Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ५—आत्म्याचे बरे करणे

    “तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापाची क्षमा
    करण्याचा अधिकार आहे हे तुम्हांस समजावे”

    ख्रिस्ताकडे लोक मदतीच्या आशेने येत असत त्यामध्ये अनेकजण असे होते की स्वतः आजार ओढवून घेण्याचे कार्य करीत असत. तरीही येशूने त्यांना बरे करण्यास नकार दिला नाही आणि जेव्हा त्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये जात असे तेव्हा त्यांना त्यांच्या पापाची जाणीव होत असे आणि त्यांच्यामधील अनेक लोक शारीरिक आजारांबरोबर आत्मिक रोगांपासूनही बरे होत असत.MHMar 40.1

    त्यांच्यामधील एक व्यक्ति जी कफणूमाहून होती तो पक्षाघाताचा रोगी होता. कुष्ठरोगाप्रमाणे पक्षाघाताचाही रोग असा होता की तो बरे होण्याची आशा नव्हती. त्याचा हा आजार त्याच्या पापी जीवनामुळे आला होता. त्याच्या खेदामुळे त्याच्या वेदनेमध्ये अधिकच कडवटपणा आला होता. त्याने आपल्या दु:खापासून सुटका मिळविण्यासाठी अनेक वैद्य आणि परुशी विनंती करुन अयशस्वी प्रयत्न केले होते. परंतु त्यांनी त्याचा रोग बरा होऊ शकणार नाही अशी ग्वाही दिली होती आणि हा रोग त्याच्या पापामुळे आल्याचे सांगितले होते आणि परमेश्वराच्या क्रोधाखालीच तो मरणार. पक्षाघाताचा रुग्ण निराशेमध्ये बुडून गेला. तेव्हा त्याने येशूच्या कार्याविषयी ऐकले. त्याच्या समोरच इतर रोगी आणि पापी लोक बरे होत होते. यामुळे त्याला धैर्य आले की कोणीतरी त्याला येशूपर्यंत पोहोचविल तर तो बरा होऊ शकेल असा त्याला विश्वास आला, परंतु त्याच्या रोगाचे कारण समजून त्याची अशा धुळीस मिळाली, परंतु तरी ही बरे होण्याची आस त्याने सोडली नाही.MHMar 40.2

    त्याची मोठी इच्छा म्हणजे पापापासून मुक्ति मिळविण्याची होती. येशूला पाहाणे आणि त्याच्या मुखातून पापाची क्षमा आणि स्वर्गीय शांतीचे आश्वासन मिळण्याची त्याची आशा होती. नंतर मग परमेश्वराच्या इच्छेनुसार जीवन आणि मरण यापैकी कोणत्याही विषयी तो संतुष्ट होणार होता.MHMar 40.3

    त्याच्याजवळ गमावण्यासाठी वेळ नव्हता. आधीच त्याची नष्ट होत असलेली त्वचा त्याचा मृत्यु जवळ येत असल्याची जाणीव करुन देत होती. त्याने आपल्या मित्रांना विनंती केली की मला माझ्या बाजेसहित येशूजवळ घेऊन चला. त्याचे मित्रसुद्धा याला आनंदाने तयार झाले, परंतु ते त्याला पाहूही शकत नव्हते. केवळ त्याचा आवाजच ऐकू येत होता. येशू ख्रिस्त पेत्राच्या घरामध्ये शिक्षण देत होता. त्यांच्या पद्धतीनुसार त्याचे शिष्य त्याच्या शेजारी बसले होते आणि “परुशी व शास्त्री तेथे जे बसले होते. ते गालील व याहूदीया व यरुशलेम येथून आले होते.” (लूक ५:१७). त्यांच्यामध्ये असेही काहीजण होते की त्याल बोलण्यामध्ये पकडून त्याच्यावर आरोप लाऊन त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने आले होते. या शिवाय त्यांच्यामध्ये मिश्र घोळकाही होता ज्यामध्ये काही जिज्ञासु, आदरणीय, इच्छुक आणि अविश्वासुसुद्धा होते. वेगवेगळ्या जाती आणि सामाजिक स्थरावरील प्रतिनिधीत्व करणारे लोकसुद्धा त्यांच्यामध्ये होते आणि बरे करणारे देवाचे सामर्थ्य येशूमध्ये होते. जीवन देणारा आत्मा त्यांच्यावर त्या सभेमध्ये उपस्थित होता, परंतु शास्त्री आणि परुशांनी ती उपस्थिति ओळखली नाही. त्यांनी आवश्यकतेला जाणले नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये रोग निवारण सुद्धा नव्हते.” त्याने भुकेलेल्यास उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे. धनवानास रिकामे लावून दिले आहे.” (लूक १:५३).MHMar 40.4

    पक्षाघात झालेल्या रुग्णाच्या त्याच्या मित्रांना गर्दीत घुसून त्याला येशू पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. रुग्णाने दुःख वेदनांनी चारी बाजूला पाहिले परंतु रोग निवारण जवळच होते तेव्हा तो आपली आशा कशी सोडणार ? त्याच्या आग्रहास्तव त्याच्या मित्रांनी त्याला त्याच्या बाजेसहित व छतावर घेऊन गेले आणि त्यांनी छप्पर काढून त्याला खाली येशूच्या पायाजवळ सोडले.MHMar 41.1

    येशूच्या संभाषणामध्ये खंड पडला. उद्धारकर्त्याने रुग्णाच्या दुःखी चेहऱ्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात पाहिले त्याचे डोळे त्याच्याकडेच लागले होते. त्याने त्या दुःखी आत्म्याची गरज ओळखली. जेव्हा त्याने आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप केला आणि बरे होण्याच्या इच्छेने येशूच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला. तेव्हा प्रभुच्या करुणेने त्याच्या हृदयाला आशीर्वाद दिला होता. त्याच्या येशूवरील विश्वासाची पहिली पायरी म्हणजे येशूपर्यंत पोहोचण्याचे त्याचे अथक प्रयत्न. त्याचबरोबर त्याचा विश्वासही पुढे सरकत होता. ख्रिस्तानेच त्या दुःखीताला आपल्याकडे येण्यास प्रोत्साहित पुढे सरकत होता. ख्रिस्तानेच त्या दुःखीताला आपल्याकडे येण्यास प्रोत्साहित केले होते. आता सुमधुर संगिताप्रमाणे त्याच्या तोंडून श्रोत्यांच्या कानावर त्याचे शब्द पडले. तो म्हणाला, “मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” (मत्तय ९:२).MHMar 41.2

    रुग्णाच्या आत्म्यावरील मोठे ओझे हलके झाले. तो शंका घेऊ शकत नव्हता. येशूच्या शब्दाने जाहीर केले की तो हृदय वाचू शकतो. क्षमा करण्याच्या त्याच्या सामर्थ्याला कोणत नाकारु शकत होता ? निराशेचे ठिकाण आशेने घेतले व त्रास देणाऱ्या ठिकाणी आनंद निर्माण झाला. त्या मनुष्याच्या शरीरातील वेदना नाहीशा झाल्या आणि त्याचे पूर्ण शरीर एक नव्या चैतन्याने चमकू लागले आणि यापुढे त्याची दुसरी काही इच्छा राहिली नाही, तो तर केवळ त्याच्या शब्दानेच आनंदी होऊन शांत पडून होता.MHMar 42.1

    अनेक लोक या अद्भुत बदलाला श्वास रोखून आणि पुढे येऊन पाहात होते. अनेक लोकांनी त्याच्या या शब्दाच्या निमंत्रणाला जाणले होते. त्यांचाही आत्मा पापाच्या आजाराने त्रस्त नव्हता का ? ते सुद्धा या ओझ्यातून सुटका मिळविण्याची त्यांची इच्छा नव्हती ?MHMar 42.2

    परंतु परूशांनी लोकांवरचा आपला प्रभाव कमी होण्याच्या भीतीने येशूला दोष देत म्हटले की, “हा असे का बोलतो, हा दुर्भाषण करतो. एका वाचून म्हणजे देवावाचून पापांची क्षमा काण करु शकतो ?” (मार्क २:७)MHMar 42.3

    येशूने परूशांच्या डोळ्यात पाहिले यामुळे ते भयभीत होऊन मागे सरकले तेव्हा तो म्हणाला की, “तुम्ही, आपल्या मनात वाईट कल्पना का आणता ? कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे बोलणे किंवा उठून चाल असे बोलणे यातून कोणते सोपे आहे ? तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हांला समजावे म्हणून तो पक्षाघाती मनुष्याला म्हणाला ऊठ आपली बाज उचलून घेऊन घरी जा.” (मत्तय ९:४-६).MHMar 42.4

    तेव्हा तो मनुष्य जो खाटेवर पडला होता त्याच्यामध्ये शक्ति येऊन तो उठला आणि आपली बाज उचलून आपल्या घरी गेला. यावर सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि परमेश्वराचे गौरव करीत म्हणाले, “आम्ही असे कधी पाहिले नव्हते.” (मार्क २:१२)MHMar 42.5

    सडत चाललेल्या त्या शरीरामध्ये पुन्हा जीवन देण्याचे व आरोग्यदायी करण्याचे या दैवी शक्तिशिवाय काहीच करण्याची गरज नव्हती. तोच आवाज ज्याने मातीचा मनुष्य घडिला आणि जीवन श्वास फुकून जिवंत केले त्याच आवाजाने पक्षाघाती मनुष्याला बरे केले होते. त्याला पुनरुज्जीवन दिले होते आणि ज्या शक्तिने त्याच्या शरीराला जीवन दिले त्याच शक्तिने त्याचे हृदय सुद्धा नवे केले. तोच ज्याने सृष्टी निर्माण करताना म्हटले होते. “कारण तो बोलला आणि अवघे झालेल्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले.” (स्तोत्र ३३:९). त्यानेच पापाने मरणाऱ्या जीवात्म्यांना जीवनाचा संचार केला. शरीराचे आरोग्य ही त्याची साक्ष आहेत. यामुळे त्याचे हृदयही नवे झाले होते. ख्रिस्ताने पक्षाघाती रुग्णाला म्हटले उठ आणि चालू लाग यामुळे तुम्हास समजेल की मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापाची क्षमा करण्याचा अधिकार दिला आहे.” पक्षाघाती रोग्याने प्रभु कुठून देह आणि आत्मा दोन्हीचे आरोग्य प्राप्त केले. यामुळे पूर्वीच्या देहाचे आरोग्य मिळण्यासाठी त्याला आत्म्याच्या आरोग्याची गरज होती. मनाच्या शांतीचीही गरज होती. आत्म्याला शांती मिळाली तर शरीरसुद्धा स्वस्थ होते याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आज हजारो लोक आजारी आहेत त्या सर्वांना तुझ्या पापांची क्षमा झाली आहे हे शब्द ऐकण्याची उत्सुकता आहे. जसे पक्षाघाती मनुष्याच्या कानावर येशूचे शब्द पडले होते. आपल्या अतृप्त इच्छा आणि अशांती यांच्याबरोबर पापांचे ओझेही आहे. ज्यामुळे आजार होतात. त्यांना तोपर्यंत शांती प्राप्त होत नाही जोपर्यं ते आत्मा बरा करणाऱ्याकडे जात नाहीत. ही शांती केवळ प्रभु येशूचे देऊ शकतो. तोच त्यांच्या मनाला उत्साह आणि देहात आरोग्य देऊ शकतो. MHMar 43.1

    पक्षघाताच्या आजाराने बरा झालेला मनुष्य पाहून लोकांच्या मनावर इतका प्रभाव झाला की त्यांना वाटले की स्वर्गच उघडला आहे आणि नव्या जगाची सुरुवात झाली आहे. बरा झालेला मनुष्य जसा गर्दीतून बाहेर जात होता तसे प्रत्येक शरीरावर परमेश्वराचा आशीर्वाद होता. आपला बिछाना त्याने अशाप्रकारे उचलला होता की जसे काय झाडाचा वाळलेला पाचोळा आहे. लोक त्याला मार्ग देण्यासाठी मागे सरकत होते. त्यांचे भयग्रस्त चेहरे आपसात कुजबूजत होते की, “आज आम्ही विलक्षण गोष्टी पाहिल्या आहेत (लूक ५:२६).MHMar 43.2

    बरा झालेला पक्षाघाती मनुष्य जेव्हा घरी गेला तेव्हा त्या घरामध्ये आनंदोत्सव साजरा केला गेला. थोड्याच वेळापूर्वी तो बाजेवरुन सहज उठला होता तेव्हा त्याच्या डोळ्यात खुशीच्या अश्रुनी गर्दी केली होती व लोकांची गर्दी त्याच्याभोवती आश्चर्याने पाहात होती. त्याला स्वत:च्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. तो पूर्ण मानवी शक्तिनिशी सर्वांसमोर उभा राहिला होता. ज्या निर्जिव हातांना तो पाहात होता. आता तेच हात तो आपल्या इच्छेनुसार हलवू शकत होता. जे स्नायू आखडले होते आता ते ताजेतवाने दिसत होते. आता तो आपल्या पायांनी सहज व सुलभतेने व शक्तिने चालत होता. खुशी आणि आशा त्याच्या चेहऱ्यावर चमकत होती. पापाच्या आणि दुःखाच्या ठिकाणी आता शुद्धता आणि शांतीने जागा घेतली होती. आनंद आणि धन्यवाद त्याच्या घरातून बाहेर आला होता. परमेश्वराचा महिमा त्याच्या पुत्राकरवी झाली. त्याने आशा हीनाला आशा दिली व शक्ति हीनाला परत शक्ति प्रदान केली. पक्षाघातील मनुष्य ज्याला येशूने बरे केले तो आपल्या सर्व कुटुंबासहित देवाला समर्पित झाले. आता त्यांचा प्रभुवरील विश्वास कोणीच काढून घेऊ शकणार नाही की त्यांची निष्ठा डळमळू शकणार नाही. कारण येशूने त्याच्या अंधाऱ्या घरामध्ये प्रकाश आणला होता.MHMar 44.1

    “हे माझ्या जिवा परमेश्वराचा धन्यवाद कर हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर, हे माझ्या जिवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरु नको, तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो, तो तुझे सर्व रोग बरे करितो. तो तुझा जीव विनाश गर्तेतून उध्दारितो, तो तुला दया व करुणा ह्यांचा मुकुट घालितो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करितो. म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. जाचलेल्या सर्वांकरिता परमेश्वर नीतिची व न्यायाची कृत्ये करितो. त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्राएलाच्या वंशजांना विदित केली. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे. तो मंद क्रोध व दयामय आहे. तो सर्वदाच दोष देत राहणार नाही. तो आपला क्रोध सर्वकाळ राहू देणार नाही. आमच्या पालकांच्या मानाने त्याने आम्हांस शासन केले नाही. त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हांला प्रतिफळ दिले नाही. (स्तोत्र १०:१-१०)MHMar 44.2