Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    जीवनाच्या संघर्षासाठी शिक्षण

    प्रत्येक मनुष्याचे आरोग्य हे योगायोग नाही हे वारंवार सांगण्याची गरज नाही. हे तर आज्ञापालनाचे परिणाम आहेत. मैदानी खेळ आणि शर्यतीत भाग घेण्यासाठी शारीरिक कठोर परिश्रम करुन स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडू प्रमाणे जी तयारी करावी लागते त्यांना या सर्व शरीरिक कठीण परिश्रमातून जावे लागते तरच स्पर्धेसाठी तयार होऊ शकतात. शरीराची प्रत्येक सवय जी अंगवळणी पडली आहे ती नियंत्रणात ठेवावी लागते. वाईट सवयींचा त्याग करावा लागतो. एखाद्या गोष्टीचा निष्काळजीपणा किंवा आळस केल्यास स्पर्धेमध्ये नक्कीच पराजय आहे हे निश्चित समजावे. जीवनाच्या संघर्षामध्ये निश्चित विजय मिळविण्यासाठी खूप सावध राहावे लागते. हे अति महत्त्वाचे आहे कारण आपले युद्ध हे लुटूपुटीचे नक्कीच नाही. तर तो एक जीवनाचा महान संग्राम आहे. यावर अनेक परिणाम टिकून आहेत. अदृष्य शत्रुबरोबर आपले युद्ध आहे. दुष्ट आत्मे प्रत्येक मनुष्यावर अधिकार चालविण्याच्या प्रयत्नात आहेत. आमच्या आरोग्याचे नुकसान करणाऱ्या प्रत्येक गोष्टी आपले शरीर दुर्बल करणाऱ्या आहेत. त्याचबरोबर आपले मानसिक आणि बौद्धिक आरोग्यसुद्धा धोक्यात येते. आपली नैतिक शक्ति त्यामुळे नष्ट होते. आरोग्याचे नुकसान करणाऱ्या सवयीमध्ये राहणाऱ्या व्यक्तिला चांगले आणि वाईट गोष्टींमधील फरक ओळखणे कठीण जाते. यामुळे वाईट गोष्टींशी मुकाबला करण्यासाठी अति कठीण वाटते. यामुळे वाईटाचा सामना करणे अशक्य होऊन बसते. यामुळे अपयश आणि पराजयाचे धोके वाढतात.MHMar 83.1

    शर्यतीत धावणारे सर्वच धावतात पण एकालाच बक्षीस मिळते हे तुम्हांला ठाऊक नाही काय ? तुम्ही असे धावा की ते तुम्हांला मिळेल. (१ करिथ ९:२४).MHMar 84.1

    ज्या संघर्षामध्ये आम्ही लढत आहोत त्यामध्ये ते सर्व जिंकू शकतात. जे योग्य सिद्धांताचे पालन करुन स्वत:ला एक शिस्त लावतील. जीवनातील विस्तृत बाबी पाहून या सिद्धांताकडे असे पाहिले जाते की त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही असे अनेकांना वाटते, परंतु जी गोष्टच डावावर लावली आहे त्यावर लक्ष देणे अति महत्त्वाचे आहे आणि ही लहान गोष्ट नाही. प्रत्येक कार्याचा आमच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. यावरच आपला जय-पराजय अवलंबून आहे. पवित्र शास्त्र सांगते की, “तुम्हीही असे धावा की ते तुम्हांला मिळेल.” (१ करिंथ ९:२४). MHMar 84.2

    आमच्या प्रथम माता पित्याने त्यांच्या असयंमीपणामुळे त्यांना एदेन बागेला मुकावे लागले. एदेन बागेमध्ये जाण्यासाठी आम्हांला परत जाण्यासाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या मानवाच्या विचारा पलिकडेही अधिक आहेत. “स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टींविषयी इंद्रिय दमन करतो तो नाशवंत मुगूट मिळविण्यासाठी असे करितात आपण तर अविनाशी मुगूट मिळविण्यासाठी असे करितो म्हणून मीही तसाच धावतो. म्हणजे अनिश्चित पणे धावत नाही. तसेच मुष्टियुद्धातही करितो म्हणजे वाऱ्यावर मुष्टिप्रहार करीत नाही तर मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करुन ठेवतो. असे न केल्यास मी दुसऱ्याच घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेन.” (१ करिंथ ६:२५-२७).MHMar 84.3

    सुधारण्याची प्रगती ही नैतिक सत्यावरील स्पष्ट ओळखीवर अवलंबून आहे. एका बाजूला संकुचित थंड व कठोर रुढी जी कोणाला न आवडणारी तर दुसरीकडे निष्काळजीपणा आणि बेसावधपणाचा धोका आहे. केवळ परमेश्वराचीच व्यवस्था व रचना चिरकालीन सुधारणेचे मूल आहे. या विषयी आम्हांला विशिष्ट पद्धतिने या व्यवस्थेचे पालन करण्याचे शिक्षण देणे आवश्यक आहे. याचे सिद्धांत लोकांसमोर आणणे आवश्यक आहे. हे सिद्धांत किंवा तत्त्वे परमेश्वरासारखीच पवित्र आहेत, सनातन आहेत.MHMar 84.4

    सुरुवातीच्या धर्मत्यागाच्या दुःखद परिणामाचा प्रभाव मनुष्यावर पडला आणि त्याच्या आत्मसंयम शक्तिचा -हास झाला. कवेळ याच शक्तिच्या पुनर्रचनेनेच व त्या प्राप्तीने मानवाची आत्मसंयम शक्तिची उन्नति होऊ शकते. शरीर असे माध्यम आहे की त्यामुळेच चरित्र निर्माण करण्यासाठी मानसिक व आत्मिक या दोन्ही शक्तिंचा विकास होऊ शकतो आणि हेच कारण आहे की शारीरिक शक्तिंना दुर्बल आणि विकृत करण्यासाठी आत्म्याचा शत्रु आमच्या जीवनावर वाईटपणाला समर्पित करतो. आमच्या शारीरिक प्रवृत्ति व स्वभाव जर स्वर्गीय शक्तिच्या नियंत्रणामध्ये होत नसेल तर आमच्या मृत्युला व वाईटाला कारणीभूत होईल.MHMar 84.5

    शरीराला अधीनतेमध्ये आणायचे आहे. आमच्या जीवनावर स्वर्गीय शक्तिचे शासन असणे आवश्यक आहे. आमच्या तीव्र इच्छा आवेग या सर्वांवर नियंतण होणे आवश्यक आहे. विवेकाची महान शक्तिला स्वर्गीय अनुग्रहाने शुद्ध होऊन आमच्या जीवनावर प्रभुत्व होणे आवश्यक आहे. परमेश्वराच्या मागण्या आमच्या अंत:करणात ठसल्या पाहिजेत. पुरुषांना आत्मनियंत्रण प्राप्त करुन घेण्याचे कर्तव्य पवित्रतेची आवश्यकता, हानिकारक भूकेपासून स्वातंत्र्य आणि भ्रष्ट करणाऱ्या सवयी पासून मुक्त हाणे आवश्यक आहे. या साठी या गोष्टीची जाणीव होणे आवश्यक आहे की सर्व मानसिक आणि शारीरिक शक्ति परमेश्वरापासून आहेत आणि आपल्या या शक्तिंचा वापर परमेश्वराच्या सेवेसाठीच होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी त्या सुरक्षित असणे अति आवश्यक आहे.MHMar 85.1

    त्या प्राचीन संस्कार शास्त्रामध्ये धर्म पद्धतिमध्ये प्रतिकात्मक सुवार्ता होती. यामध्ये केवळ निष्पाप बलिदानच परमेश्वराच्या वेदीवर आणले जात असे. ख्रिस्ताचे प्रतिनिधीत्व करणारे बलिदान निर्दोष असणे आवश्यक होते. परमेश्वराचे वचन त्या उदाहरणाकडे निर्देश करते की त्याच्या मुलांना कसे असावे. एक जिवंत बलिदान पवित्र व निर्दोष बळी असायला हवा. परमेश्वराला मान्य असयला हवा. (रोम १२:१, इफिस ५:२७).MHMar 85.2

    स्वर्गीय शक्तिशिवाय कोणतीही खरी सुधारणा प्रभावित होऊ शकत नाही. स्वाभाविक आणि शिकविण्यात आलेल्या सवयी करवी मानवी प्रवृत्तींवर विजय मिळविण्याचे प्रयत्न हे जलप्रवाहापासून वाळूच्या भीतींचे संरक्षण करण्यासारखे आहे. आमच्यावर आतून व बाहेरून आणि चारी बाजूने हल्ला करणाऱ्या परीक्षांचा सामना आम्ही तोपर्यंत करु शकत नाही जोपर्यंत ख्रिस्ताचे जीवन आम्हाला जीवन शक्ति प्रदान करीत नाही. ख्रिस्त या जगात आला आणि त्याने परमेश्वराच्या आज्ञांचे पालन केले व तेच जीवन जगला म्हणजे मानवाने सुद्धा त्याचे अनुकरण करावे व निष्पाप जीवन जगावे. कारण ख्रिस्त निष्पाप जीवन जगला. आत्मा आणि शरीर या दोघांचा चिकित्सक येशू ख्रिस्त आहे. तो शरीराच्या वासनांवर विजय देतो. त्याने प्रत्येक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. म्हणजे मनुष्य आपल्या चारित्र्याची पूर्णता मिळवू शकेल.MHMar 85.3

    जी व्यक्ति स्वत:ला येशू ख्रिस्त्राला सोपविते तेव्हा त्याची बुद्धी नियमांच्या अधीन होते. परंतु ते तर स्वतंत्रतेचे नियम आहेत जे प्रत्येकाला बंदीवासातून मुक्त करते. ख्रिस्ताबरोबर एक होण्यानेच मनुष्य मुक्त होऊ शकतो. ख्रिस्ताची इच्छा आहे की प्रत्येक पुरुषाने सिद्ध पुरुषत्वामध्ये पुन्हा परत यावे यासाठी अधीनता महत्वाची आहे. म्हणजे तो पूर्णत्वामध्ये येईल.MHMar 86.1

    परमेश्वराच्या आज्ञा या मनुष्याला पापापासून मानवीय वासना आणि पापी वासनांपासून दूर ठेवतात. त्याला स्वतंत्र करतात. “कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे तर सताबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतीबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.’ (इफिस ६:१२). MHMar 86.2

    कुटुंबाशिवाय इतर कोठे ही अशा प्रकारचे मार्गदर्शन देता येत नाही आणि प्रभावी ही होऊ शकत नाही. आरोग्य सुधारण्याची चळवळ परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी होते. कारण नीतिशास्त्रावरच शारीरिक शास्त्र व आरोग्य अवलंबून असते. लोकांना दाखवून द्या की त्या वाईट गोष्टी किंवा सवया जलद गतीने जग नष्ट करीत आहेत. या उलट मानवाची सुरक्षा केवळ परमेश्वराच्या वचनावर अवलंबून आहे. मुलांवरील आई वडीलांच्या जबाबदाऱ्या त्यांच्यासमोर सादर करा. मुलांना पालकांनी आज्ञापालन करण्याची सवय लावावी आणि आज्ञा उल्लंघनाचे होणारे वाईट परिणामाची उदाहरणे सांगावीत. अशा प्रकारच्या शिक्षणाने कुटुंबियांचा उत्कर्ष अवलंबून आहे. मुले तशीच होतात जसे त्यांचे आई वडील त्यांना बनवितात.MHMar 86.3

    जर आई वडील आपल्या कार्याचे परिणाम समजून घेतात तर त्यांना दिसून येईल की त्यांच्या कुटुंबामधील धार्मिकतेमध्ये वाढ होत आहे व स्थिरता स्थापन होत आहे असे दिसून येईल. असे केल्यास नक्कीच एक उत्तम बदल दिसून येईल. बहुतेक लोक त्यांचे रीतिरिवाज परंपरा सोडून जीवनाच्या स्वर्गीय सिद्धांताकडे वळतात.MHMar 86.4

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents