Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    पृथ्वीची रचना

    सृष्टीच्या रचनेच्या कार्याविषयी वैज्ञानिक सुद्धा सांगू शकणार नाहीत. मानवाच्या जीवनाच्या रहस्याविषयी वैज्ञानिक काही सांगू शकतील काय ? “विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली. अशी की जे दिसते ते दृष्य वस्तूंपासून झाले नाही.” (इब्रीकरास ११:३). प्रकाशकर्ता अंधाराचा उत्पन्नकर्ता... हे सर्व करणारा मी परमेश्वर आहे... मीच पृथ्वी केली व तीवर मनुष्ये उत्पन्न केली. मी म्हणजे माझ्या हातांना आकाश पसरिले मी आकाशसेनेला आज्ञा दिली.” (यशया ४५:७-१२). “माझ्याच हाताने पृथ्वीचा पाया घातला. माझ्या उजव्या हाताने आकाश विस्तारिले. मी हाक मारिताच ती मजपुढे एकत्र उभी राहतात.” (यशया ४८:१३).MHMar 320.5

    पृथ्वीची रचना करण्यासाठी परमेश्वर पहिल्यापासून उपस्थित नव्हता किंवा कोण्याच गोष्टीवर अवलंबून नव्हता. “कारणे जेव्हा तो बोलला व अवघे झाले, त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले.” (स्तोत्र ३३:९). सर्व गोष्टी शारीरिक किंवा आत्मिक गोष्टी यहोवाचा आवाज ऐकून उठून उभी राहिली व त्याच्या उद्देशासाठी तयार झाली. आकाश आणि त्याच्याखाली जे काही सर्व आहे पृथ्वी व तीवरील सर्व काही त्याच्या श्वासाने निर्माण झाले. अस्तित्वात आले.MHMar 321.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents