Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय १४—श्रीमंतांसाठी सेवा कार्य

    कर्नेल्य हा रोमी सुभेदार हा जन्मापासूनच कुलीन आणि श्रीमंत मनुष्य होता. त्याचा अधिकार विश्वास आणि आदराचा होता त्याचा जन्म प्रशिक्षण आणि शिक्षण मूर्तिपूजनाच्या वातावरणामध्ये झाले होते. यहूदीपांच्या संपर्कामध्ये आल्यावर त्याला खऱ्या परमेश्वराविषयी समजले आणि तो त्याची उपासना करु लागला. “तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भयबाळगणारा लोकास फार दानधर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता.” (प्रेषित १०:२).MHMar 159.1

    कर्नेल्यला ती सुवार्ता ठाऊक नव्हती ती म्हणजे येशूचे जीवन व त्याच्या मत्यने जे प्रगट केले होते म्हणून परमेश्वराने सरळ स्वर्गातून त्याच्याकडे संदेश पाठवला आणि दुसऱ्या संदेशामध्ये पेत्राला त्याच्याकडे जायला सांगितले. कनेल्य यहूदी उपासनेशी संबंधित नव्हता. रब्बी लोक त्याला अपवित्र आणि मूर्तिपूजक असे समजतील परंतु परमेश्वराने त्याचे प्रामाणि हृदय वाचले होते आणि आपल्या सिंहासनापासून संदेश वाटकांकरवी पृथ्वीवरील सेवकांकरवी या रोमी अधिकाऱ्याकडे सुसमाचार पोंहविण्यासाठी सहाय्य करण्यासाठी पाठविले.MHMar 159.2

    अशा प्रकार परमेश्वर आज सुद्धा श्रीमंत आणि गरीब लोकांमध्ये लोकांना शोधण्यासाठी प्रयत्न करीत आहे. कर्नेल्यसारखे असे अनेक लोक आहेत. ज्यांना परमेश्वर आपल्या मंडळीमध्ये आणण्यासाठी उत्सुक आहे त्यांची सहानुभूती परमेश्वराच्या लोकांबरोबर आहे. परंतु ज्या बंधनाने ते जगीक बंधनामध्ये बांधले गेले आहेत तेथे त्यांना घट्ट पकडून ठेवले आहे. छोट्या लोकांबरोबर उभे राहण्यासाठी या लोकांना उभे राहण्यासाठी नैतिक धाडस कमी आहे. या प्राण्यांसाठी विशेष परिश्रम करण्यासाठी पाठबळ हवे आहे आणि ती आपली जबाबदारी आहे. कारण ते गंभीर धोक्यात जाऊ शकतात.MHMar 159.3

    दुर्लक्षित केले गेलेल्या गरीबांविषयीच्या आमच्या सेवा कार्याविषयी खूप काही सांगितले आहे. परंतु दुर्लक्षित केलेल्या श्रीमंतांविषयी काहीच केले जात नाही काय? बहुतेक लोक त्यांना कुछकामी समजून त्यांचे डोळे उघडण्याचे प्रयत्न करीत नाहीत. अर्थात श्रीमंतीच्या जोरावर त्यांचे डोळे दिपले आहेत. त्यांच्या जीवनात कशाचीच कमतरता नसते म्हणून त्यांनी सार्वकालिक जीवनाकडे डोळेझाक केली आहे. त्याविषयी विचार करणे त्यांनी सोडून दिले आहे. हजारो श्रीमंत लोक त्यांना सार्वकालिक जीवनाच्या सूचना न मिळताच कबरेमध्ये झोपी जातात. दिसण्यात अनेक श्रीमंत लोक बेफिकीर वाटतात परंतु आतून मात्र ते आत्म्यात दबलेले असतात. जे पैशावर प्रेम करतात त्यांची पैशाने तृप्ति होत नाही.” ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ति होत नाही. जोविपुलधनाचा लोभ धरितो त्याला काही लाभ घडतानाही.” (उपदेशक ५:१०) जो उत्तम सोन्याला म्हणतो, “माझा तुझ्यावर भरवसा आहे.” “त्याने त्या परमेश्वराचा नाकारा केला जो स्वर्गात आहे.’ (ईयोब ३१:२४). “कोणाही मनुष्यास आपल्या भावाला मुक्त करता येत नाही. किंवा त्याच्याबद्दल देवाला खंडणी देता येत नाही. त्याने सर्वदा जगावे. त्याला कधी गर्तेचा अनुभव घडू नये. म्हणून त्याला देवाला खंडणी भरून देता येत नाही.” (स्तोत्र ४९:७-८). धन संपत्ति आणि जगिक सन्मान आत्म्याला संतुष्ट करु शकत नाही.MHMar 159.4

    श्रीमंतांमध्ये असे अनेक लोक आहेत जे स्वर्गीय आश्वासन आणि आत्मिक आशेची इच्छा धरतात. बहुत लोक अशा गोष्टीच्या शोधात आहेत की ज्यामुळे त्यांच्या निरुत्साही जीवनाची समाप्ति करु शकतात. बहुतेक लोक आपल्या कार्यालयात अशी गोष्ट शोधतात जी त्यांच्याजवळ नाही. त्यामधील केवळ काही थोडेच लोक चर्चला जातात. कारण अनेकांना वाटते की चर्चला जाण्याने काही विशेष फायदा होतनाही. जे शिक्षण ते ऐकतात ते त्यांच्या हृदयाला स्पर्श करीत नाहीत त्यांना आपण व्यक्तिगत विनंती करु शकत नाही काय ?MHMar 160.1

    गरीब आणि पापाचे शिकार झालेल्या लोकांमध्ये असेही लोक सापडतात की जे कधी धन संपत्तिचे मालक होते. वेगवेगळ्या हुद्यावर असणारे आणि अधिकारावर असणारे लोक मद्यपान आणि शारीरिक लालसावर अडकलेले असतात याचे कारण त्यांच्यावर जगाचे प्रदुषणाची लागण झाली आहे आणि ते परीक्षेत पडले आहेत आणि जेव्हा ते मदतीसाठी विश्रांती करतात तर त्यांना मदत करण्याचे आपले कर्तव्य नाही का? तेव्हा त्यांचे पतन होण्यापासून त्यांचा बचाव करण्यासाठी व आपण पुढ जाऊन त्यांना सावरावे.MHMar 160.2

    हजारो लोक सन्मान आणि विश्वासाच्या हुद्यावर राहूनही अशा काही संवयांवर अडकले आहेत जे आपला देह आणि प्राण दोन्ही गमाऊन बसतील सुवार्ता प्रसारक सेवक, राजकीय लोक, लेखक, योग्यता आणि संपत्तिचे धनी मोठ्या व्यसायाचे मालक आणि उपयोगी अधिकार असणारे हे सर्व मोठ्या धोक्यामध्ये आहेत. कारण ज्या गोष्टींमध्ये आत्मसंयमाची गरज असते ती त्यांना दिसत नाही. अशा लोकांमध्ये पक्षपात नसावा परंतु मानवतेसाठी परमेश्वराच्या योजनेचा आशय समजून घेणे आवश्यक आहे. त्यांनी संयम बाळगावा. संयमांचा खरा सिद्धांत जर त्यांनी ओळखला तर उच्चभ्रू लोक आनंदाने त्याचा स्वीकार करतील.MHMar 161.1

    या लोकांसमोर शारीरिक, मानसिक आणि नैतिक शक्ति कमकुवत होते ती शरीराचे लाड केल्याने होणारे परिणाम त्यांच्या लक्षात आणून द्यावे. त्यांना या गोष्टीचे ज्ञान देणे आवश्यक आहे की ते परमेश्वराचे कारभारी आहेत त्यांना तसे वरदान देण्यात आले आहे. त्यांनी आपले पैसे योग्य मार्गांनी खर्च करावे असा मार्ग दाखवावा. सध्या ते आपला पैसा खर्च करीत आहेत ते स्वत:च्या हानीसाठी त्यांच्यासमोर असा प्रस्ताव मांडा की ते स्वत:च्या आनंदासाठी मद्यपान, धुम्रपान आणि षाममार्गाला पैसे खर्च करीत आहेत. त्यामुळे एकदिवस कंगाल होतील त्यांचे आरोग्य बिघडेल त्याऐवजी आजारी गरीब, अनाथ यांच्यावर त्यांनी खर्च करावा. पुढे जाऊन ही मुले समाजाच्या उपयोगी पडतील. अशा प्रकारचे निवेदन ऐकण्यास अनेक लोकनकार देतील.MHMar 161.2

    श्रीमंत लोकांसमोर आणखी एक दुसरा धोका आहे. त्यासाठी मेडिकल मिशनऱ्यांनी एक दार उघडले आहे. अनेक धनवान लोक असे आहेत की त्यांच्याकडे खूप धन असूनही ते धनाचा लोभ सोडत नाहीत यामुळे त्यांचा लोभ त्यांना वाईट मार्गाला घेऊन जातो. जो प्याला रिकामा आहे तो उचलण्यासाठी अति सोपा आहे परंतु काठोकाठ भरलेला प्याला उचलणे कठीण असते. अति सावधगिरी बाळगून त्याचा समतोल साधावा लागतो. दुःख आणि गरीबी निराशा आणते. परंतु ही संपन्नता आहे जी आध्यात्मिक जीवनासाठी धोका आहे.MHMar 161.3

    जे रोगाच्या उलट प्रतिक्रियेने त्रस्त आहेत त्यांना त्या झुडूपाप्रमाणे समजावे जे मोशेसमोर जळत होते. परंतु भस्म होत नव्हते. परमेश्वराचा दूत त्या झुडूपामध्ये होता. अशा प्रकारे कष्ट आणि पतन या दोन्हीमध्ये परमेश्वराचे अस्तित्व असते. अर्थात आपल्या दुःखामध्ये परमेश्वर आपल्याबरोबर असतो तो आपणास आधार देत असतो. तसे पाहता जे आजारी आणि संकटात आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची जास्त गरज असते. परंतु आमच्या पेक्षा प्रार्थनेची गरज त्यांना असते जे संपन्न आणि प्रभावशाली जीवन जगतात.MHMar 162.1

    आपमानाच्या दरीमध्ये जेथे लोकांना आपल्या गरजांची जाणीव होते आणि आपल्या पावलांच्या मार्गदर्शनासाठी परमेश्वरावर अवलंबून राहतात. तरीही तेथे सुरक्षा आहे परंतु जे लोक उंच पदावर उभे आहेत त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते की त्यांच्याजवळ महान बुद्धी आहे. अशा लोकांना मोठा धोका असतो. असे लोक जोपर्यंत परमेश्वराला आपला आधार मानित नाहीत तेव्हा नक्कीच त्यांचे पतन होईल. पवित्र शास्त्र असे कोणा श्रीमंताला दोषी ठरवित नाही. कारण ते आपले धन इमानदारीने कमावतात. असे सर्वच नसतात. पैसा जरी नसला तरी पैशावरील प्रेमहे वाईटाचे मूळ आहे. परमेश्वरच मनुष्याला संपत्ति कमविण्यासाठी शक्ति देतो आणि जे लोक परमेश्वरावरील विश्वासाने कारभारीपणाने आपले धन परमेश्वराने दिले असे समजून योग्य कारणासाठी खर्च करतात, निस्वार्थी भावनेने योग्य वापर करतात. त्यांच्या हातातील धन त्याच्या साठी आणि इतरांसाठी आशीर्वाद ठरते. परंतु बहुतेक धनवान जगीकधनामध्ये लोभ धरुन परमेश्वराचे धनावर स्वत:चा दावा लावून आपल्या साथीदार मानवाच्या गरजाकडे दुर्लक्ष करतात, त्या धनाचा वापर स्वत:च्या गौरवासाठी करतात. ते इमारतीवर बांधतात आणि जमिनीवर जमीनी वाढवितात. आपली घरे ते एशारामाच्या साधनांनी भरतात. त्यांच्या अवतीभोवती गरीब लोक आजार, दुःख आणि उपाशी मरतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. अशा प्रकारे जे लोक स्वत:च्याच सेवेमध्ये गुंतून राहतात. ते स्वत:मध्ये परमेश्वराला नाही परंतु सैतानाला थारा देतात. सैतानी गुणांचा विकास त्यांच्यामध्ये होतो.MHMar 162.2

    या लोकांना सुवार्तेची गरज आहे. त्यांना या गोष्टींची जाणीव करुन देणे आवश्यक आहे की जगीक संपत्ति नष्ट होणारी आहे. तिच्यावरील नजर काढून सार्वकालिन संपत्ति जीन संपणारी आहे त्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे हे त्यांना सांगावे.MHMar 162.3

    येशूने म्हटले, “प्रस्तुत युगातल्या धनवानांस निक्षुन सांग की तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेऊ नये तर जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी, चांगले ते करावेरू सत्कर्माविषयी धनवान असावे, परोपकारी व दानशूर असावे. जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल. असा साठा स्वत:साठी करावा.” (१ तीमथी ६:१७-१९).MHMar 163.1

    एखाद्याच्या कारण नसणाऱ्या दुर्घटनाग्रस्त धनीकाला जो जगावर प्रेम करतो. जगातील गोष्टींची पूजा करतो त्याला ख्रिस्ता समवेत आणले जाऊ शकत नाही. हे असे लोक आहेत की त्यांच्यापर्यंत पोहोचणे अति कठीण आहे. त्यांच्यासाठी असे स्त्रीपुरुष सुवार्तिक असावे की जे अति उत्साही आहेत ते कधी निराश होत नाहीत. अयशस्वी होऊन कंटाळणार नाहीत वचिकाटीने कार्य करतील.MHMar 163.2

    काही लोक (सुवार्तिक) उच्चवर्गीय लोकांसाठी विशे रुपाने स्वत:मध्ये पात्रता ठेवतात. अशा लोकांना भेटण्यासाठी केवळ औपचारिक ओळखीची गरज असते आणि या लोकांना ती कलासाध्य असते त्यांनी आपल्या गुणांचा वापर करून आपला जिवंत विश्वासाकरवी त्या लोकांची आत्मिक गरजा पाहून त्यांच्या गरजा जागृत कराव्यात आणि ख्रिस्तामध्ये असणाऱ्या सत्याकडे त्यांना मार्गदर्शन करावे. असे करण्यासाठी त्यांना परमेश्वराकडे विनंती करणे आवश्यक आहे.MHMar 163.3

    अनेक लोकांच असे म्हणने आहे की उच्च वर्गीय लोकांपर्यत पोहोचण्यासाठी त्यांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन त्यांच्याशी साजेल अशा थाटात त्यांची भेट घ्यावी. यासाठी थोडावे आपणही आपले वागणे त्यांच्यासारखेच बनवावे. तशा प्रकारची आपली कार्य पद्धतींचा वापर करावा. श्रीमंतीचा देखावा म्हणजे उंची कपडे, महागडे दागिने, अलिशान घरे असे त्यांचे थाट असतात. जणीक गोष्टी आत्मसात करणे फॅशनची चमक. शास्त्रीय सभ्यता, यशस्वी वक्ता होण्याचे गुण आवश्यक मानले जातात. ही समजूत आहे. उच्चवर्गीय लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या सर्व जगीक गोष्टींची परवानगी परमेश्वर देत नाही. उच्चवर्गीय लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ती म्हणजे आमची निस्वार्थीपणाची सेवा आणि परमेश्वरावरील विश्वास. तसेच सतत ख्रिस्ताची सुवार्ता पोहोचविणे.MHMar 163.4

    प्रेषित पौलाने आधनस येथील तत्वज्ञान्याच्या भेटीच्या अनुभवाचा आम्हाला एक धडा आहे. आग्रिपाच्या दरबादामध्ये पौलाने सुवार्ता प्रचार करतांना तर्काने तर्क विज्ञानाने विज्ञान आणि तत्वज्ञान्यांना तत्वज्ञानानेच उतर दिले. तेथील उपस्थित असणाऱ्या श्रोत्यामधील बुद्धिवान लोकांना सुद्धा नवल वाटले ते शांत झाले. त्याच्या शब्दांचा विरोध कोणी करु शकला नाही. परंतु तरीही परिश्रमाचे काही अंशीफळ प्राप्त झाले. काही थोड्याच लोकांना सुवार्ता स्वीकारण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. येथून पौलाने श्रमकरण्याची दुसरी पद्धत अवलंबविली त्याने वाद विवादामध्ये भाग न घेता सरळमार्गाने स्त्रीपुरुषासमोर ख्रिस्ताला पायांच्या मुक्तिदात्याच्या रूपाने सादर केले. करिथ करामध्ये आपल्या कार्याविषयी त्यांना लिहिले “बंधुजन हो मी तर तुमच्याकडे आलो तो व वकृत्त्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हास सांगत आलो असे नाही. कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त ह्याच्याशिवाय मी तुमच्याबरोबर असतांना दुसरे काही जमेस धरु नये असा मी ठाम निश्चय केला आणि मी तुमच्याजवळ अशक्त, भयभीत व अतिकंपित असा झालो. तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा. तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळविणाऱ्या शब्दांची नव्हती तर आत्मा व सामथ्य ह्यांची निदर्शक होती. (१ करिंथ २:१-५). नंतर रोमच्या पत्रामध्ये तो म्हणतो.” कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही. कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला प्रथम यहुद्याला मग हेल्लण्याला तारणासाठी ती देवाचे सामथ्य आहे.” (रोम १:१६). MHMar 164.1

    जे लोक उच्चवर्गीय लोकांसाठी कार्य करतात त्यांनी आपला खरा आत्मसन्मान राखतांना लक्षात ठेवले पाहिजे की स्वर्गदूत त्यांचे साथीदार आहेत त्यांनी आपले हृदय आणि बुद्धिच्या खजिन्यात “असे लिहिले आहे.” हे वाक्य भरले पाहिजे. त्यांच्या स्मृतिपटलांवर येशू ख्रिस्ताचे बहुमोल शब्द असणे आवश्यक आहे. त्यांना सोने आणि चांदीपेक्षा येशूची वचने अधिक मोलवान असावीत.MHMar 164.2

    ख्रिस्ताने म्हटले आहे की “धनवानाला स्वर्गाच्या राज्यात जाण्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे होईल.” (मत्तय १९:२४). या वर्गातील लोकांसाठी कार्य करण्यामध्ये खूप निराशाच पदरी पडेल. अनेक वेळा मने दुखविणाऱ्या गोष्टीसमोर येतील. परंतु परमेश्वरासाठी सर्व काही शक्य आहे. परमेश्वर तसे करु शकतो आणि तो त्या लोकांकरवी अशा लोकांच्या हृदयात कार्य करील की ज्यांनी पैसे कमाविण्यासाठी आपले सर्व जीवन खर्ची घातले आहे.MHMar 164.3

    खऱ्या मनाचे परिवर्तन असे आश्चर्यकारक होईल की आतापर्यंत असे कधी झाले नव्हते. जगातील सर्वात महान लोक सुद्धा आश्चर्यकारक कार्य करणाऱ्या परमेश्वराच्या अद्भुत चमत्कारापासून मागे नाहीत जर ते लोक परमेश्वराचे सहकारी आहेत ते आपले कर्तव्य इमानदारी आणि धाडसाने पूर्ण करतील. तर परमेश्वर उंच पदावर बसलेले बुद्धीवान आणि प्रभावी लोकांची हृदये बनलेले पवित्र आत्म्याच्या शक्तिकरवी अनेक लोक स्वर्गीय नियमांचा स्वीकार करण्यात तयार होतील.MHMar 165.1

    जेव्हा उच्च वर्गातील लोकांना सरळ व साध्या शब्दामध्ये सांगितले की दुःखी मानवतेसाठी त्यांचे कष्ट कमी करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला प्रतिनिधी बनवू इच्छितो तर अनेक लोक पुढे येऊन गरीबांच्या फायद्यासाठी सहानुभूति पूर्वक काम करतील. जेव्हा त्यांची मने स्वत:च्या लाभापासून दूर होतील तर अनेक लोक स्वत:ला ख्रिस्ताला समर्पित करतील. ज्या सुवार्तिकांमुळे त्यांचे परिवर्तन झाले आहे ते त्यांच्याशी समरुप होऊन सूवार्ताप्रसार कार्यामध्ये मदत करतील. जगातील त्यांचा खजिना योग्य कार्यासाठी वापरतील तर स्वर्गामध्ये त्यांच्या खजिन्याचे दार उघडले जाईल व तेथे त्यांची संणतिचा संचय होईल.” तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घरफोडी करीत नाही व चोरीही करीत नाहीत.”MHMar 165.2

    जेव्हा ते ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा धनी म्हणून स्वीकारतील तर त्यांच्यामधून अनेक लोक उच्चवर्गाच्या दुसऱ्या लोकांसाठी कार्य करण्यासाठी स्वत:ला परमेश्वराच्या हाती सोपवितील. त्यांना जाणीव व होईल की त्यांना त्या लोकांना सुसमाचार सांगण्यासाठी निवडीले आहे. ज्यांनी जगालाच आपले सर्वस्व मानले आहे वेळ आणि संपत्ति परमेश्वराला अर्पण करतील. वरदान आणि प्रभाव ख्रिस्तासाठी आत्मे जिंकण्याच्या कामी वापरण्यात येईल.MHMar 165.3

    अशाप्रकारच्या सेवेने काय प्राप्त होईल याची माहिती स्वर्गातून मिळेल. संशयाचे आजारी, जगापासून बेचैन आणि थकलेले कितीतरी जीव त्याच्या मुक्तिदात्याच्या चरणाजवळ आणले जातील. मोठ्या संख्ये लोकांनी आपणाकडे यावे अशी त्याची उत्कंट इच्छा आहे. ख्रिस्त मरणातून उठणारा मुक्तिदाता आहे आणि त्याच्या पंखांमध्ये आरोग्य आहे.MHMar 166.1

    *****

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents