Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ३७—खोटे आणि खरे शिक्षण

    “जे भोजन नाही त्याला तुम्ही दाम का देता?’

    वाईट योजना करणारा नेहमी एकाच उद्देश्याने कार्य करतो. ते म्हणजे परमेश्वराचे वचन मनुष्यापासून दूर ठेवणे. आणि मनुष्याचे विचार मनुष्यासमोर ठेवणे. हेच त्याचे खास कार्य आहे. त्याचा उद्देश आहे की परमेश्वराच्या वाणीकडे दुर्लक्ष करावे जी म्हणते की “हाच मार्ग आहे याने चला.” (यशया ३०:२१). हे कोणी ऐकू नये म्हणून स्वर्गातील या प्रकाशांला सैतान लपवू पाहतो.MHMar 342.1

    कल्पना आणि तत्वज्ञान विज्ञानाच्या शोधामध्ये परमेश्वराला ओळखले जात नाही. परंतु याकरवी हजारोंना अविश्वासू बनविता येते. आजच्या शाळांमधून जे विद्वान विज्ञान शिकवितात ते अति अति सावधगिरीने शिकविले जाते कारण त्यांना ठाऊक आहे की त्यामध्ये काही तथ्य नाही. सूर्यापासून निघालेला तुकडा थंड होऊन ती पृथ्वी आणि ती गोल कशी असू शकेल ? आणि निष्कर्ष असा निघतो की जर हे वैज्ञानिक खरे असतील तर बायबल खरे नाही. संशय मानवाच्या मेंदूला ते आकर्षक वाटते. तरुणांना यामध्ये स्वतंत्रता दिसते त्या कल्पना त्यांना मोहित करतात. आणि प्रकारे त्यामधून त्यांना धोका होतो. यामध्ये सैतान श्रेष्ठ ठरतो. तो शंकांची सर्व बिजांना पाणी घालतो आणि तरुणांच्या मनामध्ये बी पेरतो हे बी रुजून त्यांची वाढ करण्यास सैतान मदत करतो आणि लवकरच नास्तिक लोकांचा एक गट तयार होतो. MHMar 342.2

    मानवी हृदय वाईटाकडेच जास्त प्रमाणात झुकते आणि यामुळेच तरुणांमध्ये अविश्वासाचे बीज पेरण्याचे कार्य सैतानाला सुलभ होते आणि हे अतिधोकादायक आहे. जे काही परमेश्वराच्या विश्वासामध्ये दुर्बळ करते ते वाईटाचा विरोध करण्याची ताकद समाप्त करते. हे पापापासून सुरक्षित राहण्याचा एकमेव मार्ग समाप्त करते. आम्हाला तरुणांना शिकविण्यासाठी अशा शाळेची गरज आहे की त्यामध्ये परमेश्वराचा आदर करण्याचे शिक्षण असावे आणि त्याचे चरित्र आपल्या जीवनामध्ये प्रगट करण्यासाठी वापर करावा. परमेश्वराचे वचन आणि त्याचे कार्यापासून आम्हाला शिकण्याची गरज आहे. म्हणजे आम्ही आपल्या जीवनाचे उद्देश आम्ही पूर्ण करू शकू.MHMar 342.3