Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    मांसाहार भोजनाचा त्याग करण्याची कारणे

    जे लोक मांसाहार करतात ते दुसऱ्यांनी वापरलेल्या धान्यांचा उपयोग करतात. त्यांची भाजी खातात कारण पशू याच भाज्या खाऊन त्यांची काळजी घेतात आणि शाकाहार खाणाऱ्या पशूना मनुष्य खातो. त्याचा त्याला काहीच फायदा होत नाही. त्याऐवजी मनुष्यानेच शाकाहार भोजन केले तर त्याचा त्याला जास्त फायदा होईल.MHMar 238.2

    मांसाहार भोजन कधीच चांगले नसते. आणि आता तर मांसाहार अधिक धोकादायक झाला आहे. कारण हवा पाणी आणि वातावरणातील प्रदूषणामुळे जनावरांमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे आजार पसरले आहे अणि अशा जनावरांचे मांस खाऊन मनुष्यामध्ये वेगवेगळे आजार निर्माण झाले आहेत. मनुष्याला समजत नाही की तो काय खात आहेत. कसल्या प्रकारचे मांस ते खात आहेत. ज्या पशूचे मांस ते खातात तो पशू त्यांनी जिवंतपणी पाहिला असता तर त्यांना समजले असते की कशाप्रकारच्या पशूचे मांस ते खात आहेत. मगच त्यांना त्या पशूबद्दल घृणा निर्माण झाली असती. ज्या पशूना टीबी व कॅन्सरसारखे आजार आहेत त्या पशूचे मांस मनुष्य खात आहे. अशाप्रकारे पशुंचे रोगसुद्धा मनुष्यांमध्ये निर्माण होत आहेत.MHMar 238.3

    डुकरांच्या अंगावर भरपूर प्रमाणात जीवजंतू व रोग जंतून भरलेले असतात. हा प्राणी तसा घाणेरडा असतोच परंतु बायबलमध्ये सुद्धा तो निषिद्ध मानलेला आहे. त्याला स्पर्शही करायचा नाही असे सांगितले आहे. (अनुवाद १४:८). ही आज्ञा अशासाठी दिली आहे की या प्राण्याचे मांस खाणे आरोग्यास चांगले नाही. कारण डुक्कर घाणीत राहते व घाणच खाते यामुळेच मनुष्याच्या शरीराला आरोग्याला किंवा पचनसंस्थेला ते घातक आहे. परंतु योग्य प्रकारे आहार घेतल्यास मनुष्याचे आरोग्य चांगले राहते. बरेचसे लोकांचे आरोग्य उत्तमच राहते. प्रत्येक समस्यांना काहीतरी नियम बनविणे सोपे नाही. परंतु खाण्याच्या सिद्धांतामध्ये योग्य सावधगिरी बाळगली तर आरोग्यामध्ये मोठा बदल घडू शकतो. अणि स्वयंपाक करण्यामध्येसुद्धा जास्त अडचणी येऊ शकणार नाहीत.MHMar 238.4

    खाण्यामध्ये संयम बाळगला तर आपणास मानसिक आणि शारीरिक शक्ति प्राप्त होते. शारीरिक वासनांवर नियंत्रण ठेवण्यास सहाय्य प्राप्त होते. वाजवीपेक्षा जास्त खाणे धोक्याचे असते. जे लोक मानसिकरित्या सुस्त असतात त्यांनी भूकेपेक्षा कमीच खावे. आणि त्यांनी भरपूर व्यायाम करावा. बहुतकरून स्त्री पुरुषांमध्ये अतिउत्तम आरोग्य असते. आपल्या योग्यतेप्रमाणे ते अर्धे कार्यही करू शकत नाहीत. जर ते कार्य करू शकत होते तर ते भूकेच्या बाबतीत आत्मनियंत्रण करतात किंवा भूक त्यागाचे पालन करतात. बहुतेक लेखक आणि भाषणकार येथे अयशस्वी होतात. पोटभर खाल्ल्यानं तर ते कोणत्याही प्रकारचे काम करू शकता. यामध्ये शारीरिक काम नसते. यामुळे शब्द आणि विचारांचा प्रवाह बाधित होतो. ते त्या प्रबळ शक्तिने लिहू किंवा बोलू शकत नाहीत ते शब्द हृदयापर्यंत पोहोचू शकतील. अशाप्रकारे त्यांचे परिश्रम व्यर्थ आणि निष्फळ होते.MHMar 239.1

    ज्या लोकांवर महत्वाचे दायीत्व आहे ते आत्मिक हिताची रक्षा करतात. त्यांनी अशी व्यक्ती बनले पाहिजे ज्यांच्यामध्ये तीव्रतेने जाणीव व्हावी व ताबडतोब समजण्याची क्षमता असावी. त्यांनी इतरांपेक्षा स्वतःच्या खाण्यापिण्यावर संयम ठेवावा. त्यांच्या टेबलावर मसालेदार आणि पचनास कठीण असणारे पदार्थ नसावेत.MHMar 239.2

    विश्वासाने जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या लोकांनी रोज निर्णय घ्यावा की त्यांच्या हाताताल कार्य परिणामकारक व्हावे. त्यांना लवकरच निर्णय घेण्याची पात्रता असणे आवश्यक आहे हे कार्य त्यांनाच जमते जे अति कठोरपणे स्वतःवर नियंत्रण व संयम ठेवतात. योग्यप्रकारे शारीरिक आणि मानसिक शक्तिचा वापर करतात. त्यांना बौध्दिक शक्ति प्राप्त होते. जर तणाव जास्त नसेल तर प्रत्येक थकव्याबरोबर एक नवे बळ प्राप्त होते. परंतु जे महत्वपूर्ण योजना करतात आणि महत्वाचे निर्णय घेतात. त्यांना असंतुलित आहारामुळे त्यांचे महत्वाच्या कार्यात अडथळे येतात. बेढब शरीर आणि पुढे आलेल्या पोटामुळे मानसिकता आणि बौध्दिक पात्रता अस्वस्थ होते. चिडचिडेपणा निर्माण होतो आणि पापात पडण्याची जास्त शक्यता असते.MHMar 239.3

    चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आजारपण येते आणि आजारपणात त्यांच्या सर्व योजना ज्यामुळे आशिर्वाद बनू शकत होते ते एकीकडे ठेवल्या जातात. यामुळे अनेक अन्याय, अत्याचार आणि निर्दयीमार्ग पत्करले जातात.MHMar 240.1

    येथे त्या सर्वांसाठी जे एके ठिकाणी बसून मानसिक काम करतात. त्यांच्यापैकी जितक्या लोकांनामध्ये नैतिक साहस आणि आत्मनियंत्रण आहे ते यांचा अनुभव घेऊन पाहू शकतात. प्रत्येक भोजनाच्या वेळी त्यांनी ते यांचा अनुभव घेऊन पाहू शकतात. प्रत्येक भोजनाच्या वेळी त्यांनी दोन किंवा तीन साधारण अन्नपदार्थ घ्यावेत. आणि जितकी भूक भागेल तेवढेच अन्न खावे. त्यापेक्षा जास्त खाऊ नये. दररोज व्यायाम करा आणि पाहा लाभ होतो किंवा नाही.MHMar 240.2

    निष्क्रिय जीवन जगणारे लोकांसारखे कष्ट करणाऱ्या लोकांना व जे नियमित व्यायाम करतात त्यांना भोजनाची मात्रा आणि गुणवत्तेवर विशेष लक्ष देण्याची गरज नाही. परंतु त्या लोकांचे आरोग्य उत्तम राहील. जे आपल्या भोजनावर आत्मनियंत्रण करतात.MHMar 240.3

    काही लोकांची इच्छा आहे की कोणी तर आहाराविषयी योग्य आणि सविस्तर माहिती द्यावी. ते वाजविपेक्षा जास्त खातात आणि नंतर त्यांना पश्चाताप करावा लागतो. अशाप्रकारे ते नेहमी खाण्यापिण्याविषयीच विचार करीत राहतात. हे जसे असावे तसे होत नाही. एक व्यक्ति दुसऱ्या व्यक्तीसाठी योग्य नियम बनवू शकत नाही. प्रत्येक व्यक्तिला स्वतःचा विवेक आणि आत्मनियंत्रणाचा अभ्यास करून सिद्धांताच्या आधारावर कार्य करायला हवे.MHMar 240.4

    आपली शरीरे ख्रिस्ताकरवी विकत घेतली आहेत आणि आम्हाला वाटेल तसा शरीराचा वापर करण्याची परवानगी नाही. ते सर्व जे आरोग्याचे नियम समजतात. जे परमेश्वराने त्यांची जीवनात स्थापन केले आहेत. त्या सिद्धांताच्या आधारावर आपण त्याच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. म्हणजे आपणास आपल्या कर्तव्याची जाणीव होईल. आपणास देवाच्या व्यवस्थेचे उल्लंघन करण्याचे परिणाम भोगावेच लागतात. आपल्या व्यक्तिगत सवया आणि व्यवहारासाठी परमेश्वराला तसा हिशोब द्यावाच लागतो. म्हणून आपल्यासमोर प्रश्न तो नाही की जगाचा व्यवहार कसा आहे? परंतु मला एक व्यक्ति या नात्याने परमेश्वराने दिलेल्या निवासस्थानाशी कसा व्यवहार करावा याचे उत्तर द्यावे लागेल. कधीही आणि कोणत्याही परिस्थितीत आपण मांसाहार करु नये. कोणत्याही जीवधारी प्राण्याचे मांस कोणत्याही अवस्थेत आरोग्याच्या हिताचे नसते. कारण प्राणी काहीही खातात आणि कसलेही पाणी पितात. MHMar 240.5

    याच्याही पुढे जाऊन जेव्हा प्राणी आजारी होऊन निकामी होतात तेव्हा त्यांना बाजारात विकले जाते आणि त्यांची कतल केली जाते. त्याचप्रमाणे ज्या प्राण्यांची कतल करण्यासाठी वापर करण्यात येते त्यांना धष्ट पुष्ट करुन मारण्यात येते. त्यामुळे त्यांच्यामध्य रोग निर्माण होतात. कारण त्यांना प्रकाश आणि शुद्ध हवा मिळत नाही एकाच ठिकाणी त्यांना डांबून ठेवले जाते. त्यांची पशूशाला अस्वच्छ असते. व रोगजंतूची त्यांना लागण होते. व ते रोगग्रस्त होतात. त्यांना खाण्यासाठी सडका आहार दिला जातो. कत्तलखान्यामध्ये आणले जाणारे प्राणी दूरवरच्या प्रवासाहून आणले जातात. त्यांना विक्रीच्या ठिकामी पोहोचवीपर्यंत ते खूप थकलेले असतात. प्रवासामध्ये त्यांना चारापाणी दिले जात नाही. तसेच उष्णता आणि धुळीने त्यांचे अतिहाल होतात. वाहतुकीच्या वाहनामध्ये त्यांना गर्दीने उभे करण्यात येते. थकलेली ही जनावरे भूकेने व तहानेने ती अर्धमेली झालेली असतात. अशा जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस मानवाच्या खाण्यासाठी विकले जाते.MHMar 241.1

    अनेक ठिकाणी मासे असतात तेथील घाणेरडे अन्न ते खातात तेच मासे बाजारामध्ये विकले जातात आणि त्यांच्याकरवी मनुष्यांमध्ये रोगांचा फैलाव होतो. ज्या नदीमध्ये मासे असतात त्या नदीत शहरातील ड्रेनेजचे पाणी सोडले जाते. या घाणेरड्या पाण्यात असणारे मासे विकत घेऊन लोक ते खातात व आजारी पडतात. मासे खाणारे लोक विचार करीत नाहीत की हे मासे चांगल्या पाण्यातील आहेत का घाणेरड्या पाण्यातील आहेत? घाणेरड्या पाण्यातील मासे खाण्यात आल्यास ते रोगाने भरलेल असतात तेच मासे खाऊन लोकही आजारी पडतात व कधी कधी मृत्युमुखी पडतात. MHMar 241.2

    मांसाहाराचा प्रभाव लवकर दिसून येत नाही परंतु हळूहळू मनुष्य आजारी पडतो आणि बरे न होणारे आजार जडतात. तरीही चांगल्या जनावराचे व चांगल्या पाण्यातील मासे मांस खाल्ले तरीही ते आरोग्यास हानीकारकच असतात. अनेक लोक ज्या रोगाने आजारी पडतात व मरतात ते रोग जनावराचे मांस खाल्यानेच उदभवतात असे दिसून आले आहे. सतत मांसाहार करणारे सुस्त व आळशी होतात व त्यांची बुद्धी सुद्धा चालत नाही, त्यांचे नैतिक विचार चांगले नसतात तर ते वाईटच असतात. तसेच त्यांना वेगवेगळे आजार निर्माण होतात. म्हणून मांसाहार करणे हे कोणत्याही मार्गाने शरीराला हानीकारक असतात. त्यांची नैतिक पातळी खालावते, शारीरिक आरोग्य ढासळते. मांसाहार करणाराचे मन आणि आत्मासुद्धा प्रभावित होतो. मांस खाणाऱ्यांनी पशुवर होणाऱ्या अत्याचाराचा विचार करावा. जे त्यांच्या जीव घेतात आणि जे पाहतात त्यांच्या मनावर जे प्रभाव पडतात त्याबाबतीत विचार करा. विचार करा की कोमल मनावर परिणाम होऊन त्यांची कोमलता नष्ट होते. परमेश्वराने सर्व जीवधारी प्राणी एकाच प्रकारे निर्माण केले आहेत प्रत्येक जीवाला वेदना होतात. याचा विचार कोणी करतो का?MHMar 241.3

    हे एक रहस्य आहे की मुक्या जनावरांना जी वागणूक दाखविली जाते ती मानवाची बुद्धी कोणत्या पातळीवर पोहोचली आहे. ही जनावरे पाहतात, ऐकतात, प्रेम करतात, भीतात व वेदनाही सहन करतात. त्यांना भावना असतात. परंतु ते व्यक्त करू शकत नाहीत. त्रासाच्या वेळी ते इतरांना सहानुभूति व्यक्त करतात. अनेक जनावरे त्यांची काळजी घेणाऱ्यांना प्रेम देतात. ते इतके प्रेम देतात की मनुष्यसुद्धा इतके प्रेम करु शकत नाही. काही जनावरे आपल्या मालकासाठी मरायलाही तयार होतात व मरतातही. मानवाला ते खूप लळा लावतात.MHMar 242.1

    सहानुभूतिचे हृदय असणारा मनुष्य आणि त्याचे पाळीव जनावर आपल्या मालकाला जीव लावते असा मनुष्य आपले जनावर कसायाला देऊ शकेल का? आणि जरी दिले तरी ते मांस खातील का? त्याला ते धाडस होईल का?MHMar 242.2

    जनावरांचे मांस खाल्ल्यामुळे मनुष्याला शक्ति प्राप्त ही चुकीची समजूत आहे. मांसाहाराशिवाय शाकाहारानेसुद्धा मनुष्याच्या शरीरातील सर्व गरजा पूर्ण केल्या जाऊ शकतात. धान्य, फळे, सुकी फळे, कडधान्य ही सर्व मनुष्यांसाठी अति फायदेशीर असतात. सर्व प्रकारच्या भाज्यांमधूनही मानवाच्या आरोग्यासाठी. शरीराच्या वाढीसाठी उपयुक्त असतात. शाकाहाराने मनुष्याच्या शरीरामध्ये रक्त निर्माण होते. हाडे बळकट होतात व शरीराची वाढ होते. जर मानवाला मांसाहाराचीच अति गरज असती तर मानवाच्या सुरुवातीपासूनच मांसाहाराची तरतुद करून दिली असती. जे मांसाहार करतात त्यांना त्याचे व्यसन लागते जसे मद्यपान करणाराला व्यसन लागते तसेच मांसाहाराचे सुद्धा व्यसनच लागते. परंतु मांसाहारीने मांसाहार बंद करून शाकाहाराचा स्वीकार केला तर त्याचाच फायदा होईल.MHMar 242.3

    जेव्हा मांसाहारी मांस खाण्याचे सोडून देईल. तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ प्राप्त होतात, जसे धान्य, डाळी, कडधान्य सर्व प्रकारची द्विदले, ताजीफळे, सुकी फळे, सर्व प्रकारच्या हिरव्या भाज्यांचा आहारामध्ये समावेश करणे आवश्यक आहे. हे सर्व पदार्थ पोषक आणि स्वादिष्ट असतात. जे लोक अति कमजोर असतात त्यांच्यासाठी हे अति महत्वाचे असते. तसेच जे लोक कष्टाची कामे करतात त्यांच्यासाठी सुद्धा शाकाहाराचे सर्व पदार्थ महत्त्वाचे असतात. काही गरीब देशांमध्ये सर्वात स्वस्त भोजन हे मांसच असेत. अशा परिस्थितिमध्ये आहारात बदल करणे अति अवघड कार्य असते. परंतु शाकाहार प्रभावीच असतो. आम्ही लोकांची अवस्था आणि त्यांच्या सवयीवर लक्ष देणे आवश्यक आहे. आणि त्यांच्याशी सावधपणे व्यवहार करणे आवश्यक आहे की त्यांच्या योग्य विचारांवर सुद्धा आपण जोर जबरदस्ती करू शकत नाही. कोणालाही अचानक परिवर्तन करण्याची सक्ति आपण करू शकत नाही. मांसाहार भोजनाऐवजी आरोग्यवर्धक शाकाहारी भोजनाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. ते स्वस्तही असावे. यामध्ये स्वयंपाक करणारावर फार महत्वाची जबाबदारी असते. सावधगिरीने आणि दक्षता घेऊन असे भोजन करावे की ते पौष्टिक आणि स्वादिष्टही असावे. म्हणजे ते मांसाहाराचे स्थान घेऊ शकेल. MHMar 243.1

    सर्व गोष्टींमध्ये मनुष्यामध्ये विवेक व संयम असावा. इच्छेचा सहयोगही असावा. जे काय चांगले आहे त्याची उपलब्धता करून द्या. मांसाहारीच्या स्वइच्छेने परिवर्तन होऊन त्याने शाकाहाराचा स्वीकार करावा. असे जर झाले तर मांसाहार करणारा पुन्हा मांसाहाराची मागणी करणार नाही. मांसाहार करणाऱ्या सर्वांचे लक्ष मांसाहार टाळून शाकाहाराकडे वळविण्याची ही वेळ योग्य नाही काय? स्वर्गीय दूतांबरोबरचा सहवास करण्यासाठी आपल्यामध्ये शुद्धता नसावी काय ? आमच्यामध्ये पवित्रपणा नसावा काय ? मग कोणत्या प्रकारचा आहार आम्ही करावा ? कारण मांसाहारामुळे आपले शरीर आणि बुद्धीवरसुद्धा अनिष्ट परिणाम होतो. आपले भोजन स्वादिष्ट व पुर्णानंद घेण्यासाठी परमेश्वराने निर्माण केलेल्या पशुंचा जीव ते कसे घेतील ? या उलट त्यांनी शुद्ध व स्वादिष्ट शाकाहाराकडे वळावे. जे आम्हाला व आमच्या पूर्वजांना एदेन बागेमध्ये देण्यात आले होते. परमेश्वराने मानवास सर्व प्राणामात्रांवर अधिकार दिला आहे याचा अर्थ असा होत नाही की मानवाने त्यांना मारून त्यांचे मांस खावे? स्वर्गीय देवदूत मांसाहार करतात काय? मूळीच नाही.MHMar 243.2

    *****

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents