Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    परवान्याची व्यवस्था

    मद्याच्या व्यवसायासाठी परवाना देणारे विचार करतात की परवाना देण्यात हात आखडता केला तर मद्य पिण्यामुळे होणारे वाईट परिणामावर नियंत्रण बसेल परंतु परवाना दिल्यामुळे कायद्याची सुरक्षा होते. शासन याच्या अनुमतिची परवानगी देते आणि ज्या वाईट परिणामाला थांबविण्याचा दावा करते त्याला उत्तेजनच मिळते. परवाना सुरक्षितेखाली, मद्याची भट्टी, मद्याचे कारखाने सर्व देशभर पसरले आहेत आणि अशा प्रकारे मद्य विक्रेते आपल्या दरवाजापर्यंत पोहोचतात आणि अशा प्रकारे त्यांचा व्यवसाय वाढतो.MHMar 267.2

    यामुळेच नशा करणारांची संख्या वाढत राहते. नशेमुळे ते बदनाम होतात म्हणून नशा आणणारे मादक पदार्थांच्या विक्रीसाठी आळा घालण्याचे प्रयत्न केले जातात. परंतु नशेबाजांची होणारी वाढ काही थांबत नाही. यामध्ये तरुणच अधिक प्रमाणात बळी जात आहेत. तरुणांच्या मद्यपानाच्या वाढत जाणाऱ्या भूकेमुळेच मद्याचे व्यवसाय तेजीत चालत आहेत. तरुणांमध्ये मद्यपानासाठी प्रत्येक पावलांवर मोहिनी घातली जाते व त्यांना मद्यपानाचे पूर्ण व्यसन लागेपर्यंत त्यांचा पाठपुरावा केला जातो आणि त्यांना असे व्यसन लागते की त्यातून सुटका होणे अशक्य बनते. यामुळे त्यांचे अतोनात नुकसान होते. असे तरुण जे देशाचे भविष्य आहे त्यांच्या नुकसानीला कारणीभूत कोण आहे ? मद्य व्यवसायाला परवाना देण्याने लोकांसमोर नेहमीच कसोटी आहे. तरुणांना सुधारण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. अशा संस्था निर्माण केल्या आहेत. यामध्ये काही अंशी यशही मिळते, परंतु ते अति अल्पच असते. मद्यपानाचे हे लोण संपन्न घरामध्ये सुद्धा पोहोचले आहे.MHMar 267.3

    व्यभिचार आणि अपराधाला प्रोत्साहन देणारे वाईट व्यसन हे सभ्य आणि सुसंस्कृत घरातील मुला-मुलींना प्रभावित करते.MHMar 268.1

    अशी कोणतीही व्यक्ति नाही जिला मद्याच्या व्यवसायाने धोक्यात आणले नाही. असा कोणताही मनुष्य नाही जो स्वत:च्या सुरक्षासाठी मद्यपानाविरुद्ध गेला नाही. MHMar 268.2

    दुसऱ्या ठिकाणापेक्षा जेथे जगीक लाभाच्या कारणाने विरोध होत आहे कायदे बनविणारे न्यायालय किंवा ठिकाणे असंयमांच्या शापातून मुक्त होणे आवश्यक आहे. राजपाल, संसद सदस्य, प्रतिनिधी व न्यायधीश लोक जे देशाची व्यवस्था बनविण्यासाठी कानून व नियम लागू करतात ते जनतेच्या हिताचेच असतात. नियमांचे पालन करणे सक्तिचे असतातच परंतु यामध्ये पळवाटा खूप असतात. हे लक्षात घेऊनच मनुष्याने संयमाने वागावे. आपला संयम त्यांनी मुळीच सोडू नये. त्यासाठी आपली बुद्धी वापरुन चुकीचे आणि योग्य काय आहे हे निवडून घ्यावे. कारण जे व्यसनाच्या आहारी जातात त्यांची बुद्धी बरे वाईट समजण्यापलीकडे गेलेली असते. मद्य निर्मिती करणाऱ्या कायद्यानेच या नशा करणाऱ्या अनेकांना दंड ठोठावला आहे. मद्यपान करणाऱ्यांना त्यांच्या गुन्ह्याबद्दल दंड ठोठावणारे तेच वकील न्यायधीश असतात जे मद्य निर्मिती करण्याचा परवाना देतात. असे पुष्कळजण आहेत जे पिण्याचे धनी आहेत आणि शक्तिमान लोक आहेत जे तीव्र मद्याचे शोकीन आहेत जे वाईटाला चांगले आणि चांगल्याला वाईट व वाईटाला चांगले म्हणतात. हेच लोक धन देऊन वाईटाला सोडवितात. त्यांच्या जिवावरच चोर व दष्ट लोकांना बळ मिळते व ते निर्दोष सुटतात. अशा लोकांना परमेश्वर म्हणतो, “ज्यांचे शौर्य द्राक्षरस पिण्यात आणि ज्यांची बहादुरी मद्य पिण्यात आणि जे लाच घेऊन दुष्कर्म करणाऱ्यास निर्दोष ठरवितात व धार्मिकाच्या निर्दोषपणाची हानी करतात, त्याच धिक्कार असो. यास्तव अग्नीची ज्वाला धसकट खाऊन टाकिते व वाळलेल्या गवताचे अग्नीत भस्म होऊन जाते. त्याचे मुळ कुजलेल्या पदार्थासारखे होईल. त्याचा फुलवरा धुळीसारखा उडून जाईल. कारण त्यांनी सेनाधीश परमेश्वराचे शास्त्र तुच्छ लेखिले आहे. इस्त्राएलाच्या पवित्र प्रभुचे वचन अव्हेरिले आहे.” (यशया ५:२२-२४). परमेश्वराचा सन्मान, राष्ट्राची स्थिरता, समाजाची, घरची आणि व्यक्तिगत चांगल्याचा हा पुरस्कार आहे. लोकांच्या असंयमाच्या वाईटा विषयीची सावधगिरी करण्यासाठी प्रत्येक संभवाचे प्रयत्न करायला हवे जे आम्ही आता पाहू शकत नाहीत. लवकरच आपण या भयंकर वाईटाचे परिणाम पाहाणार आहोत. नुकसानेच हे कार्य थांबविण्यासाठी कोण निश्चयाने पुढे येईल ? आता तर हे प्रकरण सुरुच झाले आहे. मद्याच्या या व्यापाराला थांबविण्यासाठी जे या लोकांना वेड्यात काढतात. तेव्हा चला एक संघटना करु मद्याच्या व्यवसायाचे जे धोके आहेत ते स्पष्ट करा आणि ते बंद करण्यासाठी लोकांची मने तयार करा. चला तर जे मद्यपानाच्या मागे वेड्यासारखे धावत आहेत त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न करु या. त्यांना संधी देऊ या. देशाचा आवाज उठवून त्याचे कायदे करणारांना वाईट व्यवसाय बंद करण्याची मागणी करा. MHMar 268.3

    “ज्यांना ठार मारण्यासाठी धरुन नेत असतील त्यास सोडीव, ज्यांच्या वधाची तयारी झाली असेल त्यांचा बचाव करण्याचा साधेल तेवढा प्रयत्न करा. आम्हांला हे ठाऊक नव्हते असे ते म्हणतील तर हृदये तोलून पाहणाऱ्यास हे कळत नाही काय ? तो प्रत्येकास ज्याच्या त्याच्या कृत्याचे प्रतिफळ देत नाही काय ?” (नीतिसूत्रे २४:११-१२)MHMar 269.1

    “तो तुला दंडीत करील तेव्हा तू काय म्हणशील ?’ (यिर्मया १३:२९).MHMar 269.2

    *****