Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    विश्रांती एक उपचार

    काही लोक जास्त प्रमाणात काम करण्याने आजारी पडतात. अशा लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी त्यांना विश्रांतीची आवश्यकता असते. त्यांनी कोणत्या गोष्टीची चिंताही करु नये आणि आहारामध्ये वाढ करावी. त्यांच्यासाठी सतत कार्य करत राहणे आणि बंद जागेत राहिल्यामुळे बुद्धी थकते. काही दिवस सुट्टी घेऊन निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन राहिल्यास आरोग्यामध्ये सुधारणा होते. मानसिक विश्रांती मिळते. यासाठी शहरापासून कोठे तरी दूर निघून जावे. यामुळे चिंतामुक्त व मानसिक तणाव दूर होतो. शेतात वनात फिरणे. फुले तोडणे, पक्षांची मंजूळ गाणी ऐकणे याशिवाय आरोग्याला कोणत्याच गोष्टीने लाभ होत नाही. निसर्ग हाच जीवनाचा खरा आनंद आरोग्य आणि आजारामध्ये शुद्ध पाणी हा स्वर्गीय आशीर्वाद आहे. याचा योग्य वापर हा आरोग्याला मोठा लाभ होतो. पाणी हे असे पेय आहे ज्याने मनुष्य आणि इतर पशु पक्षांची तहान भागते. भरपूर पाणी पिण्यामुळे हे तंत्र शरीराच्या बऱ्याच गरजापूर्ण करते आणि आजाराशी तोड देण्यासाठी उपयोगी पडते. रक्तभिसरणावर नियंत्रण करण्यासाठी पाण्याचा वापर अति महत्त्वाचा आहे. बाह्य शरीरावर पाण्याचा वापर अति सोपा व संतोष जनक पद्धत आहे. थंडपाण्याने स्नान करणे हे अति उत्तम टॉनिक आहे. गरम पाण्याने स्नान करणे हे त्वचेवरील रं उघडी होऊन शरीरातील विषारी घटक बाहेर निघून जातात. गरम व थंड पाण्याने नाडीची गती शांत होते रक्ताभिसरण सुरळीत होते. रक्तप्रवाह सामान्य होतो.MHMar 182.3

    परंतु अनेकांना आपल्या अनुभवामध्ये पाण्याचा योग्य वापर आणि त्यापासून होणाऱ्यालाभाचे शिक्षण घेतले नाही. काही लोकांना तर पाण्याची भीति वाटते. पाण्याच्या उपचाराचे जितके महत्त्व द्यायचे ते बहुतेकांना ठाऊक नाही. पाण्याचा वापर दक्षतापूर्वक करण्याचे शिक्षण बरेच लोक घेत नाहीत व तसे प्रयत्नही करीत नाहीत व शिकून घेण्याचे कष्ट करण्याची अनेकांची तयारी नसते. परंतु याविषयी अज्ञान आणि दुर्लक्षित राहण्यास कोणालाही कसलेही निमित्त नाही. शरीरातील आजार आणि वेदना कमी करण्यासाठी पाण्याच्या उपचाराच्या अनेक पद्धती आहेत. सामान्यपणे घरगुतीपाण्याचे उपचार पद्धती सर्वांना येणे आवश्यक आहे. विशेषतः मातांना आपल्या बाळांना आणि कुटुंबातील सदस्यांवर पाण्याचे उपचार करण्याची कला अवगत असावी.MHMar 183.1

    मनुष्य असण्याचे आपले कार्य म्हणजे नियम शरीराच्या प्रत्येक अवयवांचे त्यांचे ठरलेले कार्य असते. या सर्व कार्यामुळेच शरीराचा विकास व शक्ति अवलंबून आहे. शरीरातील सर्व अवयव सामान्यपणे आपले कार्य करु लागले तर शरीरामध्ये शक्ति निर्माण होते आणि जर अवयव काम करेनासे होतात तेव्हा विनाश आणि मृत्युच्या दारात जातात. एक हात काही आठवड्यासाठी बांधून ठेवा आणि नंतर सोडा तेव्हा लक्षात येईल की दुसऱ्या हाताप्रमाणे हा हात कार्य करण्यास सक्षम नसणार तो कमजोर व शक्ति हीन झाला असेल अशा प्रकार बांधून ठेवल्यामुळे त्या हाताचे स्नायु कमजोर झालेले असतात.MHMar 183.2

    आळस हा रोगाचे मूळ कारण आहे. व्यायामामुळे रक्तसंचार वाढतो व सामान्य करतो. परंतु आळसामध्ये रक्तसंचार स्वतंत्रपणे होत नाही आणि जीवन व आरोग्यामध्ये रक्तामध्ये होणारे आवश्यक परिवर्तन होत नाही. त्वचा सुद्धा आळशी होते, स्नायु ढिले पडतात. शरीरातील घाण बाहेर पडत नाही. ती शरीराबाहेर पडणे अति आवश्यक आहे. जोरदार व्यायामामुळे शरीरातील रक्तस्राव वाढतो आणि घाम येतो. यामुळे त्वचा निरोगी बनते. फुफ्फुसामध्ये शुद्ध व ताजी हवा प्रवेश करते. ही अवस्था शरीरातील घाण शरीराबाहेर काढणाऱ्या इंद्रियांना दुप्पट जोर देते. आपल्या लोकांना आळशीपणे बसण्यासाठी प्रोत्साहन देऊ नये. जेव्हा एखादा गंभीर आजार झाला असेल तर विश्रांती घेणे अति आवश्यक आहे तेव्हा ती आजार बरा होऊ शकतो. परंतु काही ठराविक आजारामध्ये क्वचितच विश्रांतीची गरज असते.MHMar 184.1

    मानसिक कार्य करुन जे लोक थकलेले असतात. त्यांना थकवा आणणाऱ्या विचारांपासून विश्रांती घेणे आवश्यक आहे. परंतु त्यांनी हे सुद्धा समजू नये की ते पूर्णपणे आपल्या मानसिक शक्तिचा पूर्णपणे वापर करु शकत नाहीत. अनेक लोक आपल्या आजारी अवस्थेला अधिक गंभीर असल्याचे समजतात. त्यांची अशी मानसिक अवस्था बरे होण्याच्या विरुद्ध असते. अशा मनास्थितीला प्रोत्साहन देऊ नये.MHMar 184.2

    अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि बौद्धीक कार्य करणारांना मानसिक थकवा येऊन आजारपण येऊ शकते. अशा लोकांना शारीरिक व्यायाम करून बरे होता येते. अशा लोकांना जास्त प्रमाणात प्रोत्साहीत आणि कार्यरत जीवन जगण्याची गरज आहे. त्यांना कठोर संयमाची संवय लाऊन घेऊन योग्य व्यायाम करण्याची सवय लाऊन घ्यावी. यामुळे मानसिक व शारीरिक उत्साह टिकून राहील आणि बौद्धीक काम करणारांना सहन शक्ति मिळून येईल.MHMar 184.3

    जे लोक आपल्या शारीरिक शक्तिला थकवितात. त्यांनी पूर्णपणे शारीरिक विश्रांती घेण्यास प्रोत्साहीत करु नये. परंतु त्यांनी आपले कार्य व्यवस्थित आणि सुखद स्वरुपाने करावे. घरापेक्षा घराबाहेर केलेला व्यायाम हा फायदेशीर असतो. या व्यायामाची योजना अशी असावी की शरीराचा जो भाग कमकुवत आहे त्याला शक्ति मिळावी असे करावे आणि हे कार्य मनापासून करावे. हाताच्या परिश्रमाला कधीही कमी श्रम समजू नये.MHMar 185.1

    जेव्हा अपंग लोकांना असे कार्य नसते की त्यामध्ये गुंतून जातील म्हणून ते स्वत:चाच विचार करतात आणि त्यामुळे ते चिडचिडे हो जाते है व अधिक आजारी होतात. याशिवाय ते आपल्या वाईट भावनांवरच विचार करतात ते इतका की स्वत:ला त्यापेक्षाही अधिक वाईट समजतात. यामुळे ते स्वत:ला काहीही करण्याच्या लायकीचे समजत नाहीत.MHMar 185.2

    या सर्व गोष्टींसाठी उत्तम उपाय एकच आहे आणि तो म्हणजे शारीरिक व्यायाम काही गोष्टींमध्ये आरोग्याच्या सुधारणेसाठी व्यायाम करणे अनिवार्य असते. हातांनी श्रम करीत असतांना इच्छा सुद्धा श्रम करु लागते. आणि या दुबळ्या लोकांसाठी सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे त्यांची इच्छा जागविणे आवश्यक आहे. जेव्हा विचार करण्याची इच्छा सुस्त होते तेव्हा विचारांची श्रृंखला तुटते आणि आजाराच्या सामना करणे कठीण होऊन बसते. आळस हा सर्वात मोठा अभिशाप आहे जो अपंग लोकांवर येऊ शकतो म्हणून साधे व सोपे काम करण्यात आल्यास त्याचा शरीरावर व मनावरही योग्य प्रभाव पडतो आणि कार्य करण्याची पात्रता त्यांच्यामध्ये असल्याचा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होतो हा विश्वास त्यांना कार्य करण्यात शक्ति देतो आणि त्यांच्या शरीरातील रक्ताभिसरण सामान्य होते आणि दुबळ्या लोकांना आनंद होता. आपल्या कामात त्यांचे समाधान होते. आपण पूर्णपणे निकामी झालो नाही असा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होतो. सुरुवार्ताला त्यांच्याकडून थोडे काम होऊ शकेल. परंतु लवकरच आपली काम करण्याची शक्ति वाढलीअसल्याचे त्यांच्या लक्षात येईल. कामाचे प्रमाणसुद्धा वाढत जाईल.MHMar 185.3

    व्यायाम केल्यामुळे अपचनाची सवय असणाऱ्या लोकांची पचन संस्था सुधारते. त्यांना आरोग्यप्राप्ती होते. भोजन केल्याबरोबर कठीण परिश्रम किंवा अभ्यास केल्यामुळे पचन संस्थेमध्ये अडथळे निर्माण होतात. परंतु भोजनानंतर डोके सरळ ठेऊन खांदे पाठीमागे ठेऊन थोडावेळ फिरत राहिल्याने भरपूर फायदा होतो.MHMar 185.4

    याविषयी महत्त्वाच्या गोष्टी सांगून लिहून सुद्धा अनेक लोक शारीरिक व्यायाम करण्याकडे दुर्लक्ष करतात. कारण त्यांच्या शरीराची यंत्रणा तोपर्यंत बिघडलेली असते व ते स्थूल झालेले असतात. दुसरे लोक कमकुवत आणि सडपातळ व अशक्त बनतात. कारण निकृष्ट आहार घेतल्याने ते थकलेले दिसतात. त्यांच्या यकृतामधील दुषित रक्त काढून टाकण्याची यकृताची पात्रता कमी होते. तस प्रयत्न करण्याते आल्याचे ओझे त्याच्यावर अधिक पडते. परिणामी ती व्यक्ति आजारी पडते.MHMar 186.1

    जे लोक आळसामध्ये जीवन व्यतीत करतात त्यांनी प्रत्येक वातावरणामध्ये सकाळी व संध्याकाळी व्यायाम करणे अनिवार्य आहे. मोकळ्या हवेत त्यांनी व्यायाम करावा. सायकल चालविणे किंवा ड्रायव्हिंग करण्याऐवजी त्यांनी चालण्याचाच व्यायाम जास्त प्रमाणात करावा. कारण यामुळे त्यांच्या स्नायू आणि हाडांचा व्यायाम होतो. फुफ्फुसांना आरोग्य प्राप्त होते. कारण फुफ्फुसांचे प्रसरण करण्यासाठी चालणे आवश्यक आहे. बऱ्याच गोष्टींमध्ये उत्तम आरोग्यासाठी व्यायाम हाच उत्तम उपचार आहे. चिकित्सक आपल्या रुग्णांना सहसा समुद्र किनाऱ्यावर किंवा मोकळ्या हवेमध्ये फिरायला जाण्यासाठी सांगतात किंवा निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचा सल्ला देतात. त्यांच्यासाठी हवापालट होणे हे अति फायद्याचे असते. खाण्या व संयम राखणे प्रसन्नचित राहून व्यायाम करणे यामुळे आरोग्यामध्ये सुधारणा होते. यामुळे पैसे वाचतील आणि वेळही वाचेल.MHMar 186.2

    “तुमचे शरीर, तुम्हामध्ये बसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हास ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वत:चे मालक नाही. कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा.” (१ करिंथ ६:१९-२०).MHMar 186.3

    *****

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents