Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    आई-वडीलांची जबाबदारी

    मुक्तिदाता त्यांच्या जीवनामध्ये सार्वकालिक कोमलता आणि प्रेम पाहतो. कारण त्याने आपल्या रक्ताने त्यांना विकत घेतले आहे. त्याच्या प्रेमाचे ते हक्कदार आहेत. त्यांच्यावरील त्याचे प्रेम निशब्द आहे. त्याचे प्रेम त्यांच्यावरच नाही की जे उच्चशिक्षित आहेत. जे आकर्षक आहेत, परंतु जो समाज दुर्लक्षित आहे, जे अशिक्षित, गरीब आहे अशा त्याच्या मुलांवरही त्याचे अतिव प्रेम आहे. बऱ्याच आई-वडीलांना समजत नाही की त्यांच्या मुलांमध्ये असणाऱ्या दोषाला ते स्वतः किती जबाबदार आहेत ? त्यांच्यामध्ये ती कोमला व बुद्धी नाही की चुका करणाऱ्या मुलांना ते सावरु शकतात. मुलांची जबाबदारी पालकांवरच असते. त्यांचे दायीत्व त्यांच्यावरच असते, परंतु येशू अशा दोषी मुलांकडे दुःखाने पाहातो. ही मुले कशाने बिघडली आहेत याचा शोध तो करतो.MHMar 18.3

    ख्रिस्ती कार्यकर्ता अशा दोषी मुलांना तारणकर्त्याकडे आणू शकतात. बद्धी आणि चातुर्याचा वापर करुन या मुलांना ते आपल्या हृदयाच्या जवळ ठेऊ शकतात. या मुलांना ते धाडस आणि आशा देऊ शकतात की येशूची त्यांच्यावर कृपा होऊन त्यांचे चारित्र्य बदलू शकते आणि त्यांच्या विषयी असेही म्हटले जाऊ शकते की स्वर्गाचे राज्य अशासारखेच आहे.MHMar 18.4