Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    बरे होण्याचे मूळ

    उद्धारकर्त्याने आपल्या चमत्काराने ज्या शक्तिचे प्रदर्शन केले ती शक्ति जीवन संभाळण्यासाठी आणि आरोग्य प्राप्त करण्यासाठी सतत कार्यरत राहते. निसर्गाच्या माध्यमातून परमेश्वर रोज, प्रत्येक तास आणि प्रत्येक क्षण कार्य करत आम्हांला जिवंत ठेवणारा आमचा निर्माणकर्ता आहे. जेव्हा शरीराच्या एका भागामध्ये काही त्रास होत असेल तर ताबडतोब बरे होण्याची प्रतिक्रिया ही सुरु होते. निसर्गाचे माध्यम आरोग्य प्राप्त करण्यासाठी लगेच सुरुवात होते, परंतु या माध्यमातून कार्य करणारी शक्ति परमेश्वराची शक्ति आहे. जीवन देणारी प्रत्येक शक्ति केवळ परमेश्वराची शक्ति आहे. जो कोणी आजारामधून बरा होतो ते केवळ ती शक्ति केवळ परमेश्वराचीच आहे.MHMar 67.3

    आजार, कष्ट, दुःख ही सैतानाच्या शक्तिची कामे आहेत. सैतान नाश करणारा आहे आणि परमेश्वर रोगमुक्ति देणारा आहे. इस्राएलांना सांगितलेली वचने त्यांना अजूही लागू आहेत यामुळे देह व आत्मा आरोग्यदायी राहतात. “मी तुला बरे करणारा यहोवा आहे.” (निर्गम १५:२६). प्रत्येक मानवासाठी परमेश्वराने ही इच्छा व्यक्त केली आहे. “हे प्रिया माझी ही प्रार्थना आहे की जशी तू आत्मिक उन्नती करतोस तसेच तू सर्व गोष्टीमध्ये उन्नति कर आणि सुखी राहा.” हो तोच आहे. “तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करितो तो तुझे सर्व रोग बरे करितो तो तुझा जीव विनाश गर्तेतून उद्घारितो तो तुला दया व करुणा ह्यांचा मुकुट घालितो.” (स्तोत्र १०३:३-४).MHMar 68.1