Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    येशूच्या हातात जवाची लहान भाकरी असली तरी
    मोठ्या संख्येतील लोकांना तृप्त करण्यास समर्थ आहे

    समुद्र किनाऱ्यावर शिकवित असताना दिवसभर त्याच्याभोवती लोकांची गर्दी होती. त्याचे प्रेमळ शब्द ते ऐकत होते. त्याचे शब्द साधे व स्पष्ट होते तरी लोकांच्या आत्म्याला मलम असे होते. त्याच्या दैवी हातांनी रोगी बरे झाले आणि मरणारांचे जिव वाचले. तो दिवस त्यांच्यासाठी पृथ्वीवर स्वर्गासारखा वाटला. आणि ते विसरले होते की त्यांनी भोजन केव्हा केले होते. सूर्यास्त होणार होता. तरीही लोकांची गर्दी तशीच होती. शेवटी शिष्य येशूकडे आले व म्हणू लागले की लोकांच्या हितासाठी त्यांना घरी जावू द्यावे. अनेक लोक फार दुरून आले आहेत आणि त्यांनी सकाळपासून काहीच खाल्ले नाही. जवळपास असणाऱ्या गावातून ते आपणासाठी काहीतर खावयास विकत घेतील. परंतु येशू त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यांस खावयास द्या.” (मत्तय १४:१६).MHMar 19.1

    “मग तो फिलिपाकडे वळून म्हणाला, “ह्यांना आपण भाकरी कोठून विकत आणाव्यात ?” (योहान ६:५) MHMar 19.2

    लोकसमुदायाकडे पाहून फिलिप विचार करीत होता की इतक्या सर्व लोकांना भोजन देणे अशक्य आहे. तो म्हणाला की २०० दीनारच्या भाकरी विकत आणल्या तर थोड्या थोड्या दिल्या तरीही पुरणार नाहीत. MHMar 19.3

    गर्दीमधून किती अन्न मिळेल हे येशूने जाणून घेतले. आंद्रिया म्हणाला की “एक मुलगा आहे त्याच्याजवळ जवाच्या पाच भाकरी आणि दोन मासे आहेत, परंतु एवढ्या मोठ्या लोकांना त्या कशा पुरतील ?” (योहान ६:९). येशूने त्या भाकरी व मासे आणण्यास सांगितले आणि लोकांना गवतावर बसविण्यासाठी शिष्यांना सांगितले. मग येशून ते अन्न घेऊन स्वर्गाकडे पाहून आशीर्वाद मागीतला आणि भाकरी मोडून शिष्यांना लोकांस वाटण्यास सांगितले. सगळे लोक जेवून तृप्त झाले आणि उरलेल्या भाकरी गोळा केल्या तेव्हा बारा टोपल्या उरल्या. (मत्तय १४:१९-२०).MHMar 19.4

    स्वर्गीय सामर्थ्याच्या चमत्काराने हे घडले होते. इतक्या मोठ्या लोकसंख्येला येशूने तृप्त केले होते. तरीही हे भोजन किती साधे होते मासे आणि जवसाच्या भाकरी. गालीलातील मासे धरणाऱ्या कोळ्यांचे रोजचे अन्न हेच होते. या सर्व लोकांना येशू उत्तम मेजवाणी देऊ शकला असता, परंतु केवळ भुकेच्या तृप्तीसाठी दिलेल्या भोजनासाठी असणारा संदेश त्यांना मिळाला नसता. परंतु या करवी येशूला लोकांना साधेपणाचा धडा शिकवायचा होता. जर मानवाच्या सवयी अगदी साध्या असत्या तर आदाम व हवेसारखे निसर्गाच्या सान्निध्यात राहिले असते, तर आजमितीला लोकांना अन्नाचा भरपूर पुरवठा झाला असता, परंतु स्वार्थ आणि जिभेचे चोचले पुरविण्याच्या नादात मानवामध्ये पाप अधिकच पसरले. यामुळे आजारपण वाढले. एकीकडे विलासी जीवन आणि दुसरीकडे सामान्य जीवनाची कमतरता अशी विषमता निर्माण झाली.MHMar 19.5

    येशूने लोकांना अशाकरिता आपणाकडे आकर्षित केले नाही की त्याने त्यांच्या विलासी जीवनाची पुर्तता करावी. त्या दिवशी दिवसभराचा थकवा आणि भुकेने कासावीस झालेल्या जिवाला उत्साह देणारा साधा आहार उपयोगी पडतो. सामान्य जिवाची गरज भागविली जाते. साधा आहारच शरीराला सामर्थ्य देऊन शारीरिक गरजा भागवितो. हेच त्याचे प्रमाण होते. मुक्तिदात्याने आपल्या अनुयायांना या जगातील विलासी जीवनाचे आश्वासन दिले नव्हते. ते गरीब असू शकतात, परंतु त्याचे वचन आश्वासन देते की त्यांच्या सर्व गरजा पुरविल्या जातील. त्याच बरोबर त्याच्या जीवनाच्या चांगल्यासाठी तो सतत त्यांच्या सान्निध्यात राहण्याचे वचन त्याने दिले आहे. MHMar 20.1

    मोठ्या लोकसमुदायाची भूक भागविल्यानंतर बरेच अन्न उरले होते. येशूने शिष्यांना सांगितले की वाया जाऊ नये म्हणून अन्नाचे तुकडे गोळा करा. (योहान ६:१२). म्हणजे उरलेल्या अन्नाचे तुकडे खूप होते. याचे दोन अर्थ होतात, अन्नाची नासाडी होऊ नये आणि जगातील सुविधा व्यर्थ जाऊ नयेत. ज्या गोष्टीमुळे लोकांचा लाभ होईल अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ नये असा अर्थ होतो. लोकांच्या वापरात येणाऱ्या प्रत्येक गोष्टी एकत्र करुन ठेवाव्यात. यामुळे जगातील भुकेल्यांची भूक भागविली जाईल. याच प्रकारे आपणास स्वर्गातून मिळालेल्या भाकरीच्या खजिन्याला जपून ठेवणे आवश्यक आहे. आपल्याला देवाच्या प्रत्येक वचनावर जिवंत राहायचे आहे. देवाने जे सांगितले आहे त्यातील एकही वचन आपण हरवायचे नाही. आमच्या अनंतकाळच्या उद्धारासाठी आपण परमेश्वराचे एकही वचन दुर्लक्षित करु नये. त्याचे एकही वचन या पृथ्वीवर व्यर्थ जाऊ नये म्हणून काळजी घ्यावी.MHMar 20.2

    भाकऱ्यांचे हे आश्चर्यकारक कार्य आपणास परमेश्वरावर अवलंबून राहण्यास शिकविते. जेव्हा परमेश्वराने पाच हजार लोकांच्या गर्दीला भोजन पुरविले होते तेव्हा त्याच्याकडे ते नव्हते. असे वाटत नव्हते की तो कोणत्याही प्रकारे तशी काही व्यवस्था करु शकला असता. त्या रानामध्ये तो पाच हजार पुरुषांबरोबर होता व तसे स्त्रिया व मुले वेगळी त्याने या सर्व लोकांना आपल्या मागे येण्यास सांगितलेही नव्हते. त्याच्या उपस्थितीमध्ये राहण्याचे इच्छेने ते त्याच्या मागे आले होते. त्यासाठी त्यांनी त्याची परवानगी घेतली नव्हती, परंतु त्याला ठाऊक होते की दिवसभर त्याचे ऐकल्यावर सर्व लोक थकलेले व भुकेले होते. आपल्या घरांपासून ते खूप दूर होते आणि रात्र होणार होती. त्यांच्यातील बहुतेकां जवळ अन्न विकत घेण्यासाठी पैसे सुद्धा नव्हते. ज्यांच्यासाठी त्याने चाळीस दिवस उपवास केला होता त्याची इच्छा नव्हती की त्यांनी उपाशी घरी जावे.MHMar 21.1

    परमेश्वराच्या दूरदर्शी योजनेसाठी ख्रिस्ताला तेथे ठेवण्यात आले होते. जेथे तो असेल तेथे आपल्या आवश्यकतेसाठी त्याला परमेश्वरावर अवलंबून राहावे लागत असे. जेव्हा आपल्या गरीबीसाठी तोंड द्यावे लागते तेव्हा आपण परमेश्वरावर अवलंबून राहावे प्रत्येक कठीण अवस्थेमध्ये आपण त्याला विनंती करावी, म्हणजे त्याच्या आज्ञेनुसार आपल्यासाठी अनंत साधने उपलब्ध होतील.MHMar 21.2

    हा अद्भुत पुरवठा ख्रिस्ताने पित्याकडून प्राप्त करुन घेतला होता. त्याने शिष्यांना दिला आणि शिष्यांनी लोकांना दिला आणि लोकांना एकमेकांना दिला. म्हणून जे सर्व ख्रिस्ताबरोबर जोडले गेले आहेत. त्यांनी परमेश्वराकडून भाकर प्राप्त करुन इतरांना द्यायची आहे. त्याच्या शिष्यांना ख्रिस्तासाठी इतर लोकांमध्ये मध्यस्थी करायची आहे. त्यांच्यामध्ये संभाषण करायचे आहे. MHMar 21.3

    जेव्हा शिष्यांनी मुक्तिदात्याकडून सूचना ऐकल्या, “तुम्ही त्यास खावयास द्या” हे ऐकून शिष्य बुचकळ्यात पडले. ते अस्वस्थ झाले. त्यांनी उलट प्रश्न केला की “आम्ही जाऊन या लोकांसाठी अन्न विकत आणावे काय ?’ परंतु येशूने काय म्हटले होते “तुम्हीच त्यांना खावयास द्या’ शिष्यांजवळ जे काय होते ते सर्व त्यांनी त्याच्याकडे आणले, परंतु त्याने त्यांना खाण्यासाठी आमंत्रित केले नव्हते. त्याने त्यांना आदेश दिला होता की लोकांना खावयास द्या. त्याच्या हातातील भोजन वाढत गेले आणि शिष्यांचे हात रिकामे राहिले नाहीत. एक लहानसा संग्रह वाढतच गेला. सर्वांना पुरुन उरला. जेव्हा सर्व लोकांची गर्दी जेऊन तृप्त झाली होती, तेव्हा शिष्यांनी ही येशूबरोबर भोजन केले. ते स्वर्गातून आलेले अनमोल असे भोजन होते.MHMar 21.4

    जेव्हा आम्ही गरीब, अनाथ आणि दुखी लोकांच्या गरजा पाहतो, तर अनेकदा आपण दुखामध्ये बुडून जातो. आम्ही प्रश्न विचारतो “आमची अल्पशक्ति, अल्पपुरवठा या एवढ्या भयानक गरजेची पूर्तता कशी करु शकतो? आमच्या कार्यामध्ये आम्हांला मार्गदर्शन करण्यासाठी एखाद्या मोठ्या योग्य व्यक्तिची प्रतिक्षा करायला हवी की एखाद्या संस्थेची वाट पाहावी लागणार आहे काय ? जो आमचे कार्य तो स्वत:च्या हाती घेईल ? ख्रिस्त म्हणतो, “तुम्हीच त्यांना खावयास द्या.’ आपल्याजवळ जे साधन वेळ आणि योग्यता आहे त्यांचा वापर करा. आपल्या जवळील जवसाची भाकर येशूकडे घेऊन या.MHMar 22.1

    जरी तुमच्याकडे हजारो लोकांना खावयास देण्यासाठी संग्रह जरी नसला तर ती भाकर कोणा एका भुकेल्याचे पोट भरु शकते आणि ख्रिस्ताच्या हाती भाकर गेली तर हजारो भुकेल्यांची पोटे भरुन ते तृप्त होऊ शकतात. तुम्हाकडे जे काय आहे ते शिष्यांप्रमाणे प्रभुकडे द्या. मग तो त्यामध्ये कितीतरी पटीने वाढ करील ते पाहा. तो इमानदार आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना देणगी देईल. आज जे थोडे दिसते उद्या ते मोठी मेजवाणी देण्याच्या योग्यतेचे होईल. “जो थोडे पेरतो तो थोडक्याचीच कापणी करील आणि जो खूप पेरतो तो खूपच कापणी करील. परमेश्वर तुम्हाला सर्व प्रकारचे अनुग्रह अधिक प्रमाणात देईल. ज्याचे प्रत्येक गोष्टींमध्ये आणि दरवेळी सर्व काही तुम्हांला ज्यांची गरज आहे. ते सर्व तुमच्याकडे असेल आणि प्रत्येक चांगल्या कामासाठी तुमच्याकडे भरपूर असेल. जसे लिहिले आहे “त्याने विस्कटले, त्याने गरीबांना वाटले, दान दिले त्याचा धर्म सदोदित राहिल.”MHMar 22.2

    “शेवटी जो परेणाऱ्याला बी पुरवितो व खाण्याकरिता अन्न परिवतो तो तुम्हाला बी पुरविल व ते बहुगुणीत करील आणि तुमच्या नीतिमत्त्वाचे फळ वाढवील. म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी संपन्न व्हाल.” (२ करिथ ९:६-११)MHMar 22.3

    *****