Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    शिक्षणामध्ये आरोग्यदायीत्व असावीत

    शिक्षणामध्ये आरोग्यदायी तत्त्वांची आवश्यकता या आधी कधीच आली नव्हती. जीवनाच्या सुखसोयीमध्ये स्वच्छता आणि आजारपणाच्या उपचारामध्ये उन्नती आणि आधुनिक ते मध्येही शारीरिक शक्ति आणि सहनशीलते मध्ये कमतरता आली आहे. आधुनिक उपचारामध्ये नवे नवे शोध लागले असले तरीही नवे नवे आजार आणि चिकित्सालयामध्येही वाढ होत आहे. या सर्व गोष्टी आपल्या लक्षामध्ये येतात की नागरिकांच्या कल्याणाविषयी विचार करणे अति आवश्यक आहे. आपले नकली राहणीमान वाईट गोष्टी करण्यास प्रोत्साहन देते आणि यामुळे योग्य सिद्धांताला नष्ट करते. रीतिरिवाज पद्धति आणि फॅशन या गोष्टी नैसर्गिक सिद्धांताशी लढत आहेत. आधुनिक व्यवहारांची जबरदस्ती होत आहे. यामुळे मानसिक व शारीरिक शक्तिंचा -हास होत आहे. तसेच मानवावर असह्य ओझे लादले जात आहे. असंयम, अपराध, आजार आणि हीनपणा प्रत्येक ठिकाणी दिसून येते.MHMar 80.2

    अनेकजण अज्ञानतेमुळे आरोग्य नियमांचे उल्लंघन करतात यांना सल्ला देणे अति आवश्यक आहे. परंतु बहुतेक लोक जे करतात. त्यापेक्षा अधिक माहिती त्यांना असते. त्यांना सांगणे आवश्यक आहे की आरोग्य विषयीचे जे ज्ञान त्यांना आहे त्याप्रमाणे वागावे. तसे प्रोत्साहन त्यांना द्यावे. आरोग्याच्या नियमांची माहिती देणे आणि या माहितीचा आपल्या जीवनामध्ये वापर करणे या गोष्टींचे महत्त्व सांगण्याची संधी प्रत्येक चिकित्सकांना वारंवार येत. योग्य प्रकारच्या मार्गदर्शनाने अनेक प्रकारच्या वाईट सवया काढून लोकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा आणण्याचे कार्य डॉक्टर करु शकतात.MHMar 80.3

    चिकित्सकांकडे न जाता काही आजारांवर स्वत:च औषधे घेण्यामध्ये धोके उद्भवतात. यामुळे मोठ्या संख्येमध्ये वाईट आजारांना निमंत्रण मिळते आणि आरोग्याचे नुकसान होते. आजारांचा हल्ला झाल्यावर अनेक लोक आजाराचे कारण शोधून न काढताच त्यावर उपचार सुरु करतात. त्यांची पहिली चिंता असते की आजार, वेदना आणि अस्वस्थतेपासून मुक्तता. म्हणून ते प्रथम औषधोपचार करुन घेण्याचा प्रयत्न करतात. आपल्या चुका सुधारण्यासाठी एखाद्या स्वस्तातील चिकित्सकांकडे जाऊन उपचार करुन घेतात, परंतु आपल्या सवयी सुधारण्याच्या बाबतीत विचार करीत नाहीत. आजारांमध्ये लवकर सुधारणा झाली नाही तर दुसऱ्या औषधांचे उपचार सुरु करतात. अशाप्रकारे ते आजारामध्ये अधिकच खोल जातात आणि प्रकार गंभीर बनतात. लोकांना हे शिकविणे आवश्यक आहे की औषधे रोग बरे करीत नाही तर हे खरे आहे की कधी कधी त्यांना लगेच बरे वाटते आणि असे वाटते की ते औषध घेतल्याने रोग बरा झाला आहे. असे अशासाठी होते की शरीरामध्ये नैसर्गिक रोग प्रतिकार शक्ति असते. रोगाचे विष शरीरातून बाहेर फेकण्याची व्यवस्था निसर्गत:च असते. औषधोपचारशिवायसुद्धा आजार बरे होऊ शकतात, परंतु काही प्रकारामध्ये औषधे आजाराचे ठिकाण आणि स्वरुप बदलतात. सहसा काही काळ रोगाची लक्षणे नाहीशी होतात. परंतु शरीरामध्ये रोग तसाच राहतो. नंतर तो अधिक धोकादायक होऊ शकतो. विषारी औषधामुळे अनेक लोक स्वत:ला आयुष्यभर आजारी करुन घेतात आणि अनेकजण स्वत:ला नैसर्गिकपणे रोगमुक्त करु शकतात, परंतु ते नष्ट होतात. बहुतेक औषधे असे असतात की ते विषारी असून देह व आत्मा दोघांचा नाश करतात. आत्मा आणि देह या दोहोंचा नाश करणाऱ्या सवयी बदलणे अति आवश्यक आहे नकली औषधे घेऊन रोग, आजार बरे होत नाहीत उलट बळावतात. अनेक नकली औषधे चिकित्साकांकरवी सुद्धा दिली जातात त्याची त्यांनाही कल्पना नसते. मद्यपान, अफीमची नशा यामुळे धुम्रपान आणि इतर वाईट सवयीसुद्धा लागतात. ही व्यसने समाजाला एक शाप ठरली आहेत.MHMar 81.1

    लोकांना जर योग्य सिद्धांताचे शिक्षण दिल्यास ती एक आरोग्यदायी जीवनासाठी फार मोठी आशा असेल. चिकित्सक किंवा डॉक्टरांना शिकविणे आवश्यक आहे की आरोग्य प्राप्त करण्याची शक्ति औषधांमध्ये नाही, परंतु निसर्गामध्ये आहे. रोग आजार निर्माण होतात ते आरोग्याचे नियमांचे उल्लंघन केल्यामुळे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी निसर्गाचा एक नियम आहे. आजारी होण्याचे मुख्य कारण शोधून काढणे अति आवश्यक आहे. आजारांची अवस्था बदलणे आणि चुकीच्या सवयी बंद करुन योग्य आरोग्यदायी सवयी लावून घेणे आवश्यक आहे. तरच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातील आणि शरीर यंत्रणा अशुद्धतेपासून शुद्ध राखून रोगांपासून स्वतंत्र ठेवणे आवश्यक आहे. यामुळे शरीरात रोग प्रतिकारक शक्ति निर्माण होऊन शरीर रोग निरोगी राखण्यास सहाय्य लाभते.MHMar 82.1