Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    पाहा, तुमच्या आयुष्यभर मी तुमच्याबरोबर आहे.

    येशूच्या शिष्यांसमोर तीन वर्षे त्याची अद्भुत उदाहरणे होती. दिवसे न दिवस त्यांनी येशूला दुःखी व ओझ्याने वाकलेल्यां बरोबर आनंदाच्या गोष्टी बोलतांना ऐकले व पाहिले. दुःखी व आजाऱ्यांना तो आपल्या सामर्थ्याने कार्य करीत ते त्याच्याबरोबर फिरत होते आणि त्याच्याशी ते बोलले. जेव्हा त्याची जाण्याची वेळ झाली तेव्हा त्याने शिष्यांना आपले सामर्थ्य व शक्तिरुपी आशीर्वाद देऊन जगामध्ये पाठविले. त्यांना त्याची प्रीति आणि रोगमुक्त करुन सुवार्तेचा प्रकाश पसरविला. आणि उद्धारकर्त्याने त्यांना वचन दिले की ते जेथे असतील तेथे त्याची उपस्थिती असेल. पवित्र आत्म्याकरवी त्यांच्यामध्ये राहिल्याने तो शरीरावर त्यांच्याबरोबर होता त्यापेक्षा अधिक जवळ होता. शिष्यांनी जे कार्य केले आम्हांलाही तेच कार्य करायचे आहे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तिला एक सुवार्तिक बनायचे आहे. गरजवंतांना त्यांचा कळवला येऊन व त्यांच्यावर दया दाखवून सहाय्य करायला हवे. निस्वार्थीपणे दुःखीतांच्या वेदना दूर करुन मानवतेला चिंतामुक्त करावे. सर्वांना काहीना काहीतरी करण्यास काम मिळू शकते. कोणीही असा विचार करु नये की ख्रिस्ती मनुष्याला परिश्रम करण्यासारखे काही नाही. उद्धारकर्ता मानवाच्या प्रत्येक मुलाबरोबर एकरुपाने प्रकट होतो. तो पृथ्वीच्या कुटूंबाचा सभासद झाला तो अशासाठी की आम्ही मानव स्वर्गीय कुटुंबातील एक सभासद व्हावे. तो मनुष्याचा पुत्र झाला कारण तो आमचा एक बंधू झाला आहे. त्याच्या अनुयायांनी जगाचा नाश होत असता स्वत:ला वेगळे असे समजू नये. मानवतेच्या एक मोठ्या संघटित कार्याचा ते एक भाग आहेत. आणि स्वर्ग पापी आणि संत दोघांनाही बंधुच्या रुपाने पाहतो. MHMar 63.3

    पाप, आजार आणि अज्ञानतेमध्ये लाखो व कोट्यावधी लोक फसलेले आहेत. ज्यांनी ख्रिस्ताच्या प्रीतिविषयी अजून ही काही ऐकले ही नाही. त्यांची आणि आपली अवस्था दोन्हीमध्ये बदल झाला तर आपली त्यांच्याकडून काय अपेक्षा असेल ? त्यांनी आपल्यासाठी काय करावे ? आम्हांला त्यांच्यासाठी जे काय करायला हवे ते आपण करावे. जीवनासाठी ख्रिस्ताचा जो नियम आहे तो न्यायाच्या दिवशी आपणास त्याला तोंड द्यावे लागेल तो नियम असा, “ह्या करिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” (मत्तय ७:१२). MHMar 64.1

    ते सर्व जे आम्हांला इतरांकडून प्राप्त झाले आहे मग ते काहीही असो. शिक्षण, संस्कार, उत्तमचारित्र्य, ख्रिस्ती प्रशिक्षण, धार्मिक अनुभव या सर्व गोष्टींसाठी आम्ही त्यांचे ऋणी आहोत. जे आमच्यामध्ये कमी होते. यासाठी आमच्याकडून जितके होईल तितकी आम्ही त्यांची सेवा करावी. जर आम्ही शक्तिवान असलो तर दुर्बलांचा हात धरुन त्यांना मदत करावी.MHMar 64.2

    स्वर्गातील देवदूत रोज परमेश्वराचे मुख पाहतात. दुर्बलांचे सहाय्य करण्यामध्ये त्यांना आनंद वाटतो. जेथे स्वर्गीय दूतांची जास्त गरज असते तेथे ते सदैव हजर असतात. ज्या ठिकाणी निराशमय घोर अंधकार आहे तेथील लोक संघर्ष करीत आहेत अशा ठिकाणी त्यांचे सहाय्य होते. ज्या ठिकाणी दुर्बळ आत्मे धडपडतात. जे असाहय्य आहेत. अनेक आपत्तींना तोंड देतात या सर्वांची सेवा करणे हे देवदूतांचे सर्वात मोठे कर्तव्य आहे. जी स्वार्थी हृदये आहेत अशा सेवा कार्याला हीन व तुच्छ लेखतात अशा ठिकाणी स्वर्गीय दूत सेवा करतात. कारण दूत निष्पाप असतात.MHMar 64.3

    जेव्हा आम्ही हरवलो होतो. येशूने स्वर्गात राहण्याचे नाकारले व त्याने या भूतलावर जन्म घेतला. त्याने स्वर्गाचा त्याग करुन कलंक, अपमान व लज्जास्पद मृत्युचा स्वीकार केला. तो जो स्वर्गाचा मौल्यवान धनाचा धनी होता तो निर्धन बनला त्याच्या निर्धनतेमुळे आम्ही धनवान बनलो. ज्या मार्गावर तो चालला त्याचे उदाहरण त्याने आमच्या समोर ठेवले आहे.MHMar 64.4

    जो परमेश्वराचे संतान बनतो तो स्वत:ला ख्रिस्ताच्या दयाळू योजनेमध्ये एकरुप होतो आणि त्याच्याबरोबर हरवलेल्यांना शोधून ज्याने मानवतेच्या उद्धारासाठी स्वर्गातून उतरला त्याचे अनुकरण करणे आपले कर्तव्य आहे. अनेकांना वाटते की पृथ्वीच्या ज्या भागावर येशू हिंडला, फिरला ज्या समुद्र किनारी त्याने सुवार्ता सांगितली. ज्या डोंगरावर तो गेला ती सर्व ठिकाणे जाऊन पाहणे हे आपले सौभाग्य आहे. परंतु येशूच्या पाऊल खूणावरुन चालण्यासाठी आम्हांला नासरेथ, बेथेहेम, कफरनम किंवा गालील या सर्व ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. तर त्याच्या पावलाची चिन्हे रोग्याच्या खाटेजवळ निर्धनांच्या झोपडीमध्ये, मोठ्या शहरातील गल्ल्यांमधून राहणारे गरीब व भूकेलेल्यांजवळ आणि ज्या ठिकाणी दुःखी हृदये जी सांत्वनासाठी तडफडत आहेत अशा ठिकाणी येशूच्या पाऊलखूणा दिसून येतील.MHMar 64.5

    आपल्याला भूकेलेल्यांना अन्न द्यायचे, वस्त्रहीनांना वस्त्र द्यायची आहेत आणि दीन दुबळे व दुःखीताना दिलासा द्यायचा आहे. निराशजणांची सेवा करायची आहे आणि हतबल लोकांना धीर द्यायचा आहे.MHMar 65.1

    ख्रिस्ताचे नि:स्वार्थी प्रेमाच्या प्रदर्शनाने दुष्टपणाच्या सवयी सुधारण्याच्या कोर्टामध्ये तलवारी पेक्षाही अधिक प्रभावशाली ठरते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये भय निर्माण करणे आवश्यक आहे. परंतु प्रीतिचे कार्य यापेक्षाही अधिक काही करील. सहसा जे हृदय निंदा करण्यासाठी कठोर बनते ते ख्रिस्ताच्या प्रीतिने पाघळलेले जाते.MHMar 65.2

    मिशनरी केवळ शारीरिक कष्टच दूर करीतो असे नाही, परंतु पाप्यांना असे मार्गदर्शन करतो की जो वैद्य पापाच्या कोडापासून पाप्यांना शुद्ध करु शकतो. जे आजारी आहेत, अभागी आहेत आणि दुष्ट आत्म्याने पछाडलेले आहेत अशांना परमेश्वराचा आवाज ऐकविण्याचे कार्य मिशनरी लोकांनी करावे अशी देवाची इच्छा आहे. मानवी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जगाचे असे सांत्वन करावे की आजपर्यंत जगाने अनुभवे नसेल असे कार्य मिशनऱ्यांनी करावे अशी देवाची इच्छा आहे.MHMar 65.3

    उद्धारकर्त्याने आपले जीवन अशा मंडळीच्या स्थापनेसाठी खर्च केले की जे दुःखी, पीडलेले, अभागी, कसोटीशी झगडणारे, अपंग व आजारी अशांची सेवा मंडळीने करावी. विश्वासणाऱ्यांचा गट निर्धन, अशिक्षित आणि अनोळखी असू शकतो, परंतु ख्रिस्तामध्ये असणारे घरे, समाज एवढेच नाही तर दूरच्या क्षेत्रामध्येही असे कार्य करु शकतात की त्याचे परिणाम अनंतकाळासाठी होऊ शकतात.MHMar 65.4

    आधुनिक ख्रिस्ताच्या अनुयायांसाठी जी वचने सांगितली आहेत ती पहिल्या शिष्यांना सांगितली होती तीच आहेत. “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळण्यास शिकवा... सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.” (मत्तय २८-१९, मार्क १६:१५).MHMar 66.1

    आणि आमच्यासाठी सुद्धा त्याने त्याच्या उपस्थितीची तीच प्रतिज्ञा दिली गेली आहे. “आणि पाहा जगाच्या शेवटापर्यंत मी तुम्हांबरोबर आहे.” (मत्तय २८:२०). MHMar 66.2

    आज कोणीही उत्सुकतेने ख्रिस्ताला पाहण्यासाठी आणि त्याचा आवाज ऐकण्यासाठी वाळवंटात गर्दी करीत नाही. स्वत:मध्येच गुंतलेल्या गल्ल्यांमधून त्याचा आवाज कोणाला ऐकू जात नाही. रस्त्याच्या कडेला आता कोणाचा आवाज ऐकू येत नाही की, “नासोरी येशू जात आहे.” (लूक १८:३७).MHMar 66.3

    तरीही आजही त्याचे वचन सत्य आहे. ख्रिस्त आमच्या गल्लीमधून अदृश्य रुपात जात आहे. दयेच्या संदेशाकरवी तो आमच्या घरामध्ये प्रवेश करतो. त्याच्या नावाने जे सर्व त्याची सेवा करण्याची इच्छा धरतात. ख्रिस्त त्यांना सहकार्य करण्यास सदा तयार असतो. जर आम्ही त्याचा स्वीकार करतो तर तो आमच्यामध्ये राहून आम्हांला आशीर्वादीत आणि बरे करु इच्छितो. MHMar 66.4

    “परमेश्वर म्हणतो’ प्रसादसमयी मी तुझे ऐकले, उद्धारदिनी मी तुला सहाय्य केले. देशाचा उत्कर्ष व्हावा उजाड झालेल्या वतनाची पुन्हा वाटणी व्हावी म्हणून मी तुझे रक्षण करितो व लोकांच्या करारा प्रीत्यर्थ तुला नेमितो तू बंदीत असलेल्यास म्हणावे बाहेर या, अंधारात आहेत त्यांस म्हणावे उजेडात या ते रस्त्यांवर चरतील सगळ्या उजाड टेकड्यांवरही त्या चारा मिळेल... जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करितो, तारण जाहीर करितो शुभवृत्त विदित करितो तुझा देव राज्य करीत आहे मी असे सियोनास म्हणतो त्याचे पाय पर्वातावरुन येतांना किती मनोरोम दिसतात.” (यशया ४९:८-९, ५२:७)MHMar 66.5

    “यरुशलेमाच्या उध्वस्त झालेल्या स्थलांनो आनंद घोष करा सर्व मिळून गा कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, त्याने यरुशलेमास उद्धरिले आहे.” (यशया ५२:९-१०).MHMar 66.6

    *****