Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    शहरातील झोपडपट्ट्या :

    शहरांमध्ये राहणाऱ्यांच्या गर्दीमध्ये असे सुद्धा लोक आहेत ज्यांना मुके बहिरे आणि पशुपेक्षाही हीन वागणूक दिले जाते. त्या कुटुंबियांच्या बाबतीत विचार करा की जे भाड्याच्या घरामध्ये दाटीवाटीने राहतात. खुराड्यासारख्या लहान खोल्यामध्ये जेथे अंधार असतो. दुर्गंधीयुक्त तळघरात राहतात जेथे योग्य प्रमाणात प्राणवायुही नसतो अशा ठिकाणी मुले जन्माला घातली जातात. वाढतात आणि मरतातही निसर्गाचे सौंदर्य ते पाहू शकत नाहीत परमेश्वराने मानवासाठी सर्व काही दिले आहे. मानवाच्या ज्ञानेंद्रियांना सुख आत्म्याला शांती मिळण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा प्राप्त करुन दिल्या परंतु मानवाला अंगावर लवतरे अर्धपोटी जेवण मिळविण्यासाठी त्याला वाईट कामे करावी लागत आहेत. देवाने मानवाला अशासाठी जन्मदिला नाही. आज मानवाच्या याऊवस्थेला कारण आहे ती दुष्टता यामध्येच मनुष्य मरतो. लहान मुले परमेश्वराचे नाव केवळ शिव्याशापामध्येच ऐकतात. त्यांच्या कानावर केवळ घाणेरडे शब्द शिव्या भांडणे अशाच गोष्टी पडतात याच वातावरणामध्ये त्यांची वाढ होते. मद्य पान धुम्रपान तंबाखूचा वास मद्यपानाची दर्प सर्वत्र पसरलेला अशा वातावरणात मुलांची वाढ होते तीच त्यांची संस्कृती बनते. तेथे त्यांचे नैतिक पतन होते. अशाप्रकारे अनक तरुण अपराधीपणाचे शिक्षण घेऊन उत्तीर्ण होतात त्यात पारंगत होतात आणि समाजाचे शत्रु बनतात.MHMar 141.3

    सर्व मोठ्या शहरातून घाणेरड्या वस्तीमध्ये राहणारे सर्व गरीब या वर्गामध्ये येत नाहीत. परमेश्वराचे भय धरणारे स्त्री-पुरुष आजार आणि दुर्भाग्याच्या अवस्थेमध्ये अशासाठी पडतात की त्यांच्या शेजारचे नागरिक मित्र यांनी त्यांची फसवणूक केलेली असते. जे साधेभोळ व सरळमार्गी असतात ते प्रामाणिक असतात औद्योगिक शिक्षण न झाल्यामुळे गरीबच राहतात. अज्ञानतेमुळे हे लोक जीवनातील कठीण समस्येला तोंड देऊ शकत नाहीत. शहरामध्ये आल्यानंतर योग्य काम मिळविण्यास ते असमर्थ असतात. वाईट दृष्ये आणि आवाजामध्ये गुरफटून जातात. वाईट परिक्षा त्यांच्यावर येते. वाईट आणि अपराधी लोकांमध्ये राहिल्यांमध्ये त्यांनाही त्यांच्यामधीलच एक समजले जाते. या पतन पावलेल्या गर्दीमधून त्यांना एक चमत्कारच बाहेर काढू शकेल. बहुतेक लोक आवत्या सत्यनिष्ठतेसाठी त्रास भोगतात. परंतु अपराध करीत नाहीत. या वर्गातील लोकांसाठी विशेषतः सहानुभूति सहाय्य आणि प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.MHMar 142.1

    जर शहरामधील गर्दीत राहणाऱ्या गरीबाजवळ जर शेत असेल तर तो शेतात आपले घर बांधील तर त्यांच्याजिवीताची तरतुद तर होईलच परंतु त्यांना आरोग्यलाभ सुद्धा होईल. शहरामध्ये ते शक्य नाही. कष्टाचे काम थोडा मोबदला आर्थिक अडचणी कष्टदायक जीवन आणि एकाकीपण हे या शहरी जीवनामध्ये असले ही काय आशीर्वादाची गोष्ट आहे ? शहरातील गर्दी, कोलाहाल, अपराध, दूषित वातावरण अशांती यामधून निघून खेड्यामधील शांत वातावरणामध्ये स्वच्छ हवा व निरोगी वातावरणामध्ये जाऊन राहिल्यास भरपूर आशीर्वादाची ओतणी होईल.MHMar 142.2

    जे लोक शहरात राहतात त्यांच्या नशीबी हिरव्या गवतावर चालणे मिळणार नाही. वर्षानुवर्षे ते घाणेरड्या रस्त्याने चालतात. विटांची व सिमेंटच्या भिंती सतत त्यांच्या नजरेसमोर असतात. रस्ते धुळीने भरलेले असतात. शहरात प्राणवायुची कमतरता असते. तर गावाकडे सर्वत्र हिरवळ शेतामधून असणाऱ्या पिकांचे वेगवेगळे रंग डोळ्यात भरतात. शुद्ध व स्वच्छ हवा जंगले, डोंगर, पर्वत, नद्या, ओहोळ व स्वच्छ आकाश अशा प्रकारे खेडे गावात स्वर्गसुखाचा आनंद आहे.MHMar 142.3

    लोकांचा संपर्क आणि त्यांच्यावरील अवलंबापासून दूर जगाचे नीतिनियम आणि पध्यतिपासून लांब निसर्गाच्या सानिध्यात त्याच्या हृदयाजवळ जायचे आहे येथे परमेश्वराचे वास्तव्य त्याची उपस्थिती जाणवेल. अनेक लोक परमेश्वरावर अवलंबून राहण्याचे धडे शिकतात. निसर्गाकरवी ते लोक आपल्या हृदयात परमेश्वराची शांती आणि प्रेमाचा आवाज ऐकतील. यामुळे त्यांचे मन व बुद्धी आणि शरीर परमेश्वराच्या चांगुलपणाचा स्वीकार करण्यास उत्सुक राहतील.MHMar 143.1

    जर ते कष्टकरी आणि स्वावलंबी होतीलतर अनेक लोकांचा आधार प्रोत्साहन आणि शिक्षक बनतील. शहराच्या गर्दीमध्ये अनेक असे परिवार आहेत त्यांना शेतीविषयक शिक्षण देऊन पीक काढण्याची कला देऊन ते आपले स्वत:चे जीवन जगू शकतात आणि यासारखे मिशनरी कार्य कोणतेच नसणार.MHMar 143.2

    अशाप्रकारचे सहाय्य आणि शिक्षण केवळ शहरापर्यंतच नाही. तर गाव आणि खेड्यांमधूनही गरीब लोकांसाठी चांगले जीवन जगण्यासाठी फार मोठी गरज आहे सर्व समाजामध्ये औद्योगिक आणि आरोग्यदायी शिक्षणाची कमतरता आहे. झोपडीमध्ये राहणाऱ्या कुटुंबियाना पुरेशी सामग्री नसते जसे लाकूड, कपडे आणि शेतीची औजारे तसेच पुस्तके योग्य विश्रांती, शांती, समाधानही मिळत नाही. मानवी संस्कृतिमध्ये सुद्धा मागासलेले आहेत. अविकसित आहेत. कलंकीत जीवन, दुर्बल आणि अल्पविकसित शरीर, चुकीच्या सवयी पिढ्यानपिढ्या वाईट गोष्टींची सवयीची परंपरा या सर्व गोष्टींची साक्ष त्यांची वर्तणूक दाखविते म्हणून या लोकांना शिक्षणाची अति आवश्यकत आहे. या लोकांनी बेजबाबदार आळशी आणि भ्रष्टतेचे जीवन जगले आहे आणि त्यांना चुकीच्या सवयी वाईट व्यसनांपासून मुक्त होऊन योग्य जीवन कसे जगावे याविषयी शिक्षण देणे आवश्यक आहे. अशा प्रकारे खालच्या पातळीतून वागणारे लोकांना उच्च पातळीवर कसे आणावे आणि त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रोत्साहित कसे करावे ज्या ठिकाणी गरीबी पसरली आहे. प्रत्येक पावलावर संघर्ष करावा लागतो. तेथे काय करावे लागेल ? नक्कीच हे कार्य कठीण आहे. जोपर्यंत बाहेरील स्त्रीपुरुषांचे शक्तिबळ मिळत नाही तोपर्यंत या लोकांमध्ये सुधारणा होणे शक्य नाही. परमेश्वराची इच्छा आहे की गरीब आणि श्रीमंत एकमेकांशी सहानुभूतिपूर्वक वागणूक ठेऊन सहाय्याच्या बंधनामध्ये बांधले जावे. ज्या लोकांकडे साधन, सामग्री, योग्यता व क्षमता आहे त्यांनी आपले आशीर्वाद आपल्या साथीदार नागरिकांमध्ये वाटाचा.MHMar 143.3

    ख्रिस्ती व गरीबशेतकऱ्यांना शेतामध्ये घर बांधण्यासाठी आणि शेतातील पीकांची वाढ कशी करावी याविषयी त्यांना शिकण्यासाठी सहाय्य करावे हेच खऱ्या मिशनऱ्याचे काम आहे. शेतीसाठी असणाऱ्या औजारांचा वापर कसा करावा. वेगवेगळ्या प्रकारची पीके जास्तीत जास्त कशी काढावीत तसेच बागालावून त्यांची देखरेख कशी करावी या सर्व गोष्टी त्यांना शिकवा.MHMar 144.1

    शेती करणारे अनेक लोक स्वत:च्या निष्काळजीपणाने यशस्वी होत नाहीत. बागेची योग्य देखरेख केली जात नाही. योग्यवेळी पीकाची पेरणी किंवा कापणी केली जात नाही आणि मातीमध्ये वरवरच पेरणी केली जाते. शेताची योग्य मशागत केली जात नाही आणि आपल्या अपयशासाठी नशीबाला दोष देत राहतात आणि म्हणतात की आता जमीन उपजाऊ राहिली नाही. जमिनीला दोष देण्यासाठी खोटी साक्षही दिली जातात. परंतु त्यांनी जस योग्य पद्धतीने शेती केली तर त्यांना भरपूर पीक मिळू शकते. संकरीत योजना, अर्ध्या ताकदीने केलेली मेहनत आणि सर्वोत्तम पद्धतीचा वापर करण्यासाठी अर्धवट ज्ञान उंच आवाजात सुधारण्याची इच्छा करतात. ज्या लोकांना शिकण्याची इच्छा आहे त्यांना योग्य पद्धतीने शिकविणे आवश्यक आहे. जर कोणी व्यक्ति आधुनिक पद्धतीने बोलू इच्छित नाही तर त्याला न बोलता ज्ञान शिकवा. तुम्ही आपल्या शेतीचा नमुना त्यांना दाखवा. तुमची शेती त्यांना दाखवा. त्यांना कसे करावे ते शिकवा. तुम्ही केलेल्या भरघोस शेतीचे प्रमाणच त्यांची खात्री करुन देईल. तुम्ही त्यांना हे दाखवून द्या की योग्य पद्धतीने शेती केली तर भरपूर पीक येईल. त्यांचे नापीक शेत सुद्धा हिरवेगार होईल.MHMar 144.2

    विविध प्रकारच्या उद्योगांची स्थापना करावी यासाठी विशेष ध्यान द्यावे. असे केल्याने गरीब आणि बेकारांना काममिळेल. सुतार, लोहार आणि प्रत्येकाजवळ जी जी कला आहे ती कला ते जागृत ठेवतील त्यांनी काम करायला सुरुवात केली की ते आपसुकच स्वत:ची जबाबदारी समजतील त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव होईल आणि ते इतर बेरोजगार आणि अज्ञानी लोकांना मदत करतील.MHMar 144.3

    गरीबांची मदत आणि सेवाच्या करण्याच्या हेतुने फार मोठे क्षेत्र उपलब्ध आहे. तरबेज स्वयंपाकी घरचे काम करणारे गृहीणी, शिंपी, परिचारीका सर्वांची गरज आहे. गरीब घरातील बेकार सदस्यांना स्वयंपाक करणे, जुनी कपडे शिवण्याचे काम करणे, घरामधील रुग्णाची सेवा करणे आणि घराची देखरेख करण्याचे ज्ञान मिळविणे आवश्यक आहे. मुले आणि मुलींना काही काही व्यवसाय शिकवावा.MHMar 145.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents