Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    वायु जीवन आणि सूर्य प्रकाश :

    सार्वजनिक किंवा खाजगीकरणासाठी इमारतीचे बांधकाम करण्यात येते तेव्हा प्रामुख्याने पाहिले जाते की इमारतीमध्ये भरपूर हवा आणि सूर्य प्रकाश येण्याची व्यवस्था केली जाते. चर्च आणि शाळा बनवितांना वायुवीजन आणि सूर्य प्रकाश येण्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. ज्या खोलीमध्ये अशी व्यवस्था नसते तेथे जांभई आणि सुस्ती येते. अशा शाळांमधून विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे आणि शिक्षकाच्या शिकवणीकडे विद्यार्थ्याचे लक्ष लागत नाही आणि शिक्षकांचे शिकविणे कठीण होते. शक्य होई तो मनुष्याने राहण्यासाठी एखाद्या उंच ठिकाणी घर बांधून राहण्याचा प्रबंध करावा. ज्याठिकाणी शुद्ध हवा आणि पाण्याचा निचरा होतो या ठिकाणी असणारी जमीन नक्कीच कोरडी आणि दूषितपणा नसतो. या ठिकाणी आजारी होण्याचे धोके नसतात. ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही तेथे घाण साचून राहते हवा दूषित होते व अनेक प्रकारचे रोग आजार निर्माण होतात. यामुळे अनेक मृत्यु होतात.MHMar 209.1

    घरांची निर्मिती करतांना त्यामध्ये भरपूर खेळती हवा आणि सूर्य प्रकाश येण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे. घराच्या प्रत्येक खोलीमध्ये हवा व सूर्यप्रकाश असावा. झोपण्याच्या खोलीमध्ये सुद्धा ताजी हवा व सूर्य प्रकाश येण्याची सुविधा असावी. तेथे रात्रदिवस स्वच्छ हवा असणे आवश्यक आहे. ज्या खोलीत अशा प्रकारची व्यवस्था नसेल ती खोली झोपण्यासाठी योग्य नाही. बहुतेक देशातून विशेषतः थंड आणि ओल्या क्रुतूमध्ये खोली गरम आणि कोरडी राहण्यासाठी तशी व्यवस्था करणे आवश्यक आहे.MHMar 209.2

    पाहण्यांच्या खोलीच सतत वापर करण्यात आल्यामुळे त्यांची स्वच्छता करणे आवश्यक आहे या गडबडीमध्ये इतर खोल्यांकडे दुर्लक्ष होऊ शकते काही खोल्यांची दारे खिडक्या सतत बंद असल्यामुळे खोली दमट व ओलसर राहते. ही खोली कोरडी करण्यासाठी काही व्यवस्था करणे आवश्यक असते. जो कोणी अशा खोलीत झोपतो त्या खोलीत सूर्य पकाश येत नाही आणि त्याचा बिछाना कोरडा राह शकत नाही. तो आपले आरोग्य किंबहुना जिवही गमाऊन बसतो.MHMar 209.3

    घर बनवितांना बहुतेक लोक झाडे झुडुपे लावण्याची व्यवस्था करतात फूलझाडे आणि फळ झाडांची योग्य व्यवस्था करतात. फळ झाडे आणि फूलझाडासाठी सूर्य प्रकाश आणि भरपूर हवेची गरज असते. ग्रीनहाऊसमध्ये तशी व्यवस्था करण्यात आलेली असते. कारण शुद्ध हवा आणि सूर्यप्रकाशाशिवाय झाडांची वाढ होत नाही. फळझाडे फूलझाडे आणि इतर वनस्पतीसाठी सूर्य प्रकाश हवा पाणी यांची नितांत गरज असते. त्याचप्रमाणे आपले आरोग्य आपले कुटूंब आणि पाहुणे या सर्वांच्या आरोग्यासाठी या गोष्टींची गरज असते.MHMar 210.1

    आपले घर चांगल्या व स्वच्छ ठिकाणी हवे आहे असे वाटत असेल तेथे दूषितपणा नसावा अशी इच्छा असेल तर जमीनीपासून उंच ठिकाणी आपले घर बांधावे. तेथे स्वर्गीय जीवन देणाऱ्या आशीर्वादाची येजा होणारी असावी खिडक्यांना जाड पडदे लावू नका. पडदे उघडे ठेवा खिडक्यावर कोणत्याही प्रकारची रोपे व वेली ठेऊनक ज्यामुळे वायुजीवनास अडथळे होतील. फूलझाडे, फळझाडे कितीही सुंदर असू देत त्यांना घराजवळ लावण्याचा परवानगी देऊ नका. त्यामुळे सूर्यप्रकाश व शुद्ध हवेला अडथळे होईल. सूर्यप्रकाश घरात आल्यास गालीजाचा रंग फीका होईल फोटोवर धूळ साचेल परंतु त्याला विरोध केल्या आपल्या मुलांच्या चेहऱ्यावरील तेज नाहीसे होईल. MHMar 210.2

    ज्या घरामध्ये वृद्ध लोक आहेत त्यांना उबदार आणि आरामदायी खोली असणे आवश्यक आहे. वय जसे वाढत जाईल तसे मनुष्याची ताकद कमी होत जाते. रोगआजारांचा ते विरोध करु शकत नाहीत म्हणून बहुतेक वृद्ध लोकांना शुद्ध ताजी हवा व सूर्य प्रकाशाची गरज असते.MHMar 210.3

    शरीर आणि मन या दोन्हीच्या आरोग्यासाठी काळजीपूर्व स्वच्छताची गरज असते. त्वचेकरवी शरीरातील घाणबाहेर टाकली जाते. जर नेहमी शरीर स्नान करुन स्वच्छ ठेवले नाही तर त्वचेवरील रन्ध्रे बंद होतात आणि शरीरातील मळ परत शरीरात प्रवेश करतो. आणि इंद्रियांना जास्त काम पडते. यासाठी लोकांनी रोज सकाळी व संध्याकाळी कोमटपाण्याने स्नान केल्यास त्यांना लाभ होतो. कारण स्नान केल्याने शरीरातील रक्त प्रवाह सुद्धा वाढतो. रक्त त्वचेच्या वरीला भागामध्ये आल्याने रक्तदाब सामान्य होऊन नियमित बनतो. शरीर आणि बुद्धी उत्तेजित होऊन त्यामध्ये अधिक उर्जा निर्माण होते व स्नायु अधिक लवचिक होतात. स्नान केल्याने नाडीतंत्र सामान होऊन शरीरास विश्रांती मिळते व उत्साह वाढतो. स्नानाने पोट आंतडी, यकृत यांचे कार्य सुलभ होते. पचनक्रिया वाढते.MHMar 210.4

    आपल्या शरीरावरील कपडे सुद्धा स्वच्छ असावेत. शरीरातील येणारा घामरुपी घाण शरीरातील कपड्यांना चिकट तो म्हणून रोज कपडे ही बदलते आवश्यक आहे असे न केल्या कापड्यातील अशुद्धपणा पुन्हा शरीरात शोषला जातो.MHMar 211.1

    प्रत्येक प्रकारची अशुद्धता आपणासाठी रोगराई आणते. अंधारामध्ये दुर्लक्षीत केलेला कचरा दमट व ओला होऊन तेथे अनेक प्रकारच्या रोगजंतूंचा प्रसार होतो. खाद्य पदार्थ सडल्यामुळे तेथे दुधंधी निर्माण होते. दुर्गंधीमुळे सुद्धा रोग जंतूंचा प्रसार होतो. यामध्ये सडलेल्या भाज्या, झाडाची पडलेली पाने, कुजकीनासकी फळे यामुळे दुर्गंधी पसरुन रोगजंतूंची निर्मिती होते. अशी काही शहरे पेठा आहे ती राहण्यासाठी चांगली आहेत म्हणतात परंतु निष्काळजीपणाने नागरिकांनी स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यस रोग आजार पसरतो. कारण निष्काळजीपणाने आपण घरातील कोठेही टाकतो. यामुळे खेळणारी लहान मुले, मोठी माणसे ही आजारी पडतात. कारण नासकी कुजकी फळे खरकटी अशा प्रकारचा कचरा त्याची दुर्गंधी तर येतेच परंतु तो सडून त्यामध्ये कीडे होतात व रोग जंतूंचा फैलाव होतो. यामुळे लोक आजारी पडतात व अनेक प्रकारचे रोगनिर्माण होतात.MHMar 211.2

    घरामध्ये स्वच्छता राखणे, घरात भरपूर शुद्ध हवा व सूर्य प्रकाश असणे कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे. यामुळे आपल्या कुटूंबाचे व शेजाऱ्यांचे ही आरोग्य सुरक्षित राखते.MHMar 211.3

    *****

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents