Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    मोशेच्या जीवनापासून शिक्षण

    मोशेच्या अनुभवाविषयी विचार करा. मिसर देशाच्या राजाच्या मुलीचा मुलगा या नात्याने त्याला जे शिक्षण मिळाले होते त्या आधारावर तो राजगादीचा हक्कदार होता. मिसर लोकांच्या दृष्टीने व त्यांच्या बुद्धीनुसार मोशे एक बुद्धीमान व राजकारणी बनविण्यासाठी त्याच्या शिक्षणामध्ये मुळीच कसूर केली नाही. त्याला उत्तम प्रतीचे शिक्षण आणि सैनिकी शिक्षण देण्यात आले होते. त्याला समजून आले की इस्त्राएल लोकांना गुलामगिरीमधून त्यांची सुटका करण्यासाठी तो आता तयार झाला होता, परंतु परमेश्वराने त्याला दुसऱ्या प्रकारे पाहिले. परमेश्वराच्या योजनेनुसार त्याला रानामध्ये चाळीसवर्षे मेंढरे राखण्यासाठी पाठविले. त्याला ते प्रशिक्षण द्यायचे होते.MHMar 374.1

    मिसर देशामध्ये मोशेला जे शिक्षण मिळाले होते त्याचा अनेक प्रकारे त्याला उपयोगी होणारे होते, परंतु त्याच्या जीवनाचे कार्य हे सर्वात मौल्यवान तयारी म्हणजे मेंढपाळाच्या रुपानेच मिळायचे होते आणि तेच त्याला मिळाले होते. मोशे हा एक मूळ स्वभावाने क्रोधी होता. तो मिसर देशामध्ये एक यशस्वी सेनापति, कुशल योद्धा, राजा आणि देशाच्या पसंतीस उतरणारा राजकुमार होता. त्याच्यामध्ये तेच गुण भिनले होते. त्याने लोकांना स्वत:कडे आकर्षित केले होते. इस्त्राएल लोकांना त्याने आपल्या शक्तिनुसार सोडविण्याचे प्रयत्न केले होते. परमेश्वराच्या प्रतिनिधी पारुपाने त्याला जे धडे शिकवायचे होते ते पूर्ण वेगळे होते. जेव्हा रानामध्ये, डोंगरामध्ये मेंढरे राखीत होता तेव्हा त्याला मेंढराच्या कळपामध्ये विश्वास, नम्रता, धैर्य, दीनपणा आणि आत्मत्यागाचे धडे तो या चाळीस वर्षात शिकला. त्याने दुर्बळ लोकांची काळजी घेतली. आजाऱ्यांची शुश्रुषा केली. भटकलेल्यांना शोधून काढले. हट्टी आणि गोंधळ घालणाऱ्यांना सहन केले. लोकऱ्यांची काळजी घेतली, वृद्धांची सेवा केली.MHMar 374.2

    त्याच्या या कार्याकरवी मोशे हा त्याचा मुख्य मेंढपाळ येशू ख्रिस्त याच्या जवळ आला. इस्त्राएलांचा पवित्र परमेश्वरांच्या सान्निध्यात आला. आता या पुढे तो कोणतेच महान कार्य त्याला करायचे नव्हते. कारण परमेश्वराने त्याला जे कार्य दिले हाते ते त्याने प्रामाणिकपणे केले. तसे प्रयत्न त्याने केले होते. त्याने आपल्या चारी बाजूला परमेश्वराची उपस्थिति जाणली. सर्व निसर्गाकरवी मोशेला परमेश्वराच्या गोष्टी समजत होत्या. त्याने परमेश्वराला एक व्यक्ति म्हणून ओळखले आणि त्याच्या स्वभावाचे मनन करताना तो परमेश्वराची उपस्थितिचा भास होत होता. म्हणून तो परमेश्वराला शरण गेला.MHMar 375.1

    या अनुभवानंतर मोशेने स्वर्गातून आवाज ऐकला की त्याने मेंढपाळाच्या काठीचा वापर आता इस्राएली लोकांच्या नेतृत्वासाठी करावा. त्याने आता मेंढपाळाचे काम बंद करुन देवाच्या लोकांचे नेतृत्व करावे. स्वर्गीय पवित्र अधिकाराला मोशे हा स्वत:वर विश्वास न ठेवणारा, जड जिभेचा व तोंडाचा जड आहे. परमेश्वराचा प्रतिनिधी बनण्याशी त्याने आपले अयोग्यता दर्शविली होती. तो घाबरला होता, परंतु परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेऊन त्याने कार्य करण्याचे स्वीकारले त्याने आपल्या कार्यासाठी आपले डोके वापरुन प्रयोग करण्याची त्याने तयारी केली. परमेश्वराने त्याच्या तत्पर आज्ञापालनाच्या गुणाला आशीर्वाद दिला. कालांतराने ते बोलण्यात आणि योजनेत सक्षम आशावान व कार्य करण्यात सक्षम झाला. त्याच्या विषयी असे लिहीण्यात आले की, “परमेश्वराच्या प्रत्यक्ष परिचयाचा असा मोशेसमान कोणी संदेष्ठा इस्त्राएलात आजवर कोणी झाला नाही.” (अनुवाद ३४:१०). MHMar 375.2

    ते लोक जे असा विचार करतात की त्यांच्या कार्याची प्रशंसा करण्यात येत नाही आणि तो एक मोठ्या जाबबदारीची आणि पदाचा इच्छा धरतात त्यांनी या गोष्टीचा विचार करावा की, “कारण उन्नति ही पूर्वेकडून नव्हे पश्चिमेकडून नव्हे व अरण्याकडून ही नव्हे, तर न्याय करणारा देव आहे तो एकाला खाली पाडीतो व दुसऱ्याला वर चढवितो.” (स्तोत्र ७५:६-७). स्वर्गाच्या सनातन योजनेमध्ये प्रत्येक व्यक्तिसाठी कार्य आहे. आम्ही ती जागा भरुन काढतो किंवा नाही ते परमेश्वराबरोबर आम्ही विश्वासाने कार्य करतो किंवा नाही यावर ते अवलंबून आहे.MHMar 375.3

    आम्हांला हीनपणाच्या भावनांपासून फारच सावध असायला हवे आहे. आम्हाला कमी किंमत देण्यात येत आहे. अशा गोष्टी आमच्या मनात कधीच येऊ देऊ नयेत की आमच्या कार्याची प्रशंसा करण्यात येत नाही असे समजू नये. तुमचे काम कठीण आहे असे मानू नये. ख्रिस्ताने आपल्यासाठी जे काय सहन केले आहे हा विचार प्रत्येक थरथरणाऱ्या विचाराला शांत करण्यास पुरेसा आहे. आमच्या प्रभुबरोबर जो विचार केला गेला होता तेव्हा आमच्याशी त्यापेक्षा चांगला व्यवहार केला जाईल. “तू आपणासाठी मोठ्या गोष्टींचा वांच्छा करितोस काय ? ती करु नको.” (यिर्मया ४५:५). परमेश्वराच्या योजनेमध्ये त्यांच्यासाठी काही स्थान नाही. जो आपला वधस्तंभ उचलून आणि मुगुट घालण्याची इच्छा करतो. असे लोक इनाम मिळविण्यासाठी आणि स्वत:च्या फायद्यासाठीच कार्य करतात.MHMar 376.1

    ते लोक जे नम्र आहेत आणि आपले कार्य असे करतात की जसे ते परमेश्वरासाठी करीत आहेत. ते अहंकारी लोकांसारखे आपले कार्य लोकांना दाखविण्यासाठी करीत नाहीत आणि लोकांना स्वत:कडे आकर्षित करुन घेत नाहीत, परंतु त्याऐवजी ते कार्य करतात त्याकडे जास्त लक्ष देतात व कार्याला अधिक महत्त्व देतात. ते कामच त्यांना अधिक महत्त्वाचे वाटते, परंतु जे लोक इतरांना दाखविण्यासाठी काम करतात आणि इतरांचे लक्ष आपणाकडे वेधून घेऊन स्वत:चे महत्त्व पटवून देण्याचे प्रयत्न करतात ते त्यांच्या कार्यामध्ये यशस्वी होत नाहीत. कारण ते स्वत:चा आदर करुन घेऊन पाहतात जो परमेश्वराचा हक्क आहे. “ज्ञानही श्रेष्ठ चीज आहे म्हणून ते संपादन कर, आपली सर्व संपत्ति वेचून सूज्ञता संपादन कर. त्याला उच्च पद दे म्हणजे ते तुझी उन्नति करील, त्याला कवटाळून राहशील तर ते तुझे गौरव करील.” (नीतिसूत्रे ४:७-८).MHMar 376.2

    कारण त्यामध्ये त्याचे आकलन करण्याची व आपल्यामध्ये सुधारणा करण्याचा दृढ निश्चित नाही. बहुतेक लोक पारंपारिक पद्धतीने काम करण्याची चुकीच्या पद्धतीचा वापर करतात, परंतु तसे करण्याची गरज नाही. सर्वांत चांगले काम आपल्या योग्यतेचा विकास करु शकतात तेव्हा त्यांचीही नेहमी मागणी असते तेव्हा त्यांची ही किंमत त्यांच्या योग्यतेनुसार लावली जाते.MHMar 376.3

    जर ते उंच पदासाठी योग्य आहेत, प्रभु केवळ त्यांच्यावरच नाही, परंतु त्या लोकांवरही ज्यांना पारखले आहे त्यांचीही किंमत समजते त्यांना पुढे जाण्यासाठी संधी देतात. तेच ते लोक आहेत ज्यांना दिलेले काम ते दिवसे न् दिवस विश्वासाने मन लाऊन करतात. परमेश्वराने ठरविलेल्या वेळी त्यांचे बोलावणे ते ऐकतात. “येथे उंचीवर या.’MHMar 377.1

    जेव्हा मेंढपाळ बेथेलहेमच्या टेकड्यांवर आपली मेंढरे चारीत होते, तेव्हा स्वर्गदूत तेथे आले. अशाप्रकारे आजही एखादा नम्र कामगार परमेश्वरासाठी काम करतात. परमेश्वराचे दूत त्यांच्या जवळ उभे राहून त्यांचे शब्द ऐकतात. कशाप्रकारचे कार्य केले आहे त्याकडे ते लक्ष देतात. आणि ते हे पाहातात की यापेक्षा मोठे काम त्यांना दिले जाऊ शकते किंवा नाही. MHMar 377.2

    त्यांचे धन, शिक्षण व त्यांच्या पदवीनुसार परमेश्वर त्यांची किंमत ठरवित नाही. तर त्यांच्या इच्छांची शुद्धता आणि त्यांच्या स्वभावाची सुंदरतेच्या आधारावर मूल्यांकन करतो. तो हे पाहतो की ते कोणत्या मर्यादेपर्यंत ते पवित्र आत्म्याने भरतात आणि किती मर्यादेपर्यंत परमेश्वराचे गुण त्यांच्या मधून दिसतात. परमेश्वराच्या राज्यात मोठे होण्यासाठी विश्वासाचा साधेपणा, सरळपणा आणि प्रेमाचे पावित्र्यता एक लहान मुलाप्रमाणेच नम्र बनणे आवश्यक आहे.MHMar 377.3

    “पण येशूने त्यांना बोलावून म्हटले परराष्ट्रीयांवर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवितात व मोठे लोकही अधिकार करतात. हे तुम्हाला ठाऊक आहे तसे तुम्हामध्ये नाही तर जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल.” (मत्तय २०:२५-२६).MHMar 377.4

    स्वर्गाच्या दृष्टीने सर्वात उत्तम उपहार हा ख्रिस्ताच्या दुःखामध्ये सहभागी होणे हे आहे. हनोखाला जिवंतपणी स्वर्गात घेतले गेले. एलिया जो अग्निस्थान बसून वर गेला, परंतु बाप्तिस्मा करणारा योहान एकटाच तुरुंगामध्ये मरण पावला. स्वर्गाच्या दृश्टीने तोच सर्वात सन्माननीय गणला गेला. “कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरिता दुःखही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे.” (फिलिपैकरास १:२९).MHMar 377.5

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents