Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    ख्रिस्ताची शिकवण

    अशाप्रकारे ख्रिस्ताने सुद्धा सत्याच्या सिद्धांताला सुवार्ताप्रसारामध्ये सादर केले. त्याच्या शिकवणीमध्ये आम्ही स्वच्छ पाण्याच्या झऱ्याचे पाणी पिऊ शकतो. हा झरा परमेश्वराच्या सिंहासनापासून निघतो. ख्रिस्त लोकांना असे ज्ञान देऊ शकत होता जे त्याने पहिले दिले होते. ते या प्रवचनापेक्षाही अधिक उत्तम होते. आणि प्रत्येक दुसऱ्या शोधाला मागे टाकले असते. तो एकापेक्षा एक गुपितावरचा पडदा काढू शकत असता आणि त्या अदभुत प्रकाशनाला जगाच्या शेवटापर्यंतच्या लोकांना कार्यरत ठेऊ शकला असता. त्यांना उच्च विचारांमध्ये ठेऊ शकला असता. परंतु मुक्तिच्या विज्ञानाला शिकविण्याच्या वेळी त्याने एक क्षणही वाया घालविला नाही. त्याची वेळ त्याची योग्यता आणि त्याचे पूर्ण जीवन लोकांचे जीवन वाचविण्यासाठीच खर्च केले. ख्रिस्त हा हरवल्यांना शोधावयाला तारावयाला आला होता आणि त्याने आपल्या उद्देशाकडे मुळीच दुर्लक्ष केले नाही. ख्रिस्ताने कोणत्याही गोष्टीने स्वतःला विचलित होऊ दिले नाही.MHMar 351.1

    ख्रिस्ताने केवळ तेच ज्ञान दिले ज्याचा वापर होऊ शकत होता. लोकांसाठी त्याचे मार्गदर्शन व्यवहारिक जीवनाच्या गरजेनुसारच होते. जे लोक ख्रिस्ताला बोलण्यामध्ये फसवू पाहात होते त्या उद्देशानेच ते त्याच्याकडे येत होते ख्रिस्ताने त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला नाही. अशा त्यांच्या प्रश्नावरील उत्तर त्याने गंभीर आणि उत्साहीपणे व महत्वपूर्ण निवेदन केले. जे लोक ज्ञानाचे झाड तोडण्यासाठी अति उत्साही होते. ख्रिस्ताने त्यांना जीवनी वृक्षाचे फळे दिली. त्यांनी परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग सोडून बाकीचे सर्व मार्ग बंद असलेले पाहिले. सार्वकालिक जीवनाच्या वाटा सोडून इतर सर्व वाटा बंद झाल्याचे दिसून आले. आमच्या मुक्तिदात्याने त्यावेळी कोणालाही गुरुंच्या घरी शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले नव्हते. त्याचे कारण असे होते की वारंवार तो असे म्हणत असे की “असे म्हटले आहे” किंवा “असे म्हणतात’ ऐकण्याने त्यांची बुद्धी भ्रष्ट होते मग का आम्ही मनुष्याच्या अस्थिर शब्दांना मोठ्या बुद्धीमानांसारखे स्विकार करता ? जेव्हा आपल्याकडे एक उत्तम ज्ञान उपलब्ध आहे व ते स्थिर आहे.MHMar 351.2

    जे काही मी सार्वकालिक जीवनाविषयी पाहिले आणि जे काही मी मानवतेच्या अशक्तपणाविषयी पाहिले. त्याने खोलवर माझी बुद्धी आणि माझे जीवनकार्य प्रभावित केले आहे. मी असे काहीच पाहिले नाही की ज्यामुळे मनुष्याची प्रशंसा किंवा महिमा केला जाईल. मला असे कोणतेही कार्य दिसले नाही की ज्यायोगे जगिक मानवीरुपाने बुद्धीमान आणि महान म्हटले जाणाऱ्या लोकांच्या सल्यावर विश्वास ठेऊन त्याला महानता आणि पूर्णपणे त्याच्यावरच अवलंबून राहिले जाईल. ज्यांच्याजवळ इश्वरी प्रकाशाचा अभाव आहे ते परमेश्वराच्या योजना आणि विधीवरील विषय कसे मांडू शकतील? ते तर पूर्णपणे त्याचा नकारच करतील किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. किंवा ते परमेश्वराच्या शक्तिची अवहेलना करून स्वतःच्या विचारानुसार इतरांपुढे सादर करतात.MHMar 351.3

    चला तर आता आपण ख्रिस्ताकडून शिकण्याचा निर्णय घेऊ या ज्याने पृथ्वी व आकाश निर्माण केले. ताऱ्यांना त्याने स्थिर केले सूर्य आणि चंद्राला त्यांची कामे नेमून दिली. MHMar 352.1

    तरुणांना या गोष्टीची जाणीव व्हायला हवी की त्यांनी आपल्या मानसिक क्षमतेची प्रगती करावी. आम्हाला त्या शिक्षणाला प्रतिबंध लागू नये ज्यासाठी परमेश्वराने काही सीमा ठेवली नाही. परंतु आमच्या उपलब्धीपासून काही फायदा होत नाही जर आम्ही त्यांना परमेश्वराचे गौरव मानवाच्या भल्यासाठी उपयोगात आणत नाही. MHMar 352.2

    अशाप्रकारचे अध्ययन बुद्धीसाठी चांगले नाही ज्याचा वापर परमेश्वराच्या गौरवासाठी होत नाही तसेच जे अध्ययन बुद्धीला ओझे होते परंतु त्याचा व्यवहारामध्ये काहीच उपयोग होत नाही. अशाप्रकारचे अध्ययन विद्यार्थ्यांना नुकसानदायक असते. कारण अशा प्रकारच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांची आवड नष्ट होते. त्यामुळे इतर शिक्षणाला वंचित राहिल्यामुळे वास्तविक जीवनाचे उपयुक्त शिक्षणाविषयी त्यांना काहीच समजत नाही व परमेश्वराच्या खऱ्या ज्ञानापासून ते दूर राहतात. परंतु केवळ ज्ञान असणे योग्य नाही परंतु आपल्या आतमध्ये त्याचा प्रयोग करण्याची योग्यता असणे आवश्यक आहे. MHMar 352.3

    वेळ, साधने आणि परिश्रमाचा योग्य वापर न करणे आणि व्यर्थ शिक्षणामध्ये वेळ खर्च करणे यापासून परावृत्त करणे व स्त्रीपुरुषांना व्यवहार उपयोगी शिक्षणात प्रविण करून त्यांना त्याच कार्यासाठी व तशाप्रकारचे शिक्षण इतरांना देण्यासाठी त्यांची नेमणूक करावी. या आम्हाला अशा ज्ञानाची आवश्यकता आहे की जे ज्ञान मन आणि आत्म्याला बळकट करील. पुस्तकी ज्ञान मिळविण्यापेक्षा व्यवहारीक ज्ञान आणि त्याचा वापर करणे महत्वाचे आहे. ज्या जगामध्ये आम्ही राहतो तेथील ज्ञान असणे अतिआवश्यक आहे. परंतु जर आम्ही सार्वकालिक जीवनाचा विचार मनातून काढून टाकला तर आपल्याला अशा अपयशाचा सामना करावा लागेल की ज्याची कधी सुधारणा होणार नाही.MHMar 352.4

    एक विद्यार्थी ज्ञान संपादन करण्यासाठी आपली सर्व शक्ति खर्च करू शकतो. परंतु जोपर्यंत तो परमेश्वराचे ज्ञान संपादन करीत नाही जोपर्यंत नियमांचे पालन करीत नाही हे नियम त्याच्या जीवनासाठी उपयोगी आहे तो पर्यंत त्याचे जीवन सुरक्षित नाही. चुकीच्या सवयींमुळे तो स्वतःचे महत्व हरवून बसतो, आत्मनियंत्रण हरवून बसतो. ज्या सर्व गोष्टी त्याच्या जीवनासाठी अतिमहत्वाच्या आहेत त्याचा तो विचार करीत नाही. आपली बुद्धी आणि शरीराला कशाप्रकारचे वळण याविषयी तो सावध राहत नाही तो त्यासाठी अज्ञानच राहतो. योग्य सिद्धांताचा विकास करण्याकडे तो दुर्लक्ष करतो त्यामुळे वर्तमान आणि सार्वकालिक जीवनासाठी तो मुकतो.MHMar 353.1

    जर तरूण आपला कमजोरपणा समजला तर परमेश्वरामध्ये आपला अशक्तपणा भरून काढील कारण परमेश्वर त्याला बळ देईल जगासाठी तो फलदायी ठरेल परंतु जगिक काल्पनिकमधून त्याने स्वतःला सावरावे.MHMar 353.2

    *****