Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    पित्याची जबाबदारी

    पती आणि वडील कुटूंबाचा मुख्य असतो. त्याची पत्नी प्रेमळ व सहानुभूतिपूर्व आणि मुलांचे लालनपालन करणारी असते. मुले आईची असतात आणि पित्याची असतात. आपल्या मुलांचे भले व्हावे असे पित्यालाही वाटते व तोही त्यांच्यावर मातेप्रमाणेच प्रेम करतो. त्याचे मूल आपल्या पित्याकडे सहाय्यक, मार्गदर्शक आणि सहानुभूति याद्वारे पाहाते. पिता आपल्या कुटूंबामध्ये ऐक्य असल्याचे पाहतो व तसा दृष्टीकोन ठेवतो. पित्याचे जीवन, प्रेम परमेश्वराचे भय, त्याचे शिक्षण या करवी नियंत्रित होणे आवश्यक आहे. म्हणजे ती आपल्या मुलांना योग्य मार्गाने चालवयास शिकविल.MHMar 301.4

    पिता कुटूंबासाठी नियम बनवितो आणि आब्राहामाप्रमाणे त्याने परमेश्वराचे नियम आपल्या कुटूंबासाठी नियम बनवितो आणि आब्राहामाप्रमाणे त्याने परमेश्वराचे नियम आपल्या घरातील नियम बनवितो परमेश्वराने आब्राहाम विषयी म्हटले आहे. “मी त्याची निवड केली ती अशासाठी की त्यानेMHMar 302.1

    आपल्या लेकरांस व आपल्या पश्चात आपल्या घराण्यास आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनितीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा.” (उत्पत्ति १८:१९). वाईटाला थोपविण्यासाठी पायाकडे दुर्लक्ष होऊ नये. पक्षपात करण्यासाठी कोणतीही दुर्बल मुर्खता होऊ नये. लाड करण्याच्या हेतूने कोणतेही चुकीची खात्री देऊ नये. आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करु नये. आब्राहाम केवळ योग्य सल्लेच देत नव्हता तर योग्य न्यायाचे पालनसुद्धा करीत होता. आपल्या मार्गदर्शनासाठी परमेश्वराने त्याचे नियम दिले आहेत. मुलांनी आपले सुरक्षित मार्ग सोडून भटकून धोक्याच्या मार्गाने जाऊ नये म्हणून सावध राहावे. त्यांच्याशी धैर्याने परंतु प्रेमाने प्रार्थनापूर्वक, दृढतापूर्वक मुलांना त्यांच्या वाईट खोडीपासून परावृत्त करावे.MHMar 302.2

    पित्याने आपल्या कुटूंबामध्ये चांगले गुण अंमलात आणण्याची सक्ति करावी जसे इमानदारी, धैर्य, चांगुलपणा, ममता, साहस, परिश्रम असे व्यवहारी गुण असणारे नियम कडकपणे बाळगण्याची शीस्त पालन करण्याची सक्ति करावी. पुढे जाऊन ही शक्ति त्यांच्या अंगवळणी पडते व त्यांचे चांगले गुण इतरांच्या नजरेस येतात व त्यांचा आदर वाढतो, परंतु पित्याने आपल्या मुलांना निराश करु नये. त्यांनी मुलांवर आपला अधिकार दाखवावा परंतु त्यामध्ये स्नेह, दया व सहानुभूतिपूर्वक हे सर्व नियम त्यांना लागू करावेत. आपल्या रिकाम्या वेळामध्ये आपल्या मुलांशी वेळ घालवून त्यांना समजून घ्या. त्यांच्या कामामध्ये आणि खेळामध्ये राहून त्यांचा विश्वास संपादन करा. विशेषतः आपल्या मुलांशी मैत्री वाढवा. अशाप्रकारे त्यांच्यावर आपला चांगला प्रभाव पाडा.MHMar 302.3

    आपल्या कुटुंबाला सुखी आणि आनंदी ठेवण्यासाठी पित्याने आपली जबाबदारी समजून घ्यावी. आपले कार्य आणि व्यवसायामध्ये कितीही समस्या आल्या तरी त्यांची झळ कुटूंबावर येऊ देऊ नये. याउलट त्यांनी हसतमुखाने घरात प्रवेश करावा. पिता आपल्या कुटूंबाचा एक प्रकारे गुरु आहे, याजग आहे तो प्रत्येक सकाळी व संध्याकाळी हे परमेश्वराला ........ अर्पण करण्याचे कार्य करतात, परंतु पत्नी आणि मुलांनी प्रार्थना व गीतांनी स्तुति करण्यामध्ये सामील होणे आवश्यक आहे. सकाळी आपल्या व्यवसायासाठी निघण्यापूर्वी माता-पित्यांनी आपल्या मुलांना जवळ घेऊन त्यांनी परमेश्वरासमोर नम्रतेने दिवसभराच्या कार्यामध्ये कुटुंबाचे रक्षण करण्याची विनंती करावी आणि दिवसाचे कार्य समाप्त झाल्यावर पुन्हा संध्याकाळी एकत्र येऊन देवाचे आभार मानावेत व त्याची स्तुति, प्रार्थना करावी, धन्यवाद द्यावेत. MHMar 303.1

    आई-वडीलांनी आपल्या व्यवसायामध्ये कितीही तातडीची कामे आली तरीही त्यांनी आपल्या मुलांना नियमितपणे परमेश्वराच्या वेदीजवळ जाण्याची दिरंगाई करु नये. आपल्या घरामध्ये पवित्र दूतांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करा. लक्षात ठेवा की आपले प्रियजन कसोटीने घेरलेले आहेत. रोज मुले आणि प्रौढ व वृध्द रागाच्या गोष्टी करतात. जे धीर धरतात, जे सौम्य व लिन आहे, आनंदी जीवन जगू पाहतात त्यांनी प्रार्थना करावी. निरंतर प्रार्थना करुन आपण स्वर्गीय शक्ति मिळवून आम्ही विजय मिळवू शकतो. घर असे हवे आहे की जेथे नेहमी दया, शांती, प्रीति आणि आनंद असावा. तेथे नेहमी शांती आणि आनंद वास करतो. त्रास तर येतातच परंतु धैर्य, प्रीति, कृतज्ञता आणि हृदयात प्रेम असले म्हणजे समस्यांचे किती ही ढग येवोत किंवा दुःखाचे उन असो. अशा घरामध्ये परमेश्वराचे देवदत हजर असतात. MHMar 303.2

    पति-पत्नी यांनी एकमेकांच्या सुखाचा अभ्यास करावा. शिष्टाचार आणि दया यांचे छोटे मोठे कार्यक्रमाने जीवनात आनंद आणि प्रकाश आणतात. असे हे प्रसंग आणण्यास विसरु नये. पति-पत्नी संबंधामध्ये पूर्ण विश्वासाचे वातावरण असावे. दोघांनी एकत्रितपणे आपल्या जबाबदारीवर विचार करायला हवा. दोघांनी मिळून आपल्या मुलांच्या भल्यासाठी कार्य करायचे आहे. कधी मुलांसमोर एकमेकांना दोष देऊ नका किंवा मुलांमध्ये वेगळेपणा दाखवू नका. पत्नीने सावध राहून पतीने जर मुलांना त्यांच्या चुकीबद्दल रागावले तर पत्नीने यावेळी मुलांची बाजू घेऊ नये. यामुळे वडील मुलांना जी शिस्त लावतात त्यामध्ये बाधा येते. पतीने आपल्या पत्नीचा हात घेऊन तिला योग्य बौद्धीक सल्ला देऊन प्रेमाने प्रोत्साहन द्यावे. MHMar 303.3

    आई-वडील आणि मुलांमध्ये थंडपणा आणि तिरस्काराची भिंत नसावी. तर उलट त्यांनी एक होऊन मुलांमध्ये त्यांच्या योग्य प्रगतीमध्ये रुची दाखवावी. त्यांच्या भावनांमध्ये प्रवेश करुन समजेल अशा भाषेमध्ये त्यांच्या मनात काय आहे हे काढून घ्यावे. MHMar 304.1

    माता-पित्यांनी आपल्या मुलांना जाणीव करुन द्यावी की ते त्यांच्यावर प्रेम करतात आणि त्यांनी नेहमी प्रसन्न राहावे असे प्रयत्न करतात. जर त्यांनी असे केले आणि मुलांची खात्री झाली की त्यांच्यावर काही नियम घालणे सोपे जाते आणि मुलेसुद्धा आनंदाने त्याचे पालन करतील. आपल्या मुलांवर ममता आणि कोमलतेने असे शासन करा की, “सांभाळा, ह्या लहानातल्या एकालाही तुच्छ मानू नका, कारण मी तुम्हाला सांगतो, स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात.” (मत्तय १२:१०). तुम्हांला जर वाटत असेल की स्वर्ग दूतांना दिलेले कार्य त्यांनी करावे तर तुम्ही सुद्धा त्यांना सहकार्य करुन त्यांच्या कार्यात सहकार्य करावे. MHMar 304.2

    एक खऱ्या घराचे बुद्धीमानी मार्गदर्शन आणि प्रेमाचे पालन पोषण मिळणारी मुले आनंद आणि सहवासाच्या शोधात कोठे बाहेर भटकरणार नाहीत. वाईटपणा त्यांना आकर्षित करणार नाही. जी भावना घरामध्ये टिकन आहे ती सतत राहिल आणि त्यांचे चरित्र तसे बनेल. जेव्हा आपले बालक घरच्या सुरक्षितते मधून बाहेरच्या जगामध्ये जाईल आपले एक वेगळे अस्तीत्व तयार करण्याचा प्रयत्न करील तेव्हा आपल्या कुटूंबातील संस्कृति त्याच्यामध्ये ठाम राहतील व त्या करवी त्याला यश मिळेल. त्याच्यावर कितीही संकटे व समस्या आल्या तरी तो ढळणार नाही.MHMar 304.3

    कुटूंबामध्ये मुलांबरोबरच आई-बापाच्याही काही जबाबदाऱ्या आहेत. त्या अति महत्त्वाच्या आहेत. मुलांना शिकवायला हवे की ते कुटूंबाचा एक भक्कम हिस्सा आहेत. त्यांना खाणे-पिणे दिले जाते, शिक्षण, कपडे दिले जातात आणि प्रेमही दिले जाते व त्यांची देखरेख केली जाते. त्याचप्रमाणे मुलांनी सुद्धा कुटूंबामध्ये सुख, शांती व आनंदी वातावरण राहण्यासाठी आपली कर्तव्ये पार पाडावित. त्यासाठी त्यांनी झटले पाहिजे, कार्य केले पाहिजे. कधी कधी मुलांवर काही नियम लागू केल्यास ते त्यांना आवडणार नाही, परंतु नंतर मात्र त्यांच्या वापराने किंवा आत्मसात केल्याने त्यांच्या जीवनामध्ये विश्वासूपणा आणि सावधगिरी त्यांच्या व्यवहारामध्ये राहिल्यास व प्रामाणिकपणाची सवय लागल्यामुळे ते लज्जित फजित होणार नाहीत व त्यामुळे अशी मुले उठून आपल्या माता-पित्यांना धन्य म्हणतील.MHMar 304.4

    *****