Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    मदिरा विकणाऱ्याचे कार्य

    पवित्रशास्त्राची ही वचने मदिरा बनवून विकणाऱ्याचे चित्र दाखविते. त्यांच्या व्यवसायाचा अर्थ आहे इतरांचे पैसे लुटणे. जो पैसा त्यांना मिळतो त्याच्या बदली खरेदी करणारास काहीच प्राप्त होत नाही. अशाप्रकारे प्रत्येक रुपया जे मिळवितात, तो खर्च करणाऱ्यावर शाप येतो. उदार हस्त असणाऱ्यांना परमेश्वर आशीर्वाद देतो.MHMar 260.2

    जर मिळालेल्या दानांचा चतुराईने उपयोग केल्यास जग गरीबी आणि संकटांपासून कितीतरी दूर राहिलं. मनुष्याची दुष्टताच अशी आहे की तो परमेश्वराच्या आशीर्वादास वंचित राहून शापाचा धनी होतो. आपली भूक भागविण्यासाठी परमेश्वराने आपल्याला धान्य व फळे भाज्या दिल्या आहेत, परंतु लालसापोटी मानवाने त्याचे विष बनविले आहे. यामुळे वेदना आणि नाश आला आहे.MHMar 260.3

    - प्रत्येक वर्षी लक्षावधी गॅलन नशा आणणारी मदिरेचा वापर केला जातो. करोडो रुपये. अभागी, गरीब, आजारी, अपराध आणि इतर गोष्टी करवी पैसे मिळविण्यात येतात. हे पैसे खर्च केले जातात ते मदिरा प्राशनसाठी मद्याची निर्मिती करणारे ते इतरांना विकून त्यांच्यामध्ये नशेचे विष भरतात. सामान्य लोकांचे आत्मे भ्रष्ट करतात, त्यांचा नाश करतात व अशाप्रकारे गोळा केलेला पैसा घेऊन ते स्वतः सुखी होण्याची स्वप्ने पाहतात, परंतु त्यांच्या जीवनामध्ये मदिरामुळे ज्यांच्या कुटुंबाचे नुकसान झाले आहे त्यांचे पाप त्यांना सुखी राहू देणार नाहीत.MHMar 260.4

    जेव्हा मद्य विकणाऱ्याची शिकार मरते तेव्हा तेथेच काम थांबत नाही. उधारीवर मद्य पिऊन मरणाऱ्यांची विधवांना लुटतात व त्यांच्या मुलांना भीक मागण्याची वेळ येते. पती आणि बापाच्या घरातील उपयोगी चीज वस्तु सुद्धा हे लोक सोडत नाहीत. त्या जीवनावश्यक गोष्टी सुद्धा हे लोक घेऊन जातात. अर्थात मद्याचे व्यसन असणारे गरीब होतातच, परंतु जीवनावश्यक वस्तुं विकून मद्यपान करतात. अशा प्रकारे त्यांचा संसार उध्वस्त होतो. अभागी पत्नी दुःखी होते, मुलांच्या गरजा भागत नाहीत. ते शाळेला जाऊ शकत नाहीत व त्यांची भूक भागत नाही व ते भीक मागतात. अशा प्रकारे मदिरामुळे संसार उध्वस्त होतात घरातील कर्ता माणूस व्यसनामुळे गरीब होतो, मद्यपानामुळे मरतो. त्याच्या विधवा स्त्रीच्या डोळ्यातील अश्रु थांबत नाही व मुलांची भूक शमत नाही. अशाप्रकारे मद्यपानामुळे अनेक संसार उध्वस्त होतात. मद्य बनविणारे व त्याची विक्री करणारे त्याच्या कमाईवर श्रीमंत बनता आणि स्वत:ला नरकात ढकलीत असतो.MHMar 261.1

    वेश्यालय, जुगार अड्डे, गुन्हेगारी, तुरुंगवास, वेड्यांचे दवाखाने अशी सर्व ठिकाणे भरलेली असतात. त्यांचे व्यवसाय व्यवस्थित चाललेले असतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे मद्याची निर्मिती करुन त्याची विक्री करणारे, यांच्यामुळेच हे व्यवसाय चालू असतात. प्राचीन काळी बाबेलमधील दासदासी व गुलाम यांची विक्री चालत असे. या मद्यविक्री करणारांच्या मागे आत्म्यांचा नाश करणारा सैतान उभा असतो. तो मानवाच्या आत्म्यांना अनेक प्रकारचे मोहजाल टाकून आपल्याकडे आकर्षित करुन घेतो व त्यांना मद्यपानाचे गुलाम बनवितो. गाव, शहरे, रेल्वे स्टेशन, मोठी जहाजे, व्यापारी संस्था, मनोरंजक ठिकाणे, औषधांची दुकाने अशा सर्व ठिकाणी मद्य उपलब्ध असते. एवढेच नाहीतर चर्चमध्ये प्रभु भोजनाच्या पवित्र टेबलावर मद्यविक्री करणारांचे जाळे पसरलेले असते. नशेची इच्छा निर्माण करणे आणि त्यामध्ये वाढ करण्याची कसर सोडली नाही. जवळ जवळ सर्वच सार्वजनिक ठिकाणे मद्यालयाने भरली आहेत. दुकानामधून आकर्षकपणे त्यांची मांडणी केलेली असते. आकर्षक विद्युत रोशनाई करुन सर्व वर्गातील लोकांच्या स्वागतासाठी काही कमी पडू दिले जात नाही. श्रीमंत तेथे येऊन मद्याचा आस्वाद घेण्याच्या लालसेने तेथे जातात.MHMar 261.2

    दुपारच्या भोजनाच्या वेळी खाजगी खोलीमध्ये, हॉटेलमध्ये सुंदर स्त्रिया मदिराचा पुरवठा करीत असतात. मदिराबरोबर खायचे पदार्थ पुरवित असतात. आजारी, थकलेले आणि शोकिन लोकांसाठी आकर्षक नावाच्या मद्याच्या बाटल्यांचा पुरवठा केला जातो. त्यामध्ये आकर्षक रंगातील विषारी मद्य असते.MHMar 262.1

    लहान मुलांमध्ये मद्याची भूक निर्माण करण्यासाठी त्यांच्या खाण्याच्या गोड पदार्थांमध्ये मद्य मिसळले जाते. या मिठाया मिठाईच्या दुकानामध्ये विकल्या जातात. मुलांच्या चॉकलेटमध्ये सुद्धा अल्कोहॉलचा समावेश असतो. यामुळे मुलांना त्याचे व्यसन लागते. अशाप्रकारे मद्याची विक्री करणारे मुलांना आपल्या जाळ्यात अडकवितात.MHMar 262.2

    दिवसेन दिवस प्रत्येक महिना व वर्षान् वर्ष हे कार्य चालूच राहते. पिता, पती, भाऊ जे या देशाची आशा आहे, गौरव आहे अशांना मद्याची विक्री करणारे त्यांना शोधून काढतात व आपल्या जाळ्यात ओढून घेतात आणि फसवूणक करतात.MHMar 262.3

    यापेक्षा अधिक भयानकता म्हणजे नशेबाजीचा शाप कुटुंबियांवर व त्यांच्या हृदयांवर दुःखाचा डोंगर कोसळतो. पूर्वी मद्यपी पतीमुळे पत्नी अश्रु गाळीत असे परंतु आता बऱ्याच महिलांनासुद्धा मदिरेचा कैफ चढत आहे. स्त्रियांना मद्याचे व्यसन लागत आहे. आजकाल अनेक घरांमध्ये मुलां विषयी बेफिकीरी, त्यांच्याशी चांगले व्यवहार न करणे त्यांना मारहाण करणे अशाप्रकारची वागणूक मातांकडून मुलांना मिळते. अशाप्रकारे स्त्रियांच्या व्यसनामुळे मुलांचे भविष्य धोक्यात आले आहे. मुले आणि मुली भयंकर वाईट सावलीमध्ये राहात आहेत. त्यांचे भविष्य अंधारात आहे. आजकाल माता व पिता दोघेही मदिरेच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे मुलांकडे त्यांचे लक्ष नसते. त्यांच्याविषयी ते साधी चौकशीही करीत नाहीत.MHMar 262.4

    ख्रिस्ती म्हणविणाऱ्या देशातून हे घृणास्पद कल्पना मूर्तिपूजक देशामध्ये पोहचली आहे. गरीब, अडाणी व असभ्य लोकांना मद्यपानाचे व्यसन लावले आहे. त्याचप्रमाणे मूर्तिपूजक देशामध्ये अनेक सभ्य लोक आहेत जे या विषाला विरोध करतात. या पेयाचे परिणाम त्यांना ठाऊक आहेत म्हणून त्यांनी कडाडून विरोध केला, परंतु आपल्या भूमिला ते या नाशापासून वाचविण्यास असमर्थ ठरले. आता सभ्य लोकांकरवीच तंबाखू, दारु, अफीमसारखे मादक पदार्थांची विक्री केली जात आहे. गरीबांवर जबरीने लादण्यात येत आहे. असभ्य लोकांच्या अनियंत्रीत वासनांना उत्तेजित केले जात आहे. सभ्य लोकांना तंबाखू, मद्यपान जबरीने पिकविले जात आहे त्यांना नकळत पतनाकडे ढकलले जात आहे. आणि या देशांमध्ये देवाच्या सुवार्तीकांना पाठविणे निराशजनक ठरले जात आहे.MHMar 263.1

    मद्यपीच्या संपर्कामध्ये जे सभ्य लोक जातात त्यांना वाईट व्यसनांमध्ये जबरीने ढकलले जात आहे आणि याचे कारण म्हणजे पृथ्वीवरील अंधाऱ्या भागामध्ये या सभ्य लोकांचा द्वेष केला जातो.MHMar 263.2