Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    मादक पेये आणि पदार्थ

    द्राक्षारस चेष्टा करणारा आहे, मद्य गलबला करणारे आहे. त्यांच्यामुळे झिंगणारा शहाणा नव्हे. (नीतिसूत्रे २०:१). हाय हाय कोण म्हणतो ? अरेMHMar 254.1

    अरे कोण करितो ? भांडण तंट्यात कोण पडतो ? गा-हाणी कोण सांगतो ? विनाकारण घाय कोणास होतात ? धुंदी कोणाच्या डोळ्यात असते ? जे फार वेळेपर्यंत द्राक्षरस पीत राहतात जे मिश्र मद्याचा पूर्ण आस्वाद घेण्यास जातात त्यांचा द्राक्षरस कसा तांबडा दिसतो ? प्याल्यात कसा चमकतो ? घशातून खाली सहज कसा उतरतो हे पाहत बसू नको, शेवटी तो सर्वासारखा दंश करितो. फुरशाप्रमाणे झोंबतो. (नीतिसूत्रे २३:३९-३२).MHMar 254.2

    मादक पेये आणि पदार्थाच्या व्यसनाधीन आणि गुलामगिरीत असणाऱ्या आणि पतन पावलेल्यांचे अधिक स्पष्ट आणि सजीव चित्र कोणत्याही इसमाने कधीही बनविले नाही. मोहीत आणि पतित असणाऱ्यास कधी त्याच्या अवस्थेची कधीही जाणीव होत नाही. इतका तो नशेच्या आहारी गेलेला असतो. नशेच्या जाळ्यामधून निघण्यासाठी त्याच्याकडे ताकदच मुळी नसते. तो म्हणतो, मी शुद्धीवर कधी येऊ ? मी पुन्हा त्याचे सेवन करीन. (नीतिसूत्रे २३:३५).MHMar 254.3

    मद्यपीवर दष्परिणाम दिसण्यासाठी कोणत्या पुराव्याची गरज नसते. त्यांच्यामधील उत्साह उमेद व मानवता नष्ट झालेली असते. ज्या आत्म्यांसाठी प्रभूने आपला जीव दिला आणि ज्यांच्यासाठी स्वर्गातील देवदूत रडत आहेत असे आत्मे सर्वत्र आहेत. असभ्यतेच्या गळ्यातील लोढणे हे एक मानवाला कलंक आहे. प्रत्येक देश आणि समाजासाठी लज्जा आहे शाप आहे आणि धोका ही आहे. MHMar 254.4

    ज्या कुटुंबामध्ये वाईटपणा, यातना आणि निराशा आहे त्याचे चित्र कोण काढणार आहे ? त्या पत्नीविषयी विचार करा जिचे पालन पोषण कोमलपणे केले गेले होते. संवेदनशील आणि सुसंस्कृत व सभ्य कुटुंबामध्ये ती वाढली होती आणि आता ती एका अशा मनुष्याच्या गळ्यात बांधली गेली होती की आता तो एक सैताना सारखा वाटत होता. त्या मुलांविषयी विचार करा की जे शिक्षणाला वंचित होऊन पित्याच्या दहशता खाली जीवन जगत होते. त्याला त्यांचा अभिमान असायला हवा होता, त्यांचा तो रक्षक व्हायला हवा होता परंतु त्याच्या पिण्याच्या व्यसनामुळे हे कुटुंब निंदायुक्त जीवन जगत होते.MHMar 254.5

    त्या भयंकर अपघाताविषयी विचार करा जे रोज मद्यपानामुळे घडत असतात. रेल्वे स्टेशनवरील काही अधिकारी काही संकेताकडे दुर्लक्ष करतात किंवा हुकूमाकडे चुकीच्या अर्थाने पाहतात. गाडी पुढे चालतच राहते आणि पुढे पुढे जाऊन अपघात होतो. यामुळे अनेकजण मृत्युमुखी पडतात, जखमी होतात. एक बोट पाण्यामध्ये पलटी होते आणि अनेक प्रवासी आणि नावाडी मरतात. तपासणीमध्ये असे दिसून येते की बोटीचा मुख्य चालक नशेमध्ये होता. कोणाला पिण्याची इतकी सवय असते की अनेक लोकांच्या जिवाची जबाबदारी त्याच्या हातात असते हे तो विसरतो. अशा बेजबाबदार लोकांवर कसा विश्वास ठेवायला ? एका अटीवर त्याच्यावर विश्वास ठेवता येतो ती म्हणजे त्याने मद्यपान पूर्णपणे वर्ण्य केले पाहिजे.MHMar 255.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents