Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    सर्व वस्तुमध्ये परमेश्वर असण्याची कल्पना

    सध्या सर्व ठिकाणी सर्व संस्था, शिक्षण संस्था आणि मंडळ्यांमध्ये परमेश्वर आणि त्याच्या विश्वासाला खोटे ठरविण्याचे प्रयत्न करीत आहेत यासाइी आध्यात्मवादाचे शिक्षणाने प्रवेश केला आहे. ही कल्पना अशी आहे की परमेश्वर निसर्गामध्ये एक सुगंधाप्रमाणे आहे. हा सुगंध सर्वत्र पसरला आहे. ही शिकवण याद्वारे जे वचनावर विश्वास ठेवतात त्यांनी स्वीकारली आहे. तसा ते दावा करतात, परंतु या शिकवणीला कितीही सुंदर पोशाख चढवून सजवा परंतु हा एक भयंकर धोका आहे. हे शिक्षण परमेश्वराला चुकीच्या रुपात दाखविण्याचा प्रयत्न आहे. त्याच्या महानतेचा आणि अधिकाराचा अनादर केला जात आहे. हे शिक्षण मनुष्याला केवळ पदभ्रष्टच करीत नाही, परंतु त्याचे मोलही कमी केले जाते. याचा उगम अंधकार आहे. भोगविलास याची प्रवृत्ति आहे. या शिक्षणाचा स्वीकार करणे हे परमेश्वरा विरुद्ध आहे पतीत मानवासाठी हा विनाशाचा मार्ग आहे.MHMar 330.1

    पापामुळे आमची अवस्था अनैसर्गिक झाली आहे. म्हणून आम्हांला जी शक्ति पुन्हा मिळू शकते ती शक्ति आत्मिक असावी. नाहीतर त्यामध्ये काही मोल राहणार नाही. मनुष्याच्या पापमय हृदयाची शक्ति केवळ एकच शक्ति निर्बळ करु शकते आणि ती म्हणजे ख्रिस्ता करवी मिळणारी परमेश्वराकडून येणारी शक्ति आहे. केवळ वधस्तंभावरील ख्रिस्ताच्या रक्ताद्वारेच आमच्या पापांची क्षमा होऊ शकते. केवळ त्याचाच अनुग्रह पापावर विजय मिळवू शकतो आणि आमच्या पापी स्वभावावर दबाव आणू शकतो. परमेश्वराच्या विषयातील आध्यात्मिक काल्पनीक कल्पना ख्रिस्ताच्या अनुग्रहाला प्रभावाहीन बनविते जर परमेश्वर निसर्गामध्ये पसरणारा सुगंध आहे तर परमेश्वर प्रत्येक मनुष्यामध्ये असायला हवा आणि पवित्रता मिळविण्यासाठी मनुष्याला त्याच्या अंतरित असणाऱ्या शक्तिचा विकास करायला हवा.MHMar 330.2

    या परिकल्पनेला जर या अंदाजाच्या निष्कर्षापर्यंत अनुसरण केले तर ख्रिस्ताची सर्व व्यवस्था अर्थहीन होईल, समाप्त होईल. ती मानवाचे प्रायश्चितच समाप्त करील आणि मनुष्य स्वत:च उद्धारकर्ता होईल. परमेश्वराच्या बाबतीत ही कल्पना त्याच्या वचनाचे महत्त्वच समाप्त करील आणि जे लोक या कल्पनेचा स्वीकार करतील ते संपूर्ण पवित्र शास्त्र एक कल्पना समजून त्याचा स्वीकार करणार नाहीत. हाच एक मोठा धोका असेल. ते सद्गुणाला वाईटापेक्षा चांगले असे समजतील आणि परमेश्वराला त्याच्या अधिकाराला काढून मनुष्याला आपला अधार बनवितील, परंतु परमेश्वराविना मनुष्य बेकार आहे. पापांचा विरोध व वाईटावर विजय मिळविणे हे मनुष्याला कधीच शक्य होत नाही त्याच्यामध्ये ती शक्ति नाही. कोणीही मनुष्य पापापासून स्वत:च बचाव करु शकत नाही. परमेश्वर व त्याच्या आत्म्याचे नियंत्रणाची व वचनाचा कोणी स्वीकार करणार नाही तर मनुष्य काहीच नाही.MHMar 330.3

    “ईश्वराचे प्रत्येक वचन शुद्ध आहे, त्याचा आश्रय करणारांची तो ढाल आहे. त्याच्या वचनात तू काही भर घालू नको घालशील तर तो तुझा दोष उघड करील आणि तू लबाड ठरशील. (नीतिसूत्रे ३०:५-६). “दुर्जनाला त्याची स्वत:चीच कर्मे पछाडितात, तो आपल्याच पाशात सापडतो” (नीतिसूत्रे ५:२२).MHMar 331.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents