Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    निसर्ग नियम परमेश्वराच्या अधीन

    परमेश्वर आपल्या सृष्टीतील गोष्टी संभाळणे आमि आपल्या सेवकासमान त्यांचा वापर करण्यामध्ये नेहमी मग्न असतो. परमेश्वर या गोष्टींचा आपले उपकरणासारखा वापर करून निसर्ग नियमांप्रमाणे त्यांचा वापर करतो. निसर्ग आपल्या कार्यामध्ये परमेश्वराची बुद्धी प्रगट करते. तो आपल्यामध्ये परमेश्वराची उपस्थिती आणि सक्रियता सिद्ध करतो. तो परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आपले कार्य करतो. “हे परमेश्वरा तुझे वचन स्वर्गात सर्वदा स्थिर आहे. तुझ्या निर्णयाविषयी म्हणावे तर ते आजपर्यंत टिकून आहेत.” (स्तोत्र ११९:८९९१). तो परमेश्वराच्या नावाचे स्तवन करोत कारण त्याने आज्ञा केली आणिMHMar 322.1

    आणि ती निर्माण झाली. त्याने सर्व काळासाठी स्थापिली त्याने नियम लाऊन दिला त्याचे उल्लंघन कोणी करणार नाही.” (स्तोत्र १४८:५-६).MHMar 322.2

    ही शक्ति जन्मजात नाही ज्याकरवी दरवर्षी पृथ्वी पैदास करण्याची शक्ती देते. आणि सूर्याभोवती फिरते. सतत फिरत राहते ज्याने सर्व विश्व निर्माण केले त्याच्या नियंत्रणानेच पृथ्वी फिरते. तोच मार्गदर्शन करतो. तेव्हाही परमेश्वराची शक्ति आहे व तोच त्यावर गतीवर व वेळेवर नियंत्रण ठेवतो. हा तोच परमेश्वर आहे जो दिवसरात्र नियमित करतो कारण सृष्टीची निर्मिती झाल्यापासून आतापर्यंत गतीमध्ये व दिवसरात्रीमध्ये व वेळेमध्ये मुळीच फरक पडला नाही. पाऊस तोच पाडतो तोच प्रकाश देतो.MHMar 322.3

    “तो लोकरीसारखे हिम पाडतो राखेसारखे कण पसरितो.” (स्तोत्र १४७:१६).” तो आपला शब्द उच्चारितो तो आकाशात पाण्याचा गडगडाट होतो, तो पृथ्वीच्या दिगंतापासून वाफेचे लोट वर चढवितो. तो पावसासाठी विजा सिद्ध करतो आणि आपल्या भांडारातून वायु बाहेर काढितो.’ (यिर्मया १०:१३).MHMar 322.4

    ही परमेश्वराचीच शक्ति आहे ज्यामुळे वनस्पति उगवते. फळे, फुले उमलतात. प्रत्येक फळ पिकते, प्रत्येक फूल फूलते, सुंदर दिसते. मानवी शरीराला पूर्णपणे समजून घेणे अशक्य आहे. आणि अशी रहस्ये उलगडतात की सर्वात बुद्धीमान लोकसुद्धा बुचकळ्यात पडतात. हा संरचनेचा परिणाम नाही की जी वारंवार चालू करावी लागते तर ते निरंतर चालूच राहते जस हृदयाचे धडधडणे श्वास नाकातून आत जाणे बाहेर येणे, यावरून आपण परमेश्वरामध्येच जिवंत आहोत. चालतो फिरतो व आमचे अस्तित्व ठेवतो. जिवंत शरीरामध्ये प्रत्येक नाडी नस व्यवस्थित व सतत चालत राहते. याचा अर्थ असा होतो की आमच्यामध्ये परमेश्वराचे अस्तित्व सततच असते. त्याची शक्ति व सामर्थ्य आमच्यामध्ये असते.MHMar 323.1

    निष्क्रियाची अवस्थामध्ये नाही किंवा गुपचुपपणे एकांत नाही. बायबलमध्ये परमेश्वराला उंच आणि पवित्रस्थान जवळ दाखवून देते तेथे तो हजारो व हजारो पवित्र देवदूतांच्या गराड्यामध्ये राहतो. आणि ते सर्व देवदूत परमेश्वराची इच्छापूर्ती करण्यासाठी सदैव तत्पर असतात. ते त्यांचे संदेश वाहक आहेत. परमेश्वर आपल्या राज्याच्या कानाकोपऱ्यातील माहिती ठेवतो. आपल्या पवित्र आत्म्याकरवी तो प्रत्येकाच्या संपर्कामध्ये असतो. मानवाची सेवा करतो. पृथ्वीच्या कोलाहलापासून अति दूरवर परमेश्वर स्वर्गामध्ये विराजमान आहे. त्याच्या स्वर्गीय दृष्टीमध्ये पृथ्वीवरील सर्व गोष्टी त्याच्या समोर स्पष्ट असतात. त्याच्या सर्व गोष्टी शांत, चिरकालिक असतात त्याच्या आवडीप्रमाणे तो त्यांना आदेश देतो.MHMar 323.2

    “हे परमेश्वरा मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही. पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३). “तू अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. तू आपल्या सर्व मार्गावर त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” (नीतिशास्त्र ३:५-६).” पाहा जे परमेश्वराचे भय धरतात व त्याच्या दयेची अपेक्षा करतात त्यांचा जी मृत्युपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते.” (स्तोत्र ३३:१८-१९). “हे देवा तुझे वात्सल्य किती अमोल आहे. मानवजाति तुझ्या पंखाच्या छायेचा आश्रय करीते.” (स्तोत्र ३६:७).” ज्याच्या सहाय्याकरिता याकोबाचा देव आहे. ज्याची आशा आपला देव परमेश्वर ह्यावर आहे तो धन्य.” (स्तोत्र १४५:५). हे परमेश्वरा तुझ्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे तू आपले नियम मला शिकीव.” (स्तोत्र ११९:६४)” त्याला नीती व न्याय ही प्रिय आहेत, परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे.” (स्तोई ३३:५).” हे आमच्या तारणाऱ्या देवा पृथ्वीच्या सर्व सीमांचा व दूर समुद्रावर असलेल्यांचा आधार तू आहेस तू न्यायाच्या भयंकर कृत्यांत्यांनी आम्हाला उत्तर देतोस तू पराक्रमाने कंबर बांधून सामर्थ्याने पर्वत स्थिर ठेवितोस. तू समद्राची गर्जना त्याच्या लाटांचा कल्लोळ व लोकांची दंगल शमवितोस.” (स्तोत्र ६५:५-७). “म्हणून जे सीमांत प्रदेशात राहतात तेहि तुझ्या उत्पातांस भितात. दिवसाचा उदय व अस्त ह्यांच्याद्वारे तू गजर करवितोस.” (स्तोत्र ६५:८). “पतन पावणाऱ्या सर्वांना परमेश्वर आधार देतो. व वाकलेल्या सर्वांना उभे करितो. सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात आणि तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाळी देतोस. तू आपली मूठ उघडून प्राणिमात्रांची इच्छा पूरी करतोस.” (स्तोत्र १४५:१४-१६)यMHMar 323.3