Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    शिष्यांचे कार्य

    लूक कृत शुभवर्तमान पुस्तकाचे लेखक लूक याच्या नावानेच ओळखले जाते. लूक हा वैद्य होता. त्याच्या संबंधी पौलाने म्हटले आहे. “प्रिय वैद्य लूक व देमास हे तुम्हांला सलाम सांगतात.” (कलसै ४:१४). प्रेषित पौलाने या योग्य चिकित्सकाविषयी ऐकले आणि त्याला शोधून काढले. कारण परमेश्वराने त्याला एक विशेष कार्य सोपविले होते. पौलाने हा सहयोग साधन त्याने लूकाबरोबर काही वेळ कार्य केले. ठिकठिकाणी जाऊन सुवार्ता प्रसार केला. काही काळानंतर त्याने मोसेदोनियाच्या फिलिपै येथे त्याला सोडले. येथे त्याने अनेक वर्षे एक चिकित्सक आणि शुभवर्तमान प्रचारकाच्या रुपाने कार्य केले. चिकित्सकाच्या रुपाने त्याने अनेक रुग्णांना बरे केले त्यांची सेवा केली आणि दुःखी लोकांसाठी परमेश्वराची प्रार्थना केली. अशाप्रकारे सुवार्ता प्रसाराच्या संदेशासाठी मार्ग मोकळा झाला. एक चिकित्सकाच्या रुपात लूकला यश मिळाले. या माध्यमातून त्याने ज्यांना परमेश्वर ठाऊक नव्हता त्यांना त्याने शुभवर्तमान सांगितले. ही एक स्वर्गीय योजना आहे. जे कार्य शिष्यांनी केले तसेच कार्य आपणास करायचे आहे. शारीरिक आरोग्य हे शुभवर्तमानाच्या महान कार्याला जोडले आहे. शुभवर्तमान कार्यापासून शिक्षण आणि आरोग्यसेवा ही वेगळी करु नये. शिष्यांचे कार्य हे शुभवर्तमानाचा प्रसार करायचा होता. शिष्यांवर ते कार्य सोपविले होते की जे कार्य येशूने याजकामध्ये प्रसारीत केले होते ते कार्य त्याने जगामध्ये आणले ते आपल्या लोकांसाठी. आकाशाखाली एका पीढीमध्ये दिसून येणारी समस्त जातींना सुवार्ता प्रसाराचे कार्य संपन्न केले होते MHMar 93.1

    परमेश्वराने पूर्ण जगाला सुवार्ताप्रसार करण्याचे कार्य त्यांच्यावर सोपविले होते जे त्याच्यावर विश्वास ठेवतात. पृथ्वीवरील पाप आणि त्रासावर एकच उपाय आहे तेच औषध आहे सर्व मानव जातीला परमेश्वराच्या कृपेविषयी संदेश सांगणे हेच त्यांचे कार्य होते. त्याच्या सामर्थ्याने ज्यांना आरोग्यदायी जीवन प्राप्त होते तेच त्याचे सामर्थ्य ओळखतात.MHMar 93.2

    जेव्हा ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सुवार्ता प्रसाराच्या संदेशाबरोबर पाठविले तेव्हा जगातील परमेश्वरावरील विश्वास जवळ जवळ संपला होता. यहूदी लोकांमध्ये जे लोक यहोवाचे ज्ञान असण्याचा दावा करीत होते त्यांनी सुद्धा परमेश्वराच्या वचनाचा त्याग केला होता. आणि मनुष्यांचे नियम आणि त्यांनी केलेल्या अंदाजाचा स्वीकार केला होता. स्वार्थी महत्वकांक्षा, लालूच, प्रेमाचा केवळ देखावा अशा सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये होत्या. जसा आदाम परमेश्वरासाठी कमी होत गेला तसेच लोकांमध्ये ही एकमेकांधमील दया कमी झाली किंवा नष्ट झाली. स्वार्थीपणाचे नियमच सर्व लोकांमध्ये रुजले गेले आणि सैतानाला मानवाचे पतन आणि दुःख पाहून आनंद झाला त्याची इच्छा पूर्ण झाली.MHMar 93.3

    सैतानी शक्तिने मानवतेवर नियंत्रण केले मानवाचे शरीर जे परमेश्वराचे निवास्थान होते ते आता दुष्टात्म्यांचे घर झाले. मानवाची बुद्धी, त्याचे ज्ञान, त्याच्या सर्व इच्छा सतत सैतानाच्या नियंत्रणाखाली गेल्या. लोकांच्या चेहऱ्यावर सैतानाचा शिक्का मारला गेला. तो चेहरा सैतानी दिसू लागला.MHMar 94.1

    आजच्या जगाची अवस्था काय आहे ? पवित्र शास्त्रावरील होणारी टीका आणि संशय दिवसेन दिवस वाढत आहेत. ख्रिस्ताच्या वेळीही टीका करणारे संशय घेणारे आणि आपल्याच परंपरेने चालणारे लोक होते तसेच आताही आहेत. पूर्वीसुद्धा गुरुजनांचा किंवा याजकांच्या परंपरेचा प्रभाव लोकांवर होता. आजही तीच परंपरा चालू आहे. लोकांच्या मनातील लालसा स्वार्थ, गर्व जगीक सुख, आनंद या सर्व गोष्टींचा त्यांच्या हृदयावर खोल प्रभाव पडला आहे. हीच अवस्था येशूच्या काळामध्येही होती आज ख्रिस्ती मंडळ्यामध्ये किती सभासद असे आहेत की ते परमेश्वराच्या नियमांप्रमाणे चालतात ? व्यापार समाज घर एवढेच नाही परंतु धार्मिक क्षेत्रामध्येही किती लोक असे आहे जे ख्रिस्ताच्या नियमांप्रमाणे चालतात ? ख्रिस्ताच्या शिकविणीचे आपल्या दैनंदिन जीवनात पालन करतात ? “न्यायाला मागे ढकलले आहे. धार्मिकता लांब उभी राहिली आहे. कारण चव्हाट्यावर सत्य अडखळून पडले आहे. तेथे सरळतेचा प्रवेश होत नाही. सत्याचा अगदी अभाव झाला आहे. दुष्कर्मापासून दूर राहणारा बळी पडतो. परमेश्वराने हे पाहिले व न्याय नाही म्हणून त्याची इतर जी झाली.” यशया ५९:१४-१५). आज हे खरे नाही काय ?MHMar 94.2

    आज आपण जगामध्ये अपराधाच्या साथीच्या मध्यभागी राहात आहोत. या मध्ये परमेश्वराचे भय धरणारे त्याचे चिंतन करणारे देवाचे लोक भांबवल्या अवस्थेत आहेत. आज जो भ्रष्टाचार चालू आहे तो मानवाच्या कल्पनेपलिकडे आहे. त्याचे वर्णन करता येत नाही. राजकारणामध्ये रोज काहीतरी उलाढाली होत आहेत. फसवेगीरी आणि लाचलुचपतीचे प्रकारच रोजच चालू आहेत. रोज चोरीच्या बातम्या येतात. घरफोड्या, दरोडे चालू आहेत. न्याय व्यवस्था बिघडली आहे. हिंसाचार, अत्याचाराला उत आला आहे. निष्काळजीपणा आणि क्रूर पणा वाढत आहे. मानवाच्या नाशाच्या बातम्या रोजच येत आहेत. दररोज आत्महत्या खून या प्रकारामध्ये वाढ होत आहे. सैतान शक्ति मानवामध्ये आपले कार्य अति जोराने होत आहे याविषयी कोणाला संशय आहे काय ?MHMar 94.3

    आणि जसे वाईट गोष्टींनी हे जग भरले आहे आणि सुवार्ताप्रसारणसुद्धा अशा प्रकारे होत आहे की त्याचा मानवाच्या विवेक बुद्धीवर अति कमी प्रभाव पडत आहे. प्रत्येक ठिकाणी माणसाचे मन अशा ठिकाणी आकर्षित होत आहे की जी गोष्ट त्याच्या जवळ नाही. ती आपल्याला मिळावी हा लोभ. काही लोक अशा गोष्टींची अपेक्षा करतात की ज्यांना अशी शक्ति मिळावी जी पापावर विजय मिळविल, अशी शक्ति जी वाईटावर विजय मिळाविल. अशी शक्ति जी त्यांना आरोग्य आणि शांती प्राप्त करुन देईल. अनेक लोक असे आहेत ते कधी परमेश्वराच्या वचनाची शक्ति ओळखीत असत, परंतु आता तेथे आहेत जेथे परमेश्वराची ओळख नाही ते परमेश्वराच्या उपस्थितिची अपेक्षा करतात.MHMar 95.1

    आज जगामध्ये दोन हजार वर्षांपूर्वीसारखे ख्रिस्ताच्या प्रकाशनाची गरज आहे. एक महान सुधारणा कार्याची गरज आहे. ज्यामुळे शारीरिक मानसिक आणि आत्मिक रुपाने आरोग्य प्राप्त होऊ शकेल. MHMar 95.2

    केवळ ख्रिस्ताच्या पद्धतीनेच लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये यश आहे. उद्धाकर्त्याने लोकांच्या भल्यासाठी त्यांच्या चांगल्यासाठी त्यांच्यामध्ये मिसळत होता. त्याने त्यांच्यासमोर आपली सहानुभुति व्यक्त केली. त्यांच्या गरजा पुरविल्या आणि त्यांचा विश्वास जिंकला. तेव्हाच त्याने त्यांना सांगितले “माझ्या मागे या.”MHMar 95.3

    व्यक्तिगत श्रम करुन लोकांच्या जवळ जाण्याची गरज आहे. जर उपदेश देण्यामध्ये कमी वेळ लाऊन व्यक्तिगत सेवा करण्यामध्ये जास्त वेळ लावला तर चांगले परिणाम निर्माण होतील. गरिबांना मदत करणे, आजारी लोकांची शुश्रुषा करणे, दुःखी लोकांचे दुःख दूर करणे आणि अज्ञानांना शिक्षण देणे या गोष्ट करव्यात ज्या ख्रिस्ताने केल्या. आपण रडणाऱ्यांबरोबर रडावे व आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करावा. प्रोत्साहनाची शक्ति, प्रार्थनेची शक्ति आणि परमेश्वराची प्रीतिची शक्ति करवी हे कार्य यशस्वी होते.MHMar 95.4

    आम्ही नेहमी लक्षात ठेवावे की वैद्यकीय मिशनरी कार्याचा एकच उद्देश आहे आणि तो म्हणजे पापामध्ये पीडित असलेल्या स्त्री-पुरुषांना ख्रिस्ताच्या वधस्तंभाजवळ आणणे. कारण सर्व जगाच्या पापाचे ओझे त्याने वाहिले आहे. जे त्याला पाहतात त्याच्यावर विश्वास ठेवतात ते त्याच्या प्रीतित राहतात. आपण आजारी व द:खी लोकांना येशूकडे पाहणे आणि जिवंत राहण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. कार्यकर्त्यांनी नेहमी त्या महान चिकित्सकाला त्यांच्यासमोर उभे करायला पाहिजे जे शारीरिक आणि आत्मिक रोगाने अशक्त झाले आहेत. त्यांना दाखवा की येशू शारीरिक आणि आत्मिक आजारापासून बरे करतो. त्यांना सांगा की तुम्ही दुखी व आजारी असताना त्यालाही तुमच्याविषयी वाईट वाटते. तोही अस्वस्थ होतो. अशा लोकांना प्रोत्साहन द्या की त्यांनी आपले जीवन त्याच्या देखरेखीखाली सोपवून द्या. त्याने आपले जीवन आपल्यासाठी अशासाठी दिले की आपणास सार्वकालिक जीवन मिळावे. त्याच्या प्रीतिविषयी बोला आणि त्याच्या सामर्थ्याविषयी बोला जे आपले तारण करु शकते.MHMar 96.1

    चिकित्सक मिशनऱ्यांचे हे कर्तव्य उच्च आणि बहुमोलाचे आहे आणि त्यांची व्यक्तिगत सेवाही त्यासाठी मार्ग तयार करते. शारीरिक कष्ट दूर करण्यासाठी आमच्या प्रयत्नाकरवी परमेश्वर लोकापर्यंत पोहचतो. त्यांच्या हृदयामध्ये तो राहू शकतो.MHMar 96.2

    चिकित्सा मिशनऱ्यांचे कार्यामध्ये शुभवर्तमान अग्रभागी आहे. वचनाचा प्रसार आणि चिकित्सा कार्याकरवी शुभवर्तमानाचा प्रसार होणे आवश्यक आहे.MHMar 96.3

    जवळजवळ प्रत्येक समाजामध्ये असे लोक आहेत की जे परमेश्वराचे वचन ऐकत नाहीत अशा लोकांची संख्या जास्त आहे. धार्मिक संमेलनासाठी येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या लोकांपर्यंत सुवार्ताप्रचार जायचा असेल तर त्यांच्या घरी जावे लागेल. यासाठी त्यांच्या शारीरिक त्रासाचे निवारण हा एकच मार्ग आहे. त्याकरवी त्यांच्यापर्यंत परमेश्वराचे प्रेम पोहचू शकते. मिशनरी परिचारिका ज्या रुग्णांची काळजी घेतात, त्यांचे दु:ख कमी करतात. रुग्णांसाठी प्रार्थना करण्याची संधी सुद्धा त्यांना मिळते. एवढेच नाही तर परमेश्वराचे वचन त्यांना वचन त्यांना वाचून दाखाविते आणि उद्धारकाविषयी सांगू शकते. ती त्यांच्यासाठी प्रार्थना करु शकते किंवा त्यांना प्रार्थना करण्यासाठी असमर्थ असतात आपले व्यसन पूरे करण्यासाठी लज्जास्पद जीवन जगतात. त्यासाठी निराशा आणि पराजयामध्ये जगतात अशा दुःखी लोकांमध्ये एक आशेचा किरण आपण आणू शकतो. अशा रुग्णांसाठी ज्या परिचारिका काम करतात त्यांच्या नि:स्वार्थी प्रीतिने रुग्णांवर प्रभाव पडून ख्रिस्ताच्या प्रेमावर त्यांचा विश्वास बसतो व ते त्याला शरण जातात.MHMar 96.4

    बहतेक लोकांचा परमेश्वरावर विश्वास नसतो आणि मनुष्यांवरचाही त्यांचा विश्वास उडलेला असतो. परंतु त्यांना सहाय्य आणि सहानुभूतीची गरज असते. जेव्हा ते पाहतात की परिचारिका कोणत्याही लालसेने, बढाई किंवा इनाम मिळविण्याच्या इच्छेने रुग्णांची सेवा करीत नाहीत. भूकेलेल्यांना खावयास देतात. वस्त्रहीनांना कपडे देतात आणि दुःखी जनांना सहानुभूती व धीर देतात. प्रेमळपणाने त्यांची चौकशी करतात. त्यांच्यावर दया दाखवितात. त्यांचे दुःख पाहून त्यांची हृदये द्रवतात व होता होईल तेवढे सहाय्य करतात. हे पाहून त्यांना किंवा कोणालाही त्यांच्यावर विश्वास बसतो. त्यांची मने विचलित होतात. त्यांच्या तोंडून धन्यवादाचे उच्चार निघतात. सेवा करणाऱ्यांच्या उपकाराखाली ते नम्र होतात. ते पाहतात की परमेश्वराला त्यांची चिंता आहे. तेव्हा ते परमेश्वराचे वचन ऐकण्यासाठी तयार होतात. जसे त्यांच्या समोर देवाचे वचन उघडले जाते मग तो स्वदेश असो, परदेश असो. स्त्री-पुरुष मिशनरी बनून रुग्णांची सेवा करतात अशावेळी आजारी लोकांकडे जाण्याची संधी त्यांना मिळते. ज्या स्त्रिया परिचारिकेच्या रुपांमध्ये जातात तेव्हा त्यांना सुसमाचार सांगण्याची संधी त्यांना मिळते. ज्यांना सुवार्ता प्रसाराचे सर्व मार्गा बंद होतात तेव्हा रुग्णांची सेवा या मार्गाने ते आपले मिशनरी कार्य करु शकतात. सुवार्ता प्रसार करणाऱ्या सर्व मिशनऱ्यांना रुग्णांची सेवा करण्याची कला अवगत असणे आवश्यक आहे.MHMar 97.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents