Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय १९—निसर्गाच्या संपर्कामध्ये

    ष्टीकर्त्याने आपल्या प्रथम माता पित्यांसाठी त्यांच्या आरोग्यासाठी व प्रसन्नतेसाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती केली. देवाने त्यांना महालात ठेवले नाही किंवा ऐश आरामाच्या वस्तुंनी त्यांचे घर भरले नाही ज्यांची प्राप्ति करण्यासाठी लोक जीवनभर झगडतात. परंतु देवाने त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात ठेवले स्वर्गीय पवित्रतेमध्ये त्यांचा संपर्क ठेवला.MHMar 203.1

    परमेश्वराने जी बाग आपल्या मुलांसाठी निर्माण केली. घर सपी ही याबागेमध्ये कोठेही पाहिले तर सुंदर झाडे सुकूमार फुले त्यांच्या नजरेचे स्वागत करत होते. तेथे हरत-हेची झाडे होती आणि त्यामधील अनेक झाडे सुगंधी फुलांनी बहरलेली होती त्यांच्या फाद्यावर बसू पाखरे गीत गाऊन परमेश्वराची स्तुति करीत होते. त्यांच्या सावलीमध्ये सर्व प्रकारचे प्राणी आनंदाने बागडत होते. MHMar 203.2

    पापात पडण्याअगोदर आदाम आणि एदेन बागेतील दृष्ये आणि आवाजांचा आनंद उपभोगीत होते. परमेश्वराने बागेमध्ये त्यांचे काम ठरवून दिले होते. “परमेश्वर देवाने मनुष्यास बागेत तिची देखरेख व मशागत करण्यासाठी ठेवले.” (उत्पत्ति २:१५). प्रत्येक दिवसाचे त्यांचे परिश्रम त्यांच्यासाठी आरोग्य व आनंद घेऊन येत असे. यामुळे ते खुश व आनंदी होते ते आपल्या निर्माण कर्त्याची स्तुति करीत असत सायकांळी जेव्हा ते प्रभुला भेटत असत तेव्हा त्याच उपकार मानत असत त्याच्याशी बोलत असत. परमेश्वर त्यांना रोज धडे शिकवित असे.MHMar 203.3

    परमेश्वराने आमच्या प्रथम मातापित्यांना जीवनाची जी योजना दिली ती ती आमच्यासाठी सुद्धा शिकवण आहे. जरी पापाने पृथ्वीवर आपली काळी छाया पसरली आहे तरी त्याच्या रचनेच्या कार्याचा आम्ही आनंद करावा अशी परमेश्वराची इच्छा आहे. आपण त्याच्या योजनांचे पालन जितक्या जवळून करु तितक्या अधिक प्रमाणात तो पीडित मानवाचे दुःख कमी करील. सर्व आजारी लोकांना निसर्गाच्या सानिध्यात आणण्याची गरज आहे. घराच्या बाहेर निसर्गामध्ये नैसर्गिक वातावरणामध्ये रुग्णाला बरे करण्याचे अद्भूत कार्य निसर्गामध्ये आहे हे एक आश्चर्य आहे.MHMar 203.4

    शहरातील दंगेधोपे गर्दी व मोठे आवाज आणि नकली जीवन रुग्णांसाठी आजारी लोकांना जास्त निराश, बलहीन आणि निराश बनविते. शहरातील धूरधूळ, विषारी गॅस, रोगजंतू आणि आजारीपणा यासर्व समस्या शहरी वातावरणामध्ये आहे यामुळे मानवाच्या जीवनाला धोका निर्माण झाला आहे. बहुतेक वेळ चारभितींच्या आत राहिल्याने रुग्णाला वाटते की तो घरामध्ये कैदेत आहे. घरामध्ये राहून ते वाहणारे रस्ते पाहतात गर्दी पाहतात. हे सर्व ते पाहतात परंतु निळे आकाश, सूर्यप्रकाश, हिरवळ झाडे झुडूपे त्यांना कोठेच दिसत नाहीत. फळांनी भरलेली झाडे आणि फुलांनी बहरलेली त्यांना दिसत नाहीत बंद घरात राहून ते आपल्याच आजाराविषयी आणि दुःखाविषयी विचार करतात आणि ते आपल्याच दुःखाचे शिकार बनतात. MHMar 204.1

    ज्या लोकांचे नैतिक सामर्थ्य कमकुवत आहे त्यांच्यासाठी शहरामधून अनेक धोके आहेत. शहरामध्ये राहणाऱ्या रुग्णांना अजूनही त्यांच्या अनैसर्गिक भुकेवर मात करायची आहे. त्यांच्यासमोर नेहमीच परीक्षा येत असतात. त्यांना नव्या वातावरणामध्ये ठेवण्याची गरज आहे. ज्या प्रकाराच्या वातावरणामुळे त्यांची वाताहत झाल्यामुळे त्यांना तेथून दुसरीकडे चांगल्या वातावरणामध्ये घेऊन जाणी अति आवश्यक आहे. काही वेळ त्यांना परमेश्वरापासून दूर करणाऱ्या वातावरणामधून काढून अधिक शुद्ध वातावरणामध्ये परमेश्वराच्या व निसर्गाच्या सानिध्यात न्यावे.MHMar 204.2

    रुग्णांवर उपचार करणाऱ्या संस्था शहरापासून दूरवर स्थापन केल्यास रुग्ण लवकर बरे होतील आणि रुग्णांची इच्छा असेल तर त्यांनी शहरापासून खेडोपाडी जाऊन राहावे. तेथे त्यांना चारभिंतीच्या आत राहण्याची आवश्यकता भासणार नाही. निसर्ग हा परमेश्वराने निर्माण केलेले उपचार केंद्र आहे. शुद्ध हवा, भरपूर प्राणवायू, निरभ्र आकाश, हिरवी राने, झाडे, फुले, सूर्यप्रकाशया सर्व गोष्टी जीवन आरोग्य देणाऱ्या आहेत. हे एक असे शिक्षण आहे जे अनमोल सिद्ध होईल.MHMar 204.3

    मोकळ्या हवेत व्यायाम करणे जीवन देणारी आवश्यकता रुपाने शिक्षण देणे आवश्यक आहे आणि अशाप्रकारच्या व्यायामासाठी शेती करणे याशिवाय उत्तम व्यायाम कोणतात नाही. रुग्णांना फूलझाडाची काळजी करण्याचे काम द्यावे. या निमित्ताने घराबाहेर राहून त्यांनी छोटी मोठी कामे करण्यास त्यांना प्रोत्साहन द्यावे. त्यांना झेपेल अशी बागेतील फूल व फळ झाडांची त्यांना काळजी घ्यावी. अशा उत्साही वातावरणामध्ये ते आपले दु:ख व आजार विसरुन जातील.MHMar 204.4

    रुग्णाला जितका जास्तकाळ चार भिंती बाहेर ठेवण्यात आले तर त्यांची जास्त प्रमाणात देखरेख करण्याची गरज राहणार नाही. त्यांच्या भोवतीचे वातावरण जितके अधिक आनंदी व प्रसन्न राहील तितके ते आशावादी राहतील. घर कितीही मनमोहक वस्तुंनी सजविले आणि रुग्णाला त्यात बंद करण्यात आले तरीही रुग्ण कुरकुर करणारच आणि तो उदास राहणार अशा रुग्णाला निसर्गाच्या सानिध्यात ठेवा झाडांची हिरवळ, रंगीबेरंगी फूले व मंजूळ आवाजात, गाणारे पक्षी त्याला पाहू द्या. त्यामध्ये त्याचे मन रमून जाईल यामुळे तो आपले दुःख विसरेल व आनंदी राहील. यामुळे त्याच्या देहाला व मनाला विश्रांती मिळेल. त्याची बुद्धी जागी होईल, कल्पना शक्तिस जीव होईल आणि रुग्णांचे मत परमेश्वराचे वचन ग्रहण करण्यास तयार होईल. निसर्गामध्ये नेहमी असे काही दिसून येते की रुग्णाचे स्वतः वरुन निघून परमेश्वराकडे व त्याच्या वचनाकडे लागेल. तो त्याच्याविषयी विचार करु लागेल. परमेश्वराच्या त्या गोष्टींकडे जाते जे त्याला दिसत नाहीत. निसर्गाचे सौंदर्य त्यांना स्वर्गीय घरांविषयी विचार करण्यास मदत करते. तेथील सौंदर्य नष्ट करणे, खराब करणे आणि बिघडविण्यासाठी काहीच नसणार तेथे आजार व मरण हेही नसणार.MHMar 205.1

    चिकित्सक आणि परिचारीका यांना नैसर्गिक गोष्टींमधून उपचारासाठी वापर करण्याचे शिक्षण घ्यावे. आपल्या रुग्णांना त्यांनी परमेश्वराकडे लक्ष देण्याचे शिक्षण द्यावे व प्रोत्साहन द्यावे. परमेश्वराने उंच उंच झाडे फूले गवत व सर्वप्रकारची वनस्पति निर्माण केली. प्रत्येक फूल व कळीमध्ये त्यांनी परमेश्वर पाहावा. ज्यानं फूले पाखरे बनविली तो मनुष्याचीही काळजी घेतो. कारण परमेश्वराने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा बनविला आहे.MHMar 205.2

    घराबाहेर परमेश्वराने बनविलेल्या गोष्टींमध्ये जीवन देणारी स्वच्छ ताजी हवायामध्ये श्वास घेतल्याने रुग्णाला ख्रिस्ताकडून मिळणारे नवे जीवन याविषयी उत्तम प्रकारे सांगितले जाऊ शकते. येथे परमेश्वराच्या वचनाचे अध्ययन केले जाऊ शकते. येथे ख्रिस्ताच्या धार्मिकतेचा प्रकाश रुग्णाच्या हृदयामध्ये चमकू शकतो.MHMar 205.3

    शारीरिक आणि आत्मिक आरोग्य प्राप्ती करुन घेऊ पाहणाऱ्या स्त्री पुरुषांना अशा लोकांच्या संपर्कामध्ये यायला हवे की त्यांच्या शिकवणीने यांना ख्रिस्ताजवळ आणण्यासाठी सहाय्य करतील त्यांना त्या महान वैद्यमिशनच्याकडे व त्याच्या प्रभावी क्षेत्रामध्ये आणले तर तो त्यांचे शरीर आणि आत्मा दोन्हीला बरे करु शकतो. त्यांना मुक्तिदात्याची प्रीतिची कहाणी ऐकविली जाईल. आपल्या पापाबद्दल जे पश्चाताप करुन त्याच्याकडे जातात तो त्यांची सर्व पापे स्वत:वर घेतो व त्यांची क्षमा करतो.MHMar 206.1

    अशा प्रकारच्या प्रभावाने पीडित लोकांना एक जीवन प्राप्त होते. दुःखी व आजारी लोकांच्या जीवनामध्ये व हृदयामध्ये आनंद व शांति प्राप्त होते असे करण्यासाठी स्वर्गीय यदूत सहाय्य करतात. अशा अवस्थेत रुग्णाला दुप्पट आशीर्वाद मिळतो आणि बहुतेक लोकांना आरोग्य प्राप्त होते. दबळ्या पायांना बळ येते. निराश लोकांना आशा प्राप्त होते. द:खी आणि लांब चेहऱ्यावर आनंदाची छटा दिसून येते. कुरकुर करणारे आणि तक्रार करणारे आनंदी आणि खूष होतात. संतोषाने त्यांचा चेहर उजळून येतो.MHMar 206.2

    शारीरिक आरोग्य, प्राप्त होते स्त्री पुरुष ख्रिस्तावर पूर्ण विश्वास ठेवण्यास पात्र होतात. तसे व्यवहार त्यांच्याकडून घडून येतात. जो आत्मा आणि आरोग्यास सुव्यवस्थित बनवितो तो क्षमा केलेल्या पापामध्ये निश्चित राहतो. त्याबद्दल त्याच्या मनात शंका राहात नाही. त्याऐवजी त्याच्या मनात शांति, आनंद आणि समाधान प्राप्त होते. त्याला विश्रांती मिळते. याचे वर्णन करता येत नाही. ख्रिस्तीजनांची अंधुक झालेली आशा आनंदून उठते. वचन विश्वासामध्ये प्रगट होते. “परमेश्वर आमचे आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयीसदा सिद्ध असतो.’ (स्तोत्र ४६:१). “मृत्यु छायेच्या दरीतून ही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. कारण तू माझ्याबरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात.” (स्तोत्र २३:४). “तो भागलेल्यास जोर देतो. निर्बलास विपुल बल देतो.” (यशया ४०:२९).MHMar 206.3

    *****

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents