Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय २८—कुटुंबाची सेवा

    “आई-वडीलांना दिलेल्या कार्यापेक्षा
    कोणतेही मोठे मिशनरी कार्य नाही.”

    मानवतेची सुधारणा आणि प्रगती घरापासूनच सुरु होते. प्रत्येक कामामध्ये आई-वडीलांचा हात असतो. समाजाची निर्मिती घरापासून होते आणि तो तसेच बनतो जसे घरचा मुख्य असतो. मनुष्याचे मन हे “जीवनाचा उगम आहे.” (नीतिसूत्रे ४:२३) आणि कुटुंब हे समाज, मंडळी आणि देशाचे हृदय आहे. समाजाचे कल्याण मंडळीचा चांगुलपणा आणि राष्ट्राची उन्नति ही कुटुंबावरच अवलंबून असते.MHMar 270.1

    घरगुती जीवनाचे महत्त्व आणि वेळेचा सदुपयोग हे प्रभु येशूच्या जीवनामध्ये दिसून आले होते. तो स्वर्गामधून आमच्यासाठी तो आमचा एक आदर्श आणि शिक्षक बनून आला. त्याने आपल्या जीवनाची तीस वर्षे नासरेथच्या एका कुटुंबाचा सभासद होता. या वर्षांविषयी धर्मशास्त्रामध्ये अगदी सांक्षीत माहिती आहे. कोणत्या मोठ्या चमत्काराने त्याने लोकांचे चित्त याकडे आकर्षित केले नव्हते. कोणत्याही उत्सुक गर्दीने या त्याच्या तीन वर्षांमध्ये त्याचे अनुकरण केले नाही किंवा त्याची वचने ऐकली नाहीत. तरीही या सर्व वर्षांमध्ये तो आपले स्वर्गीय उद्देश पूर्ण करीत होता. घरगुती जीवनाचा भाग बनून कौटुंबिक जीवनाच्या नियमांच्या अधीनतेमध्ये होता. तो आपल्या कर्तव्याचे पालन करीत कुटुंबाचा भार वाहत त्याने आमच्या सारखेच एक कौटुंबिक जीवन जगून उदाहरण दाखविले. गरीब कुटुंबाच्या अधीनतेमध्ये राहून आमच्या सामान्य कार्याचा भाग बनून त्याचा अनुभव घेत तो “ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसाच्या कृपेत वाढत गेला.” (लूक २:५२).MHMar 270.2

    कुटुंबातील या सर्व वर्षांमध्ये त्याच्या जीवनातून सहानुभूति आणि सहाय्यताचा झरा वाहत होता. त्याची नि:स्वार्थी आणि धैर्यशील सहाय्यता, सहनशीलता आणि त्याचे साहस आणि इमानदारी परीक्षाला तोंड देणे, त्याच्यामधील शांती आणि शांत व आनंदमय स्थिति हे सततच्या प्रेरणेचे मूळ आहे. त्यामुळे घरातील वातावरण शांत व सुखी होते आणि त्याचे जीवन समाजाच्या सर्व तत्त्वांमध्ये खमीराचे कार्य करीत होते. कोणीही म्हणू शकले नाही की त्याने चमत्कार केले, परंतु तरीही त्याच्या जीवनातील चांगूलपणा देणारी त्याच्या प्रेमाची शक्ति ही त्याच्या जीवनामध्ये परीक्षेत फसलेले आजारी आणि निराश लोकांकडे त्याचा ओढा होता. त्याच्या बालपणापासूनच कुरकुर न करता त्याने इतरांची सेवा केली. त्याने दुसऱ्यांची सेवा करण्यातच आपले जीवन खर्च केले व म्हणूनच त्याच्या सार्वजनिक सुरु केलेल्या सेवेमध्ये लोक त्याचे आनंदाने ऐकत असत. मुक्तिदात्याच्या लहानपणीची वर्षे तरुणांसाठी एक उदाहरणापेक्षाही अधिक आहेत. तो एक धडा आहे. जो प्रत्येक मातापित्याने शिकावा. त्यांच्यासाठी एक प्रोत्साहन आहे. जे लोक आपल्या साथीदार माणसांसाठी व त्यांच्या प्रगतीसाठी काही करु इच्छितात त्यांच्यासाठी कुटुंबिय आणि शेजाऱ्यांसाठी कर्तव्याचे पहिले उदाहरण आहे. घराचे संरक्षण आणि संस्थापकांना जे कार्य सोपवून दिले आहे यापेक्षा अधिक महत्त्वाचे कार्य क्षेत्र दुसरे कोणते असू शकत नाही. जे कौटुंबिक जीवनामध्ये आहे. मनुष्याला कोणतेही काम इतके महत्त्वपूर्ण नाही जे कुटुंबातील माता पित्यांना सोपविले आहे.MHMar 270.3

    आजची मुले आणि तरुणच उद्याच्या समाजाचे व देशाचे भविष्य आहेत. ही मुले आणि तरुणांनी काय करावे हे कुटुंबियांवर आधारित आहे. कुटुंबातील योग्य शिक्षणाच्या अभावामुळेच आमची मानवता शापीत करणारे आजार, दुःख व अपराध निर्माण झाले आहेत. जर घरातील जीवन शुद्ध आणि खरे असते व जर मुले कुटुंबाच्या देखरेखीखाली पालन करण्यात आली असती, त्यांना योग्य शिक्षण मिळाले असते आणि त्यांना आपली जबाबदारी समजून आली असती तर आज जगामध्ये किती मोठा बदल घडून आला असता. MHMar 271.1

    वाईट सवयांचे शिकार झालेल्या लोकांना सुधारण्याच्या संस्थामधून मोठे प्रयत्न केले जातात. भरपूर प्रमाणात वेळ, शक्ति आणि पैसा खर्च केला जातो. एवढेच नाही परंतु आवश्यकता पूर्ण करण्यासाठी हे प्रयत्नसुद्धा पूरे नाहीत तरी किती अल्प परिणाम प्राप्त होतात. किती कमी लोक आहेत जे पूर्णपणे त्यांच्यामध्ये सुधारणा होते.MHMar 271.2

    अनेक लोक चांगले जीवन जगू पाहतात, परंतु वाईट सवयी मोडण्यासाठी धाडस आणि संकल्पाची कमतरता असते ते प्रयत्न आणि संघर्ष करण्यास संकोच करतात. आणि त्यांचे जीवन बर्बाद होते. अशाप्रकारे सर्वांत हुशार बुद्धीमान उंच महत्त्वकांक्षा ठेवणारे आणि प्रभावी शक्ति असणारे लोक ज्यांना शिक्षण विश्वास आणि जबाबदारीयोग्य बनविले होते. ते या जीवनात आणि येणाऱ्या जीवनासाठी विकृत आणि नाशवंत होतात.MHMar 271.3

    जे सुधारतात जीवनाची शक्ति मिळविण्यासाठी त्यांना किती कडवट व कटू अनुभव आलेले असतात. त्यांना खडतर संघर्ष करावा लागला असेल आणि उरलेल्या जीवनामध्ये विस्कटलेली जीवनाची घडी अस्थिर इच्छा क्षतिग्रस्त जाणीव आणि दुर्बल प्राणशक्तिनीशी वाईट कर्माची फळे भोगत राहणे. जर या वाईटाच्या सुरुवातीलाच स्वत:मध्ये सुधारण्याचा आरंभ केला असता तर किती चांगली कर्मे संपन्न केली असती. या कामामध्ये मातापित्यांचा मोठा वाटा होता. असंयम आणि दुसरी वाईट गोष्टी रोखण्याचे काम माता-पिता करु शकतात, परंतु वाईट कर्मांचा कॅन्सर खात आहे. त्यांच्यामध्ये जर माता-पित्यांनी त्यांच्या लहानपणीच चांगले संस्काराचे धडे दिले असते तर त्याचे परिणाम शंभर टक्के झाले असते. जी शक्ति वाईटासाठी भयंकर शक्ति असते. चांगल्यासाठी बळ देण्याची शक्ति त्यांच्यामध्ये आहे. झऱ्याचे मूळे जेथे असते तेथूनच तो फुटतो आणि ते त्यांच्यावर अवलंबून आहे की त्यांना योग्य वळण द्यावे. माता-पिता आपल्या मुलांसाठी त्यांचे आरोग्य आणि सुखी जीवनासाठी पाया घालू शकतात. ते आपल्या घरापासून नैतिक शक्तिबरोबर परीक्षांचा सामना करीत यशपूर्वक जीवनाच्या समस्याशी लढण्यासाठी समर्थ असतात. त्यांचे जीवन परमेश्वरासाठी एक आदर्श आणि जगासाठी आशीर्वादाचे बनते. आपल्या मुलांच्या आदर्शासाठी त्यांना बलपूर्वक स्थिर केले जाते. उन, वारा, पाऊस काहीही असो ते आपल्या स्वर्गीय महामार्गानुसार चालत राहतात. कौटुंबिक कार्याच्या सेवेमध्ये केवळ कुटुंबातील सभासदच नाही, परंतु जगातील ख्रिस्ती समाजामध्ये योग्य सिद्धांताची महानता प्रकट करण्याचा आदर्श होणे आवश्यक आहे. असा नमुना जगाच्या हितासाठी एक मोठी शक्ति असेल. मानवी हृदयावर खऱ्या झराचा प्रभाव कोणत्याही प्रभावापेक्षाही प्रभावित भाषणा पेक्षाही अधिक असतो. अशा घरातील तरुण बाहेर गेले तर ते त्यांच्याजवळ असणारे सत्य इतरांमध्ये वाटून देतात. जीवनात उच्च प्रतिचे सिद्धांत दुसऱ्या घरापर्यंत पोहोचले जातात आणि त्यामुळे समाजामध्ये एक प्रभावकारी कार्य केले जाते.MHMar 272.1

    आणखी असे अनेक लोक आहे ज्यांच्याकरवी आपल्या कुटुंबामध्ये आशीर्वादाचे कारण बनू शकते. आमचे सामाजिक अतिथी सत्कार जगाच्या रीतिरिवाजाप्रमाणे नाही परंतु ख्रिस्ती आत्मा आणि त्याच्या वचनाच्या शिक्षणाने होणे आवश्यक आहे. इस्त्राएल लोक त्यांच्या सणामध्ये गरीब, परदेशी आणि लेवीय लोकांनासुद्धा सामील करुन घेत असत. जे पवित्रस्थान जे याजकाच्या मदतनीस, एक धार्मिक शिक्षक आणि एक मिशनरी दोघेही असत. हे लोक प्रत्येक सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये पाहूणे असतील तर आजारी लोकांची काळजी घेणारे व गरजवंताची काळजीपूर्वक वागणूक देऊन त्यांना पाहुण्यासारखी वागणूक देत असत. अशाच लोकांचे आमच्या घरामध्येही स्वागत होणे आवश्यक आहे. मिशनरी नर्स किंवा शिक्षकांनी काळजीच्या ओझ्याखाली दबलेले, परिश्रम करणारी माता, विधवा किंवा दुर्बल लोक बेघर, गरीब, निराश, संघर्ष करणारे त्यांच्यासाठी करण्यात येणारे स्वागत किती सुखाचे होऊ शकेल.MHMar 273.1

    “मग ज्याने त्यांना निमंत्रण केले होते त्यालाही तो म्हणाला जेव्हा तुम्ही दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ कराल तेव्हा तुम्ही आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान शेजारी ह्यांना बोलवू नका, कारण तेही कदाचित तुम्हांला उलट आमंत्रण करतील व तुमची फेड करतील. तर तुम्ही जेव्हा मेजवानी द्याल तेव्हा दरिद्री, लंगडे व आंधळे यांना आमंत्रण करा म्हणजे तुम्ही धन्य व्हाल. कारण तुमची फेड करावयास त्यांच्याजवळ काही नाही. तरी नीतिमानाच्या पुनरुत्थानासमयी तुमची फेड होईल.” (लूक १४:१२-१४). हे असे पाहुणे आहेत ज्यांचे स्वागत करण्यासाठी तुमच्यावर जास्त ओझे पडणार नाही. त्यांना अति आणि महाग व मोठी जेवणावळ करण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला जास्त देखावा करण्याचीही गरज पडणार नाही. त्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचीही गरज नाही. तुमच्याकरवी हसून स्वागत करण्यापलिकडे दुसरे काहीच करण्याची आवश्यकता नाही किंवा तुमच्या घरातील चांगल्या आसनांचीही गरज नाही. परंतु त्या ऐवजी त्यांच्यासाठी प्रार्थना करणे ही एक स्वर्गीय आशीर्वादाची देणगी असेल. MHMar 273.2

    आमच्या सहानुभूति स्वत:च्या सीमा आणि भीतीच्या पलिकडे जाऊन बाहेर दूरपर्यंत जाणे आवश्यक आहे. जे लोक आपल्या घरांना दुसऱ्यांसाठी आशीर्वादाचे कारण बनतात त्यांच्यासमोर अनेक संधी येतात. या संधी अति मौल्यवान असतात. सामाजिक प्रभाव एक आश्चर्यकारक शक्ति आहे. जर आपली इच्छा असेल तर त्याचा वापर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना त्याचा फायदा करुन देऊ शकतो.MHMar 273.3

    आपली घरे परीक्षेत पडणाऱ्या तरुणांसाठी आश्रयस्थाने असावीत. अनेक तरुण आहेत जे जीवनाच्या दोन मार्गावर उभे आहेत. प्रत्येक विचार आणि परिणाम त्यांचे वर्तमान किंवा येणाऱ्या उद्यासाठी निर्णय घेण्याच्या पायरीवर येतात. वाईटपणा त्यांना निमंत्रण देत आहे. जगाचे आश्रयस्थान हे आकर्षक आणि चमकदार असतात. ते प्रत्येक कोपऱ्यावर त्यांचे स्वागत करतात. आमच्या आजूबाजूला बेघर तरुण आहेत आणि बहतेकांच्या घरामध्ये त्यांची प्रगती आणि विकास करण्याची शक्ति नसते आणि म्हणून हे तरुण वाईटाच्या मार्गावर भटकत असतात. असे लोक आमच्या घराजवळ नाशाबरोबर विवाह करतात त्यांच्यासाठी तो आशीर्वाद असतो परंतु तो शाप आहे हे ठाऊक नसते. जे लोक विवाहाचा विचार करतात. त्यांनी विचार करावा की जे कुटुंब तो करु इच्छित आहे त्याचा विशेष प्रभाव कसा असेल. जसे ते माता-पिता बनतील तेव्हा त्यांच्यावर ती आशीर्वादीत गोष्ट आहे. ती फार मोठी जबाबदारी असेल. जगामध्ये त्यांच्या मुलांनी कसे वागावे येणाऱ्या जगामध्ये त्यांचे भविष्य नीतिमान व प्रसन्न कसे राहावे त्याचे शिक्षण माता-पित्यांनीच द्यावे. त्यांचे शारीरिक व मानसिक जीवन योग्य मार्गानेच चालण्यासाठी मार्गदर्शन घरामधूनच सुरु होते व माता-पित्यांवर ते अवलंबून असते. कुटुंबाच्या चारित्र्यावरच समाजाचे भवितव्य अवलंबून असते. प्रत्येक कुटुंबाचा प्रभाव हे सांगेल की तागडी वर जाईल व खाली येईल.MHMar 274.1

    जीवनसाथीची निवड, मुले आणि आई-वडीलांची शारीरिक व मानसिक अवस्था जी मुलांच्या कल्याणासाठी असावी लागते. मुले आणि माता-पिता दोघांनीही समाजाच्या आशीर्वादासाठी आणि निर्माणकर्त्याच्या सन्मानासाठी असणाऱ्या गोष्टींकडे लक्ष द्यावे.MHMar 274.2

    विवाह समारंभाच्या वेळी युवक व युवतींनी जबाबदारीची कामे स्वीकारावीत म्हणजे भावी जीवनामध्ये त्यांना स्वत:ची जबाबदारी कळेल. असे केल्यास त्यांना वैवाहिक जीवनाची जबाबदारी समजून येईल. तरुणांना कोवळ्या वयामध्ये विवाह करण्यास प्रोत्साहन देऊ नये. कारण जबाबदारी तोलण्या इतपत त्यांचे वय नसते. त्यांचा मानसिक व शारीरिक विकास झाल्याशिवाय ते परिपक्व होत नाहीत. विवाहसारखे महत्त्वाच्या विधिसाठी जल्दबाजी करणे योग्य नाही. विवाह इच्छुकणाऱ्यां जवळ धनसंपत्ती एकवेळ नसेल परंतु त्यांच्याकडे धनापेक्षाही मौल्यवान असा परमेश्वराचा आशीर्वाद असतो आणि विशेष भाग म्हणजे दोघांमधील वयाचे अंतर जास्त नसावे. अपक्व जोडीदाराला विवाहानंतर शारीरिक नुकसान होऊ शकते आणि होणारी मुलेसुद्धा निरोगी जन्मणार नाहीत. वृद्ध आई-वडीलांची काळजी घेणे हे त्यांच्या मुलांचे कर्तव्य आहे त्यांच्या बालपणी जी काळजी त्यांचे आईवडील घेत होते. अगदी तशीच काळजी त्यांच्या बालपणी जी काळजी त्यांचे आई-वडील घेत होते अगदी तशीच काळजी त्यांच्या वृद्धत्वामध्ये होईलच असे नाही कारण त्यांचे बालपणाचा काळ वेगळा होत आणि आताच्या मुलांचे राहणीमान यामध्ये बराच फरक असेल. या गोष्टी दोन्ही पिढींनी समजून घ्याव्यात. असेही होऊ शकते की माता-पित्याच्या बालपणी त्यांची चांगली काळजी घेण्यात आली असेल, परंतु त्यांच्या वृद्धपणी असे होऊ शकते की त्यांच्यापैकी एकाचा अंत झाला असेल तर जोडीदाराचे प्रेम मिळणे शक्य नसते, परंतु ख्रिस्ताची प्रीति त्याच्याजवळ राह शकते. मानवी प्रेमाच्या जवळीक साधायची असेल तर स्वर्गीय प्रेमापासून प्रेरणा घेणे आवश्यक आहे. कारण जेथे ख्रिस्ताचे वास्तव्य असते तेथेच खरे आणि नि:स्वाथी प्रेम मिळू शकते. प्रीति हा अति मौल्यवान उपहार आहे जो केवळ ख्रिस्तापासूनच मिळतो. कारण हा उपहार नि:स्वार्थी आणि मोफत असतो. पवित्र व शुद्ध प्रेम ही एक भावना नाही, परंतु एक सिद्धांत आहे. जे लोक खऱ्या प्रेमाने प्रेरित होतात. ते कधी अविवेकी होत नाहीत किंवा ते प्रेम आंधळे नसते. पवित्र आत्म्याकरवी शिकविण्यात आलेले प्रेम हे स्वत:वर व शेजाऱ्यावर एकच प्रेम असते. जे लोक विवाहाविषयी विचार करतात त्यांनी आपल्या जीवनसाथी विषयी जिला आपला जीवनसाथी करण्याचे विचार करीत आहात. तिच्या प्रत्येक भावना आणि विचार यांचा विकास करण्याचे प्रयत्न करावेत. आपल्या जोडीदाराच्या भावना आपल्या व्हाव्यात तिच्या गरजा आपल्या असाव्यात. विवाहाच्या प्रत्येक बंधनाकडे प्रत्येक पाऊल नम्र, निश्चिती इमानदारी आणि गंभीरपणे परमेश्वराचा आदर करण्याचे निश्चय करुनच वाटचाल करावी. विवाह हे जगाचे भविष्य आणि येणाऱ्या जीवनामध्ये प्रभावी करते. एक खरा ख्रिस्ती अशी कोणतीच योजना बनवित नाही. जी परमेश्वराला भय नसते. जर तुम्हाला असे आई-वडील मिळाले आहेत जे परमेश्वराचे धरतात, तर त्यांचे सल्ले आवश्य घ्या. त्यांच्यासमोर आपल्या योजना आणि आशा ठेवा. ते धडे शिका जे तुमच्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनाचे अनुभव तुम्ही अनुभवले आहेत. त्यांनी शिकविले आहेत. असे केल्याने तुम्ही अनेक समस्या आणि त्रासापासून सुरक्षित राहाला. या सर्वांपेक्षा हे अति आवश्यक आहे की तुम्ही ख्रिस्तालाच आपला सल्लागार माना. प्रार्थनापूर्वक त्याच्या वचनाचे अध्ययन करा. अशा प्रकारच्या मार्गदर्शनाने नवतरुण व तरुणांनी आणला जीवनासाठी असा निवडायला हवा की तरुणाने आपल्या बाजूला उभी राहणारी सहचारिणी ही आपल्या वाटपाचा भार उचलणारी असावी तिचा स्वभाव व प्रभाव इतरांना सुखावह व्हावा. तिच्या प्रीतिमध्ये सुखाचा व आनंदाचा विकास व्हावा. “सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होते.’ तिच्या पतीचे मन तिजवर भरवसा ठेवते. त्याला संपतीची वाण पडत नाही. ती आमरण त्याचे हित करते अहित करीत नाही. तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात. तिच्या जिव्हेच्या ठायी दयेचे शिक्षण असते.” “ती आपल्या कुटुंबाच्या आचारविचारांकडे लक्ष देते ती आळशी बसून अन्न खात नाही. तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात. तिचा नवराहि उठून तिची प्रशंसा करतो व म्हणतो बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखविली आहेत पण तू त्या सर्वांहून वरचढ आहेत.” “ज्याला गृहिणी लाभते त्यास उत्तम लाभ घडतो. त्यास परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होते.” (नीतिसूत्रे १९:१४, ३१:११-१२, ३१:२६-२९, १८:२२). MHMar 274.3

    तुम्ही कितीही सावधगिरी आणि चातुर्याने विवाहाच्या बंधनात बांधले जा परंतु जेव्हा विवाह विधि पार पडतात तेव्हा काही जोडपी पूर्णपणे एक होतात. लग्नानंतर दोघांची वास्तविकता एकता येणाऱ्या वर्षांमध्ये होईल. नवीन विवाह झालेल्या जोडप्यांसमोर जेव्हा अडचणी व त्रास येतात. तेव्हा त्यांच्या कल्पनेमध्ये असणारा रोमान्स नाहीसा होतो. यावेळी पती-पत्नी एकमेकांचा स्वभाव पाहतात. तो आतापर्यंतच्या सहवासात पाहू शकले नव्हते. त्यांच्या अनुभवातून हा प्रसंग सर्वांत नाजूक असतो. त्यांच्या संपूर्ण भविष्याची व जीवनाची खुशी व दुःखामध्ये योग्य निर्णय घेण्यावर अवलंबून असतो. या प्रसंगी ते एकमेकातील अवगुण व कमतरता पाहू शकतात, परंतु त्यांची हृदये प्रेमाने बांधलेली असतात तेव्हा ते कोणत्याही प्रसंगाला सहज तोंड देऊ शकतात. प्रत्येकाने एकमेकांतील अवगुण व वाईट गुण पाहू नयेत, परंतु त्यांच्यामधील चांगले गुण शोधावेत. तसे पाहता ते एक आपला दृष्टिकोन आमच्या सभोवतीच्या वातावरणावर निश्चित केली जाते. ते म्हणजे आम्ही एकमेकांमध्ये काय पाहात आहोत. बहुतेक लोक दुसऱ्यावर प्रेम दाखविणे म्हणजे एक दुर्बळपणा समजतात आणि ते सर्वांपासून वेगळे राहतात. यामुळे दुसरे त्यांच्यापासून वेगळे होतात. अशा प्रकारची भावना सहानुभूतिला रोखते. जेव्हा मित्रत्व आणि उदारतेच्या भावनांना दाबले जाते तेव्हा सहानुभूति कोमजून जाते. हृदय एकलकोंडे आणि थंड पडते. या चुकीपासून आपणास सावध राहणे आवश्यक आहे. जर प्रेम व्यक्त केले नाही तर तर ते जास्त काळ टिकत नाही. ज्याचे हृदय तुमच्याशी जोडले आहे त्याला दया व सहानुभूती विना मरु देऊ नका. MHMar 276.1

    जर अडचणी, त्रास कठीण दिवस, निराशा येतील परंतु पतीने किंवा पत्नीने आपल्या मनात विचारही येऊ देऊ नये की त्यांचे विवाह बंधन ही एक मोठी चुक होती. एकमेकांसाठी जितके होईल तितके दोघांनी एकत्रितपणे या सर्व समस्यांना तोंड द्यावे, एकमेकांचा आदर करावा. जीवनातील लढाईमध्ये एक होऊन संघर्ष करावा. एकमेकांच्या आनंदात सहभागी व्हा. तरच विवाह हा प्रेमाचा शेवट नाही, परंतु त्यांच्या प्रेमाची सुरुवात आहे असे त्यांना वाटेल. त्यांची खरी मैत्री, उबदारपणा असेल दोन्ही हृदये एकमेकांत गुंतून बांधली जातील. त्यांना स्वर्गीय प्रेमाचा अनुभव येईल.MHMar 277.1

    प्रत्येक परिवाराभोवती एक प्रेमाचे कुंपन असते. हे पवित्र कुंपन असते. ते तसेच राहू देण्यासाठी प्रयत्न करावेत. या कुंपनामध्ये बाहेरील कोणत्याही व्यक्तिला प्रवेश वर्ण्य करावा. त्यांना तसा हक्क देऊ नये. पती-पत्नी दोघांमध्ये कोणतीही गोष्ट गुप्त राहू नये.MHMar 277.2

    प्रत्येकाने एकमेकांना शिक्षा करण्याऐवजी प्रेम करावे त्याचा विकास करावा असणि एकमेकांमधील दोष झाकून त्यांचे गुण पाहावे. त्यांची प्रगती करावी एकमेकांची प्रशंसा करण्याने जो आनंद निर्माण होतो त्यामुळे संतोष व उत्तेजन निर्माण होते. सहानुभूति व सन्मान निपुणता प्राप्त करण्यासाठी एक प्रोत्साहन येते आणि प्रेम स्वत: चांगले करण्याच्या उद्देशाला प्रेरणा देते. पती किंवा पत्नीने आपले व्यक्तित्व इतरांमध्ये विलीन करु नये. प्रत्येकाचे परमेश्वराशी एक वेगळे संबंध असतात. प्रत्येकाने त्यालाच विचारावे की “योग्य काय आहे ?” “चुकीचे काय आहे ?” “मी आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचे उद्देश कशाप्रकारे पूर्ण करु शकतो ?’ ज्याने आपल्यासाठी पूर्ण जीवन दिले त्याच्याकडे आपले प्रेमाची दौलत त्याच्याकडे वाहू द्या. आपल्या जीवनाची प्रत्येक गोष्ट मसीहा समोर प्रथम स्थान द्या. जसजसे त्याच्यासाठी आपले प्रेम दृढ होत जाईल. बळकट होत जाईल तसतसे एकमेकांतील प्रेम शुद्ध व दृढ होत जाईल.MHMar 277.3

    ज्या भावना ख्रिस्ताने आमच्यासाठी दाखविल्या त्या पती-पत्नीने एकमेकांसाठी दाखवाव्यात. “आणि ख्रिस्ताने तुम्हांवर प्रीति केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वत:ला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले. त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतिने चाला.” (इफिस ५:२). “तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते, तसेच स्त्रियांनीही सर्व गोष्टीत आपल्या पतीच्या अधीन असावे. पतींना जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली आणि स्वत:स तिच्यासाठी समर्पण केले अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करुन पवित्र करावे.” (इफिस ५:२४-२५).MHMar 278.1

    पतीने आपल्या पत्नीवर किंवा पत्नीने आपल्या पतीवर आपली मर्जी लादण्याचा प्रयत्न करु नये. आपल्या इच्छेनुसार इतरांना समर्पण करण्यासाठी कधीही विवश करु नका. असे करण्याने आपण एकमेकांवरील प्रेम कायम करु शकणार नाही. दयाळू, धैर्यवान, सहनशील, एकमेकांसाठी कृपादृष्टी असणारे बना. नम्र व्हा. परमेश्वराच्या अनुग्रहाकरवी तुम्ही एकमेकांना खुश ठेऊ शकता. विवाहामध्ये तुम्ही एकमेकांशी ज्या आणाभाका केल्या होत्या त्यामध्ये तुम्ही परमेश्वराच्या वतीने यशस्वी होऊ शकतात.MHMar 278.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents