Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    स्व सहाय्यक कार्यकर्ता

    अनेक ठिकाणी स्व सहाय्यक किंवा स्वयंसेवक यशस्वीपणे आपले कार्य करतात. प्रेषित पौल आणि इतर प्रेषित होते ते सर्व स्वयंसेवक कार्यकर्तेच होते या सर्वांनी देवाचे वचन सर्व जगभर पसरविले. यामध्ये त्यांना खूप यश मिळाले. पौलाने तर आशिया आणि युरोपच्या मोठ मोठ्या शहरांमधून दररोज सुवार्ता प्रचार केला. लोकांना येशूविषयीचे ज्ञान दिले. हे सर्व करीत असतांना त्यांना स्वत:च्या व आपल्या साथीदारांच्या गरजाही पुरविल्या. इफिसमधील लोकांना त्याने लिहिलेल्या पत्रांद्वारे सुवार्ता प्रचार करतांना त्यांच्या रोजच्या गरजांसाठी त्याच्याकडे जी कला होती त्या करवी तो आपला व साथीदारांचा उदरनिर्वाह करीत असे यावरुन त्याच्या श्रमाची कल्पना लोकांना येते. प्रत्येक स्वयंसेवक सुवार्ता प्रचारकांसाठी हे एक उत्तम उदाहरण आहे.MHMar 105.3

    तो म्हणाला, “मी आशिया प्रांतात पहिल्याने ते पाऊल टाकल्या दिवसापासून तुम्हा बरोबर नेहमी कसा होतो. जे हितकारक होते ते तुम्हांला सांगण्यात आणि चार लोकांत घरोघरी शिकविण्यात मी कसूर केली नाही. मी कोणाच्या सोन्याचा रुप्याचा किंवा वस्त्राचा लोभ धरिला नाही. माझ्या व माझ्या सोबत्यांच्या गरजा भागविण्याकरिता ह्याच हातांनी श्रम केले. हे तुम्ही स्वतः जाणून आहात. सर्व गोष्टीत मी तुम्हांला कित्ता घालून दाखविले आहे की तसेच तुम्हीही श्रम करुन दुर्बलांना सहाय्य करावे आणि घेण्यापेक्षा देणे ह्यात धन्यता आहे असे जे वचन प्रभु येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी.” (प्रेषित २०:१८-३५)MHMar 106.1

    आजसुद्धा बरेचसे लोक जर त्या प्रकारे आत्मसमर्पणरुपी स्वयंसेवकाचे कार्य करतील.MHMar 106.2

    आजसुद्धा अनेक लोकांना जर स्वत:ला समर्पित भावना ठेऊन स्वयंसेवक बनून सुवार्ता प्रचारकाचे कार्य केले तर त्याचे योग्यच परिणाम दिसून येतील. दोन किंवा अधिक लोकांनी मिळून या कार्यारत सुरुवात करायची आहे. लोकांच्या घरी जाऊन प्रार्थना करणे, गीत गाणे, स्तुति, आराधना करणे, त्यांना शिकविणे आणि पवित्र शास्त्रामधून शिकविणे, आजाऱ्यांची सेवा करणे अशाप्रकारे लोकांमध्ये धर्म जागृति आणावयाची असते. काही लोक पुस्तकांची विक्री करुन स्वत:चा खर्च काढतील इतर काहीजण काही कलाकुसरीची कामे करुन आपला उदरनिर्वाह करतील. आपली दुर्बळता समजून घेऊन विनम्रपणे परमेश्वरावर अवलंबून राहून आपल्या कार्यामध्ये पुढे जातील तर त्यांना एक वेगळाच अनुभव येईल.MHMar 106.3

    पूर्ण जगामध्ये दयापूर्ण संदेशाची गरज आहे. ख्रिस्ती परिवारांना ही एक सुवर्णसंधी आहे त्यांना अशा जनसमुदायामध्ये जाऊन कार्य करायचे आहे की जे अंधारात आणि चुकांमध्ये सापडले आहेत. ख्रिस्ती लोकांनी तेथे जाऊन त्यांना प्रीति आणि ऐक्याचा संदेश द्यावा. त्यांनी आपल्या धन्याच्या कार्यामध्ये सहकार्य करावे. त्यांच्या समस्या सोडवाव्यात, त्यांना अडचणीतून आणि त्रासातून वर काढावे. जगाच्या पाठीवर जेथे कोठे लोक आत्मिक अंधारामध्ये चाचपडत आहेत तेथे त्यांनी ख्रिस्ताचा प्रकाश घेऊन जावे. स्वत:मध्ये त्यांनी ख्रिस्ताचा प्रकाश धारण करुन त्यांना प्रकाशात आणावे असे केल्याने त्यांचे ते महान कार्य संपन्न होईल.MHMar 106.4

    हे कार्य आत्मबलिदानाची मागणी करते. तरी अधिक लोक सर्व अडथळे दूर होण्याची वाट पाहतात. परंतु अशाने हे कार्य कधीच होणार नाही. परिणामी लोकांची गर्दी आशाहीन राहते आणि परमेश्वराविना मरत आहे. पूर्वीच्या लोकांनी जे कार्य केले ते आत्मियतेने कळकळीने केले. काही लोक स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी किंवा ज्ञान प्राप्त करुन घेण्यासाठी यामध्ये भाग घेतात, परंतु शेवटी त्यांच्या हाती निराशा येते. याशिवाय अतिअल्प लोक आपल्या परिवारासहित अडचणी, त्रास सहन करुन मानवतेसाठी व त्यांच्या सेवेसाठी गरजवंतांच्या सेवेसाठी स्वत:ला वाहून घेतात.MHMar 107.1

    खरी सेवा हीच आहे की जेथे लोक ज्या अवस्थेमध्ये आहेत तेथे जाऊन त्यांची सेवा करतात अशा प्रकारची जनसेवा केल्याने ते लोकांची हृदये जिंकतात. यामुळे नाश होत जाणाऱ्या आत्म्यापर्यंत आपण पोहोचतो, मार्ग मोकळे होतात. आपल्या सेवाकार्यामध्ये लक्षात ठेवणे आवश्यक आहे की ख्रिस्ताबरोबर एक झाल्यामुळे आपण त्या महान मुक्तिच्या योजनेमध्ये भाग घेतो. परमेश्वराचे प्रेम ख्रिस्ताला लोकांचे दुःख पाहू कळवळा आला. त्यांना बरे केले तसेच आपणसुद्धा त्याच्याचसारखेच दुःखीतांना आरोग्यदान आणि सेवा करुन त्याच्या जीवनदायी कार्यामध्ये स्वत:ला वाहून घेतो. आपण लोकांना ख्रिस्ताच्या प्रीतिमय वर्तुळामध्ये घेऊन येतो. त्यासाठी मार्ग तयार करताना आपली भाषा शुद्ध, नम्र व प्रेमळ असावी. आपल्या सेवेमध्ये स्वार्थ नसावा. आपल्या आचरणाचा आनंद परमेश्वराच्या आशीर्वादाची साक्ष देतील. जगामध्ये परमेश्वराची शुद्धता त्याची प्रीति, त्याची धार्मिकता त्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्यां स्वयंसेवकांमधून लोकांना दिसणे आवश्यक आहे. म्हणजे लोकांना ख्रिस्ताची सुंदरता दिसून येईल.MHMar 107.2

    लोकांच्या चुकांना आपण वाईट सवयी समजून त्यावरच हल्ला केला तर त्याचा खूप कमी फायदा होतो. सामान्यपणे अशाप्रकारच्या प्रयत्नाने फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त होते. याकोबाच्या विहीरीवर शमरोनी स्त्रीबरोबर बोलताना ख्रिस्ताने तिची निंदा न करता चांगल्या शब्दात आपले संभाषण तिच्यासमोर ठेवले. “येशूने तिला उत्तर दिले, देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यावयास पाणी दे असे तुला म्हणणारा कोण आहे. हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते.” (योहान ४:१०). तिच्याबरोबर बोलणी करुन त्याने तिला त्या खजिन्याकडे नेले तो त्याच्याजवळ होता. त्याने तिला चांगले काही देण्यासाठी म्हणजे जीवनी पाणी देऊ केले. तिला त्याने सुवार्तेकडे आनंद आणि आशा देऊ केली. हे असे एक उदाहरण आहे जे आम्हाला कार्य करायचे आहे. जे लोक जवळ आहे त्यापेक्षाही उत्तम त्यांना द्यायचे आहे जे आमच्याकडे आहे अर्थात ते म्हणजे ख्रिस्ताची शांती. आम्हाला त्यांना ख्रिस्ताच्या पवित्र प्रीति विषयी सांगायचे आहे. त्याच्या पवित्र आज्ञांविषयी माहिती द्यायची आहे. त्यांना सांगायचे आहे की देवाचे नियम हा त्याचा स्वभाव आहे. त्याचे अतिव प्रेम आहे अशी ही त्याची पवित्र रचना आहे. ही सर्व टिकणारी आहेत, कारण हे जग नश्वर आहे. जगाचा आनंद क्षणभंगूर आहे. याच्या ऐवजी स्वर्गीय आनंद अविनाशी आहे. त्याचा माहिमा सर्वकाळ टिकणारा आहे. लोकांना त्यांच्या स्वातंत्र्याविषयी विश्रांती विषयी सांगा. या सर्व गोष्टी मुक्तिदात्यांकडून मिळतात. ख्रिस्ताने घोषणा केली आहे की “परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनाच उफळत्या पाण्याचा झरा असा होईल.” (योहान ४:१४).MHMar 107.3

    ख्रिस्ताला असे ओरडून उंच करा की, “हा पाहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा.” (योहान १:२९). केवळ तोच हृदयांच्या इच्छा पूर्ण करुन त्यांना संतोष देतो आणि आत्म्याला शांती देतो.MHMar 108.1

    जगातील समस्त लोकांमध्ये सुधारक लोकांना सर्वात जास्त नि:स्वार्थी सर्वात अधिक दयाळू आणि सर्वात अधिक नम्र होणे आवश्यक आहे. त्यांच्या जीवनामध्ये नि:स्वार्थ कार्याची सच्चाई दिसून आली पाहिजे. ज्या कार्यकर्त्यांमध्ये नम्रता कमी दिसते. इतरांचे अज्ञान व हट्टीपणा पाहून अधीर होऊन प्रतिक्रिया करतात. विचार न करता कठोरपणे बोलतात त्यांच्यासाठी लोकांच्या हृदयाचे दरवाजे कायमचे बंद होतात. त्यांच्याकडे हे कार्यकर्ते परत कधीच जाऊ शकत नाहीत.MHMar 108.2

    ज्या प्रकारे सकाळी धुके पडून रोपांमध्ये टवटवी येते त्याचप्रकारे आमचे शब्द लोकांच्या मनावर पडून त्यांचे समाधन झाले पाहिजे. त्याच्या ज्या चुका आहेत त्यांना धक्काही न लावता त्यांना जिंकले पाहिजे म्हणजे त्यांच्या चुका आपोआप सुधारतील. परमेश्वराची योजना प्रथम हृदयापर्यंत पोहोयचणे ही आहे. जीवनामध्ये सुधारणा आणणारे परमेश्वराचे सामर्थ्यावर विश्वास ठेऊन आम्ही त्यांना प्रेमाने सत्य सांगावे. जे शब्द प्रेमाने बोलले जातील ते पवित्र आत्म्याकरवी लोकांच्या आत्म्यावर प्रभावी परिणामकारक ठरतील. स्वाभाविकपणे आपण सर्व आत्मस्वार्थी आणि हट्टी आहोत. परंतु जेव्हा आपण येशूने शिकविलेले धडे शिकतो तेव्हा आम्ही त्याच्या स्वभावाचे सहभागी होतो. अशाप्रकारे आपण ख्रिस्ताचे जीवन जगतो. ख्रिस्ताचे अद्भुत जीवन तो हसणाऱ्या बरोबर हसला व रडणाऱ्यांबरोबर रडला. अगदी मृदू भावनेने त्यांच्यामध्ये सामील झाला. ज्यांना प्रामाणिकपणे त्याच्या मागे जाऊ इच्छितात. त्यांच्यावर त्याच्या स्वभावाचा खोल प्रभाव होणे आवश्यक आहे. दयाळूपणाचे वचन आणि कार्याकरवी थकलेल्या पायांना आणि मार्ग सुलभ करण्यासाठी उपयोगी येतात.MHMar 108.3

    “शिणलेल्यास बोलून कसा धीर द्यावा ते समजावे म्हणून प्रभु परमेश्वराने मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे. तो रोजरोज सकाळी मला जागे करतो. शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून कान उघडितो.” (यशया ५०:४). आमच्या चारी बाजूला दुःखी आत्मे आहेत. येथे-तेथे प्रत्येक ठिकाणी आम्ही त्यांना पाहू शकतो. या तर आपण या दुःखीतांना शोधून काढू आणि त्यांच्या हृदयाला शांती देऊ या. त्यांच्याशी प्रेमळ शब्दांनी बोलू आपणास असे माध्यम बनायचे आहे की यामुळे सहानुभूतिपूर्वक पाण्याचा तजेला देणारी थंड जलधारा बनू.MHMar 109.1

    लोकांशी व्यवहार करताना आम्हांला लक्षात ठेवायला हवे की दुसऱ्यांच्या अनुभवानुसार नाशवंत बाजूने हे अध्याय बंद आहेत. लपलेले आहेत. आठवणींच्या पानांवर दु:खाने भरलेला इतिहास आहे. ज्याला जिज्ञासू नजरेतून लपवून ठेवला आहे. तेथे कठीण परिस्थितितील दीर्घ व कठीण संघर्ष कदाचित घरगुती जीवनातील त्रास ज्या रोजच्या जीवनातील आत्मविश्वास कमजोर करतात आणि विश्वासाला दुर्बल बनवितात. अशा गोष्टी दीर्घ काळ चालतात. जे लोक मोठ्या विषमतेमध्ये जीवनाची लढाई लढत आहेत. प्रेमाने भरलेले प्रयत्न करुन त्यांनी थोडी शक्ति व साहस दिले तर त्यांच्यासाठी एक खऱ्या मित्राने सहाय्य केल्यासारखे होईल. अशा मित्रांनी आधारासाठी दिलेला हात सोने व चांदीपेक्षा मौल्यवान असतो. दयापूर्ण शब्द स्वर्गदूतांच्या स्वागताप्रमाणे होईल. MHMar 109.2

    गरीब लोक मोठ्या संख्येने रोजची मजुरी मिळविण्यासाठी धडपड करतात त्यामुळे त्यांना त्या दिवसाची थोडशी मजुरी मिळून आपल्या कुटुंबासाठी त्या दिवसाची गरज भागेल. कठीण श्रम करण्यासाठी ते विवश आहेत. कठीण श्रम आणि वर अनेक गोष्टींना ते वंचित राहतात. अशातच त्यांचे श्रम अधिकच असहनीय होते आणि तशातच त्यांना त्रास व आजार आल्यास हे ओझे असह्य होते. यामुळे अधिक निर्माण झालेल्या चिंताकाळ ज्यामुळे कोणाकडे जाऊन मदत मागावी हे त्यांना सुचत नाही. त्यांच्या परीक्षेमध्ये त्यांच्या हृदयातील पीडा आणि निराशामध्ये त्यांना सहानुभूति द्या. असे केल्यास तुम्हाला त्यांना मदत करण्यासाठी एक मार्ग मोकळा होईल म्हणजे त्यांच्या सहाय्यासाठी तुम्ही पुढे सरसावाल. त्यांच्यासमोर परमेश्वराचे वचन उघडून त्याने देऊ केलेले सहाय्य अभिवचनावर चर्चा करा. त्यांच्याबरोबर प्रार्थना करा. अशाप्रकारे त्यांची हिम्मत बांधा.MHMar 109.3

    जेव्हा आत्मा आजारी होतो, धाडसपणाची धडधड कमी होते अशावेळी त्यांना आनंद आणि उत्साही शब्द बोलले तर स्वत: उद्धारकर्त्याने बोलल्यासारखे वाटेल. जेव्हा हृदय आनंदी होते तेव्हा स्वर्गीय दूतांना सर्वांत जास्त आनंद होतो. आनंदाने ते त्यांच्याकडे पाहतात.MHMar 110.1

    मनुष्यांमध्ये अनेक शतकांपासून परमेश्वर स्वर्गीय बंधुप्रितीची भावना जागाविण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी आपण ख्रिस्ती या नात्याने त्याचे सहकारी बनू जगामध्ये अविश्वास आणि असंतोष पसरत आहे. अशा अवस्थेत ख्रिस्ताच्या शिष्यांनी त्या भावना प्रगट कराव्यात ज्या स्वर्गामध्ये आहेत. ख्रिस्तासारखे बोला व ख्रिस्तासारखे कार्य करा. निरंतर त्याचा स्वभाव त्याचे गुण प्रगट करा. त्या प्रीतिची दौलत जाहीर करा. जी त्याच्या सर्व शिकवणीमध्ये आणि मनुष्याबरोबर असणाऱ्या त्याच्या सर्व व्यवहारातून दिसून येत होती. सर्वांत नम्र कार्यकर्ता ख्रिस्ताच्या सहयोगाने हृदयाच्या त्या तारांना स्पर्श होऊ शकतो. त्या तारांचा झनकार पृथ्वीच्या शेवटपर्यंत जातो आणि ते संगीत अनंत काळापर्यंत वाजत राहील.MHMar 110.2

    स्वर्गीय बुद्धी मानवीय साधनांशी सहयोग करण्याची प्रतीक्षा करीत आहे. अशासाठी की जगाला दिसून येईल की स्वर्गीय संगीताद्वारे मानव काय बनु शकतो. आणि जे लोक स्वत:चा नाश करण्यासाठी तयार आहेत त्यांना वाचविण्यासाठी मानव काय करु शकतो. जे लोक आपली घमेंड एकीकडे ठेऊन पवित आत्म्याला आपल्या हृदयात कार्य करण्याची परवानगी देतात आणि परमेश्वरासाठी पूर्ण रुपाने आपले जीवन अर्पण करतात त्यांच्या उपयोगासाठी काही सीमा नाही. जे सर्व आपापली शरीरे, आत्मा आणि प्राण परमेश्वराच्यां सेवेसाठी अर्पण करतात ते सतत शारीरिक, मानसिक आणि आत्मिक शक्ति प्राप्त करीत राहतात. स्वर्गाची कधीही न संपणारी मदत त्यांच्या आदेशावर उपलब्ध होईल ख्रिस्त त्यांना स्वतः आपला आत्मारुपी आत्मा आपली सर्वोच्च शक्ति लावतो. आम्हांला जो आशीर्वाद दिला आहे त्या करवी आम्ही विजय प्राप्त करु शकतो. जे आमचे भ्रम, पूर्वग्रहकरवी आमचे गुणदोष व विश्वासाच्या कमीपणामुळे आम्हांला असंभव असे होते ते आता शक्य होतात.MHMar 110.3

    प्रत्येक ती व्यक्ति जी प्रभुच्या सेवेसाठी स्वत:चे संपूर्ण समर्पण करते त्यांच्यासाठी परमेश्वर अनियंत्रित शक्ति प्रदान करील. म्हणजे ते जोमाने कार्य करतील. तो लोकांच्या मनावर कार्य करील. यामुळे या जगामध्ये येणाऱ्या जगाती कार्य पूर्ण करण्याचे दिसून येईल. जंगल व निर्जन प्रदेश अति आनंदी व प्रफुल्लित होतील आणि आनंदामुळे जयजयकार करतील. त्यांची शोभा लबानासारखी होईल. कर्मेल आणि शोरानप्रमाणे तेजोमय होईल ते यहोवाची शोभा आणि आमच्या परमेश्वराचे तेज पाहतील.MHMar 111.1

    “अरण्य व रुक्ष भूमिही हर्षतील वाळवंट उल्हासेल व कमळाप्रमाणे फुलेल. ते अत्यंत प्रफुल्लित होईल. आनंदाने गाऊन उत्सव करतील, लबानोनाची शोभा आणि आमच्या परमेश्वराचे तेज पाहतील.MHMar 111.2

    “अरण्य व रुक्ष भूमिही हर्षतील वाळवंट उल्हासेल व कमळाप्रमाणे फुलेल. ते अत्यंत प्रफुल्लित होईल. आनंदाने गाऊन उत्सव करतील, लबानोनाची शोभा त्याला मिळेल. कर्मेल व शारोन यांचे ऐश्वर्य त्यांना प्राप्त होईल. ती परमेश्वराचे वैभव आमच्या देवाचे ऐश्वर्य पाहतील. गलित हस्त दृढ करा. लटपटणारे गुडघे बळकट करा. घाबऱ्या मनाच्यास म्हणा. धीर धरा, भिऊ नका, पाहा तुमचा देव सूड घ्यावयास अनुरुप असे प्रतिफळ द्यावयास येईल. तो येईल व तुमचा उद्धार करील.MHMar 111.3

    तेव्हा अंधाचे नेत्र उघडतील, बहिऱ्यांचे काम खुले होतील, तेव्हा लंगडा हरिणा प्रमाणे उड्या मारील. मुक्याची जीभ गरज करील कारण रानात जलप्रवाह , वाळवंटात झरे फुटतील. जेथे मृगजल दिसते तेथे तलाव होईल. तृषित भूमीचे ठिकाणी उफळते झरे होतील. कोल्हे राहतात त्या स्थळी बोरु व लव्हाळे या सहित गवत उगवेल. तेथील मार्ग राजमार्ग होतील. त्याला पवित्र मार्ग म्हणतील. त्याने अपवित्र जन जाणार नाहीत, पण तो त्यांच्यासाठीच परमेश्वराच्या लोकांसाठी होईल. त्या मार्गाने जाणारे गूढ असले तरी मार्ग चुकणार नाहीत. तेथे सिंह असणार नाहीत. हिंस्त्र पशुंचा तेथे रिघाव होणार नाहीत. तेथे ते आढळणार नाहीत, पण तेथे उद्धारलेले संचार करितील. मुक्त केलेले परमेश्वराचे लोक तेथे येतील. ते जयजयकार करीत सियानेत येतील. त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील. ते आनंद व हर्ष पावतील, दुःख व उसासे पळ काढतील. (यशया ३५:१-१०).MHMar 111.4

    *****MHMar 112.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents