Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    सजावटीमधील सरळपणा

    आमच्या कृत्रिम सवयी आम्हाला बरेच आशीर्वाद आणि आनंदापासून वंचित ठेवतात आणि आपल्या अधिक उपयोगी जीवनाला जगण्यासाठी अयोग्य करतात. या सर्व सवया, सजावटीसाठी आपला पैसाच नाही परंतु त्यापेक्षाही जास्त करुन आरोग्याचे नुकसान होते. घराच्या आतील सजावट ही मेहनत, खर्च आणि काळजीचे ओझे घेऊन येते. MHMar 285.2

    काही घरांमध्येही अशी अवस्था असते की घरचा खर्च मोठा असतो आणि मिळकत कमी असते. घरातील सर्व जबाबदारी आईलाच सांभाळावी लागते. सर्वांत चांगल्या खोल्या अशा सजविल्या जातात की घरातील लोकांच्या मिळकतीपेक्षा तो सजावटीचा खर्चच जास्त असतो. घरच्या लोकांच्या सुविधा आणि आरामाच्या विपरीत असते. घरातील गालिचे महागडे असतात. फर्निचर आणि त्यावरील गाद्या आकर्षक असतात की पाहाणारेचे डोळे थकून जातात आणि या सर्व गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी व त्यावरील धूळ झटकण्यासाठी किती तरी वेळ खर्च होत असेल. हे सर्व कार्य आणि फॅशनच्या इतर ज्या परिवारामध्ये त्यांच्या सवयीमध्ये असतात त्यामध्ये महिलांच्यात एक असे कार्य असते की ते संपण्याचे नावच घेत नाही.MHMar 285.3

    बहतेक घरातील पत्नी आणि आईला वाचन करण्याची काही शिकण्याची आणि पती व मुलांची काळजी घेणे त्यांची मानसिक व शारीरिक विकास करण्याच्या काळजीसाठी वेळच मिळत नाही. मुले व पतीबरोबर काही वेळ खर्च करण्याची उसंत त्यांना मिळत नाही. त्यांच्याजवळ वेळ नसते आणि आपल्या निर्माणकर्त्या देवाचे उपकार मानण्यासाठी मुळीच वेळ नसतो. तिच्या देवाचे उपकार स्मरण किंवा प्रार्थना करण्याचीही उसंत नसते. दिवसभर घरकामातच ती मग्न असते. अशाप्रकारे तिचा समय अशा नाशवंत गोष्टींसाठी खर्च होतो. अशा नाशवंत गोष्टीमध्येच दिवस जातात. तिची शक्ति खर्च होते व त्याचबरोबर या नाशवंत गोष्टींचाही नाश होतो. शेवटी ती आपल्याच घरात अनोळखी अशी होते. एकवेळ अशी होती की ती आपल्या कुटुंबियांसमवेत त्यांच्या जीवनाच्या भल्यासाठी वेळ खर्च करु शकत होती, परंतु घरातील नाशवंत सजावटी शाबूत राखण्यामध्येच तिने आपल्या बहुतेक समय खर्च केला होता. तो सुअवसर नेहमी तिच्या हाती होता. MHMar 286.1

    कुटुंब बनविणाऱ्यांना प्रथम कुटुंबातील सदस्यांच्या बौद्धिक, मानसिक व शारीरिक विकासासाठी तयारी करणे आवश्यक असते. अशा प्रकारचा विकास करण्याचा स्वीकार आणि संकल्प करावा. ही प्राथमिक आवश्यकता आहे. घराची सजावट म्हणजे ते साधे शुद्ध व स्वच्छ असावे. घरातील वातावरण प्रसन्न असणे आवश्यक आहे. सतत शांति आणि आनंदी वातावरण असावे. पाहुण्यांचे नेहमी स्वागत करणारे कुटुंब असावे. ख्रिस्ताने यासाठी सांगून ठेवले आहे. ज्याअर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधुपैकी एकाला केले त्या अर्थी ते मला केले आहे.” (मतय २५:४०).MHMar 286.2

    आपल्या घराला साध्या आणि सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी असाव्यात. त्या सुरक्षित आणि सहज स्वच्छ करण्यात येणाऱ्या असाव्यात. स्वस्त व खिशाला परवडणाऱ्या वस्तुंनी आपले घर सजवा. हे घर प्रीति आनंद आणि समाधानाने भरलेले असावे हीच सर्वांत मौल्यवान सजावट आहे.MHMar 286.3