Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ३६—काल्पनिक ज्ञानामध्ये धोका

    “ते स्वतःला बुद्धीमान समजून मुर्ख बनले एवढेच नाही परंतु त्यांचे मन अंध:कार झाले.”

    ज्ञान प्राप्त करण्याची लालसा आणि विज्ञानाचा शोध घेण्याची सर्वात वाईट गोष्ट म्हणजे मानव केवळ तर्क करतो आणि वास्तविकतेचे मोल आणि त्याच्या योग्य चाकोरी बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो. बहतेक लोक सृष्टीकर्ता आणि त्यांच्या कार्याचे ज्ञान हे आपल्या अर्ध्यामुा ज्ञानाच्या आधारावर तपासणी किंवा शोध करण्याचे प्रयत्न करीत असतात. ते परमेश्वराचा स्वभाव व त्याचे गुण अधिकार निश्चित करण्याचे प्रयत्न करतात आणि अनंत कालीन परमेश्वराच्या बाबतीत काल्पनिक आणि परिकथेच्या कल्पनेमध्ये बुडतात. जे लोक अशाप्रकारचे अध्ययन करतात ते स्वाभाविकपणाच्या वर्जित क्षेत्रामध्ये घुसतात. त्यांच्या संशोधनापासून काहीच फायदा होत नाही. आणि यामध्येच राहिल्याने जीवन धोक्यात येते. MHMar 333.1

    आमचे मूळ आईवडील ते ज्ञान मिळविण्याच्या इच्छेनेच पापामध्ये पडले. परमेश्वराने ते ज्ञान त्यांच्यापासून दूर ठेवले. हे ज्ञान मिळविण्याच्या नादात त्यांच्याजवळ असलेल्या अतिमोलवान ज्ञानाला ते मुकले. जर आदाम व हवेने मना केलेल्या झाडाचे फळ खाल्ले नसते तर परमेश्वराने त्यांना असे ज्ञान दिले असते त्यामुळे त्यांच्यावर पापापासून शाप मिळाला नसता आणि त्या ज्ञानाने त्यांना अनन्तकालीन जीवनाच आनंद दिला असता. परिक्षा घेणाऱ्याचे ऐकल्यामुळे त्यांना केवळ पाप आणि त्याच्या परिणामाचेच ज्ञान झाले. आज्ञाचे उल्लंघन केल्यामुळे मानव परमेश्वराचा विरोधी आणि स्वर्गापासून दूर झाला. आमच्यासाठी हा एक धडा आहे. आमच्या प्रथम मातापित्यांना सैतान त्या क्षेत्रात घेऊन गेला आणि अजूनही तो मनुष्याला तेथेच घेऊन जाण्यासाठी प्रोत्साहीत करीत आहे. सैतानाने जगाला काल्पनिक कथांनी भरविले आहे व भरवित आहे. त्याच्याजवळ जी काही साधने आहेत ती सर्व यासाठीच वापरीत आहे. “देवाच्या रहस्याचा तुला थांग लागेल काय ?... ते गगनाइतके उंच आहे. तेथे तुझे काय चालणार ते अघोलोकाहून खोल आहे. तुला ते काय कळणार? त्याचे परिणाम म्हटले तर ते भूगोलाहून लांब व समुद्राहून रुंद आहे.” (ईयोब ११:७-९) MHMar 333.2

    “तरीपण ज्ञान कोठून मिळते? बुद्धीचे स्थान कोणते? त्याचे मोल मानवास कळत नाही ते जिवंताच्या भूमीत सापडत नाही. अगाध जलाशय म्हणतो तो माझ्याठायी नाही समुद्र ही म्हणतो ते माझ्याजवळ नाही. उत्कृष्ट सोने देऊन ते मिळत नाही. चांदी तोलून देऊन ते त्याचे मोल होत नाही. ओफीरचे सोने गोमेद व नीलमणि ही भारंभार देऊनही त्याचे मोल होत नाही. सोने व काचमणि ही त्याच्या बरोबरीची नाहीत. उंची सोन्याच्या नगांनी त्याचा मोबदला होत नाही. तर मग ज्ञान कोठून येते? बुद्धीचे स्थान कोणते? ते सर्व जिवतांच्या नेत्रांना अगोचर आहे. आकाशातील पक्षांना ते गुप्त आहे देवच त्याचा मार्ग जाणतो त्याचे स्थान त्यालाच ठाऊक आहे. कारण त्याची दृष्टी पृथ्वीच्या दिगतांना पोहोचते. तो आकाश मंडळाखालचे सर्व काही पाहतो. त्याने वायुचे वजन ठरविले. व जल मापून दिले त्याने पर्जनास नियम लाऊन दिला. गर्जनाऱ्या विद्युलतेस मार्ग नेमून दिला. तेव्हा त्याने ज्ञान पाहून त्याचे वर्णन केले. त्याने ते स्थापित केले व त्याचे रहस्य जाणिले तो मानवास म्हणाला पाहा प्रभुचे भय धरणे हेच ज्ञान होय दुष्टतेपासून दूर राहणे हेच सुज्ञान होय.” (ईयोब २८:१२-२८)MHMar 334.1

    बुद्धी ही गुहेत शोधल्याने किंवा परमेश्वराच्या रहस्यामध्ये घुसल्याने मिळत नाही. बुद्धी तर विनम्रतेने त्याच्या प्रकाशनाचा स्वीकार करतात आणि त्या प्रकाशानुसार आपले जीवन व्यतीत करतात जे परमेश्वराने ते आनंदाने मानवास प्रगट केले.MHMar 334.2

    सर्वात महान बुद्धीमान व्यक्तिसुद्धा परमेश्वराचे ज्ञान समजू शकत नाहीत. स्वर्गीय प्रेरणा असे अनेक प्रश्न विचारते त्याचे उत्तर सर्वात बुद्धीमान मनुष्यही देऊ शकत नाही. हे प्रश्न आमच्याकडून अशासाठी विचारले गेले नाहीत की आम्ही त्यांची उत्तरे देऊ परंतु आमचे लक्ष परमेश्वराच्या गहन रहस्याकडे वेधून ते शिकण्यास आमची बुद्धी तेथपर्यंत पोहोचू शकत नाही. आमच्या जीवनाच्या अवतीभोवती अनेक अशा गोष्टी आहेत की नाशवंत बुद्धीच्या प्रयत्नांना त्यांचे आकलन होत नाही.MHMar 334.3

    संशय घेणारे लोक परमेश्वरामध्ये विश्वास करण्याचे नाकारतात. कारण ज्या अनंत शक्तिबरोबर परमेश्वर स्वतःला प्रगट करतो त्याला हे लोक समजून घेत नाहीत. परंतु परमेश्वराच्या जितक्या त्या गोष्टींचा स्वीकार करतात ज्या त्यांच्यासाठी मर्यादित ठेवण्यात आल्या आहेत. मानवासाठी ज्या गोष्टी प्रगट केल्या आहेत त्यावरूनच त्यांनी त्याचा स्वीकार केला आहे. परमेश्वराने ज्या गोष्टी आमच्यासाठी प्रगट केल्या नाहीत त्याविषयी आपण विचार करू नये. कारण मानव सतत तपास करीत असतो परंतु तरीही शेवट आमच्यापासून आपल्या मर्यादेपलिकडे दूर आहे. MHMar 334.4

    “जलाचे माप आपल्या चुळक्याने कोणी केले आहे ? आकाशाचे माप आपल्या रितीने कोणी घेतले आहे? पृथ्वीची धूळ मापाने कोणी मापिले आहे ? डोंगर काट्याने व टेकड्या तराजूने कोणी तोलल्या आहेत ? परमेश्वराच्या आत्म्याचे नियमन कोणी केले आहे ? त्याचा मंत्री होऊन त्याला कोणी शिकविले आहे? त्याने कोणाला मसलतत विचारिली? सन्मार्गविषयी मसलत देऊन त्याला कोणी शिक्षण दिले ? त्याला कोणी ज्ञान शिकविले ? सुज्ञतेचा मार्ग त्याला कोणी दाखविला? पाहा त्याच्या हिशोबी राष्ट्र पोहऱ्यातल्या जलबिंदूसमान, तराजूतल्या रजासमान आहेत. पाहा द्वीपेही तो धूळीच्या कणासारखी उचलितो लबानोन जळण्यास पुरावयाचा नाही व त्यावरील वनपशू होमास पुरे पडावयाचे नाहीत. सर्व राष्ट्रे त्याजपुढे काहीच नाहीत. त्याच्या हिशोबी ती अभाव व शुन्यता याहूनही कमी आहेत.MHMar 335.1

    तुम्ही देवाला कोणती उपमा द्याल? त्याच्याशी कोणती प्रतिमा लावून पाहाल ? कारागीर मुर्ती ओतून तयार करितो. सोनार तिला सोन्याचे पत्र्याने मढवितो. तिच्यासाठी चांदीच्या साखळ्या घडवितो. जो दारिद्रयामुळे उर्पण करण्यास समर्थ नाही तो न कुजणारे लाकूड निवडून घेतो. न ढळणारी अशी मूर्ती बनविण्यासाठी तो चतुर कारागिर शोधून काढतो. तुम्हास कळत नाही काय ? तुम्हास ऐकू येत नाही काय? प्रारंभापासून तुम्हाला हे कळविले नाही काय ? पृथ्वीचा पाया घातल्यापासून हे तुम्हास समजले नाही काय? हाच तो पृथ्वीच्यावरील नभोमंडळावर आरूढ झाला आहे. तिच्यावरील रहिवासी टोळासमान आहेत तो आकाश मलमली प्रमाणे पसरितो, राहण्यासाठी तंबू ताणितात तसे तो ताणितो. तो अधिपतींना कस्पटासमान लेखितो पृथ्वीच्या न्यायाधिशांना शून्यवत करितो. त्यांना लाविले न लाविले, पेरिले न पेरिले त्यांचे मूळ भूमीत रूजते न रुजते तोच तो त्यावर कुंकर मात्र घालिती म्हणजे ते सुकून जातात. वादळ त्यांस भूसाप्रमाणे उडवून नेते. मी कोणाशी तुल्य आहे म्हणून त्यांची उपमा मला तुम्ही द्याल असे पवित्र प्रभु म्हणतो आपले डोळे वर करून पाहा. ह्यांना कोणी उत्पन्न केले ? तो त्याच्या सैन्याची मोजन करून त्यांस बाहेर आणितो तो त्या सर्वांस नावाने हाका मारितो, तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे; म्हणून त्यापैकी कोणी उणा पडत नाही.MHMar 335.2

    हे याकोबा, असे का म्हणतोस, हे इस्राएलला असे का बोलतोस की माझा मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहे व माझा न्याय देवाच्या दृष्टीआड झाला आहे? तुला कळले नाही काय? तू ऐकले नाही काय? परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्नकर्ता, थकत भागत नाही त्याची बुद्धी अगम्य आहे.” (यशया ४०:१२-२८).MHMar 336.1

    पवित्र आत्म्याकरवी परमेश्वराच्या संदेष्ट्यांना दिलेल्या प्रतिनिधीत्वापासून या आम्ही परमेश्वराची महानतेविषयी शिकू या. यशया भविष्यवक्ता लिहितो, “उज्जीया राजा मरण पावला त्यावर्षी प्रभूस उच्चस्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले त्याच्या झग्याच्या सोग्यांनी मंदीर व्यापून गेले होते. त्याच्या भोवताली सराफीम उभे होते. त्या प्रत्येकाला सहा सहा पंख होते. दोहोंनी तो आपले तोंड झाकी दोन्हींनी आपले पाय झाकी व दोन्हींनी उडे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत पवित्र! पवित्र! पवित्र सेनाधीश परमेश्वर अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होय. घोषणा करणाऱ्यांच्या ह्या वाणीने उंबरठे हालले व मंदिर धुराने भरले तेव्हा मी म्हणालो, हाय हाय माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध लोकांच्या मध्ये राहतो. आणि सेनाधीश परमेश्वर राजाधिराज ह्यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले.MHMar 336.2

    मग एक सराफदूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन मजकडे उडत आला तो माझ्या ओठास लावून त्याने म्हटले, पाहा ह्याचा स्पर्श तुझ्या ओठास झाला असून म्हणून तुझा दोष दूर झाला आहे तुझ्या पापाचे प्रायश्चित झाले आहे.” (यशया ६:१-७).MHMar 336.3

    “हे परमेश्वरा तुझ्यासारखा कोणीच नाही. तू थोर आहेस पराक्रमामुळे तुझे नाम मोठे आहे हे राष्ट्रांच्या राजा तुला कोण भिणार नाही? हे तुला साजते; राष्ट्रातील सर्व ज्ञात्यात त्यांच्या सर्व राज्यात तुजसमान कोणीच नाही.” (यिर्मया १०:६-७).MHMar 336.4

    हे परमेश्वरा तू मला पारखिले आहे. तु मला ओळखीले आहे. माझे बसणे व उठणे तू जाणतोस तू दुरून माझे मनोगत समजतोस तू माझे चालणे माझे निजमे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकूण वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. तू मागून पुढून मला वेढीले आहे. माझ्यावर तू आपला हात ठेविला आहे. हे ज्ञान माझ्या कल्पनेपलिकडेच आहे. हे अगम्य आहे हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे.” (स्तोत्रसहिता १३९:१-६).” त्याच्या महात्म्याने तुम्ही घाबरे होणार नाही काय? त्याचा धाक तुम्हाला वाटणार नाही काय?’ (ईयोब १३:११). “देवाचा निवास उंच गगन आहे ना? अतिशय वरल्या ताऱ्यांकडे पाहा, ते किती उंच आहेत ?’ (ईयोब २२:१२). “त्याच्या सैन्याची गणती करिता येईल काय ? त्याचा प्रकाश कोणावर पडत नाही?” (ईयोब २५:३). “देव अद्भुत शब्दांनी गर्जतो, आम्हास अगम्य अशी मोठी कृत्ये तो करितो. तो हिमाला म्हणतो पृथ्वीवर पड. पावसाच्या सरीला व भारी पर्जन्य वृष्टीला तो असेच म्हणतो त्याने उत्पन्न केलेल्या सर्व मानवांनी मानवांनी त्याला ओळखावे, म्हणून तो प्रत्येक मनुष्याच्या हातचा व्यवसाय बंद करितो. तेव्हा वनपशु आडोसा शोधितात व आपल्या गृहात पडून राहतात. वावटळ दक्षिणेकडून येते उत्तरेकडील वाऱ्यामुळे थंडी येते. देवाच्या श्वासाच्या फुकऱ्याने हिम होते, तेव्हा विस्तीर्ण जलाशय गोठून जातात. तो मेघ जल पूर्ण करितो तो आपल्या विद्युलतेचे अभ्र चोहोकडे पसरितो. ते त्याच्या सूत्राने चोहोकडे फिरतात. म्हणजे अर्थात त्यांस आज्ञापिलेले कार्य ते अखिल भूपृष्टावर करितात. शिक्षेसाठी असो त्याच्या ह्या पृथ्वीच्या हितासाठी असो किंवा दया करण्यासाठी असो, तो त्यांस पाठवितो. ईयोबा कान देऊन ऐक. स्तब्ध राहून देवाच्या अद्भुत कृत्यांचे मनन कर. देव मेघांना आज्ञा देऊन त्यांचा प्रकाश चमकावयास कसा लावितो, हे तुला कळते काय ? त्या सर्वज्ञाच्या अदभुत कृत्यांचे मर्म तू जाणतोस काय? दक्षिणेकडील वाऱ्याने पृथ्वी निर्वात होते. तेव्हा तुझे वस्त्रे कशी तापतात ओतीव आरशासारखे भक्कम नभोमंडळ त्याच्याप्रमाणे तुला विस्तारिता येईल काय ? त्याच्या सी काय बोलावे हे आम्हास शिकवील. अंधकारामुळे आम्हासा शब्दयोजना करिता येत नाही. मी बोलणार असे त्याला सांगायचे काय? असे सांगून कोणी आपला नाश करून घेईल काय? आता मेघमंडळातील दैदिप्यमान सूर्यप्रकाश दिसत नाही पण वारा सुटून ते स्वच्छ करिते. उत्तर दिशेकडून सुवर्णप्रभा येते देव भयजनक तेजाने मंडित आहे. सर्व समर्थ तर अगम्य आहे. त्याचे सामर्थ्य अप्रतिम आहे. तो न्याय व धर्म विपरीत करीत नाही. म्हणून मनुष्ये त्याचे भय धरितात. ते शहाणपणाच अभिमान वाटतात त्याजकडे तो लक्ष देत नाही.” (ईयोब ३७:५-२४). MHMar 337.1

    “परमेश्वर वादळात व तुफानात चालतो, मेघव्याच्या चरणाची धूळ आहेत.” (नहूम १:३). “परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे, त्याची थोरवी अगम्य आहे. एक पिढी दुसऱ्या पिढीपुढे तुझ्या कृत्याची प्रशंसा करीत राहील. त्या तुझ्या पराक्रमाचे वर्णन करितील. तुझ्या वैभवाचा गौरवयुक्त प्रताप व तुझी अदभुत कृत्ये ह्यांचे मी मनन करीन. तुझ्या भयावह कृत्यांचा पराक्रम लोक विदित करितील मी तुझो थोरवी वर्णीन ते तुझ्या परमदयेची आठवण काढतील व तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करितील परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे तो मंद क्रोध अतिदयाळू आहे, त्यांची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे. हे परमेश्वरा तुझी सर्व कृत्ये तुझी स्तुती गातात. आणि तुझे भक्त तुझा धन्यवाद करितात. जे तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात. आणि तुझा पराक्रम कथन करतात. ह्यासाठी की तुझे पराक्रम व तुझ्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य ही मानवजातीस कळावी. तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. तुझा राज्याधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे. पतन पावणाऱ्या सर्वांना परमेश्वर आधार देतो. व वाकलेल्या सर्वांना उभे करितो. सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात आणि तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाळी देतोस. तू आपली मूठ उघडून प्राणीमात्राची इच्छा पुरी करितोस. परमेश्वर आपलय सर्व मार्गात न्यायी आहे. तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. जे कोणी त्याचा दावा करितात. जे कोणी खऱ्या भावाने त्याचा धावा करितात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. तो आपले भय धरणारांची इच्छा पुरी करितो. व त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारितो. परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करितो. पण सर्व दुर्जनांचा नाश करितो. माझे मुख परमेश्वराचे स्तवन करील, प्राणीमात्र त्याच्या नावाचा धन्यवाद युगानुयुग करोत.” (स्तोत्र संहिता १४५:३-२१).MHMar 338.1

    जेव्हा आम्ही परमेश्वर काय आहे हे अधिकन अधिक शिकतो आणि त्याच्या दृष्टीने आम्ही काय आहोत असे शिकलो तर त्याच्यासमोर आपण घाबरून थरथर कापू. आजच्या काळातील लोकांना जुन्या काळातील लोकांच्या संस्कृतिचे शिक्षण घ्यायला हवे. ज्यांनी परमेश्वराकरवी पवित्र ठरविली गेलेल्या वस्तुंना सामान्य मानण्याची कुचराई केली. जेव्हा इस्राएल लोकांनी कराराचा कोश उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना शिक्षा करण्यात आली वलिस्ती लोकांच्या देशातून तो आणण्यात येत होता. त्यांच्या या श्रद्धाहीन धाडसाबद्दल त्यांना गंभीर शिक्षा करण्यात आली.MHMar 338.2

    नंतर त्या शिक्षेविषयी विचार करा जी उज्जियावर तो दंड आला होता. जेव्हा दाविद राजाच्या काळामध्ये कोश यरूशलेममध्ये आणला जात होता तेव्हा उज्जियाने आपला हात पुढे करून कोशाला सावरण्यासाठी त्याला हात लावला होता. परमेश्वराच्या उपस्थिती मध्ये निष्काळजीपणा करण्यात आला होता. तेव्हा ताबडतोब त्याला मृत्युदंड देण्यात आला. “ते जळते झुडूप पाहन मोशे परमेश्वराची उपस्थिती न ओळखून ते दृष्य पाहण्यासाठी तिकडे गेला तेव्हा आज्ञा देण्यात आली इकडे जवळ येऊ नको, तू आपल्या पायातील जोडे काढ कारण ज्या जागी तू उभा आहेस तू भूमी पवित्र आहे. तेव्हा मोशेने आपले मुख झाकिले कारण देवाकडे पाहण्यास तो भ्याला.” (निर्गम ३:५-६).MHMar 339.1

    “इकडे याकोब बैरशेबा येशून हारानास जावयास निघाला. तो एके जागी पोहोचला असता सूर्य मावळला म्हणून तेथे रात्र घालवावी या विचाराने तेथला एक धोंडा उशाला घेऊन तो त्या ठिकाणी निजला. तेव्हा त्यास स्वप्न पडले त्यात त्याने असे पाहिले की एका शिडी पृथ्वीवर उभी केली असून तिचा शेंडा आकाशाला लागला आहे आणि त्या शिडीवरून देवदूत चढत उतरत आहेत आणि पाहा परमेश्वर त्याच्यापाशी उभा राहून त्यास म्हणाला, मी परमेश्वर तुझा पिता आब्राहाम याचा देव व इसाहकाचा देव आहे ज्या भूमीवर तू निजला आहेत ती मी तुला व तुझ्या संततीला देईन. तुझी संतति संख्येने पृथ्वीच्या रजाइतकी होईल. पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशाचाही दिशांस तुझा विस्तार होईल आणि तुझ्या व तुझ्या संततीद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशिर्वादीत होतील. पाहा मी तुजबरोबर आहे. आणि जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. मग याकोब झोपेतून जागा होऊन म्हणाला खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे पण हे मला कळले नव्हते. तो भयभीत होऊन म्हणाला हे किती भयप्रद स्थल आहे हे प्रत्यक्ष देवाचे घर स्वर्गाचे दार आहे.” (उत्पत्ति २८:१०-१७).MHMar 339.2

    रानातील त्या पवित्रस्थानामध्ये आणि परमेश्वराच्या उपस्थितीचे प्रतीक त्याच्या मंदिरातील एक दालन परमेश्वराच्या उपस्थितीसाठी सर्वात वेगळे होते. त्याच्या प्रवेशद्वारावरील करूब असणारे पडदे एका व्यक्तिशिवाय दुसरे कोणीच उचलू शकत नाही. ते पडदे उचलणे आणि न बोलाविता परमपवित्र स्थानामध्ये प्रवेश करण्याचा अर्थ म्हणजे मृत्यु. परमपवित्र स्थानातील दयासन व परमेश्वराचा महिमा पाहिल्यावर कोणी जिवंत राहू शकत नव्हता. परमपवित्र स्थानामध्ये जाण्यासाठी वर्षातील एक दिवस मुख्ययाजक थरथरत्या शरीराने सेवा करण्यासाठी तेथे जात असे. तेथील धूपाच्या धूरामध्ये परमेश्वराचे अस्तित्वामुळे व धूपामुळे मुख्य याजक जिवंत राहू शकत असे. परंतु पवित्रस्थानात पूर्ण शांतता असे. तेथील वेदीवर कोणी सेवा करीत नसे. उपासना करणाऱ्यांच्या घोळका शांत आणि भयाने डोके झुकवून परमेश्वराच्या दयेची याचना करीत होता.MHMar 340.1

    “ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहोचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहील्या आहेत.” (१ करिंथ १०:११). “परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे. सर्वधारित्री त्याजपुढे स्तब्ध राहो.” (हबक्कू २:२०) “परमेश्वर राज्य करितो, लोक कंपित होवोत. तो करूबावर अधिष्ठित आहे. पृथ्वी थरथर कापो, परमेश्वर सीयोनेत थोर आहे, तो सर्व लोकांहन परमथोर आहे. ते तुझे थोर व भययोग्य नाव स्तवोत, पवित्र तोच आहे.” परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे. परमेश्वराचे राजासन स्वर्गात आहे. त्याचे नेत्रमानवास पाहतात, त्याच्या पापण्या त्यांस अजमावितात (स्तोत्रसंहिता ११:४).MHMar 340.2

    “कारण परमेश्वराने आपल्या उच्च पवित्रस्थानातून खाली पाहिले.” (स्तोत्रसंहिता १०२:१९). तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना न्याहाळून पाहतो. त्या सर्वांची हृदये घडणार व त्यांची सर्व कामे जाणणारा तो आहे. अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरो, जगात राहणारे सर्व त्याचा धाक बाळगोत.” (स्तोत्र ३३:१४,१५,८).MHMar 340.3

    मनुष्य शोधण्याद्वारे परमेश्वराला प्राप्त करू शकत नाही कोणीही परमेश्वराचे गौरव झाकलेला पडदा धाडसाने काढून त्याला शोधण्याचे साहस करू नये. “अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे. त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत.” (रोम ११:३३) हे तर त्याच्या दयेचे प्रमाण आहे की त्याचे सामर्थ्य लपले आहे. कारण त्याच्या गौरवाचा पडदा उघडणे म्हणजे मृत्यूच कोणीही नाशवंत मनुष्य त्याच्या रहस्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. कारण त्यामध्ये राहून महान प्रतापी परमेश्वर कार्य करतो. आम्ही केवळ तेवढेच समजतो जेवढे तो उघड करतो की जे आमच्या पात्रतेनुसार तो प्रगट करतो. त्याला जे उचित वाटते तेच तो प्रगट करतो. तो सर्वश्रेष्ठ आहे तो जे म्हणतो मी आहे त्याला दंडवत घाला, नमन करा.MHMar 340.4

    *****