Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    हृदयापर्यंत कसे पोहोचाल :

    मानसिकते बरोबर कार्य करणे अति नाजुक काम आहे. ज्या लोकांना पश्चात्तापी अवस्थेपर्यंत जो आणू शकतो त्यालाच हृदयात काय चालले आहे हे ओळखू शकतो. केवळ तोच आम्हांला हरवले त्यांच्या हृदयापर्यंत आणू शकतो व त्यामुळेच आम्हाला अशा हृदयापर्यंत पोहोचण्यास यश येते. आपण सरळ उभे राहून विचार करु शकता. “मी तुझ्यापेक्षा अधिक पवित्र आहे.” आपले विचार कितीही योग्य व बरोबर असोत. आपले शब्द कितीही बरोबर असोत यामुळे काहीच फरक पडत नाही. ते हृदयांना कधीच स्पर्श करु शकत नाहीत. ख्रिस्तीपणाच्या प्रेमाचे शब्द व सहानुभूतिचे कार्यच लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचू शकतात. त्यांच्या आत्म्यापर्यंतचा मार्ग खुला होऊ शकतो. नियमांचे पुनरुच्चार आणि त्यावर चर्चा करुन काहीच फायदा होणार नाही. MHMar 115.1

    ख्रिस्तासारखी आम्हालाही सहानुभूतिची गरज आहे. सहानुभूति केवळ दोषी लोकांसाठीच नाही, परंतु गरीब, त्रासलेले, छळ झालेले संघर्षामध्ये सापडलेले आत्मे, जे चुकांमध्ये सापडलेले असतात. जे पाप करतात व पुन्हा पश्चात्ताप करतात. परीक्षांमध्ये निराश होतात. या सर्वांसाठी सहानुभूतिची गरज आहे. आम्हांला दयाळूपणाच्या महायाजकासारखे त्यांचा दुर्बळपणा या गोष्टी समजणे आवश्यक आहे. त्यांना आधार देण्याची दृष्टीने त्यांच्याकडे जाणे आवश्यक आहे.MHMar 115.2

    त्याग केलेला, तुच्छा मानलेला, राष्ट्रांनी टाकीलेला व तिरस्कार केलेला त्याला ख्रिस्ताने आपणाकडे बोलाविले. त्याच्यावर दया दाखविली. त्याला प्रेम दिले. असा एक समुह होता ज्याच्याशी कोणी सहमत नव्हते. हा त्या लोकांचा समुह होता आपल्या घमेंडिने सर्वांपासून वेगळा होता आणि इतरांकडे तुच्छ दृष्टीने पाहात होता.MHMar 116.1

    ख्रिस्त म्हणतो, “माझे घर भरुन जावे म्हणून सडकांवर व कुंपणाकडे जाऊन लोकांना आग्रह करुन घेऊन ये. त्याच्या वचनाचे पालन करुन आम्हांला विश्वासू लोकांकडे जायचे आहे जे आमच्या जवळ व दूर आहेत. एवढेच नाही तर जकातदार आणि वेश्यांपर्यंतसुद्धा परमेश्वराचे निमंत्रण पोहोचवायचे आहे. सुवार्ता प्रसारकांची दया आणि धैर्य त्याचे निमंत्रण पापामध्ये बुडलेल्या लोकांना काढण्यासाठी त्यांची शक्ति वापरली जाते.MHMar 116.2

    खिस्ताच्या उद्देशाचे मागणे असे आहे की सैतान ज्यांचा नाश करण्यासाठी शोधत फिरत आहे. त्यांच्याकडे आम्ही निर्धाराने आणि त्यांच्यावरील न संपणारी प्रीति घेऊन त्या आत्म्यांसाठी कार्य करावे. हरवलेल्या आत्म्यांसाठी तीव्र इच्छा धेऊन त्यांचा शोध केला तर कोणतीही गोष्ट निराश करु शकत नाही.MHMar 116.3

    लक्षात ठेवा की परमेश्वराच्या संपूर्ण वचनामध्ये स्त्री-पुरुषांना परमेश्वराजवळ येण्यासाठी या सर्व आत्म्यांना विनंती करण्यात आली आहे. आम्हाला व्यक्तिगत आणि सार्वजनिक पातळीवर या दोन्ही संधी सोडू नये, त्यांचा लाभ घ्या. प्रत्येक चर्चा व प्रत्येक शिकवणी मध्ये लोकांना मुक्तिदात्या जवळ आणण्याचा प्रयत्न करावा. आम्ही आपल्या पूर्ण शक्तिने लोकांना येशूकडे पाहण्यासाठी निमंत्रित करायला हवे. त्याने मानवासाठी केलेला आत्मत्याग आणि बलिदानयुक्त जीवनाचा स्वीकार करण्याची विनंती करणे आवश्यक आहे. आम्ही त्यांना दाखवायला हवे की आपल्याकडे जी दाने आहेत त्यांचा वापर त्याचा महिमा करण्यासाठी वापरतो आणि त्यामुळे परमेश्वराला आनंद होतो.MHMar 116.4

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents