेचच दिले नाही. जेव्हा ते त्याच्यासमोर आश्चर्याने शांत उभे होते आणि ते पाहात होते की दुःखी लोक त्याच्याजवळ येत होते. आरोग्यदान देणाऱ्या त्या महान व्यक्तिच्या आवाजाने बहिऱ्यांचे कान उघडले जात होते. त्यांच्या हाताच्या स्पर्शाने अंधाना दृष्टी प्राप्त होत होती. दिवसाचा प्रकाश ते पाहू शकत होते. निसर्ग, मित्र आणि ज्याने दृष्टी दिली त्याचे मुख ते पाहू शकत होते. मृतांच्या कानावर त्याचा आवाज गेला, तर त्यांच्यामध्ये चैतन्य येऊन ते जिवंत होत होते. पक्षाघात झालेले आणि अशुद्ध आत्म्याने जखडलेले त्याच्या शब्दाचे पालन करुन निघून जात होते. वेडाचे झटके येणारे वेड जाऊन त्याची सेवा करीत होते. गरीब शेतकरी आणि मजूर यांना धर्मगुरुंनी वेगळे केले होते ते सर्व त्याच्याजवळ एकत्र आले आणि येशूने त्यांना सार्वकालिक जीवनाचे शिक्षण दिले.MHMar 12.2

    योहानाचे शिष्य जेव्हा हे सर्व पाहात होते व ऐकत होते. दिवस संपला आणि शेवटी येशूने त्यांना आपल्या जवळ बोलाविले व सांगितले की, “तुम्ही जे ऐकले व पाहिले ते सर्व जाऊन योहानाला सांगा. “जो कोणी माझ्या संबंधाने अडखळत नाही तो धन्य.” (मत्तय ११:६). योहानाचे शिष्य हा संदेश घेऊन परत गेले योहानासाठी ते बस होते.MHMar 12.3

    योहानाने मसिहा विषयी केलेल्या भविष्यवाणीची आठवण केली. “प्रभु परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे; कारण दीनांस शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे, भग्न हृदयी जीनास पट्टी बांधावी, धरुन नेलेल्यास मुक्तता व बंदिवानास बंधमोचन विदित करावे, परमेश्वराच्या प्रासादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा. सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे.” (यशया ६१:१-२).MHMar 12.4

    येशू हा तो नासोरी व्यक्ति होता जो वचनदत्त होता त्याचे स्वर्गीय होण्याची साक्ष म्हणजे दीन दुःखी लोकांची त्याने केलेली सेवा दिसून येत होती. आमच्या दीन अवस्थेच्या पातळीपर्यंत उतरण्यातच त्याचा महिमा प्रकट होत होता.MHMar 12.5

    केवळ त्याच्या कार्यानेच तो मसिहा असल्याचे प्रमाण दिले नव्हते, परंतु कोणत्या प्रकारच्या राज्याची स्थापना करु इच्छितो हे सुद्धा त्याने दाखवून दिले. योहानाला हेच सत्य दिसून आले. जेव्हा तो रानात एलिया जवळ आला होता. “तेव्हा पाहा परमेश्वर जवळून जात असता त्याच्या समोरुन मोठा सुसाट्याचा वारा सुटून डोंगर विदारीत व खडक फोडीत होता पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. वारा सुटल्यानंतर भूमिकंप झाला. पण त्या भूमिकंपात ही परमेश्वर नव्हता. भूमिकंपानंतर अग्नि प्रगट झाला, पण त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता. (१ राजे १९:११-१२). अग्निनंतर देव धीम्या आवाजामध्ये ऐलियांशी बोलला. अशाप्रकारे येशूला सुद्धा आपले कार्य करायचे होते. राज्ये उलथवून नाही किंवा वरील वैभवाचे व दिखाव्याचे नाही, परंतु लोकांच्या हृदयात दया व जीवनाच्या आत्मबलिदानाकरवी सांगून राज्याची स्थापना करायची होती.MHMar 13.1

    परमेश्वराचे राज्य प्रकट रूपामध्ये येत नाही तर त्याच्या वचनाच्या प्रेरणेने येते. त्याचा आत्मा आमच्या अंत:करणात कार्य करण्याद्वारे आणि त्याच्या आत्म्याशी आमच्या आत्म्याचे संबंध येऊन त्याचे राज्य येते. त्याच्या शक्तिचे सर्वात मोठे प्रमाण म्हणजे येशूच्या चारित्र्याप्रमाणे मानवी स्वभाव बदलतो. ख्रिस्ताच्या अनुयायांना जगाचा प्रकाश म्हटले आहे, परंतु त्यांना असे नाही सांगितले की तुम्ही चमकण्याचा प्रयत्न करा. तो बाहेरील श्रेष्ठत्व दिसण्यासाठी बाहेरील प्रयत्न करण्यास अनुभूती देत नाही. त्याची इच्छा हीच आहे की आत्मा स्वर्गीय सिद्धांताने संपन्न होवो. तेव्हा ते जगाच्या संपर्कामध्ये येतील. जेव्हा त्यांच्यातील प्रकाश जगाला दिसेल. त्यांच्या जीवनातील प्रत्येक कार्यामध्ये त्यांची संपूर्ण सत्यनिष्ठा हीच प्रकाशाचे माध्यम असेल. देवाच्या कार्याच्या उन्नतिसाठी उच्च शिक्षण, पदवी, धन मौल्यवान सामग्री अशा कोणत्याही गोष्टींची आवश्यकता नसते किंवा मनुष्याच्या प्रतिष्ठेची गरज नसते. यामुळे उलट आपल्यामध्ये गर्व निर्माण होतो. जगातील दिखाऊपणा कितीही प्रभावशाली का असेना परमेश्वराच्या दृष्टीने त्याला मुळीच किंमत नसते. दिसणाऱ्या आणि अस्तित्वात असणाऱ्या गोष्टींपेक्षा न दिसणाऱ्या व शाश्वत गोष्टींचे मोल समजतो. जगातील गोष्टींना तेव्हाच महत्त्व येते जेव्हा मानव प्रथम स्वर्गीय गोष्टींचे महत्त्व जाणून घेतो. सर्वात अधिक पसंत असणारी कला व वस्तुंची सुंदरता ही चारित्र्याच्या सौंदर्याच्या तुलनेने काहीच नाही.MHMar 13.2

    जेव्हा परमेश्वराने जगासाठी आपला एकुलता पुत्र दिला, त्याने मानवाला सर्वकाळ राहणारी अनमोल देणगी अशी आहे की जगाच्या उत्पत्तिपासून आतापर्यंत सर्वांत मौल्यवान गोष्टीशी केलेली किंमत काहीच नाही अशा या देवाच्या पुत्राची तुलना कशानेच होणार नाही. ख्रिस्त या जगात आला व मनुष्याच्या संतानामध्ये अनंतकाळचे धन एकत्र करुन उभा राहिला आणि ती संपत्ति ही आहे जी त्याच्याशी आमचे असणारे संबंध सुधारल्यावर मिळते व ही संपत्ति आपण इतरांमध्ये प्रगट करुन त्यांना देतो.MHMar 14.1

    परमेश्वराच्या कार्यासाठी मानवाचे प्रयत्न तेव्हाच यशस्वी होतील जेव्हा कार्यकर्त्यांच्या समर्पणानुसार मसिहाच्या कृपेने त्याच्या बदललेल्या जीवनाची शक्ति प्रगट होईल. जगापासून आपणास वेगळे व्हायचे आहे. कारण परमेश्वराने आपणास शिक्कामोर्तब केले आहे. कारण परमेश्वर आपल्यामध्ये स्वतः त्याची प्रीति प्रगट करतो. आमची मुक्तता करणारा आपल्या धार्मिकतेने आम्हांला आच्छादितो.MHMar 14.2

    आपल्या सेवेसाठी तो स्त्री-पुरुषांची निवड करताना तो विचारीत नाही की तुमचे शिक्षण किती झाले आहे. तुम्ही पदवीधर आहात का ? तुमच्याकडे धन किती आहे वगैरे परंतु तो विचारतो की ते नम्रतेने चालतील का ? म्हणजे मी त्यांना मार्गदर्शन करु शकेन ? मी आपले शब्द त्यांच्या ओठावर ठेऊ शकू? ते माझे प्रतिनिधीत्व करु शकतील का ?MHMar 14.3

    परमेश्वर प्रत्येक व्यक्तिवर प्रमाणबद्ध प्रयोग करु शकतो आणि या प्रमाणबद्धतेनुसार तो आपला आत्मा त्यांच्या आत्मारुपी मंदिरामध्ये ठेऊ शकतो. परमेश्वर त्याचेच कार्य स्वीकारु शकतो ज्याच्यामध्ये परमेश्वराचा चेहरा दिसतो. ख्रिस्ताच्या अनुयायांना जगासमोर प्रगट करायचे असल्यास केवळ त्याचेच अनुकरण करणारे असे त्यांना जगासमोर सादर करायचे आहे.MHMar 14.4