Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    आरोग्याची तत्वे शिकविणे

    सुवार्ता प्रचार करणाऱ्या सर्व मिशनऱ्यांना आरोग्यदायी तत्वे शिकविता आली पाहिजेत. प्रत्येक ठिकाणी आजार व रोग आहेतच आणि बहुतेक लोकांना आरोग्याचे नियम ठाऊक नाहीत त्यांना ते नियम सांगून आजारांपासून त्यांना रोगांपासून वाचविता येते. लोकांना त्यांच्या व्यवहारामध्ये आरोग्याचे नियमांचे पालन करुन या जीवनामध्येच नाही परंतु येणाऱ्या जीवनामध्ये सुद्धा उत्तम आरोग्यदायी जीवनाचे रक्षण करण्याची क्षमता प्राप्त करुन घेता येते. आपल्या जीवनातील जबाबदारी ओळखून यासाठी जागृत होणे आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येक मानव सृष्टीकर्त्याच्या निवासस्थानी राहण्यालायक होईल. त्याचा अधिकार त्याचा खरा संग्रह आहे तो म्हणजे सत्य. त्यांना सत्य समजणे आवश्यक आहे. कारण परमेश्वर म्हणतो, “आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत देवाने असे म्हटले आहे की त्यांच्यामध्ये वास करुन राहीन मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.” ( २ करिंथ ६:१६) MHMar 97.2

    हजारो लोक असे आहेत की जे स्वशुखीने बरे होण्यासाठी विषारी औषधे घेतात त्यांनी सर्वसामान्यपणू रोगनिर्मुलन करण्यासाठी साधे उपचार करण्यासाठी तयार व्हावे. आमच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये विशेष सुधारणा करणे आवश्यक आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीचे भोजन करणाऱ्या रोग्यासाठी तुम्ही काही कमी जबाबदार नाही. निष्काळजीपणे जिभेचे चोचले पुरविण्यासाठी शरीरास हानिकारक पदार्थाचे सेवन करतात. यामुळे मनुष्यामध्ये असंयम, अपराध आणि प्रीतिचा अभाव हे शाप आले आहेत.MHMar 98.1

    आरोग्यांचे नियम शिकविताना आम्हांला लोकांमधील सुधारणेकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. ही सुधारणा मानवाची बुद्धी आत्मा आणि शरीरावर उच्च प्रतीचा बदल घडवून आणते. जगासमोर निसर्ग नियम हे देवाचे नियम आहेत हे स्पष्ट करा. ते नियम आपल्या भल्यासाठीच निर्माण केले आहेत. या नियमांचे पालन केल्याने आपल्या जीवनामध्ये आनंद येतो आणि येणाऱ्या जीवनामध्ये सहाय्य प्राप्त होते.MHMar 98.2

    परमेश्वराची प्रीति आणि निसर्गाविषयी शिकविण्यामध्ये मार्गदर्शन करा. मानवाच्या शरीराची रचना अद्भुत आहे या विषयी जे निसर्ग नियम आहे ते शिकविण्यासाठी लोकांचे मार्गदर्शन करा. जे त्याचे ज्ञान आणि लाभाविषयी समजतात त्याच्या नियमांच्या पालनाचे अनुभव घेतात आणि आपले कर्तव्य चांगले समजतात ते त्यांना एक लाभदायक आशीर्वादाच्या रुपाने पाहतात.MHMar 98.3

    प्रत्येक सुवार्ताप्रचार करणारांना जाणीव होणे आवश्यक आहे की जीवनाच्या उत्तम आरोग्याच्या नियमांचे पालन करण्याचे शिक्षण देणे हा त्यांच्या सेवेचा एक भाग आहे. या कार्यासाठी फार मोठी गरज आहे आणि यासाठी सर्व जग आहे.MHMar 98.4

    प्रत्येक ठिकाणी वैयक्तिकपणे कार्य करण्याऐवजी संस्थेकरवी कार्य करावे अशी मानवाची बुद्धी, संस्था आणि मंडळीमध्ये एकीकरण होत असते. बहुसंख्येच्या लोकांवर दया करण्यात येते ती संघटना किंवा संस्थांवर सोपविण्यात येते. ही सर्व जबाबदारी संस्थेवर सोपवून स्वत: वेगळे होतात व त्यांची हृदये थंड होतात परंतु प्रत्येक व्यक्तिमध्ये जबाबदारी असते की त्यांनी आपले कार्य प्रामाणिकपणे करावे तरच संघटना टिकते व संस्थेचे कार्य पुढे चालू राहते. असे न केल्यास परमेश्वर आणि मनुष्याच्या प्रती प्रेम राहात नाही.MHMar 99.1

    ख्रिस्ताने आपल्या प्रत्येक अनुयायाला वैयक्तिक कार्य दिले आहे. एक असे कार्य जे प्रतिनिधीद्वारा केले जाऊ शकत नाही. रुग्ण आणि निर्धनांची सेवा करणे, हरवलेल्यांचा शोध घेणे त्यांना सुवार्ता सांगणे आणि ही जबाबदारी संस्थेवर किंवा संघटनेवर सोपविता येत नाही. जनसेवेसाठी वैयक्तिक जबाबदारी असणे आवश्यक आहे तसेच वैयक्तिक सुवार्ता प्रसाराच्या बलिदानाची गरज असते. हेच मागणे आहे.MHMar 99.2

    “धनी दासाला म्हणाला, माझे घर भरुन जावे म्हणून सडकांवर व कुंपणाकडे जाऊन लोकांना आग्रह करुन घेऊन ये.’” (लूक १४:२३). तो त्यांना आपल्या संपर्कामध्ये आणू इच्छितो ज्यांना लाभ मिळण्याची गरज आहे. “तू आपले अन्न भुकेल्यास वाटावे, तू लाचारास व निराश्रितांस आपल्या घरी न्यावे, उघडा दृष्टीस पडल्यास त्यास वस्त्र द्यावे. तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये हाच तो उपास नव्हे काय ?” (यशया ५८:७). “त्यांनी दुखणाईनावर हात ठेवला म्हणजे ते बरे होतील.” (मार्क १६:१८). सरळ संपर्क आणि व्यक्तिगत सेवेकरवी सुवार्ता प्रसाराचा आशीर्वादाचा लाभ घेणे आवश्यक आहे.MHMar 99.3

    प्राचीन काळामध्ये लोकांना प्रकाश देण्यासाठी परमेश्वराने कोणत्या एका खास लोकांची योजना केली नव्हती. दानिएल यहूदीयांचा राजकुमार होता. यशया राजघराण्यातील होता. दाविद आणि आमोस मेंढपाळ होते. जखऱ्या बाबेलचा एक बंदीवान होता आणि आलिशा शेतकरी होता. परमेश्वराने संदेष्टे आणि राजकुमार यांचा वापर करुन जगाला सत्य वचन देण्यासाठी दीन व हीन अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचा वापर केला. त्यांना प्रशिक्षिक केले.MHMar 99.4

    जो प्रत्येकजण त्याचा आशीर्वाद मिळवितो, दुसऱ्यांसाठी कार्य करण्यासाठी प्रभु त्याची नियुक्ति करतो. आम्हांला आपल्या ठिकाणी उभे राहून परमेश्वराला म्हणायचे आहे, “हा मी आहे मला पाठीव.” (यशया ६:८). वचनाचे सेवक मिशनरी, परिचारिका, ख्रिस्ती चिकित्सक आणि व्यक्तिगत ख्रिस्ती सेवक मग तो व्यापारी, शेतकरी किंवा कोणीही असो सुवार्ता प्रसाराची जबाबदारी किंवा जनसेवा ही सर्वांसाठी आहे. हे आमचे कार्य आहे की मानवाच्या उद्धारासाठी सुसमाचार त्यांच्यासमोर ठेवणे हे आपले कर्त्तव्य आहे. आमचा उद्योग काहीही असो सर्वांचे एकच लक्ष्य असावे.MHMar 99.5

    जे लोक त्यांना दिलेले कार्य करतात ते केवळ दुसऱ्यांना आशीर्वाद देतात असे नाही तर त्याना सुद्धा आशीर्वाद मिळतो. त्यांनी चांगल्या प्रकारे केले गेलेले कार्य त्यामुळे त्यांना चेतना येऊन त्यांचा आत्मा प्रकाशमान होईल. निराशा आपला उदासीपणा विसरुन जाईल. दुर्बळ बलिष्ट होईल. निष्काळजी चतुर होईल आणि प्रत्येकजण स्वत:मध्ये एक असा सहकारी दिसेल की जो कधी अयशस्वी होणार नाही.MHMar 100.1

    ख्रिस्ती मंडळ्या सेवेसाठी संघटित केल्या आहेत. त्यांचे ब्रीद वाक्य म्हणजे सेवा आहे. या मंडळ्यांचे सभासद ते शिपाई आहेत जे आपल्या उद्धारकर्त्याच्या अधीन आहेत. तो त्यांचा सेनापती असून त्यांना तो युद्धाचे शिक्षण देत आहे. ख्रिस्ती कार्यकर्त्यांची अनेक रुपे आहेत. कोणी शिक्षक, कोणी चिकित्सक, तर कोणी पाळक असे त्यांचे विशाल कार्य आहे. अनेकांनी या सर्व कार्याविषयी विचारही केला नसेल. त्यांना केवळ लोकांची सेवा करायची नाही, परंतु त्यांनी इतरांची सेवा कशी करायची याचे शिक्षण द्यायचे आहे. त्यांना केवळ मार्गदर्शन करायचे नाही, परंतु ऐकणारांना परमेश्वराचे नियम पालन करण्याचे शिक्षण देणे आवश्यक आहे. जे सत्य इतरांना दिले जात नाही. ज्यामध्ये जगता येत नाही ते जीवन देणारी शक्ति आणि बरे करणारे सामर्थ्याला मुकतात. त्याचे आशीर्वाद इतरांना देण्यानेच ते आपल्याजवळ सतत राहतात.MHMar 100.2

    परमेश्वरासाठी आपण करीत असलेल्या सेवेमध्ये दिसून येणारी निराशा मोडून काढली पाहिजे. मंडळीमधील प्रत्येक सभासदाने परमेश्वराच्या कोणत्या ना कोणत्या तरी कार्यामध्ये गुंतवून घेतले पाहिजे. काही लोक इतरांसारखे कार्य करु शकत नाहीत. परंतु प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार प्रयत्न करुन जगाचा नाश करणाऱ्या रोग आजारांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न करण्याचे कार्य केले पाहिजे. बहुतेकजण त्यांना जर कार्य कसे करावयाचे शिक्षण दिले तर ते तयार होतील. यासाठी त्यांना शिकविणे व कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.MHMar 100.3

    प्रत्येक मंडळीमध्ये कार्यकर्त्यांना ट्रेनिंग देण्याचे वर्ग असावेत. मंडळीच्या सभासदांना बायबल कसे शिकवावे याचे ट्रेनिंग द्यावे. गरीबांसाठी कशाप्रकारे मदत करावी याचेही शिक्षण द्यावे. आजाऱ्यांची शुश्रूषा कशी करावी, जे परमेश्वरांपासून दर गेले आहेत त्यांना परत कसे आणावे. आरोग्यदायी जीवनाचे वर्ग, पाककला वर्ग अशा प्रकारची कार्यकारी शिक्षण वर्ग सुरु करावेत. आणि केवळ शिकवून थांबायचे नाही, परंतु विद्यार्थांकडून या सर्व गोष्टींचे अनुभव घेण्यासाठी प्रात्यक्षिक घेणे आवश्यक आहे तरच सभासद सर्व गोष्टी आत्मसात करु शकतील. अनुभवी शिक्षकांकडून मार्गदर्शन केले जावे. म्हणजे इतर सभासद सुद्धा त्यांना सामील होऊन त्यांना काही शिकण्याची संधी मिळेल. एक उदाहरण अनेक उपदेशांपेक्षा उत्तम असते.MHMar 101.1

    प्रत्येकाने आपली शारीरिक व मानसिक शक्ति वाढविणे आवश्यक आहे. म्हणजे परमेश्वर त्यांना जेथे कोठे घेऊन जाईल तेथे ते आपले कार्य करतील व परमेश्वराचे वचन इतरांना सांगतील. हाच आशीर्वाद पौल आणि इतर शिष्यांना मिळाला. त्यांना जे आत्मिक दान मिळाले ते सध्ययुगातील त्याच्या शिष्यांनाही मिळू शकते. परमेश्वराची इच्छा आहे की त्याच्या मुलांना ज्ञानी व बुद्धीमान बनावे. म्हणजे पूर्ण रुपाने स्पष्टपणे शक्तिशाली रुपाने या जगामध्ये परमेश्वराचा महिमा दिसून येईल.MHMar 101.2

    सुशिक्षित कार्यकर्ता अशिक्षित कार्यकर्त्यांपेक्षा अधिक कार्य करु शकतात. त्यांच्याकडून महान कार्य होऊ शकते. त्यांच्या बौद्धीकतेची शिस्त इतरांपेक्षा श्रेष्ठ असते. यामुळे त्यांची कार्य करण्याची पद्धत शिस्तबद्ध असते, परंतु ज्यांच्याजवळ अधिक शिक्षण नसते व अधिक गुण नसतात ते इतरांची किंवा गरजवंताची उत्तमप्रकारे सेवा करु शकतात. ज्यांची इच्छा असते की परमेश्वराने आमचा वापर करावा त्यांचा परमेश्वर उपयोग करुन घेतो. याचा अर्थ असा होत नाही की जे सुशिक्षित व बुद्धीमान आहेत तेच देवाचे कार्य करु शकतात, परंतु अशिक्षित व अडाणी लोक ज्यांनी परमेश्वराचे संदेश ऐकले आहेत ते सुद्धा देवाच्या राज्यासाठी कार्य करु शकतात. सर्वांत प्रभावी कार्यकर्ता तोच असतो जो हे निमंत्रण स्वीकारतो. “माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल.” (मत्तय ११:२९).MHMar 101.3

    मनापासून मिशनरी काम करणाऱ्या लोकांची गरज आहे. ज्या मनुष्याच्या हृदयाला परमेश्वर स्पर्श करतो त्याचे हृदय त्यांच्यासाठी कळवळते, जे परमेश्वराला ओळखत नाहीत. या कार्यकर्त्यांना खूप दुःख होते. ते आपले जीवन हातात घेऊन स्वर्ग प्रेरित संदेशवाहक बनतात. आपले कार्य करण्यासाठी ते पुढे सरसावतात. यामध्ये स्वर्गदूत त्यांच्या सहाय्याला धावू येतात.MHMar 102.1

    ते लोक ज्यांना परमेश्वराने महान बुद्धीमानपूर्वक गुणांनी संपन्न केले आहे ते जर त्या गुणांचा वापर आपल्या स्वार्थासाठी उपयोगात आणीत असतील तर परीक्षेच्या वेळी आपल्या मनाच्या मार्गावरच चालण्यासाठी त्यांना मार्ग सोडले जाते. परमेश्वर अशांची निवड करतो जे अधिक हुशार नसतात. जे पूर्ण आत्मविश्वासू नसतात. कारण ते स्वत: कार्य करीत नाहीत, परंतु कार्यासाठी ते परमेश्वरावर अवलंबून असतात. परमेश्वर पूर्ण हृदय सेवा स्वीकारतो व स्वतः त्यांच्या कमतरता पूर्ण करतो.MHMar 102.2

    प्रभूने अशा लोकांची आपल्या कार्यासाठी निवड केली आहे की ज्यांना अधिक शिक्षण मिळविण्याची संधी मिळाली नाही. त्या लोकांना आपले पूर्ण तनमन लाऊन परमेश्वराचे कार्य केले आणि परमेश्वराने त्यांना आपल्या कार्यासाठी त्यांच्या ज्ञानाची तहान भागविण्यासाठी त्यांना पुरस्कृत केले. त्याने त्यांच्या प्रार्थना ऐकल्या आणि त्यांचे अश्रु पाहिले. ज्याप्रकारे परमेश्वराचे आशीर्वाद बाबेलमधील बंदीवानांना मिळाले त्याच प्रकारे तो आजसुद्धा त्याच्या सेवकांना बुद्धी आणि ज्ञान प्रदान करतो.MHMar 102.3

    कमी शिक्षण घेतलेले आणि खालच्या समाजाचे लोक ख्रिस्ताच्या आशीर्वादाने कधी कधी आत्म्यांना जिंकण्यासाठी अद्भुत प्रकारे यशस्वी होतात. त्यांच्या यशाचे रहस्य म्हणजे त्यांचा परमेश्वरावरील पूर्ण विश्वास आहे. त्यांनी दररोज असे शिक्षण घेतले की परमेश्वर सर्व शक्तिमान आहे आणि त्याची बुद्धी अतुलनीय आहे.MHMar 102.4

    अशा कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करायला हवे जे परमेश्वरावर पूर्णपणे विश्वास ठेवतात. त्याच्या संपर्कात सतत राहतात. यामुळे ज्या जागा नागरिकांच्या असतात त्या ठिकाणी यांची नियुक्ति केली जाते. ते ताबडतोब पाहतात की कोठे कशाची कमतरता आहे. गरजवंतांना तत्परतेने सहाय्य करणे दयापूर्ण भावनेने एखाद्याचे सांत्वन करणे, सहानुभूती व्यक्त करणे आणि होईल तितकी मदत करणे उपयोगाची जी दारे बंद असतात त्यांचा मार्ग मोकळा करणे अडचणीमध्ये सापडलेल्या लोकांना सहानुभूतिपूर्ण मार्ग मोकळा करुण देणे. अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांमध्ये डळमळीत आत्म्यांना वचनातील प्रभावाने परमेश्वराकडे आणण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. ते आपले काम विश्वासुपणे करतात. अशा कार्यासाठी ते इतरही हजारो लोकांना ते तयार करु शकतात.MHMar 102.5

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents