Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    फॅशनपासून मुक्ति

    महिलांनी फॅशनेबल मागणी पूर्ण करण्याऐवजी सामान्य परंतु आरोग्यवर्धक पेहरावाचे आग्रह करावे. शरीरासपूरक साजेल असा व आरोग्यास योग्य असा पोशाख असावा. घरातील कामामध्ये जास्त वेळ खर्च करण्याऐवजी आईपत्नी यांनी शिक्षण घेण्यासाठी जागृत राहावे. आपल्या पतीच्या बरोबरीने काम करण्यासाठी मुलांच्या वाढत्या बौद्धिक पातळी वाढविण्यासाठी महिलांनी वेळ काढावा. त्यांच्या जवळ वेळ असेल तेव्हा त्या वेळेचा सदूपयोग करण्यासाठी आपल्या प्रियजनांसाठी व महिलांसाठी शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे. यासाठी आपला प्रिय मुक्तिदाता आपला सहकारी व्हावा म्हणून त्याला विनंती करावी. परमेश्वराच्या वचनाचे अध्ययन करण्यासाठी वेळ काढावा. मुलांना घेऊन निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन परमेश्वराची सुंदर निर्मिती दाखवावी व देवाचे आभार मानावेत.MHMar 226.4

    प्रत्येक महिलेने प्रसन्न व आनंदी राहावे. कधीही न संपणारे काम बाजूला ठेऊन स्वत:साठी वेळ काढावा व आनंद व मनोरंजनात भाग घ्यावा. संध्याकाळी कुटुंबियातील सर्व लोक एकत्र आल्यानंतर त्यांच्याबरोबर आनंदाचे क्षण घालवावे. बहुतेक पुरुष क्लब व मित्रांबरोबर गप्पा मारण्यासाठी बाहेर जातात. त्या ऐवजी घरीच राहून कुटुंबियांमध्ये आनंदात वेळ घालवावा. यावेळी तक्रार व कुरकुर कटाक्षाने टाळाव्यात. बहुतेक तरुण चौकात जमणे गल्लीमध्ये भटकणे, मुलींच्या खोड्या काढणे या ऐवजी घरीच राहून आपल्या कुटुंबातील लोकांशी गप्पा माराव्यात. परमेश्वराच्या योजनेप्रमाणे वातावरण सुखी व समाधानी राहील.MHMar 227.1

    ******

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents