Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    आरोग्याचे शुभवर्तमान

    मनुष्याने ही गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे की परमेश्वराच्या नियमांचे पालन करुन भरपूर आशीर्वाद मिळविणे. तोही ख्रिस्ताच्या कृपेने आशीर्वाद मिळतो. ही परमेश्वराची कृपा आहे की परमेश्वराच्या नियमांचे पालन करण्याने परमेश्वर शक्ति देतो एवढेच नाही, परंतु वाईट सवयी मोडण्याची शक्तिसुद्धा तो देऊ शकतो. तीच एक शक्ति अशी आहे की जी सत्यावरच तिचा पाया आहे आणि सत्य मार्गामध्ये चालण्याची शक्ति देते. जेव्हा या शुभवर्तमानाचा त्याची शुद्धता आणि शक्तिमध्ये स्वीकार करण्यात येते तेव्हा सर्व रोग आजार शुद्ध व बरे होण्याचे कारण बनते. कारण हे रोगाजार पापामुळे निर्माण झालेले असतात. “तुम्ही जे माझ्या नामाचे भय धरणारे त्या तुम्हांवर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल. ज्यामुळे तुम्ही निरोगी बनाल.” (मलाखी ४:२).MHMar 70.2

    या जगामध्ये मिळणाऱ्या सर्व वस्तु मिळून तुटलेले हृदय आणि मनाला शांती मिळू शकत नाही. तसेच चिंता आणि आजार ही बरे होऊ शकत नाहीत. प्रसिद्धी, प्राविण्य, यश व श्रीमंती या सर्व गोष्टी दुःखी हृदयाचे समाधान किंवा करु शकत नाही किंवा उध्वस्त झालेले जीवन सावरु शकत नाही. परंतु आत्म्यामध्ये असणारे परमेश्वराचे जीवनच मानवाची एक मात्र आशा आहे.MHMar 70.3

    समस्त अस्तित्वाकरवी ख्रिस्त जे प्रेम पसरतो त्यामुळे जीवनदायी शक्ति येते. जीवनासाठी प्रत्येक अवयव आवश्यक आहेत जसे मेंदू, हृदय, नाडीचे ठोके या सर्वांना आरोग्यदायी शक्तिशी आवश्यक आहेत जसे मेंदू, हृदय, नाडीचे ठोके या सर्वांना आरोग्यदायी शक्तिशी साथ मिळते या शक्तिचे द्वार मनुष्याची सर्वोच्च शक्ति कार्य करण्यासाठी जागृत असतात. या शक्ति आत्म्याला दाबून ठेवणारे दोष, शोक, उत्तेजन आणि चिंता या सर्वांना मुक्त करतात. याचबरोबर स्थिरता व संतुलन प्राप्त होते. ख्रिस्ताची जीवनदायी शक्ति ही आत्म्याला आनंदीत करते. पवित्र आत्म्यामध्ये आनंद, आरोग्यदान आणि जीवन देणारी शक्ति असते. हा आनंद जगातील कोणतीही गोष्ट नष्ट होत नाही.MHMar 70.4

    आपल्या मुक्तिदात्याचे शब्द “माझ्याकडे या आणि मी तुम्हांला विश्रांती देईन” (मत्तय ११:२८). शारीरिक मानसिक आणि आत्मिक आजारातून बरे होण्याची उदाहरणे आहेत. जर मनुष्य त्याच्या चुकीच्या कामामुळे स्वत:वर कष्ट ओढूवन घेतो तरीही देव त्यांच्यावर दया करतो. त्याच्यावर जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी तो महान कार्य करतो. जरी अनेक शतकांपासून जगावर व मानवावर पापाने आपली पकड घट्ट केली आहे. सैतानाने आपल्या खोट्या व फसव्या चलाखीने परमेश्वराच्या वचनाचा चुकीचा अर्थ लावला आहे व लोकांच्या मनावर त्या विरुद्ध काळी सावली पसरवली आहे. तसेच परमेश्वराच्या चांगुलपणाविषयी त्यांच्या मनात संशय निर्माण केला आहे. परंतु तरीही पित्याची दया आणि त्याच्या प्रीतिची धार कमी झाली नाही ती स्वर्गातून पृथ्वीवर सतत येतच राहते. जर मनुष्याने आपल्या आत्म्याच्या खिडक्या उघडून परमेश्वराने दिलेल्या देणग्यांचा स्वीकार केल्यास परमेश्वराच्या चांगुलपणाविषयी कृतज्ञता व्यक्त करील. असे जर झाले तर चांगुलपणाची शक्ति मनुष्यावर वर्षावासारखी येईल.MHMar 71.1

    जो चिकित्सक ख्रिस्ताबरोबर योग्य सहकारी बनतो त्याने आपले प्रत्येक कार्य अति दक्षतेने करण्याचे नित्य प्रयत्न करायला हवे आणि आपले ज्ञान वाढवावे. अधिक ज्ञानाने उत्तम योग्यता आणि सखोल अभ्यास प्राप्त करण्यासाठी त्याच तत्परतेने अभ्यास करावा. म्हणजे आपल्या व्यवसायाची योग्य जबाबदारीनुसार तशा प्रकारची योग्यता मिळेल यामुळे सतत वरच्या थराला जाता येईल. प्रत्येक चिकित्सकाला जाणीव व्हायला हवी की जो चिकित्सक दुर्बल आणि पूर्ण ज्ञानी नाही तो रुग्णालाच नाही परंतु इतर चिकित्सकांनाही नुकसानदायक आहे. आणि जो योग्य चिकित्सा शिकत नाही किंवा सराव करीत नाही, रुग्णाबाबत निष्काळजी करतो तो चिकित्सा व्यवसायाचा नाही परंतु ख्रिस्ताचाही अनादर करतो.MHMar 71.2

    जे लोक स्वतः समजून घेतात की ते चिकित्सा व्यवसायाला योग्य नाही त्यांनी दुसरा कोणता तरी व्यवसाय निवडावा. परंतु ज्यांना रुग्णाची काळजी घेण्यामध्ये आनंद वाटतो परंतु त्यांचे चिकित्सा ज्ञान अल्प आहे त्यांनी परिचारीकेचे नम्र कार्य स्वीकारुन रुग्णांची सेवा करावी आणि हे कार्य विश्वासाने करणे शक्य होईल. योग्य चिकित्सक आत्मियतेने काळजीपूर्वक आपले कार्य विश्वासाने करतात त्यांना त्यामध्ये यश येते आणि ते अधिक शिकत राहतात. आजच्या तरुण चिकित्सकांसाठी आम्ही आमचा मुख्य चिकित्सक परमेश्वर, त्याचे सहकारी आहोत. त्याची तुमच्यावर जी कृपा आहे ती व्यर्थ जाऊ देऊ नका आणि कोणत्याही बाबतीत अडथळे येऊ देऊ शकत नाही. म्हणजे आमच्या सेवेला कोणी दोष देऊ शकणार नाही. तर प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराच्या सेवकांप्रमाणे आपले सद्गुण प्रगत करतात. (२ करिथ ६:१-४).MHMar 72.1

    आमच्यासाठी परमेश्वराचे हेच प्रयोजन आहे की आमची सतत उन्नती होत राहो. खऱ्या चिकित्सकता कुशलता प्राप्त होते त्यांना नेहमीच योग्य चिकित्स होण्याचे सतत प्रयत्न करायला हवेत. चिकित्सामध्ये तशा प्रकारची पदवीधर, हुशार आणि अनुभवी ख्रिस्ती चिकित्सक रुग्णांवर उपचार करण्यासाठी योग्य आहे. अशा चिकित्सकचा शोध करुन त्याची अशा ठिकाणी नियुक्ति करावी की तेथे तो रुग्णाची सेवा करु शकेल आणि विद्यार्थ्यांनाही चिकित्सेचे शिक्षण देऊ शकेल. चिकित्सकाला त्याचा स्वत:चा आत्मा परमेश्वराच्या वचनाने नेहमी प्रकाशित ठेवणे आवश्यक आहे. त्याला नेहमी कृपेमध्ये वाढत जाणे आवश्यक आहे. त्याच्या जीवनामध्ये धर्माचा प्रभाव सतत असणे आवश्यक आहे. यामुळे सर्व प्रभावित होतील. त्याचे विचार उच्च कोटीतील आणि पवित्र असावेत. त्याचे उच्च उद्देश परमेश्वराकडून येतात. यामुळे पापांवर विजय मिळविण्यासाठी आपणास शक्ति मिळते. त्यासाठी त्याने आपला प्राण आम्हांसाठी दिला आहे.MHMar 72.2

    जर चिकित्सक विश्वास आणि प्रयत्नपूर्वक आपले कार्य करील तर त्याच्या व्यवसायामध्ये त्याला यश प्राप्ती होईल त्याने जर स्वत:ला ख्रिस्ताच्या सेवेसाठी समर्पित केले तर आणि आपले हृदय तपासण्यात वेळ घालविला तर पवित्र आत्म्याचे पाचारण त्याला समजेल आणि स्वत:ला अशी शिस्त लाऊन घेईल व आपल्या कार्यामध्ये निपूणता प्राप्त करील तेव्हा त्याच्या प्रभावाने त्याच्या क्षेत्रातील लोक प्रभावित होऊन त्याची शिकवण व बुद्धीमत्ता चिकित्सेची कुशलता पाहून त्याच्याकडे आकर्षित होतील व परमेश्वराशी जोडले जातील. ख्रिस्ताचे सहाय्य रुग्णालयामध्ये जितके जास्त गरजेचे असते तितके इतर कोणत्याही व्यवसायामध्ये कमीच असते. या ठिकाणी खरोखरच उपचाराचे कार्य यशस्वीपणे पार पाडले जाते. जे चिकित्सक मन लावून व काळजीपूर्वक रुग्णाची सेवा करतात त्यांनी दररोज व प्रत्येक क्षण परमेश्वराच्या सान्निध्यात आपले जीवन ठेवले पाहिजे. रुग्णाचे जीवन चिकित्सकांच्या हाती असते. एक गंभीर रुग्ण वरील निष्काळजीपणा, एक चुकीचे उपचार किंवा चुकीची शस्त्रक्रिया किंवा कोणता ही चुकीचा निर्णयामुळे एखाद्याचे जीवन समाप्त होऊ शकते. हे अति गंभीर विचार आहेत. म्हणून जगातील चिकित्सक नेहमी स्वर्गीय चिकित्सकाच्या सान्निध्यात असायला हवा. त्याच्या नियंत्रणाखाली असायला हवा. MHMar 72.3

    मुक्तिदाता त्यांच्या सहाय्याला उत्सुक आहे जे त्याच्याकडे ज्ञान आणि बुद्धीचे मागणी करतात रुग्णांना बरे करण्याच्या सहाय्य मागणाऱ्या चिकित्सकांची विनंतीकडे तो कान देतो. जे चिकित्सक किंवा इतर कोणीही त्याच्यावर विसंबून राहतात. चिकित्सक जे रुग्णांवर उपचार करतात ते परमेश्वरावर किती अवलंबून राहतात ? जर एखाद्याचा जीव वाचवू पाहतो त्याने प्रत्येक निर्णय घेताना त्यांचे सहाय्य मागावे. म्हणजे कठीण कार्यामध्ये त्याचे सहकार्य लाभेल आणि चिकित्सकाचे कार्य सुलभ होऊन रुग्णाचे प्राण वाचू शकतील. रुग्णांची शुश्रुषा करणाऱ्यांना एक अद्भुत संधी लाभलेली आहे. रुग्णांनाही समजणे आवश्यक आहे की चिकित्सक त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी जे कार्य करीत आहेत त्यांना परमेश्वराची साथ आहे. त्यांना हे ही समजणे आवश्यक आहे की चिकित्सक आपणावर जे उपचार करीत आहेत किंवा प्रयत्न करीत आहेत ते स्वर्गीय शक्तिच्या सहाय्याची अपेक्षा करु शकतात.MHMar 73.1

    आजारी आणि दुःखी लोक या चिकित्सकावर जास्त विश्वास ठेवतात जे परमेश्वराचे भय धरतात व त्याच्यावर अवलंबून राहतात. त्याच्यावर प्रेम करतात. त्याच्या वचनावर त्यांचा भरवसा आहे. हे रुग्ण अशा चिकित्सकाच्या उपस्थितीमध्ये निर्भय व सुरक्षिततेचा अनुभव करतात.MHMar 73.2

    जे प्रभु येशूला ओळखतात ते ख्रिस्ती चिकित्सक प्रार्थना करुन रुग्णाच्या खोलीत जातात व उपचारा दरम्यान परमेश्वराच्या उपस्थितीची विनंती करतात. गंभीर शस्त्रक्रिया करते वेळी चिकित्सक त्या स्वर्गीय महान चिकित्सकाच्या उपस्थितीसाठी विनंती करतात आणि तसा विश्वास ते ठेवतात. त्याचबरोबर त्यांनी रुग्णांनाही त्यांनी आश्वासन द्यावे की परमेश्वर त्यांना या महान संकटातून नक्कीच वाचविल. कारण परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्यांना तो मोठ्या संकटातून नेहमीच सहज सुटका करील. आणि जे चिकित्सक असे करीत नाही तो रुग्णाच्या मृत्युस कारण होऊ शकतो. अशा रुग्णांचा जीव वाचविता येऊ शकतो. परंतु रुग्णाकडे दुर्लक्ष केल्यास परिणाम गंभीर होऊ शकतात. परंतु जर चिकित्सक रुग्णाशी सहानुभूतीने वागला, बरे होण्याची त्याची आशा वाढवून त्याला धीर दिला तर रुग्णामध्ये एक उत्साह निर्माण होऊन आत्म्यामध्ये आनंद निर्माण होते आणि बरे होण्याची त्याची इच्छा बळावते. अशा प्रकारचा विश्वास रुग्णामध्ये निर्माण करण्याचे कार्य चिकित्सक करु शकतो. त्याला प्रेरणा देऊ शकतो आणि रुग्णाबरोबर प्रार्थना करुन त्याला परमेश्वरासमोर सादर करु शकतो. अशा प्रकारे परमेश्वराचे सहाय्य मिळून गंभीर धोकासुद्धा टळू शकतो.MHMar 73.3

    रुग्णाला कोणत्या प्रकारचे भय आहे हे केवळ त्याचे हृदय वाचणाऱ्यालाच समजून येते आणि तोच त्याच्या मनातील भय दूर करुन त्याला धीर देऊ शकतो. त्याचा असमंजस दूर करु शकतो. चिकित्सकाच्या योग्यतेवर विश्वास ठेवून जो रुगण शस्त्रक्रियेसाठी तयार होतोच परंतु जो चिकित्सक शस्त्रक्रियेआधी प्रार्थना करतो त्याच्यापुढे परमेश्वरापुढे नम्र होऊन रुग्ण देवाचे सहाय्य मागतो त्याचा आत्मविश्वास वाढतो. भरवसा आणि कृतज्ञता परमेश्वराच्या शक्तिसाठी हृदये उघडली जातात. मनुष्याच्या पूर्ण व्यक्तिमत्वाच्या शक्ति सजीव होतात आणि जीवन शक्तिची सरशी होते. मुक्तिदात्याच्या उपस्थितीमध्ये चिकित्सकासाठी एक वरदान ठरते. तसे पाहता रुग्णावरील गंभीर शस्त्रक्रियेसाठी चिकित्सकाच्या मनामध्ये जबाबदारीची धास्ती निर्माण होते. अनिश्चितता आणि अस्वस्थपणामुळे भय निर्माण होते आणि त्यामुळे असक्षम होण्याची शक्यता असू शकते. परंतु स्वर्गीय सल्लाकार तेथे चिकित्सकाला मार्गदर्शन करण्यासाठी त्याच्या बाजूला उभे असतात, त्याला ते धीर देतात. साहस देतात आणि शांती देतात.MHMar 74.1

    जेव्हा संकट टळते समोर यश दिसून येते अशावेळी रुग्णाबरोबर काहीक्षण प्रार्थनेमध्ये धालविणे आवश्यक आहे. जे जीवन वाचविण्यात आले त्यासाठी देवाचे आभार मानने आवश्यक आहे. जेव्हा रुग्ण चिकित्सकाचे आभार मानतो तेव्हा तेव्हा परमेश्वराला धन्यवाद देऊन त्याची स्तुति करणे आवश्यक आहे. रुग्णाला सांगायला हवे की परमेश्वराने जो स्वर्गीय चिकित्सक आहे. त्याच्यामुळे जीवाचे रक्षण झाले आहे.MHMar 74.2

    जो डॉक्टर (चिकित्सक) अशा प्रकारच्या पद्धतीने रुग्णाला परमेश्वरावर विश्वास ठेवण्यास व त्याच्यावर अवलंबून राहण्यास शिकवितो त्यामुळे रुग्णामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.MHMar 75.1

    मेडिकल मिशनरी कार्यामध्ये आत्म्यांसाठी एक फार मोठी आणि खोल तडफड होणे आवश्यक आहे. सुवार्ता प्रसार सेवकांप्रमाणे डॉक्टर किंवा चिकित्सकांना सुद्धा अशाप्रकारच्या उच्चस्तराची सेवा देण्यात आली आहे. मग तुम्ही त्याची जाणीव ठेवा किंवा ठेऊ नका. प्रत्येक चिकित्सकाला आत्म्याच्या आरोग्याचे कार्य दिले गेले आहे.MHMar 75.2

    आजार आणि मृत्युच्या विषयामध्ये व त्या कार्यामध्ये अनेकदा चिकित्सका एक जीवनाची गंभीर अवस्था पाहतात आणि दुर्लक्ष करतात. अशावेळी तत्परता दाखवून रुग्णाच्या शारीरिक वेदना कमी करुन त्याच्या आत्म्यावर येणारे संकट दूर करणे अति आवश्यक आहे. असे होऊ शकते की ज्यांची ते सेवा करीत आहेत त्यांचा विश्वास उडू शकतो. त्याची शेवटीची वेळ त्याच्या हातून निसटून जात असल्यासारखे वाटते. परमेश्वराच्या न्यायालयासमोर त्या आत्म्याची नक्कीच चौकशी होईल...MHMar 75.3

    वेळेवर योग्य शब्द न बोलल्यामुळे आपण मौल्यवान आशीर्वादाला दुर्लक्षित करतो. रुग्णाच्या बिछान्याजवळ वादविवाद आणि मतभेदाविषयी काही बोलू नये. पीडित आणि दुःखी लोकांचे लक्ष त्याच्याकडे केंद्रित करायला हवे जो सर्वांची दुःखे हलकी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी उत्सुक आहे. जे त्याच्याकडे विश्वासाने येतात त्यांना तो सहाय्य करतोच तोच अशांना विश्वासु लोकांनी दुःखीत रुग्णांच्या मनात परमेश्वराविषयी विश्वास निर्माण करावा. जे रुग्ण मृत्युशय्येवर असतील त्यांनीही विश्वासाने परमेश्वरा जवळ यावे.MHMar 75.4

    जो चिकित्सक जाणतो की ख्रिस्त त्याचा व्यक्तिगत मुक्तिदाता आहे आणि तो त्याला शरण गेला आहे. त्याला ठाऊक आहे की दोषी आणि पापाने पीडित आत्म्याशी कसे वागावे. “उद्धारासाठी मी काय करावे’ असे तो विचारतो. तेव्हा त्याला उद्धाराची कथा सांगावी. तो स्वत:चा अनुभव विश्वास आणि मुक्तिदात्याची शक्तिविषयी स्वत: सांगू शकतो. सरळ व साध्या शब्दामध्ये तो मुक्तिदात्याकडे करुणा आणि दया मागणे आणि स्वीकार करण्यासाठी प्रोत्साहित करु शकतो. रुग्णामध्ये तशा प्रकारचा विश्वास निर्माण करु शकतो. म्हणून रुग्णाच्या बिछान्या जवळ त्याची सेवा करतेवेळी त्याला आराम आणि सहानुभूतीचे शब्द वापरुन त्याला सहाय्य करणे आवश्यक आहे. शारीरिक उपचार तर करावेच लागतील, परंतु त्यापेक्षा मानसिक उपचार अति महत्त्वाचे असतात. रुग्णाचे सर्व लक्ष त्याच्या दुखण्याकडेच असते. तेव्हा त्याला धीर देणे आवश्यक असते. रुग्णाला जेव्हा उद्धारकर्त्याकडे घेऊन गेल्यास त्याला ख्रिस्ताची शांती मिळते. त्याला आत्मिक आरोग्य प्राप्त झाल्यानंतर परमेश्वराचा हात त्याला आरोग्यदान प्रदान करतो व शारीरिक आरोग्य मिळण्यास सहाय्य होते. रुग्णाची सेवा करता करता रुग्णांच्या मित्रांची सेवा करण्याची संधी मिळते. जेव्हा रुग्णाचे मित्र वेदनेने तळमळणाऱ्या रुग्णाचे हाल मित्र अगतिक होऊन पाहात असतात. तेव्हा त्यांची हृदये द्रवले जातात. ज्या वेदना रुग्णास होतात त्या चिकित्सका शिवाय कोणाला सांगता येत नसतात आणि हीच वेळ असते जेव्हा त्या दुःखी मित्रांकडे रुग्णाकडे पाहण्यासाठी त्यांना निमंत्रित केले जाते. कष्टी व भाराक्रांत लोकांना तो आपल्याकडे बोलावितो. कदाचित त्यांच्याबरोबर एकत्रितपणे प्रार्थना करण्याची गरज असते. जो सर्व लोकांना बरे करतो. त्याच्याकडे सर्वांनी जाऊन प्रार्थना केल्यास तो सर्व त्रासातून मुक्त करील. अशांना परमेश्वराकडे वळवून त्यांचा विश्वास वाढवून विनंती पूर्व प्रार्थना करावी म्हणजे परमेश्वर त्यांना आजारातून व सर्व समस्यामधून सुटका करील. रुग्णाला त्याच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना परमेश्वराकडे घेऊन येण्याची हीच वेळ सर्वोत्तम आहे. त्यांना परमेश्वराच्या भांडारामधून नवे जुने अनुभव किंवा त्याची प्रचिती सांगणे आवश्यक आहे. या आधी रुग्णांना आलेले अनुभवाची उदाहरणे सांगावित. परमेश्वराचे पवित्र वचनातून त्यांना संदेश सांगून वचनांचा अभ्यास केल्यास रुग्ण व नातेवाईकांना परमेश्वराची ओळख होण्याचे मोठे सहाय्य लाभेल. देवाने नातेवाईकांना परमेश्वराची ओळख मोठे सहाय्य लाभेल. देवाने आजाऱ्यांसाठी काय चमत्कार केले होते याविषयी रुग्णांना सांगून त्याच्यावरील विश्वासाचे समाधान करणे हे अतिमहत्त्वाचे आहे. जगामध्ये असताना ख्रिस्ताने जे संदेश दिले लोकांचे दुःख आजार नाहीसे केले त्यांची सेवा केली. जेऊ घातले या सर्व गोष्टी रुग्णांना सांगाव्यात. निराश झालेल्या रुग्णांचे मन नव्या विचाराने ताजे करावे. त्यामध्ये ख्रिस्ताची आशा भरावी. रुग्णाच्या मनामध्ये ख्रिस्ताने केलेली रुग्णांची सेवा त्याने बरे केलेले रोग आजार, जन्मांधाला दिलेली दृष्टी, कुष्ठरोग्यांना बरे केले, एवढेच नाहीतर मेलेल्यांना जिवंत केल्याचे सांगून किंवा वाचून दाखवून दुःखी रुग्णामध्ये नव जीवनाची आशा निर्माण करणे हे चिकित्सक किंवा परिचारकांचे अति आशीर्वादित कार्य आहे. ते रुग्णांना सांगावे. रुग्णांवरची मुख्य चिकित्सा हीच तर आहे.MHMar 75.5

    ख्रिस्ताच्या वचनामध्ये तेच सामर्थ्य आहे जे तो या जगामध्ये असताना लोकांमध्ये फिरुन त्यांचे रोग आजार बरे करीत असे. येशूचे शब्दच असे होते की त्याने केवळ शब्दाने लोकांचे आजार बरे केले. शब्दाने भूते घालविली. त्याने आपल्या वचनाने समुद्र शांत केला, मृतांना जिवंत केले आणि लोकांनीही साक्ष दिली की त्याच्या शब्दांमध्ये शक्ति होती तीच शक्ति अजून ही त्याच्या वचनामध्ये आहे. त्याने वचने तशीच सांगितली जशी जुन्या करारामध्ये संदेष्ठे व शिक्षक यांना सांगितली होती. पूर्ण पवित्रशास्त्रामध्ये केवळ येशूचेच स्पष्टीकरण अति महत्त्वाचे आहे.MHMar 77.1

    पवित्र शास्त्रामध्ये लिहीलेले आणि बोललेली सर्व वचने परमेश्वराच्या वचनासारखीच स्वीकारणे आवश्यक आहे. जेव्हा दुःखी लोक येशूकडे आले तेव्हा केवळ त्याच्याकडेच त्यांचे लक्ष होते असे नाही, परंतु त्याची नजर त्यांच्यावरही होती जे भविष्यामध्ये विश्वास ठेऊन त्याच समस्या घेऊन त्याच्याकडे येणार होते. जेव्हा त्याने पक्षाघात झालेल्या मनुष्याला म्हटले. “मुला धीर धर तुझ्या पापाची क्षमा झाली आहे.” (मतय ९:२). जेव्हा त्याने कफर्नहूमच्या स्त्रीला म्हटले, “मुली तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा.” (लूक ८:४८). आणि जे इतर जे दुःखी पीडित लोक पापाने दबलेले लोक त्याची मदत मागण्यासाठी आले होते त्यांनाही तो हीच वचने बोलला होता. MHMar 77.2

    परमेश्वराची सर्व वचने अशाप्रकारची आहेत. तो व्यक्तिगत आपणास अशा प्रकारे बोलतो की आपण त्याची वाणी ऐकतो. अशा प्रकारची वचने ख्रिस्त आम्हांला त्याच्या कृपेने शक्ति देतो. तो त्या झाडांची पाने आहे जी “राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात.” (प्रकटीकरण २२:२). यांना प्राप्त करुन आत्मसात केल्याने ते आपल्या गुण स्वभावासाठी प्रोत्साहन आणि जीवनासाठी प्रेरणा व बळ अशी होतात. याशिवाय इतर कोणामध्ये अशा प्रकारची शक्ति असणार नाही असे आरोग्य प्राप्त होते. जीवन देणाऱ्या शक्तिसाठी असे साहस आणि विश्वास या शिवाय इतर कोणाकडून मिळणार नाही.MHMar 77.3

    भयाने थरथर कापत कबरेजवळ उभ्या असलेल्या व्यक्तिसाठी जो पापाच्या ओझ्याने वाकलेली व दबलेली व्यक्ति जेव्हा चिकित्सकाला संधी मिळते तेव्हा मुक्तिदात्याचे वचन वाचून दाखवितो कारण पवित्र शास्त्रातील वचने सर्वांसाठी आहेत. “भिऊ नको, कारण मी तुला सोडविले आहे मी तुला तुझ्या नावाने हाक मारिली आहे. तू माझा आहेस. तू जलातून चालशील तेव्हा मी तुजबरोबर असेन, नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडविणार नाहीत. अग्नितून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस. ज्वाला तुला पोळणार नाहीत. कारण मी परमेश्वर तुझा दोष आहे. मी इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा त्राता आहे. मी तुझ्याकरिता मिसर खंडादाखल दिला आहे. तुझ्याबद्दल कूश व सबा दिले आहेत. तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस. तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुजवर प्रेम करितो म्हणून तुझ्याबद्दल तुझ्या जिवाबद्दल मनुष्ये, राष्ट्रे मी देईन... भिऊ नको कारण मी तुझ्याबरोबर आहे, मी आपल्या करिता तुझे अपराध पुसून टाकितो मीच तो तुझी पातके स्मरत नाही. (यशया ४३:१४.५,२५). MHMar 78.1

    “जसा बाप आपल्या मुलावर ममता करितो, तसा परमेश्वर आपले भर धरणाऱ्यांवर ममता करितो. कारण तो आमची प्रकृती जाणतो आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवितो. (स्तोत्र १०३:१३-१४).MHMar 78.2

    “तू आपला देव याजपासून पतन पावून इकडे तिकडे प्रत्येक हिरव्या झाडाखालून परक्याबरोबर भटकलीस व माझा शब्द ऐकला नाही. हा आपला दोष मात्र पदरी घे. असे परमेश्वर म्हणतो.” (यिर्मया ३:१३).MHMar 78.3

    “जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वासनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्या सर्व अनीतिपासून शुद्ध करील.” (१ योहान १:९).MHMar 78.4

    “तुझे अपराध धुक्याप्रमाणे तुझी पातके अभ्राप्रमाणे मी नाही तशी केली आहेत. मजकडे फीर कारण मी तुला उद्धरीले आहे.” (यशया ४४:२२).MHMar 78.5

    “परमेश्वर म्हणतो चला आपण बुद्धिवाद करु. तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील. ती किरमिजी सारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील. तुम्ही माझे ऐकावयाला तयार व्हाल, तर भूमीचे उत्तम फळ खाल.” (यशया १:१८-१९).MHMar 78.6

    “मी सार्वकालिक प्रेम वृत्तीने तुजवर प्रेम करीत आलो म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे.” (यिर्मया ३१:३) MHMar 79.1

    “रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुजपासून क्षणभर लपवितो, पण मी तुजवर दया करीत तुजवर मी सर्वदा प्रसन्न राहीन असे तुझा उद्धारकर्ता परमेश्वर म्हणतो.” (यशया ५४:९). MHMar 79.2

    “तुमची अंत:करणे अस्वस्थ होऊ देऊ नका देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा.” (योहान १४:१). MHMar 79.3

    “मी तुम्हाला शांति देऊन ठेवतो, मी आपली शांति तुम्हाला देतो जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंत:करण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये.” (योहान १४:२७).MHMar 79.4

    “वाऱ्यापासून आसरा व वादळापासून निवारा असा मनुष्य होईल. रुक्ष भूमीत पाण्याचे नाले. तप्त भूमीत विशाल खडकाची छाया असा तो घेईल.” (यशया ३२:२)MHMar 79.5

    “दीन व दरिद्री पाणी शोधितात पण ते कोठेच नाही त्यांची जीभ तहानने कोरडी पडली आहे. त्यांची विनंती मी परमेश्वर ऐकेन मी इस्राएलचा देव त्यांचा त्याग करणार नाही.” (यशया ४१:१७).MHMar 79.6

    “परमेश्वर तुझा निर्माणकर्ता, गर्भावस्थेपासून तुझा घडणारा व सहाय्यकर्ता असे म्हणतो हे माझ्या सेवका याकोबा माझ्या निवडलेल्या यशूरुना भिऊ नको कारण मी तृषित भूमीवर पाणी आणि रुक्ष भूमीवर जलधारा ओतीन मी तुझ्या संतानावर माझ्या आशीर्वादाची वृष्टि करीन.” (यशया ४४:२-३). “खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला. आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हास शांति देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटकऱ्यांनी आम्हांस आरोग्य प्राप्त झाले.” (यशया ५३:५).MHMar 79.7

    *****