Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ४—विश्वासाचा स्पर्श

    “मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईन.” (मतय ९:२१). जिने हे शब्द उच्चारले ती एक गरीब महिला होती, एक अशी महिला जी मागील बारा वर्षापासून एक आजाराने ग्रस्त होती. यामुळे तिचे जीवन तिच्यासाठी एक ओझे झाले होते. तिने आली सर्व धनदौलत या आजारावर खर्च केली होती खूप औषधोपचार केले. शेवटी तिला हेच सांगण्यात आले की तिच्या या आजारावर काहीच उपाय नाही. तो बरा न होणारा आजार आहे, परंतु जसे तिने येशू ख्रिस्ताविषयी ऐकली. पुन्हा तिची आशा उफाळून आली. तिने विचार केला की “मी त्याच्या इतक्या जवळ जाऊ शकू की त्याच्याशी बोलणी करता येतील.”MHMar 28.1

    ख्रिस्त याईराच्या घरी जात होता. याईर हा एक सभास्थानाचा यहूदी अधिकारी होता. त्याने येशूला विनंती केली की त्याने आपल्या घरी येऊन त्याच्या मुलीला बरे करावे. तुटलेल्या हृदयाची ही विनंती होती. तो म्हणाला “माझी लहान मुलगी मरावयास टेकली आहे. तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा.” (मार्क ५:२३). या त्याच्या विनंतीने ख्रिस्ताचे सहानुभूतियुक्त मन द्रवले आणि लगेच तो त्या अधिकाऱ्याबरोबर त्याच्या घरी जाण्यासाठी तयार झाला.MHMar 28.2

    ते वेगात चालू शकत नव्हते कारण गर्दीने येशूला चहूबाजूंनी घेरले हाते. गर्दीमधून वाट काढीत ख्रिस्त चालत होता. चालता चालता तो ती दुःखी महिला उभी होती तेथे आला. येशूच्या जवळ जाण्याचा तिने वारंवार प्रयत्न केला. प्रयत्न तरी केले, परंतु तिला यश आले नाही. आता ही संधी तिच्या हातात होती. ख्रिस्ताबरोबर बोलण्याचा कोणताच मार्ग तिला दिसत नव्हता. त्याच्या चालण्यामध्ये ती अडथळाही बनू शकत नव्हती, परंतु तिने विचार केला की त्याच्या वस्त्राला शिवाल्यानेसुद्धा मी बरी होऊ शकेन आणि भीतिसुद्धा वाटत होती की ही संधीसुद्धा तिच्याकडून निसटून जाईल. ती गर्दीमध्ये असा विचार करुन घुसली की “जर मी त्याच्या वस्त्राला शिवले तरीही बरी होईन.” MHMar 28.3

    ख्रिस्त तिच्या डोक्यातील सर्व विचार जाणत होता आणि तिच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत होता जेथे ती उभी होती. त्याला तिच्या मोठ्या गरजेची जाणीव होती आणि त्याला तिचा विश्वास पाहायचा होता. त्यासाठी तो तिला प्रोत्साहित करीत होता.MHMar 28.4

    जेव्हा तो पुढे जात होता तेव्हा ती त्याच्या वस्त्राला शिवण्यास यशस्वी झाली. त्याचवेळी त्याला समजले की ती तिच्या रोगातून मुक्त झाली. तिच्या स्पर्शामध्ये तिचा विश्वास सामावला होता. आणि त्याचवेळी तिचा त्रास आणि अशक्तपणा नाहीसा झाला होता. ताबोडतोब तिच्या देहामधून एक विजेची लहर आली आणि पूर्ण बरे होण्याची जाणीव झाली. “तेव्हा लागलाच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पीडेपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला.” (मार्क ५:२९). MHMar 29.1

    ती महिला पूर्णपणे बरी झाल्यावर मनापासून तिला बरे करणाऱ्याचे आभार मानण्याची इच्छा झाली. बारा वर्षे अनेक हकीम वैद्य तिचा रोग बरा करु शकले नाहीत ते केवळ ख्रिस्ताच्या एका स्पर्शाने ती पूर्णपणे बरी झाली होती, परंतु त्याचे आभार मानण्याचे तिचे धाडस झाले नाही. धन्यवादित हृदयाने ती तेथून निघून जाण्याच्या तयारीत होती. अचानक येशू थांबला आणि चारीबाजूला पाहात त्याने विचारले, “मला कोणी स्पर्श केला ?’MHMar 29.2

    पेत्र आश्चर्याने त्याच्याकडे पाहून म्हणाला, “गुरुजी, समुदाय तुम्हाला दाटी करुन चेंगरीत आहेत. लोक तुमच्यावर पडत आहेत आणि तुम्ही म्हणता की मला कोणी स्पर्श केला ? (लूक ८:४५) MHMar 29.3

    “मला कोणीतरी स्पर्श केला आहे.” येशू म्हणाला. “कोणीतरी मला स्पर्श केलाच कारण माझ्यातून शक्ति निघाली हे मला समजले आहे.” (लूक ८:४६) MHMar 29.4

    त्याला केला गेलेला विश्वासाचा स्पर्श आणि गर्दीचा निष्काळजीपणाचा स्पर्श हे त्याला ठाऊक होते. त्यातील फरक त्याला समजत होते. कोणीतरी त्याला काही उद्देशाने स्पर्श केला होता आणि त्याचे उत्तरही मिळाले होते.MHMar 29.5

    ही माहिती ख्रिस्ताला स्वत:साठी नको होती तर त्याच्याकडे त्याचे शिष्य इतर लोक यांच्यासाठी एक धडा होता. आजारी रुग्णाला एक आशा देऊन त्यांना प्रेरित करण्याची त्याची इच्छा होती. तो लोकांना सांगू इच्छित होता की तो एक विश्वासच होता त्यामुळे तिला बरे वाटले होते यावर टिपणी दिल्याशिवाय तिला जाऊ द्याचे नव्हते. त्या महिलेची धन्यवाद युक्त साक्षीने देवाची स्तुती होणार होती. त्या महिलेला हे ठाऊक व्हायला पाहिजे होते की तो तिच्या विश्वासपूर्ण कार्यामध्ये सहमत आहे हे तिला सांगण्याचा हेतु होता. तिने केवळ अर्ध्या आशीर्वादावर जा अशी येशूची इच्छा नव्हती. ख्रिस्ताला हेही सांगायचे होते की त्याला तिचा त्रास ठाऊक होता आणि तिची दया येऊन तिला स्पर्श करु देण्यामध्ये त्याची संमती होती आणि जे विश्वासाने त्याच्याकडे येतात त्यांना बरे करण्यास तो सक्षम होता.MHMar 29.6

    त्या महिलेकडे पाहून ख्रिस्ताने तिने केलेला स्पर्श जाहीर केला मला कोणीतरी स्पर्श केला हे वाक्य तो मोठ्याने उच्चारला होता. मग आपण गुप्त राहिलो नाही असे पाहन ती स्त्री कापत कापत पुढे आली आणि त्याच्या पायावर पडली. धन्यवाद ! पूर्ण आसवांनी सर्व लोकांसमोर कोणत्या कारणासाठी त्याच्या वस्त्राला स्पर्श केला ते सांगितले आणि तत्काळ बरी कशी झाली तेही सांगितले. ती घाबरली होती की येशूच्या वस्त्राला स्पर्श करणे हे येशूला आवडले नसावे असे तिला सुरुवातीला वाटले, परंतु तिला दोष देण्याचे कोणतेच शब्द त्याच्या मुखात नव्हते. त्याने केवळ स्वीकृती वचन बोलला होता. मानवतेसाठी केवळ सहानुभूतिचे शब्द त्याच्या मुखातून निघत असत. हृदयातून प्रेमचा पाझरत असे. तो म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा.” हे शब्द तिला अति आनंद देणारे होते. आता तिच्या आनंदाला कडवटपणा देणारे कोणतेच भय नव्हते.MHMar 30.1

    गर्दीमध्ये येशूला धक्काबुक्की करणाऱ्या कोणालाही जीवनशक्ति मिळाली नव्हती, परंतु त्या महिलेने विश्वासाने त्याला स्पर्श केला होता आणि ती बरी झाली. म्हणून आत्मिक गोष्टींवर एक साधारण स्पर्श आणि विश्वासाचा स्पर्श यामध्ये फरक आहे. येशू केवळ जगाचा मुक्तिदाता म्हणून विश्वास ठेवल्याने कोणी बरा होत नाही. उद्धार करणारा या विचाराने केवळ सुसमाचाराच्या सत्याचा करणेच नाहीतर खरा विश्वास तो आहे जो येशूला वैयक्तिक रूपाने स्वीकार करतो तो खरा विश्वासु आहे. परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र दिला. अशासाठी की जा कोणी त्याजवर विश्वास ठेवतो त्याचा होऊ नये तर सार्वकालिक जीवन मिळावे. (योहान ३:१६). जेव्हा मी त्याच्या वचनानुसार येशूकडे येतो तर मला विश्वास ठेवायला हवा की उद्धार करणाऱ्याचा स्वीकार करतो आणि यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो आणि आता देहामध्ये माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगे आहे. त्याने माझ्यावर प्रीति केली आणि स्वत:ला माझ्याकरिता दिले. (गलती २:२०)MHMar 30.2

    बहुतेक लोक विश्वासाला एक विचार समजतात. उद्धार करणारा विश्वास ही एक तडजोड आहे अनेकांना वाटते. ज्यामध्ये मशीहाचा स्वीकार करणारे लोक परमेश्वराशी करार केल्यापमाणे बांधले जातात. एक जिवंत विश्वासाचा अर्थ एक जोमदार भरवशामध्ये वाढत जाणे. ज्यामध्ये मशीहाच्या अनुग्रहामध्ये आत्मा एक विजयी शक्ति बनतो.MHMar 31.1

    विश्वास हा मृत्युपेक्षा जास्त शक्तिशाली विजेता आहे, जर आजारी लोकांना त्यांचे डोळे त्या महान शक्तिशाली रोग निवारण करणाऱ्यांकडे लावण्याचे मार्गदर्शन केले तर आपणास एक अनोळखी परिणाम दिसून येतील. यामुळे शरीर आणि आत्मा या दोन्हीला जीवन प्राप्त होईल.MHMar 31.2

    वाईट सवयींच्या लोकांसाठी कार्य करताना त्यांना निराशा आणि विनाशा बाबतीत बोलण्याऐवजी त्यांचे डोळे दूर असणाऱ्या येशूकडे लावण्यासाठी सांगावे. स्वर्गीय गौरवाकडे त्यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांना सहाय्य करा. यामुळे देह आणि आत्मा या दोन्हीवर अति जास्त प्रमाण लाभ होईल. यामुळे निराशा आणि त्यांना मृत्युचे भय दाखवून सुद्धा त्यांना भय वाटत नाही.MHMar 31.3