Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    परमेश्वराचे व्यक्तित्व ख्रिस्तामध्ये प्रगट केले

    एक व्यक्तिगत परमेश्वर होण्याच्या नात्याने स्वतःला त्याच्या पुत्राच्या रुपाने जगाला प्रगट केले. पित्याच्या सर्वश्रेष्ठ महिमा आणि हे त्याच्या तत्वाचे प्रतिरुप आहे.” (इब्री १:३). येशू एक उद्धारकर्ता म्हणून व्यक्तिगत असा या जगात झाला. एक व्यक्तिगत उध्दारकर्ता म्हणून तो उंच चढला. एक व्यक्तिगत उध्दारकर्ता या रुपात स्वर्गीय न्यायालयात आमच्यासाठी प्रार्थना करीत आहे. परमेश्वराच्या सिंहासनापुढे तो आमच्या वतीने सेवा करीत आहे. “मनुष्याच्या पुत्रासारखा एक पुरुष दिसला.” (प्रकटीकरण १:१३).MHMar 324.1

    जगाचा प्रकाश येशू ख्रिस्त आपल्या स्वर्गीय महिमावर पडदा घालून मानवाच्यामध्ये मनुष्य बनून राहू लागला. म्हणजे मनुष्य त्याच्या प्रकाशाने भस्म न होता आपल्या सृष्टीकाशी ओळख करुन घ्यावी. कारण पापाने मनुष्याला मनुष्यापासून आणि सृष्टीकर्त्यापासून वेगळे केले आहे. म्हणून कोणीही मनुष्य परमेश्वराला पाहू शकत नाही परंतु ख्रिस्ताला त्याच्याद्वारे मनुष्यरुपाने प्रगट केले.MHMar 324.2

    पवित्रशास्त्र अगदी सफाईने परमेश्वर आणि ख्रिस्त या दोघांमधील संबंधाचे वर्णन करतात. आणि या दोघातील प्रत्येकाच्या व्यक्तिगत वैशिष्ट्याचे सुद्धा वर्णन करतात. “देव प्राचीन काळी अंशाअंशानी आणि प्रकाराप्रकारांनी संदेष्ट्यांच्याद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे. ख्रिस्त सर्वांची पापे धुवून तो उर्ध्वलोकी राजभवनाच्या उजवीकडे बसला. ज्या मानाने तो त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण त्याने कोणत्या देवदूताला कधी म्हटले. तू माझा पुत्र आहेस आज मी तुला जन्म दिला आहे? आणि पुन्हा मी त्याला मी त्याला पिता असा होईन आणि तो मला पुत्र असा होईल ? (इब्री १:१-५).MHMar 325.1

    पिता आणि पुत्राचे व्यक्तित्व आणि त्यांच्यामध्ये असणारे ऐक्य योहानाच्या सतराव्या अध्यायामध्ये येशूने त्याच्या शिष्यांसाठी प्रार्थना केली की “मी केवळ त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करितो की त्या सर्वांनी एक व्हावे हे माझ्या बाप्पा, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्यामध्ये एक व्हावे. कारण तू मला पाठविले असा जगाने विश्वास धरावा.” (योहोन १७:२०२१). जे ऐक्य ख्रिस्त आणि त्याच्या शिष्यांमध्ये आहे ती त्यांच्यापैकी कोणाचीही पात्रता कमी होऊ शकत नाही. हे उद्देश, बुद्धी आणि स्वभावामध्ये एक आहे परंतु व्यक्तित्वामध्ये नाही. अशाप्रकारे ख्रिस्त आणि ख्रिस्त हे ही एक आहेत.MHMar 325.2

    मानवतेची ओढ जाणून ख्रिस्त मानवतेबरोबर एक होण्यासाठी तो जगात आला. त्याचबरोबर पापी मानवांसमोर परमेश्वराला प्रगट करण्यासाठी सुद्धा तो आला. ख्रिस्त हा प्रारंभापासूनच पित्याजवळ राहात होता. ख्रिस्त हा अदृष्य पित्याच्या स्वभावाची छाया आहे. ख्रिस्तच जो पित्याचा स्वभाव प्रगट करण्यास योग्य आहे. जसे आम्ही शरीरामध्ये आहोत तसे तोही शरीरामध्ये प्रगट होऊन आला. त्याला तहानभूक लागत होती. तो थकतही होता. भोजनाद्वारे त्याला शक्ति मिळत होती आणि झोप घेतल्यावर तो ताजातवाना होत होता. मनुष्याच्या सर्व भावनो तो भोगत होता. तरीही तो परमेश्वराचा निष्पाप पुत्र होता. या जगामध्ये तो एक परदेशी परका व एक प्रवास होता. तो जगामध्ये होता परंतु जगाचा नव्हता. जसे आज जगामध्ये स्त्री पुरुष त्रास दुख भोगतात तोही तसेच दुःख भोगीत होता. तरीही तो निष्पाप जीवन जगला. तो दयाळू, कनवाळू प्रीति पूर्ण आणि सदैव इतरांच्या हितासाठीच झटला. ख्रिस्ताने परमेश्वराचा स्वभाव जगाला सादर केला व शेवटपर्यंतच तसेच जीवन जगला. आणि निरंतर त्याने म्हणजे आम्हाला पुरे आहे. येशूने त्याला म्हटले फिलिपा मी इतका काळ तुम्हाबरोबर असूनही तू मला ओळखत नाहीस काय? ज्याने मला पाहील आहे त्याने पित्याला पाहिले आहे. तर आम्हाला पिता दाखवा असे कसे तू म्हणतोस? मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये असा विश्वास तू धरीत नाहीस काय ? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मनच्या नाहीत. माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्ये करतो.” (योहान १४:१-१०).MHMar 325.3

    त्यावेळी ख्रिस्ताचे ते शब्द समजले नाही जे परमेश्वर आणि ख्रिस्ताचे काय संबंध आहेत. अजूनही ख्रिस्ताच्या काही गोष्टी शिष्यांना समजत नाहीत. ख्रिस्ताची इच्छा होती की त्याच्या शिष्यांना त्याच्याविषयीचे पूर्ण ज्ञान प्राप्त करुन घ्यावे.MHMar 326.1

    “ह्या गोष्टी मी तुम्हाला अन्योक्तीने सांगितल्या आहेत, मी तुम्हा बरोबर अन्योक्तीने आणखी बोलणार नाही तर पित्याविषयी तुम्हास उघड सांगेन अशी घटका येत आहे.” (योहान १६:२५).MHMar 326.2

    पेंटेकॉस्टच्या दिवशी जेव्हा पवित्र आत्मा शिष्यांवर उतरला. तेव्हा ख्रिस्ताने दाखल्याच्या रुपाने त्यांना सांगितल्या होत्या त्या त्यांना समजून आल्या होत्या. त्याच्या अनेक शिकवणी शिष्यांना रहस्यमयच वाटत होत्या. त्या आता स्पष्ट झाल्या होत्या. परंतु अजूनही ख्रिस्ताची काही अभिवचने शिष्यांना पूर्ण होताना दिसत नव्हत्या. ख्रिस्ताची इच्छा होती की शिष्यांनी ख्रिस्ताच्या ज्ञानात परिपूर्ण व्हावे. परंतु माता त्यांना स्पष्ट झाले होते. आजही तीच परिस्थिती आहे. परमेश्वराच्या बाबतीत आमचे ज्ञान अर्धेच आहे. जेव्हा संघर्ष समाप्त होईल आणि येशू ख्रिस्त मनुष्याचा पुत्र आपल्या पितासमान विश्वासु सेवकांना ज्यांनी या पापी जगामध्ये ख्रिस्ताची खरी साक्ष दिली आहेत ती तो स्वीकारील. तेव्हा ते या गोष्टी स्पष्टपणे समजतील जे त्यांच्यासाठी रहस्यमय असतील.MHMar 326.3

    स्वर्गीय न्यायालयामध्ये ख्रिस्त आपल्या महिमामय मानवतेला घेऊन गेला जे लोक त्याचा स्वीकार करतात. त्याने त्यांना परमेश्वराचे पुत्र व कन्या होण्याचा अधिकार दिला आहे. म्हणजे परमेश्वर त्यांना अनंतकालिन आपल्या जवळ ठेवील. म्हणजे मग ते त्याचे मुख पाहातील. “ते त्याचे मुख पाहातील व त्याचे नाव त्यांच्या कपाळावर असेल.” (प्रकटी २२:४). परमेश्वराला पाहण्याखेरीज त्यांचा दुसरा आनंद काय असेल ? ख्रिस्ताच्या अनुग्रहा करवी वाचविलेल्या पाप्यांना यापेक्षा काय आनंद असणार आहे ? ते परमेश्वराचे रुप पाहतील आणि त्याला पिता म्हणून ओळखतील आणि मानवाची सेवा केली.MHMar 326.4