Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    “फुकट मिळाले फूकट द्या”

    सुवार्ता प्रसाराच्या निमंत्रणामध्ये केवळ काही लोकांना असा विचार करुन त्यांनी स्वीकार करुन आमचा सन्मान करतील. सुवार्तेचा संदेश सर्वांना द्यायचा आहे. जेव्हा परमेश्वर आपल्या मुलांना आशीर्वाद देतो तेव्हा तो केवळ त्यांच्यासाठी नसतो, परंतु सर्व जगासाठी असतो. परमेश्वर आम्हाला बाप्तिस्माच्या रुपाने देऊन आमच्याकडे अशी अपेक्षा करतो की आम्ही ते इतरांना देऊन त्यामध्ये आशीर्वादाची वाढ करणे.MHMar 61.5

    याकोबाच्या विहीरीवर येशूबरोबर बोलताना शमरोनी स्त्रीला उद्धारकर्ता मिळाला त्याचबरोबर ती नगरामध्ये जाऊन तेथील लोकांना घेऊन त्याच्या भेटीला आली. तिने स्वत:ला येशूच्या शिष्यांपेक्षाही अधिक प्रभावशाली सुवार्ता प्रसारक सिद्ध केले. येशूच्या शिष्यांना तिच्यामध्ये असे काहीच दिसून आले नाही की ती उत्साहित होती. त्यांचे विचार भविष्यामध्ये घडणाऱ्या घटनांवर टिकून राहिले होते. ते हे पाहू शकत नव्हते की त्यांच्या भोवती पीक तयार झाले होते आणि ते एकत्र करण्याची गरज आहे, परंतु ज्या स्त्रीला ते तुच्छ समजत होते तीच नगरातील सर्व लोकांना येशूकडे घेऊन आली होती. तिला जो प्रकाश मिळाला होता त्याच्याकडे आपल्या नगरातील सर्व लोकांना घेऊन आली होती. MHMar 62.1

    ही महिला ख्रिस्तामध्ये व्यवहारिक विश्वास ठेवते व त्यासाठी प्रतिनिधित्व करते. प्रत्येक खरा शिष्य परमेश्वराच्या राज्यामध्ये एक सुवार्तिकाच्या रुपात निर्माण होतो. जसे त्याला उद्धारकर्त्याचे ज्ञान होते तसे तो इतरांना सुद्धा ते देण्यास सुरुवात करतो. उद्धारकर्त्याची ओळख इतरांना करुन देण्यास सुरु करतो. वाचविणे आणि शुद्ध करण्याची सत्यता हृदयात बंद करुन ठेवली जात नाही. जो कोणी जीवनी पाणी पीतो तो स्वत: जीवनाचा झर बनतो. प्राप्त करणारा देणारा बनतो. आत्म्यामध्ये असणारी ख्रिस्ताची कृपा वाळवंटातील वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे असते. तो सर्वांना ताजेतवाने करण्यासाठी वाहत राहतो आणि ज्यांचा नाश होत आहे अशांना ते थंडपाणी पिण्यास उत्तेजित करीत असतो. हे कार्य करण्यासाठी मोठ्या आशीर्वादाचा लाभ होतो आणि हा आशीर्वाद केवळ स्वत:चेच कार्य करण्यासाठी प्राप्त होत नाही. उद्धाराच्या सुवार्ता प्रसाराचे कार्य करण्यानेच आपण उद्धारकापर्यंत पोहोचू शकतो.MHMar 62.2

    ज्यांना प्रभुचा आशीर्वाद प्राप्त होतो प्रभु त्यांना म्हणतो, “मी त्यांस व माझ्या डोंगराभोवतालच्या स्थळांस मंगलमय करीन, पाऊस योग्य ऋतुत पडेल असे मी करीन मंगलदायक वृष्टि होईल.” (यशया ३४:२६).MHMar 62.3

    “मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्त्वाच्या दिवशी येशू उभाराहून मोठ्याने म्हणाला कोणी तहानेला असला तर त्याने मजकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” (योहान ७:३७-३८).MHMar 62.4

    ज्यांना प्राप्त होते त्यांनी इतरांना वाटून द्यावे. प्रत्येक दिशांतून मदतीची हाक येत आहे. परमेश्वराची मनुष्यांकडून अपेक्षा आहे की त्यांनी प्रसन्न चित्ताने आपल्या साथी मनुष्यास सहाय्य करावे. अनंत मुकुट जिंकायचा आहे, स्वर्गीय राज्य प्राप्त करायचे आहे. अज्ञानतेमध्ये नाश होणाऱ्या जगाला प्रकाशित करायचे आहे.MHMar 63.1

    “अजून चार महिन्यांचा आवकाश आहे. मग कापणी येईल असे तुम्ही म्हणता की नाही ? पाहा, मी तुम्हांला म्हणतो आपली नजर वर टाकून शेती पाहा ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत. कापणारा मजुरी मिळवितो व सार्वकालिक जीवनासाठी पीक एकवट करितो ह्यासाठी की पेरणाऱ्याने व कापणाऱ्यानेही एकत्र आनंद करावा. (योहान ४:३५-३६)MHMar 63.2