Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    आनंद

    “आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय.” (नीतिसूत्रे १७:२२). कृतज्ञता, आनंद मानने, एखाद्याचे भले करणे, परमेश्वरावरील प्रीति आजाऱ्यांची शुश्रुसा. आरोग्यदायी जीवन इस्त्राएल लोकांसाठी या सर्व गोष्टी अति महत्त्वपूर्ण होत्या.MHMar 215.6

    वार्षिक सणाच्या वेळी वर्षातून तीनवेळा यरुशलेमची यात्रा मंडपाचा सण या वेळी एक आठवडा मंडपामध्ये राहायचे हे घराबाहेरचे मनोरंजनाचे जीवन असायचे. हे आनंद साजरा करायचे सण असतात यामध्ये अनोळखी, लेवीय आणि गरीबांचे स्वागत करायचे असते. यामुळे हे दिवस प्रीति, आनंद दयेचे असायचे. “आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला व तुझ्या घराण्याला जे जे चांगले दिवस दिले त्याबद्दल सर्वांबद्दल आनंद कर. तुझ्या बरोबरचा लेवी व तुझ्या बरोबरचा उपरी ह्यांनीही त्यांचा आनंदाने उपभोग घ्यावा.” (अनुवाद २६:११). MHMar 216.1

    तसेच नंतरच्या वर्षामध्ये जेव्हा बाबेलच्या गुलामगिरीतून परत येणाऱ्यांसाठी परमेश्वराच्या आज्ञाने त्यांचे सांतवन केले कारण ते अत्याचारामुळे रडत होते त्यावेळी परमेश्वराच्या आज्ञा शास्त्राचा ग्रंथ वाचून दाखविण्यात आला. “हा दिवस तुमचा देव परमेश्वर याच्या प्रीत्यर्थ पवित्र आहे, तर शोक करु नका, रडू नका, कारण ते लोक नियमशास्त्रातील वचने ऐकून रडू लागले होते. तेव्हा त्याने त्यांस सांगितले जा मिष्टान्नाचे सेवन करा. गोडगोड पेय प्या व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यांस वाढून पाठवा. कारण आजचा दिवस परमेश्वर प्रीत्थयर्थ पवित्र आहे. तुम्ही उदास राहू नका. कारण परमेश्वरा विषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रय दुर्ग होय.” (नेहम्या ८:९-१०).MHMar 216.2

    सर्व नगरांमध्ये जाऊन यरुशलेमभर या गोष्टीचा प्रकार केला. “आपल्या सर्व नगरानगरात व यरुशलेमेत त्यांनी लोकांना जाहीर करावे व कळवावे की पहाडावर जाऊन जैतून, रानजैतून, मेंदी, खजूरी आणि दाट पालवीचे वृक्ष यांच्या डहाळ्या आणून शास्त्रात लिहिले आहे त्या प्रमाणे मांडव घालावे. मग लोकांनी बाहेर जाऊन डहाळ्या आणिल्या व आपापल्या घरावर धाब्यावर, त्यांच्या अंगणात देवाच्या मंदिराच्या अंगणात, पाणी वेशीच्या चौकात आणि एफ्राईम वेशीच्या चौकात मांडव घातले जे लोक बंदीवासातून सुटून परत आले होते त्यांचा अवघा मेळा मांडव घालून त्यात राहिला. नूनाचा पुत्र यशूवा याच्या काळापासून या दिवसापर्यंत इस्त्राएल लोकांनी कधी असे केले नव्हते. चोहोकडे आनंदच आनंद झाला. पहिल्या दिवसापासून शेवटल्या दिवसापर्यंत एज्रा देवाच्या नियशास्त्राचा ग्रंथ नित्यवाची या प्रकारे त्यांनी सहा दिवसापर्यंत सण पाळला आणि आठव्या दिवशी विधिपूर्वक सणाचा समारोप केला. (नेहम्या ८:१५-१८).MHMar 216.3

    परमेश्वराने इस्त्राएलांना त्यांच्या शारीरिक व नैतिक जीवनासाठी सर्व आवश्यक नियम दिले आणि नियमांकडे कोणत्याही प्रकारे नैतिक नियमांकडे कमी प्रमाणात लक्ष दिले गेले नाही. “ज्या गोष्टी तुला मी आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव आणि त्या तू आपल्या मुलाबालांच्या मनावर बिंबव आणि घरी बसलेले असता, निजता उठता त्या विषयी बोलत जा. त्या आपल्या हाताला चिन्हा दाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. आपल्या दाराच्या बाह्यांवर व आपल्या फाटकावर त्या लिही.” (अनुवाद ६:६-९). MHMar 217.1

    भविष्यकाळी तुझा मुलगा जेव्हा तुला विचारील की हे जे निबंध, विधी व नियम पाळण्याची आपला देव परमेश्वर ह्याने तुम्हांला आज्ञा केली. त्याचे प्रयोजन काय आहे ? तेव्हा तू आपल्या मुलाला सांग की आम्ही मिसर देशात फारोचे दास होतो. त्या समयी परमेश्वराने पराक्रमी हाताने आम्हांला मिसर देशातून बाहेर काढिले. परमेश्वराने आमच्या देखत मिसर देश फारो व त्याचे सर्व घराणे यांच्याविरुद्ध मोठी व पीडादायक चिन्हे व चमत्कार दाखविली आणि आपल्या पूर्वजांना शपथपूर्वक वचनाने देऊ केलेल्या देशात आम्हांला न्यावे म्हणून त्याने तेथून आम्हांला बाहेर काढिले. आपण आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगावे आपले निरंतरचे कल्याण व्हावे आणि परमेश्वराने आपणाला आजपर्यंत जिवंत राखावे म्हणून त्याने हे सर्व विधि पाळण्याची आम्हाला आज्ञा दिली.” (अनुवाद ६:२०-२४).MHMar 217.2

    जर इस्त्राएल लोकांनी देवाने दिलेल्या सर्व निर्देशांचे पालन केले असते जे त्यांना मिळाले होते आणि त्या संधीचा लाभ त्यांनी मिळविला असता तर ते आरोग्य आणि संपन्नतेच्या विषयी जगातील एक आदर्श लोक सिद्ध झाले असते. जर ते परमेश्वराच्या प्रजेसारखे त्याच्या योजनेप्रमाणे आपले जीवन व्यतीत केले असते तर ते रोग आजारांपासून सुरक्षित राहिले असते. इतर देश ही या समस्येतून सुटले नाहीत. इतर समाज्याच्या लोकांपेक्षाही यांची शारीरिक व मानसिक बुद्धी जास्त प्रमाणात झाली असती. जगातील सर्व समाजापेक्षा हे प्रबळ राष्ट झाले असते. जसे परमेश्वराने सांगितले होते “तू सर्व राष्ट्रांपेक्षा अधिक आशीर्वादित होशील.” (अनुवाद ७:१४).MHMar 217.3

    “आणि परमेश्वरानेही आज मान्य केले आहे की, तुला सांगितल्याप्रमाणे तू माझी खास प्रजा आहेस. तू माझ्या सर्व आज्ञा पाळ म्हणजे मी निर्माण केलेल्या सर्व राष्ट्रांपेक्षा, प्रशंसा, नावलौकिक आणि सन्मान ह्या बाबतीत तुला श्रेष्ठ करीन आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे तू परमेश्वर आपला देव ह्याची पवित्र प्रजा होशील.” (अनुवाद २६:१८-१९). MHMar 217.4

    “तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. नगरात तू आशीर्वादीत होशील व शेतीवाडीत तू आशीर्वादीत होशील. तुझ्या पोटचे फळ तुझ्या भूमीचा उपज आणि तुझी खिल्लारे, गुरे-ढोरे, शेरडे मेंढरे ह्यांचे वत्स आशीर्वादीत होतील. तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादीत होतील. तू आत येशील तेव्हा आशीर्वादीत होशील व बाहेर जाशील जेव्हा आशीर्वादीत होशील. (अनुवाद २८:२-६).MHMar 218.1

    तुझ्या धान्याच्या कोठारांना व तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला परमेश्वर बरकत देईल. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देईल त्यात तुला बरकत देईल. तू आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळून त्याच्या मार्गांनी चालशील तर तो आपल्या शपथेला जागून तुला आपली पवित्र प्रजा करुन स्थिर ठेविल. परमेश्वराचे नाव तुला दिले आहे. हे पृथ्वीवरील सर्व राष्ट्र पाहतील तेव्हा त्यांना तुझा धाक वाटेल आणि जी भूमि परमेश्वराने तुला देण्याची तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिली होती तीत तुझ्या पोटचे फळ तुझ्या गुराढोरांचे वत्स व तुझ्या भूमीचा उपज ह्यांची तुझ्या कल्याणासाठी तो अभिरुद्धि करील. परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार म्हणजे आकाश खुले करुन तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडील व तुझ्या हातच्या सर्व कामाला बरकत देईल. तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील पण तुला कोणाकडून उसने घ्यावे लागणार नाही. तुझा देव परमेश्वर ह्याच्या ज्या ह्या आज्ञा मी तुला देत आहे. त्या ऐकून तू काळजीपूर्वक पाळशील तर परमेश्वर तुला पुच्छ नव्हे तर मस्तक करील. तू खाली नव्हे तर वर राहशील.” (अनुवाद २२:८-१३).MHMar 218.2

    अहरोन व त्याचे मुलगे यांना परमेश्वराने निर्देश केले होते.MHMar 218.3

    “तुम्ही इस्त्राएल लोकांना ह्या प्रमाणे म्हणा. परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे रक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुजवर पाडो व तुझ्यावर कृपा करो परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुला शांती देवो.” (गणना ६:२३-२६).MHMar 218.4

    “हे यशुरुना देवासमान कोणी नाही तो तुझ्या सहाय्यासाठी मेघ मंडळावर आरुढ होऊन आपल्या प्रतापाने आकाशमार्गाने धाव घेतो. अनादि देव तुझा आश्रय आहे. सनातन बाहूंचा तुला आधार आहे. त्याने शत्रूला तुझ्यापुढून टाकून दिले व म्हटले त्याचा नाश कर.” (अनुवाद ३३:२५-२९)MHMar 218.5

    “हे इस्त्राएला, तू धन्य आहेस परमेश्वराने उद्धारलेल्या राष्ट्रा तुझ्या समान कोण आहे ? तो तुझ्या सहाय्याची ढाल आहे. तुझ्या प्रतापाची तरवार आहे. ह्यामुळे तुझे शत्रु तुला शरण येतील. तू त्यांची उच्चस्थाने पादाक्रांत करशील.” (अनुवाद ३३:२९).MHMar 219.1

    इस्त्राएल लोक परमेश्वराचे उद्देश पूर्ण करण्यासाठी अपयशी झाले आणि अशाप्रकारे ते त्या आशीर्वादाला वंचित झाले. तो त्यांना मिळू शकत होता. परंतु योसेफ आणि दानिएल यांच्यामध्ये मोशे व एलिया आणि अनेक दुसरे लोकांची आम्हांला चांगलीच उदाहरणे आहेत. जी जीवनाच्या खऱ्या योजनांचे पालन करतात. त्याचे परिणाम आहेत. त्यांच्या सारखा विश्वास दाखविणारे आजही तेच परिणाम दिसून येतील. आमच्यासाठी लिहिले आहे, “पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे, स्वत:चे लोक असे आहा. ह्यासाठी की ज्याने तुम्हांस अंधकारातून काढून आपल्या अद्भूत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे.” (१ पेत्र २:९).MHMar 219.2

    “जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवितो ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे तो धन्य.” (यिर्मया १७:७).MHMar 219.3

    नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल तोलबानोनावरील गंधसरुसारखा वाढेल. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत. ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. वृद्धपणातही ते फळ देत राहतील ते रसभरीत व टवटवीत असतील. ह्या वरुन दिसेल की परमेश्वर सरळ आहे. तो माझा दुर्ग आहे त्याच्या ठायी अन्याय मुळीच नाही.” (स्तोत्रसंहिता ९२:१२-१५).MHMar 219.4

    “तेव्हा तू आपल्या मार्गाने निर्भय चालशील तुझ्या पायाला ठोकर लागणार नाही. तू नीजतेवेळी भिणार नाहीस तू नीजशील आणि तुझी झोप सुखाची होईल. तू आकस्मात आलेल्या धोक्याला भिऊ नको. दुष्टांची धाड आली तरी भिऊ नको. कारण परमेश्वर तुझा रक्षणकर्ता होईल. तो तुझा पाय गुंतू देणार नाही.” (नीतिसूत्रे ३:२३-२६).MHMar 219.5

    *****

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents