Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    परीकथेतील काल्पनिक गोष्टी

    मुले आणि तरूणांच्या शिक्षणामध्ये परिकथा व मनोरंजक गोष्टी या काल्पनिक असूनसुद्धा मुलांमध्ये त्यांचे मोठे स्थान आहे. अशाप्रकारच्या पुस्तकांचा शाळेमध्ये वापर होतो. आणि बऱ्याच घरामध्ये सुद्धा दिसून येतात. ख्रिस्ती आईबाप आपल्या मुलांना अशा भाकडकथांची पुस्तके वाचण्यासाठी कशी काय परवानगी देतात ? जेव्हा मुले आपल्या आईबापांना या गोष्टीविषयी विचारतात तेव्हा या गोष्टी खोट्या असल्याचे ते सांगतात. कारण अशा शिक्षणाविरूद्ध ते असतात पण त्यांच्या वाईट परिणामापासून सुटका मिळत नाही. या गोष्टींमध्ये ज्या विचारधारा दिल्या आहेत त्यामुळे मुले चुकीच्या मार्गावर जातात. मुलांना त्यांच्या जीवनाचे चुकीची धारणा दिली जाते. त्यांना खोट्या व काल्पनिक गोष्टींची आवड दिली जाते.MHMar 349.2

    अशाप्रकारच्या काल्पनिक गोष्टींच्या पुस्तकांचा दूरपर्यंत प्रसार करणे हा एक सैतानाचा कावा आहे. तो तरूण व वृद्धांना त्यांच्या चारित्र्य आणि महान कार्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. मुले, तरुण व प्रौढांच्या जीवनाचा नाश करण्याची त्याची योजना असते. अशाप्रकारच्या धोक्यामध्ये सैतान पूर्ण जगाला सैतानाने ठेवले आहे. आणि सर्व जण या काल्पनिक व खोटारड्या जगामध्ये वाहवत जातात. अशाप्रकारे सैतान त्यांच्या मनातून परमेश्वराचे वचन विसरायला लावतो. परमेश्वराच्या वचनाची एकमेव सुरक्षा आहे तीच विसरायला लावण्याची ही सैतानाची योजना आहे. MHMar 349.3

    अशाप्रकारचे साहित्य लोकांच्या व मुलांच्या हातात मुळीच पडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण या काल्पनिक कथा वास्तवांपासून व सत्यापासून दूर जातात. काल्पनिक साहित्यापासून शालेय मुलांनाही दूर ठेवावे. यामुळे त्यांच्या मनामध्ये पापाचे बीज पेरले जाऊ शकते. जे लोक स्वतःला समजूतदार समजतात त्यांनी अशा पुस्तकांपासून दूर राहिल्यास तर ते सुरक्षित राहतील. आणि त्यांच्या सकारात्मक प्रभावाने तरुण आणि इतरांना कठीण परिक्षांना सामोरे जाण्याची गरज वाटणारी नाही आणि त्यापासून बचाव करण्यास कठीण वाटणार नाही.MHMar 350.1

    जे वास्तविक आहे आणि स्वर्गीय आहे त्याविषयी आमच्याकडे खूप काही आहे. जे ज्ञानाचे तहानलेले आहेत त्यांना दूषित पाण्याच्या झऱ्याकडे जाण्याची गरज नाही. यासाठी परमेश्वर म्हणतो, “ज्ञानाची वचने कान लावून ऐक, माझ्या ज्ञानाकडे चित्त लाव. कारण ती तू अंतर्यामी वागविली व आपल्या वाणीच्या ठायी स्थापिली तर किती चांगले होईल. परमेश्वरावर तुझा भाव असावा म्हणून मी वचने आज कळविली आहेत. सत्याच्या वचनाचे तत्व तुला कळवावे व तुला पाठविणाऱ्यांना सत्याचे वचन तू परत जाऊन सांगावी म्हणून मसली व ज्ञान यांनी युक्त अशा उत्कृष्ट गोष्टी मी तुला लिहून दिल्या नाहीत काय?” (नीतिसूत्रे २२:१७ ते २१). “त्याने याकोबासाठी निबंध स्थापिले, त्याने इस्राएलासाठी नियमशास्त्र केले त्याने आमच्या वडिलांसाठी आज्ञा केली की त्यांनी ते आपल्या वंशजास शिकवावे आणि पुढच्या पिढीने म्हणजे पुढे जन्मास येणाऱ्या संततीने ह्या गोष्टी जाणाव्या त्या आपल्या मुलांस कथन करण्यासाठी त्यांना द्युत व्हावे. त्यांनी देवावर भाव ठेवावा देवाची कृत्ये विसरू नये तर त्याच्या आज्ञा पाळाव्यात.” (स्तोत्र ७८:५-७). “परमेश्वराचा आशिर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.” (नीतिसूत्रे १०:२२).MHMar 350.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents