Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    मिशनरी परिवार :

    मिशनरी लोकांनी जाऊन निर्जन ठिकाणी जाऊन राहावे. शेतकरी, भांडवलदार, बांधकाम करणारे गवंडी आणि इतर कला असणाऱ्यांनी या उपेक्षित ठिकाणी जाऊन राहावे. तेथील ओसाड भूमीची सुधारणा करावी उद्योगधंदे सुरु करावे आपणासाठी घरे बांधावीत आणि आपल्या शेजाऱ्यांना सहाय्य करण्यासाठी जावे.MHMar 145.2

    निसर्गाच्या ओबडधोबड ठिकाण आणि जंगलामध्ये परमेश्वराने अशा संदर वस्तूंनी सजावट केली आहे की सहसा नजरेस येत नाहीत. याच कार्यासाठी आम्हाला पाचारण करण्यात आले आहे. एवढेच नाही परंतु पृथ्वीवर दिसणाऱ्या विद्रप वाळवंटामध्ये सुद्धा सुंदर बगीचा बनू शकतो. “त्या दिवशी लेखांतील शब्द बहिरे ऐकतील व अंधळ्याचे डोळे काळोख व अंधार यापासून मुक्त होतील. नम्रजनांचा परमेश्वराच्या ठायीचा आनंद वृद्धि पावेल, लोकांतील दीन जन इस्राएलाच्या पवित्र प्रभूच्या ठायी उल्हास पावतील.” (यशया २९:१८-१९).MHMar 145.3

    व्यवहारिक निर्देशानुसार गरीबांना आपण अति प्रभावीपणे सहाय्य करु शकतो जसे नियमानुसार जे लोक ज्या प्रकारचे काम करण्यास शिक्षित नाहीत. त्यांच्यामध्ये श्रम करणे, धैर्य धरणे, आत्मत्याग अशा सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये नसतात ते या गोष्टीचे व्यवस्थापन करु शकत नाहीत. कारण त्यांना या गोष्टींची सवय नसते योजना करणे त्यांना जमत नाही. त्यांच्यामध्ये सावधानी आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता नसते. उलट जे करतील त्यामध्ये नुकसानच जास्त होईल त्यांचे निर्णय उचित असते तर ते आपल्या परिवाराला एक समाधानी जीवन देऊ शकतात. गरीबाचे नांगरलेले शेत विपुल अन्न देते, तरी अन्यायामुळे कित्येकांचा नाशही होतो.” (नीतिसूत्रे १३:२३).MHMar 145.4

    आम्ही गरीबांना देऊन त्यांना धोकाही देऊ शकतो त्यांचे नुकसान करु शकतो. कारण ते इतरांवर अवलंबून असतात. अशाप्रकारे दान स्वार्थपुर्ती आणि असमर्थतेला प्रोत्साहन देतो. यामुळे ते आळशी व ऐतखाऊ बनतात आणि असंयमतेकडे झुकतात. कोणतीही व्यक्ति आपली रोजी-रोटी कमवू शकतो. त्याला इतरांवर अवलंबून राहण्याचा अधिकार नाही म्हणून त्यांच्यामध्ये एक वाक्यप्रचार ओ “जग माझे माझी रोजची भाकर देण्याचे कर्जदार आहे.” यामध्ये खोटेपणा, फसवेगिरी आणि लूट असते. जे लोक काम करु शकतात. धडधाकट असतात आणि आपली रोजीरोटी कमाण्याची योगता त्यांच्यामध्ये असते. जग त्यांचे कर्जदार होऊ शकत नाही. वास्तविक पाहता दानधर्म करणे हे अगतिक लोकांना सहायक होते. जर एखादा आपल्या दारावर भुकेल्या अवस्थेत आला तर आपण त्याला तसेच भुकेले जाऊ देत नाही. त्याची गरीबी त्याच्या अभागीपणाचे कारण होऊ शकते. परंतु खऱ्या उपकाराचा अर्थ बक्षिस देण्यापेक्षाही अधिक आहे ते म्हणजे दुसऱ्यांचे भले करणे म्हणजे इतरांचे किंवा गरजवंतांचे कल्याण करणे त्यामध्ये एक रुचि आहे आणि घेतली पाहिजे दानधर्म करण्याची आवड असावी. आम्ही गरीबांच्या गरजा जाणून घेणे आवश्यक आहे आणि तशाप्रकारे त्यांचे सहाय्य करणे आवश्यक आहे. अशाप्रकारे त्यांना अधिक सहाय्य मिळू शकते त्यांची काळजी करणे त्यांच्यासाठी वेळ काढणे गरजवंतांची व्यक्तिगत भेट घेणे त्यांच्या समस्या ऐकून त्यांचे निवारण करणे हे पैसे देण्यापेक्षा अधिक मोलवान आहे. खरे दानधर्म हेच आहे.MHMar 146.1

    गरीब लोकांना हे शिकविणे आवश्यक आहे की त्यांना जे काय प्राप्त होते त्यासाठी श्रम करणे आवश्यक आहे. त्याबरोबर काटकसरही अति आवश्यक आहे. त्यांचा सदुपयोग करणेही आवश्यक आहे असे केल्याने ते सुद्धा इतरांना मदत करु शकतील. जे अपल्या जीवनातील महत्वाची वेळ वाया घालवित आहेत त्यांना वेळेचा सदुपयोग करण्याचे शिकवा. त्यांना दाखवून द्या की बायबलचा धर्म मनुष्याला कधीच आळशी बनवित नाही. ख्रिस्ताने नेहमी श्रमाला प्रोत्साहन दिले आहे.” तुम्ही सारा दिवस येथे रिकामे का उभे राहिला आहात?” (मत्तय २:६). असे त्याने बेकार उभे राहिलेल्यांना विचारले.” ज्याने मला पाठविले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत रात्र येणार आहे तिच्यात कोणालाही काम करिता येणार नाही. (योहान ९:४).MHMar 146.2

    जे आज्ञापालन करतात ते किती लाभदायक आहे हे ते प्रभाना देतात त्यांना एक संधी आहे की त्यांची कौटुंबिक जीवन रिती रिवाज आणि आपल्या वर्तुणूकीकरवी जगासमोर एक खरा आदर्श दाखवितात. त्यांचे जीवन मोलवान पवित्र आचरण सर्वजण पाहतात. ते आपला वेळ स्वत:लाच खुश करण्यासाठी घालवित नाहीत.MHMar 147.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents