Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    मंडळीची जबाबदारी

    मद्यपानाची आवड ही जगातील एक शक्ति आहे. यांच्यामध्ये व्यसन, पैसा आणि भूकेची ताकदसुद्धा सामील आहे. या ताकदीला मंडळ्यांमध्ये सुद्धा स्थान आहे. ज्या लोकांचा पैसा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मद्यपानासाठी खर्च केला जातो. हे मंडळीतील मान्यवर सभासद असतात. यामधील अनेकजण लोकप्रिय परोपकारी संस्थांना उदार हातांनी सहाय करतात व करु शकतात. हे एक अति उत्तम कार्य आहे. परंतु जोपर्यंत शासनाकरवी मद्य विक्रीची अनुमती मिळत राहिल तोपर्यंत असंयमी लोकांना सुधार केंद्रामध्ये अति कमी प्रमाणात लाभ मिळेल. कारण तेथे ते कायमचे राहणार नाहीत. समाजामध्ये ते पुन्हा येतील. त्यांचे मद्यपानाचे व्यसन सुटले असेल परंतु त्यांचे व्यसन पूर्णपणे गेले नसणार, परंतु जेव्हा त्यांची कसोटी होते तेव्हा पुन्हा ते त्याचे शिकार होऊ शकतात. जसे अनेक ठिकाणी होऊ शकते.MHMar 263.3

    ज्या व्यक्तिजवळ एक दुष्ट जनावर आहे आणि त्याचा स्वभाव ठाऊक असूनही त्याला मोकळे सोडून दिले असते आणि त्याला मोकळे सोडल्याबद्दल त्या व्यक्तीला नुकसान केल्याबद्दल दंडीत करण्यात येते. इस्त्रायलांना देण्यात आलेल्या नियमांनुसार प्रभुने सूचना दिली होती की जेव्हा एखाद्याच जनावर क्रूर असेल कोणीही मनुष्याला ते ठार मारु शकते तेव्हा त्याच्या मालकाला निष्काळजीपणामुळे केलेल्या चुकीबद्दल मरणदंडाची शिक्षा दिली जाते. या सिद्धांतानुसार मद्यविक्रीची अनुमती जे देतात मद्याच्या व्यवहारासाठी ते जबाबदार धरले जातात. जेव्हा एखाद्या क्रूर जनावराला मोकळे सोडण्याच्या अपराधाबद्दल मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते तर मद्याचा व्यापार करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या अनुभतीचा अपराध किती मोठा असू शकतो.MHMar 263.4

    अनुभूती या आधारावर दिली जाते की जितकी मिळकत असेल तिच्यावरील कर सार्वजनिक खजिन्यात गोळा केला जात असे, परंतु मद्यप्राशन करण्याचा परिणाम म्हणजे वेडेपणा, गरीबीवर खर्च होणाऱ्या धनापुढे हा खर्च काहीच नाही. एक व्यक्ति दारुच्या नशेमध्ये अपराध करतो त्याला न्यायालयात आणले जाते आणि ज्यांना मद्याच्या व्यवहाराला अनुमती दिली आहे त्याला योग्य ठरविले आहे. त्यांना नाईलाजाने परिणामाला सामोरे जावे लागते. त्याने त्या पेयाला विक्रीसाठी परवानगी दिली जे पेय एक हुशार व्यक्तिला वेडे बनविते आणि आता गरजेचे आहे की या व्यक्तिला तुरुंगात जावे लागेल किंवा फाशी दिली जाऊ शकते. त्याची पत समाजाला भार बनतात.MHMar 264.1

    हा प्रश्न केवळ पैशामध्ये मोजला जातो तर हा व्यवसाय सहन करण्याची हा कसला मुर्खपणा आहे ? परंतु मानवी विचाराचे नुकसान मनुष्यामधील परमेश्वराचे चित्र बिघडविणे, ते विकृत करणे, मुलांचे नुकसान, त्यांचे शिक्षण सुटते, ते भीक मागतात आणि अपमानीत जीवन जगतात. घरातील कर्ता पुरुष मद्यपान करुन स्वत:चे नुकसान करुन घेतलेच परंतु मुलांनी सुद्धा मद्यपान सुरु केले. त्यांचे झालेल्या नुकसानीचे कोणता कर सरकार जमा होणार आहे ?MHMar 264.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents